BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Husk at besøge podcastens hjemmeside og støtte skaberen: www.bbc.co.uk
Forfatter
BBC Marathi Audio
Kategori
Podcastens hjemmeside
Seneste episode
25. mar. 2026
Hvor kan du lytte?
Podcasts i appen Replaio Radio Kommer snartPodcasts kommer snart til appen. Installer nu, og vær den første til at se en helt ny tilgang til podcasts
Episoder
सोपी गोष्ट पॉडकास्ट: नवऱ्याने बळजबरी केली तर तो बलात्कार नाही? 27.08.2021 6:01
लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं मनानं, शरीरानं, सर्वार्थानं एकत्र येणं. पण या नाजूक नात्याच्या पडद्याआड एखाद्या महिलेवर तिच्या नवऱ्यानंच बळजबरी केली तर? तो गुन्हा ठरेल का? हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे, तो छत्तीसगढ हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे. हा निर्णय काय आहे? विवाहअंतर्गत बलात्कार म्हणजे मॅरिटल ररेपविषयी भारतीय न्यायव्यवस्था आणि सरकारची भूमिका काय आहे? आणि मुळात नवऱ्यानं बळजबरी केली तर ती बलात्क...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकार रेल्वे, हायवे, सरकारी कंपन्या भाड्याने का देतंय? मुद्रिकरण म्हणजे काय? 27.08.2021 6:26
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी दिल्लीत जाहीर केलेल्या नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन (NMP) नुसार सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या मालकीची एकूण सहा लाख कोटी रुपयांची मालमत्ता खासगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर दिली जाणार आहे. त्यावरून राहुल गांधी आक्रमक झालेत आणि सरकार सगळी संपत्ती विकून टाकतंय असा त्यांनी आरोप केलाय. राहुल गांधींना मॉनेटायझेशनचा अर्थच कळला नाही, असं सरकारचं...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: देशात तिसरी लाट येणार आहे का? 25.08.2021 5:17
कोरोनाचे आकडे आता कमी होत आहेत. सार्वजनिक ठिकाणं उघडत आहेत. आयुष्य हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात होतेय.. पण त्यातच बातमी आली की तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येऊ शकते. खरंच तसं होणार आहे का? त्याबद्दल जाणकार, डॉक्टर आणि सरकारचं काय म्हणणं आहे? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: उद्धव-राणे वादाची ठिणगी कशी पडली? 24.08.2021 5:12
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. शिवसेनेनं पोलिसांत तक्रार दाखल करण्याबरोबरच राज्यांत राणेंच्या विरोधात आंदेलनही सुरू केलं आहे. नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे हा वाद तसा पंचवीस वर्षं जुना आहे. आज सोपी गोष्टमध्ये बघूया दोघांमध्ये वादाची ठिणगी नेमकी कशी पडली? संशोधन - अमृता कदम, ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके ए...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदींची लोकप्रियता घसरत आहे का? 23.08.2021 4:59
देशात आणि देशाबाहेरही अलीकडे झालेल्या काही सर्वेक्षणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घसरत चालल्याचं समोर आलं आहे. इंडिया टूडे साप्ताहिकाने केलेल्या ताज्या सर्वेक्षणात तर फक्त 24% लोकांना वाटतंय की, नरेंद्र मोदीच पुढचे पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार आहेत. मोदींची लोकप्रियता खरंच घसरतेय का? घसरत असेल तर पुरावा काय? आणि काय आहेत त्या मागची कारणं, पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन -...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: तालिबानचं धोरण खरंच सौम्य होईल का? 20.08.2021 5:16
