BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Husk at besøge podcastens hjemmeside og støtte skaberen: www.bbc.co.uk

Forfatter

BBC Marathi Audio

Kategori

Health

Podcastens hjemmeside

www.bbc.co.uk

Seneste episode

25. mar. 2026

Hvor kan du lytte?

Podcasts i appen Replaio Radio Kommer snart

Podcasts kommer snart til appen. Installer nu, og vær den første til at se en helt ny tilgang til podcasts

Hent den på Google Play Installer gratis Android næsten 10 mio. downloads · 4,8 i bedømmelse iOS snart

Episoder

सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारत चीन युद्धानंतर चीनने माघार का घेतली होती? 16.10.2021

भारत आणि चीन सीमेवरून गेली अनेक दशकं वाद सुरू आहे. चीनने 1962 मध्ये भारतावर आक्रमण केलं होतं, पण त्यानंतर त्यांनी युद्धात वरचढ ठरत असूनही माघार घेतली. भारताने चीनविरोधात काय डावपेच लढवले? चीन आजही भारतीय भूभागांवर दावा का सांगतो? अरुणाचल प्रदेशला चीन दक्षिण तिबेट का म्हणतो? ऐका ही सोपी गोष्ट. संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- शरद बढे

सोपी गोष्ट पॉडकास्ट: शिवसेनेनं इलेक्टोरल बाँड्समधून किती कमाई केली? | सोपी गोष्ट 445 12.10.2021

मोदी सरकारने राजकीय पक्षांना देणगीतून मिळणारा काळा पैसा दूर ठेवण्याच्या इराद्यानं 2017 साली इलेक्टोरल बाँड्सची योजना आणली होती. तेव्हापासूनच इलेक्टोरल बाँड्सवर सातत्याने टीका होतेय. पण भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांसारख्या राष्ट्रीय पक्षांप्रमाणेच शिवसेनेसारखे प्रादेशिक पक्षही इलेक्टोरल बाँड्सचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचं एका अहवालातून समोर आलंय. संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – जान्हवी...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: चीन तैवानबरोबर युद्ध करण्याची तयारी करतोय का? 11.10.2021

गेल्या काही दिवसांत चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत घिरट्या घालायला सुरुवात केली. चीन म्हणतं तैवान त्यांचाच एक प्रांत आहे, पण तैवानचं म्हणणं आहे की ते एक स्वतंत्र राष्ट्र आहेत आणि चीन आपलं म्हणणं त्यांच्यावर लादू शकत नाही. अशात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग चीनच्या एकीकरणाबद्दल बोलतायत. चीन तैवानशी युद्ध करण्याची तयारी करतोय का? यांच्यातलं भांडण नेमकं कुठे सुरू झालं? संशोधन, लेखन, न...

सोपी गोष्ट: मलेरियाची लस यायला 100 वर्षं का लागली? 09.10.2021

जवळपास 100 वर्षांनंतर मलेरियावरची पहिली लस उपलब्ध झालीय. आफ्रिका खंडातल्या 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना या RTS,S लशीचे 4 डोस आता देण्यात येणार आहेत. 2019 या एका वर्षात आफ्रिकेत तब्बल 2,60,000 बालकांचा जीव मलेरियामुळे गेला होता. त्यामुळे ही लस या लहानग्यांच्या दृष्टीने विज्ञानातला एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे महासंचालयक ट्रेड्रॉस गिब्रायसुस यांनी म्हटलंय. पण मलेरियाची लस व...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: गरीब-श्रीमंत दरी कमी करण्यासाठी चीन काय करणार आहे? 08.10.2021

शी जिनपिंग यांच्या कॉमन प्रॉस्पेरिटी या उद्दिष्टासाठी चीन काय पावलं उचलतोय याकडे जगाचं लक्ष आहे. गरीब-श्रीमंत दरी कमी करण्यासाठी चीन काय करणार आहे? उच्च उत्पन्न असलेल्यांना चीन काय संदेश देतं आहे? बड्या उद्योगांना या धोरणाचा फटका बसणार आहे का? संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ऐन सणासुदीला घरी बत्ती गुल होणार का? 06.10.2021