तालिबानने अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकार आणण्याची आणि आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर जुळवून घेण्याची ग्वाही दिली आहे. पण, आपल्या मूळ कट्टरतावादी विचारसरणीशी ते कितपत फारकत घेतील हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. तालिबानच्या प्रवक्त्यांनी केलेले दावे आणि प्रत्यक्ष वास्तव पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन - बीबीसी टीम लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: तालिबानचा पाडाव शक्य आहे का? 19.08.2021 4:53
एकीकडे तालिबानने रविवारीच युद्धसमाप्तीची घोषणा केली आहे. आणि ते सरकार स्थापनेच्या प्रयत्नांत आहेत. तर तालिबान विरोधी गट पंजशीर खोऱ्यात एकत्र येताना दिसतोय. आधीचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह आणि संरक्षणमंत्रीही या गटात आहेत, असं बोललं जातंय. पण, तालिबान विरोधी या गटाला तालिबानचा पाडाव करणं जमेल का? पाहूया अफगाणिस्तानमध्ये काय सुरू आहे आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन - बीबीसी टीम लेखन, निवेदन-...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: शरिया कायदा म्हणजे नेमकं काय? 18.08.2021 6:30
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यावर ते मुस्लीम राष्ट्र असल्याचं घोषित केलंय. तेव्हापासून अफगाणिस्तानात आता शरिया कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू होणार का, ही चर्चाही जगभर सुरू झालीय. पण, मूळात शरिया कायदा नेमका आहे काय? तो इतका वादग्रस्त का आहे? याविषयी जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन - बीबीसी टीम लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: तालिबानचे अफगाणिस्तानातील नवे नेते 17.08.2021 6:47
तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवलंय. यावेळी तालिबान नेतृत्व इतर देशांशी आंतरराष्ट्रीय संबंध सलोख्याचे ठेवण्यावर भर देईल. आणि त्यासाठी कट्टरतावाद थोडा कमी करेल असं बोललं जातंय. पण, मूळात तालिबानची रणनिती ठरवतं कोण? आणि आताही अफगाणिस्तानवर राज्य करणारे तालिबानचे प्रमुख नेते कोण आहेत? त्यांची ओळख करून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन - बीबीसी टीम लेखन, निवेद...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: अफगाणिस्तान-तालिबान युद्धाचे थरारक 72 तास 16.08.2021 5:48
तालिबानसाठी लढणारे हातात बंदुका घेऊन एकेक शहर पादाक्रांत करत राजधानी काबूलच्या दिशेने येत होते. तालिबानचं सैन्य फक्त 60 हजारांचं आणि अफगाण सरकारकडे होते 3 लाखांहून जास्त सैनिक. तालिबानकडे होते लुटलेली, जुनी शस्त्र. तर अफगाण फौजांकडे होते अत्याधुनिक शस्त्रास्त्र. पण असं असून फक्त 72 तासांमध्ये तालिबानने एकेक करत डझनभर शहरांवर ताबा मिळवत काबुल गाठलं. पत्त्याच्या बंगल्यासारखं का कोसळलं अफगाणिस्तान सर...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लशीमुळे गर्भपाताचा धोका असतो का? 13.08.2021 5:30
कोव्हिडची लस घेतली तर गरोदर महिलांना गर्भपाताचा धोका असतो. कोव्हिड लस गर्भनाळेवर हल्ला करू शकते. कोव्हिडच्या लशीमुळे पुरुषांना नपुंसकत्व येऊ शकतं असे अनेक दावे तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. कोव्हिड लशींचे काही दुष्परिणाम निश्चितच आहेत पण त्यामागची तथ्यं जाणून घेणं गरजेचं आहे. या काही दाव्यांचा हा फॅक्ट चेक. संशोधन- टीम बीबीसी लेखन - सिद्धनाथ गानू निवेदन- अमृता दुर्वे एडिटिंग- निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये तालिबानला पाठिंबा देऊन भारताला शह देऊ पाहतंय का? 12.08.2021 5:09
अफगाणिस्तानमध्ये तालिबान वेगाने मोठाले प्रदेश काबीज करत चाललं आहे. तालिबानने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानी नेत्यांच्या विधानांवरून दिसतं की ते अफगाण सरकारपेक्षा तालिबानला प्राधान्य देत आहेत. तालिबानला बळ देऊन भारताला शह देण्याचा हा प्रयत्न आहे का? पाकिस्तानला यातून काय साध्य करायचं आहे?ऐका ही सोपी गोष्ट. संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन-...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओबीसी लोकसंख्येची मोजणी करायला मोदी सरकार का तयार नाही? 11.08.2021 6:35
जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी जोर धरतेय. 2021 च्या जनगणनेत जातिनिहाय मोजणी झाली नाही तर देशातले दलित आणि मागासवर्गीय त्यावर बहिष्कार टाकतील असा इसारा लालू प्रसाद यादव यांनी दिला आहे. जातींची मोजणी झाली तर आरक्षणाची गणितं सोपी होऊ शकतील असाही अनेकांचा दावा आहे. पण मोदी सरकारचा जातिनिहाय जनगणना करायला नकार आहे. 2021 च्या जनगणनेत ओबीसींची गणना होणार असं मोदी सरकारने 2018 मध्ये म्हटलं होतं, मग आता स...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: IPCC Climate Change Report भारताला काय धोक्याचा इशारा देतो? 10.08.2021 6:38
संयुक्त राष्ट्रांच्या IPCC या संस्थेने हवामान बदलावरील आपल्या अहवालात संपूर्ण जगासाठी काही अत्यंत गंभीर इशारे दिलेत. भारतालाही अनेक धोक्याचे इशारे देण्यात आलेत. या शतकात भारताला पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळं यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना अनेकदा करावा लागू शकतो असं हा अहवाल सांगतो. हे सगळं का होतं आहे? हे रोखण्यासाठी काय करता येईल? आता केलेले प्रयत्न उपयोगी येतील की वेळ निघून गेली आहे?...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन एकत्र घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते? 10.08.2021 3:47
एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या लशींचे डोस घ्यायचे नाहीत असंच भारत सरकार आतापर्यंत सांगत आलंय. पण आता ICMR चं एक संशोधन म्हणतं की कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन चा प्रत्येकी एक डोस घेतला तर कोरोनापासून जास्त संरक्षण मिळतं. जगातले इतरही देश लसीकरण करताना दोन वेगवेगळ्या लशींचे डोस देतात. पण भारतात असं होईल का? ऐका आजची सोपी गोष्ट. संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: चुंबन घेणं कायद्याने गुन्हा आहे का? 06.08.2021 6:04
मुंबईत एका सोसायटीने अलीकडेच बाहेरच्या रस्त्यावर ‘नो किसिंग झोन’ असा बोर्ड लावला आहे. लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक बागा आणि चौपाट्या बंद असल्यामुळे तरुण प्रेमी युगुलं सोसायट्यांच्या बाहेर एकत्र जमतात, एकमेकांना मिठी मारतात, चुंबन घेतात. याला आळा बसावा हा सोसायटीवाल्यांचा प्रयत्न होता. तर मुलांच्या मते इतर जागा बंद असल्यामुळे ते असे जमतात. कुणाला त्रास देण्यासाठी नाही. या प्रकारातून पुन्हा एकदा सार्वजनिक...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: पाक पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान भाड्याने देणार का? 05.08.2021 4:03
एखादा देश इतका गरीब झालाय की त्यांनी पंतप्रधानांचं निवासस्थानच भाड्याने देण्यासाठी काढलंय असं तुम्ही कुठे ऐकलंत तर! आणि त्यातही हा देश पाकिस्तान असेल तर! सरकारी कामकाजावर होणारा खर्च कमी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने पंतप्रधानांचं निवासस्थानच भाड्याने देऊ केल्याची बातमी मध्यंतरी तिथल्याच काही टीव्ही चॅनलनी दिली होती. मग ती भारतातही पसरली. पण हे खरं आहे का? ही बातमी आली कुठून? या मागचं वास्तव काय आह...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाच्या बुस्टर डोसची गरज आहे का? 04.08.2021 4:48
कोरोना व्हायरस इतका बदलतोय म्हणजे म्युटेट होतोय की, जगभरात लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना झाल्याच्या काही घटना समोर आल्यात. त्यावर उपाय म्हणून काही देशांनी लशीचे बूस्टर डोसही सुरू केले. तेव्हापासून तुमच्यातल्या काही प्रेक्षकांनीही हा प्रश्न पॉडकास्ट किंवा सोपी गोष्टमध्येही अनेकदा विचारलाय, की लशीचा बुस्टर डोस घेण्याची गरज आहे का? आज सोपी गोष्टमध्ये हेच जाणून घेऊया… संशोधन - मयांक भागवत लेखन, न...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: ई-रुपी म्हणजे नेमकं काय? 02.08.2021 6:12