गेले काही दिवस देशात कोळशाचा साठा संपत आल्यामुळे काही राज्यांमध्ये अचानक वीज जाऊ शकते किंवा लोड शेडिंगही सुरू करावं लागू शकतं, अशा बातम्या सगळीकडे पसरल्या आहेत. कोरोनानंतर वाढलेली मागणी आणि त्याप्रमाणात उत्पादन होत नसल्यामुळे ही समस्या सध्या उद्भवली आहे. पण, खरंच वीज निर्मिती ठप्प होऊन सणासुदीच्या काळात आपल्याला अंधारात जावं लागेल का? आणि इतकी वर्षं झाली तरी आपण अजून कोळशाऐवजी इतर नैसर्गित स्त्रोत...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: चीन जगाला कर्जाच्या दलदलीत ढकलतो आहे का? 01.10.2021

चीनने जगाला कर्जाच्या दलदलीत अडकवलं आहे का, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. अमेरिके पाठोपाठ चीनही जगातली दुसरी आर्थिक महासत्ता आहे. पण, अध्यक्ष शी जिनपिंग यांचा महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्प मात्र गरीब देशांच्या जीवावर उठला आहे का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण, अशा प्रकल्पामधून चीनची रणनिती स्पष्टपणे दिसतेय. आणि ती म्हणजे जगातल्या जमेल तितक्या देशांमध्ये पायाभूत सुविधा उभारणीसाठ...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: डिजिटल हेल्थ आयकार्ड कसं काढायचं? ते फायद्याचं की तोट्याचं? 29.09.2021

डॉक्टरकडे गेल्यावर पेशंटची मेडिकल हिस्ट्री घेताना अनेकदा खूप वेळ लागतो. पण तुमची आरोग्यविषयक सगळी माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रकल्प आहे. आयुष्यान भारत डिजिटल मिशनच्या माध्यमातून प्रत्येकाला एक हेल्थ आयडी मिळू शकेल ज्यावर त्यांची सगळी आरोग्यविषयक माहिती साठवली जाईल. याचा नेमका कसा फायदा होईल? यात कुठले धोके आहेत का? ऐका आजची सोपी गोष्ट. संशोधन- कमलेश लेखन, निवेदन- सिद्धनाथ...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: सर्वात श्रीमंत मंदिर अडचणीत का आलं? | सोपी गोष्ट 435 28.09.2021

केरळचं पद्मनाभस्वामी मंदिर जगातलं सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. पण याच मंदिराचा कारभार चालवण्यासाठी देवस्थानच्या समितीला आर्थिक मदतीची गरज भासली, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दादही मागितली. पण त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. पद्मनाभस्वामी मंदिराची गोष्ट काय आहे? आणि अशा श्रीमंत देवस्थानांच्या संपत्तीचा सरकारला वापर करता येईल का? संशोधन – इमरान क़ुरैशी, टीम बीबीसी लेखन, निवेदन – जान्हवी...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ईव्हरग्रांड क्रायसिस नेमका काय आहे? 24.09.2021

ईव्हरग्रांड या चिनी रियल इस्टेट कंपनीवर तब्बल 300 अब्ज अमेरिकन डॉलरचं कर्ज आहे. हे कर्ज अवाढव्य चीनच्या जीडीपीच्या 2% इतकं आहे. मूळात कंपनीवर इतकं कर्ज कसं झालं. आणि त्यामुळे जगावर 2009च्या लेहमन ब्रदर्स सारखं मंदीचं संकट येऊ शकतं का? जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारतात हिंदूंची संख्या कमी होतेय का? 23.09.2021

2011च्या भारतीय जनगणनेचा धर्मावर आधारित अभ्यास करून प्यु रिसर्च सेंटर या अमेरिकन संस्थेनं काही लक्षवेधक निरीक्षणं मांडली आहेत. मुस्लीम समाज जास्त मुलं जन्माला घालत असल्यामुळे त्यांची लोकसंख्या वर्षानुवर्षं गेली. उलट हिंदू लोकसंख्या काळाबरोबर कमी होत असल्याचा समज समाजात असतो. पण, प्यु रिसर्चच्या अहवालानुसार, मुस्लीम स्त्रियांचा प्रजनन दर मागच्या पन्नास वर्षांत 50 टक्क्यांनी कमी झाला आहे. भारतात हिं...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: स्वतःच्या नावापुढे आईचं नाव लिहीण्यात काय अडचणी येतात? 21.09.2021

स्वतःच्या नावापुढे वडिलांच्या नावासह किंवा त्याऐवजी आईचं नाव लिहीण्याची अनेक उदाहरणं सध्या पाहायला मिळतात. पितृसत्ताकाला आव्हान देणं ही त्यामागची एक भूमिका आहे पण एकमेव नाही. कायदा आई आणि वडिलांना पालक म्हणून समान स्थान आणि हक्क देतो का? नाव बदलण्यात काय अडचणी येतात? ते बदलल्यानंतरही अडचणी येतात का? ऐका ही सोपी गोष्ट. संशोधन- सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट: पंजाबमधील दलित शिखांबद्दल माहीत आहे का? 20.09.2021