केंद्रसरकारच्या महत्त्वाकांक्षी ई-रुपी योजनेचं उद्घाटन सोमवारी झालंय. या अंतर्गत विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना एका मोबाईल संदेशाद्वारे आर्थिक मदत मिळू शकेल. लोकांच्या हातात एका मोबाईल क्लिकवर पैसे देणारी ही ई-रुपी योजना आणि तिचे फायदे-तोटे समजून घेऊया संशोधन- ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: तालिबान चीनच्या मदतीने भारताला धोका ठरेल का? 29.07.2021 5:41
अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि नाटो सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबान वेगाने मोठाल्या भूभागावर नियंत्रण मिळवतंय. त्याचवेळी तालिबानी शिष्टमंडळ चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट घ्यायला पोहोचलं. चीनच्या मदतीने तालिबान अफगाणिस्तानावरची आपली पकड मजबूत करू पाहतंय. चीन आणि तालिबानचं जवळ येणं भारतासाठी धोकादायक ठरू शकेल का? संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागांमध्ये नेत्यांच्या दौऱ्यांनी अडथळे आणले का? 29.07.2021 5:27
कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पुराने हाहाःकार माजवला. यापूर्वीही अनेक भागांना पुराचा असाच तडाखा बसला होता. पण त्या अनुभवातून प्रशासनाने काहीच धडा घेतला नाही का असा प्रश्न हे पूरग्रस्त करत आहेत. आधी नियोजनाचा अभाव, नंतर एकापाठोपाठ एक नेत्यांचे दौरे आणि त्यात अडकलेलं प्रशासन या सगळ्याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला. यावेळचा पूर रोखण्यात नियोजन कमी पडलं का? नेत्यांचे दौरे मदतकार्यात अ...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: आसाम मिझोरम सीमावाद काय आहे? त्यात पोलिसांचा मृत्यू कसा झाला? 27.07.2021 6:28
दोन राज्यांमध्ये असलेला सीमावाद ही काही नवीन गोष्ट नाही. पण आसाम आणि मिझोराममधील सीमावाद इतका टोकाला गेला की दोन्ही पोलीस दलांमध्ये संघर्ष झाला. आसामचे सहा पोलीस या संघर्षात मारले गेले. आज मिझोराम राज्य असलेला प्रदेश एकेकाळी आसामचा भाग होता. मग या सीमावादाची सुरुवात झाली कुठे? ही दोन राज्य हा प्रश्न मिटवू शकतील की नाही? संशोधन- सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: चिपळूण, कोल्हापूर पुरामागे हवामान बदल हे कारण आहे का? 26.07.2021 6:53
गेल्या काही वर्षांत दुष्काळ, ढगफुटी, पूर अशी टोकाची उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. आपल्याला एकाच वेळी दोन टोकाच्या संकटांशी सामना का करावा लागतो आहे? या सगळ्या गोष्टींमागे हवामान बदल हे कारण आहे का? जगभरात तापमानवाढ आणि हवामान बदलाबद्दल काही काळ चर्चा होत आहे. या सगळ्याचे आपल्यावर काय परिणाम होतायत? संशोधन- सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: उदारीकरण म्हणजे काय? त्याने भारताचा फायदा झाला की तोटा? 23.07.2021 5:44
24 जुलै 1991 ला डॉ. मनमोहन सिंग यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाने भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली. भारताने उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि एक मोठं संकट टळलं. पण उदारीकरण म्हणजे नेमकं काय? त्याचा फायदा झाला की तोटा? संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: लॉकडाऊन न लावता जपानने कोव्हिडवर नियंत्रण मिळवलं का? 22.07.2021 5:13
कोरोना व्हायरसचा झपाट्याने प्रसार होत असताना जपानने वेगाने आपल्या सीमा बंद केल्या नाहीत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी इतर अनेक देशांप्रमाणे जपानने लॉकडाऊनचाही आधार घेतला नाही. काही काळपर्यंत जपानने कोव्हिडवर नियंत्रण मिळवल्याचं चित्र होतं. पण आता जपानमध्ये काय परिस्थिती आहे? टोकियो ऑलिम्पिकपूर्वी जपानमध्ये केसेस का वाढत आहेत? संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
Lignende podcasts
Replaio er ikke podcastudgiver; programmernes navne, coverbilleder og lyd tilhører deres ophavsmænd og distribueres via offentlige RSS-feeds.