चरणजीत सिंह चन्नी यांच्या रुपाने पंजाबला पहिला शीख दलित मुख्यमंत्री मिळाला. पंजाबमध्ये दलितांची लोकसंख्या 32 टक्के आहे, पण त्यांची राजकीय ताकद किती आहे? दलितांनी शीख धर्मापासून वेगळं होण्याचेही प्रयत्न केले होते का? दलितांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव किती आहे? या सगळ्या प्रश्नांची ही सोपी गोष्ट. संशोधन- दीपाली जगताप, सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट: अब्रुनुकसानी म्हणजे काय? कायदा काय सांगतो? 15.09.2021

किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला. राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी ते 100 कोटींचा अब्रुनकसानीचा दावा दाखल करत असल्याचं सांगितलं. राजकीय आरोप-प्रत्यारोपांनंतर अनेकदा अब्रुनुकसानीचे आरोप होतात, दावे केले जातात. कायदा याबद्दल काय सांगतो? संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट: NEET-MBBS Exam अन्यायकारक असल्याचं सांगत तामिळनाडू रद्द का करत आहे? 14.09.2021

वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी NEET परीक्षा तामिळनाडूला रद्द करायची आहे. त्यासाठी विधानसभेने एक विधेयकही पारित केलं आहे. NEET परीक्षा गरीब, ग्रामीण भागातून आलेल्या तसंच मागास स्तरांतील विद्यार्थ्यांवर अन्याय करते. या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? डॉक्टर आणि वैद्यकीय प्रवेश हाताळलेल्या तज्ज्ञांना काय वाटतं? ऐकू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

महिला आयोग काय काम करतो? त्यांना काय अधिकार आहेत? 13.09.2021

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत महिलांविरोधात अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने मुंबईतील बलात्कार प्रकरणाची दखल घेतली आहे. महिलांसंबंधातील गुन्ह्यांची महिला आयोग दखल घेत असतो. पण या आयोगाला काय अधिकार असतात? त्यांचं नेमकं काम काय? महाराष्ट्रात 2019 पासून आयोगावरच्या नेमणुका का रखडल्या आहेत? संशोधन- सिद्धनाथ गानू, प्राजक्ता पोळ लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट: बाप्पांच्या आरतीच्या वेळी सॅनिटायर का वापरू नये? 09.09.2021

कोरोना काळात गणेशोत्सव साजरा होणार असल्यामुळे आपल्याला काही कोव्हिडचे नियम पाळावे लागणार आहेत. आणि यात मास्क बरोबरच हाताच्या स्वच्छतेसाठी आपण वापरतो सॅनिटायझर. पण, सॅनिटायझर हा अल्कोहोल युक्त ज्वालाग्राही पदार्थ आहे. आणि त्याच्या मुळे खासकरून गणेश आरतीच्या वेळी सॅनिटायझर लावू नका, अशा सूचना काही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने दिल्या आहेत. पण, खरंच गणेशोत्सवाच्या काळात सॅनिटायझर वापरणं किती धोकादायक आहे...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात पूर आणि अतिवृष्टी वारंवार का होते? 5 ठळक कारणं 08.09.2021

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होतोय, अनेक धरणांचे दरवाजे उघडावे लागले आहेत, अनेक ठिकाणी पूर आला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही काळात अशा घटना वारंवार घडत आहेत. या घटनांमागे ‘हवामान बदल’ आहे असं आपण अनेकदा ऐकतो. पण म्हणजे नेमकं काय घडतं आहे? घटना घडण्याची 5 कारणं पाहणार आहोत सोपी गोष्टच्या या भागात. संशोधन- बीबीसी मराठी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओबीसी आरक्षणासाठी इंपिरिकल डेटा कसा गोळा केला जाणार? 07.09.2021

सुप्रीम कोर्टाने ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द केलं. ते पुन्हा द्यायचं तर त्यासाठी आधी इंपिरिकल डेटा गोळा करायला हवा असंही कोर्टाने सांगितलं. मुळात इंपिरिकल डेटा म्हणजे काय? राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला तो 3 ते 4 महिन्यांत गोळा करायला सांगितलं आहे. तो कोणत्या पद्धतीने गोळा केला जाईल? ओबीसी आरक्षण दिलं तरी ते 50 टक्क्याची मर्यादा ओलांडू शकत नाही, त्यासाठी काय खबरदारी घेतली जाणार आहे? सगळ्या प...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना काळात आयुष्मान भारतपेक्षा कृषी कायद्यांच्या जाहिरातीला प्राधान्य का? 06.09.2021

मोदी सरकारने कोव्हिडच्या काळात जाहिरातींवर 212 कोटी रुपये खर्च केले. पण यातला अत्यंत छोटा हिस्सा आयुष्मान भारत या वीमा योजनेच्या जाहिरातीवर खर्च झाला असं बीबीसीच्या तपासात समोर आलं. माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळवली गेली. कृषी कायदे, नागरिकत्व कायदा, स्टॅच्य ऑफ युनिटी यांच्या जाहिरातींवर मोदी सरकारने आयुष्मान भारतच्या प्रचारापेक्षा अनेक पटींनी जास्त खर्च केला. ही योजना अनेक लोकांना माहीतच नसल...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: PF वरील कराचा तुमच्या खिशावर परिणाम होईल? | सोपी गोष्ट 418 03.09.2021

भविष्य निर्वाह निधी किंवा प्रॉव्हीडंट फंड( Employees' Provident Fund) वर आता कर आकारणीला सुरुवात झाली आहे. प्रॉव्हीडंट फंडात वर्षाला अडीच लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्यास, त्याच्या व्याजावर कर भरावा लागेल. म्हणजे नेमकं काय होणार आहे? सरसकट सगळ्यांसाठी व्याजावर कर लावला जाणार का? दरवर्षी लागणार का? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्याची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन – टीम बीबी...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकार तालिबानशी बातचीत का करत आहे? | सोपी गोष्ट 417 02.09.2021

नरेंद्र मोदी सरकार तालिबानविषयी आपलं धोरण बदलत असल्याचं चित्र आहे. मंगळवारी (31 ऑगस्ट) कतारमध्ये भारतीय राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानिकझाईंची भेट घेतली. मोदी सरकारनं तालिबानशी बातचीत का सुरू केली आहे? या सगळ्यातून भारताला काय मिळणार आहे? संशोधन – रजनीश कुमार, जान्हवी मुळे लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना विषाणूही डेंग्यू-मलेरियासारखा भारतात एंडेमिक बनेल का? 01.09.2021

भारतात कोव्हिड-19नं आता काही प्रमाणात 'एंडेमिक स्टेज' म्हणजे स्थानिक आजाराचं रूप घेतलं असावं, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHOच्या वरिष्ठ संशोधक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे. पण भारतात खरंच असं काही होत आहे का? एखादा आजार एंडेमिक होणं म्हणजे काय? त्यानं साथीवर कसा परिणाम होऊ शकतो? संशोधन – झोया मतीन लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट: अफगाणिस्तानमध्ये तालिबानने अमेरिकेला मात का आणि कशी दिली? 31.08.2021

अफगाणिस्तान हे अमेरिकेचं सर्वांत दीर्घकाळ चाललेलं युद्ध होतं. अमेरिकेने आपलं सगळं सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर काढलं आहे. 20 वर्षं तिथे राहूनही अमेरिका तालिबानचा बीमोड करू शकली नाही. तालिबानने अमेरिकेवर मात कशी केली? यापूर्वी अमेरिकेवर अशी वेळ कधी आली होती? संशोधन- झुबेर अहमद लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट : तालिबान अफगाणिस्तानमध्ये पैसे कसे कमवतं? 30.08.2021

20 वर्षं सत्तेबाहेर राहूनही तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आपली मुळं शाबूत ठेवली. शस्त्रास्त्रं खरेदी, फौजा पोसणं यासाठी तालिबानने पैसा आणला कुठून? अमली पदार्थांचा व्यापार, खंडणी गोळा करणं या सगळ्यातून तालिबानने किती पैसा उभा केला आहे? अफगाणिस्तानच्या डबघाईत असलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी तालिबान कसं देऊ शकेल? तालिबानच्या खात्याचा ताळेबंद मांडणारी ही सोपी गोष्ट.

Lyt til podcasten सोपी गोष्ट i Replaio

Radio og podcasts i én app - gratis og uden tilmelding. Installer i dag, og gå ikke glip af lanceringen

Hent den på Google Play

Replaio er ikke podcastudgiver; programmernes navne, coverbilleder og lyd tilhører deres ophavsmænd og distribueres via offentlige RSS-feeds.