Vidula Tokekar

प्रकृती : आरोग्याचा पॉडकास्ट | Prakruti : Health Podcast

Health MR ↓ 45 episoder

Health is natural. Health is not dependency on medicines. Health is balance, equilibrium of the five elements within. Prakruti brings you learning and unlearning of our habits, food, exercise, rest and general daily routine. Small changes big difference. Prakruti brings you good recipes, exercises, fun and simple tricks and treatments, wonderful case studies and a lot more. 

Forfatter

Vidula Tokekar

Kategori

Health

Podcastens hjemmeside

audiowallah.com

Seneste episode

16. feb. 2024

Hvor kan du lytte?

Podcasts i appen Replaio Radio Kommer snart

Podcasts kommer snart til appen. Installer nu, og vær den første til at se en helt ny tilgang til podcasts

Hent den på Google Play Installer gratis Android næsten 10 mio. downloads · 4,8 i bedømmelse iOS snart

Episoder

स्नान उपचार Naruropathy baths, 16.02.2024

आपण रोजच पाण्याने स्नान करतो, मग त्यात विशेष काय? कोणकोणती स्नानं असतात ते तर आज मी सांगणारच आहे. पण त्याबरोबर आणखी काही तरी सांगणार आहे. काय होतं, की हे स्नानोपचार घेण्यासाठी तुम्हाला कुठल्यातरी निसर्गोपचार केंद्रात जावं लागतं. तिथे सगळी साधनसामग्री असते, भरपूर आणि योग्य तपमानाचं पाणी असतं, हे उपचार शिकलेले उपचारक असतात. पण सर्वच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असेलच असं नाही.  त्यामुळे आपल्याला घरी, उपल...

जादूची लपेट The Magic Band 30.01.2024

पाणी अनेक प्रकारांनी उपचारासाठी वापरलं जातं. आज आपण पाहाणार आहोत ती जादूची पट्टी अर्थात लपेट पट्टी हा त्यातलाच एक भाग. वापरण्यास अतिशय सोपा, सुटसुटीत, सहज आणि अतिशय परिणामकारी. या  जादूच्या पट्टीचं नाव आहे, लपेट पट्टी किंवा वेट पॅक. डोकं दुखत असेल तर डोक्याला. हात पाय कंबर दुखत असेल तर त्या त्या ठिकाणी,  पोट साफ होत नसेल, घशाशी येत असेल, मूत्रविकार असतील तर पोटाला लपेटून ठेवायची. दारात बोट चेमटलं,...

नैसर्गिक प्रथमोपचार First Aid 18.01.2024

नेहमीच्या तक्रारी, तसं म्हटलं तर किरकोळ, पण त्रासदायक. त्यावर काहीतरी झटपट उपाय करून कामाला लागावं ही इच्छा.  पण तुमच्या निसर्गोपचारात तर परिणाम व्हायला वेळ लागतो म्हणे, मग काय, गोळीच घ्यावी लागणार ना! नाही नाही नाही... शुद्ध गैरसमज.  निसर्गोपचारात तर सगळ्यात झटपट परिणाम दिसतात. तुमच्या स्वतःच्या शरीरापेक्षा आणि निसर्गापेक्षा शक्तिमान काय आहे?  गोळी घेऊन १५ मिनिटांत तात्पुरतं डोकं दुखायचं थांबत अस...

पर्व दुसरे - अध्याय दुसरा 01.01.2024

प्रकृती पॉडकास्टचे ४१ भाग ऐकल्यानंतर आता नवं काय? दुसऱ्या पर्वात काय आहे? नॅचरोपॅथीमध्ये औषधं गोळ्या इंजेक्शन असं काही नसतं. मग नॅचरोपॅथीमध्ये डॉक्टर करतात तरी काय? दुसऱ्या पर्वात आपण त्याचीच ओळख करून घेणार आहोत. शिवाय नव्या भन्नाट उपक्रमाची सुरुवात - ऐकताय काय, सामील व्हा! उपक्रमात सामील होण्यासाठी मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti       किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज  किंवा मा...

संकल्प करायचा तो पूर्तीसाठी 26.12.2023

नवीन वर्षाचा संकल्प करायचा आणि तो पार पाडायचा. २०२४ मध्ये तंदुरुस्तीची एक पायरी वर चढायचीच.  ताकद, चपळपणा, लवचिकता, संतुलन आणि दमसास या पाचही आघाड्यांवर ठरवून, चांगली प्रगती करायचीच. ठरवलं की होतं! त्यासाठी संकल्प कसा करायचा आणि त्याच्या पूर्तीची आखणी कशी करायची याबद्दलचा हा एपिसोड.  तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/v...

पडो झडो माल वाढो 23.12.2023

निसर्गोपचाराने सगळी दुखणी, दुखापती बऱ्या होतात हे मी सगळ्यांना सांगते, पण जेव्हा माझ्यावरच बेततं, तेव्हा मी काय करते? मला झालेली बऱ्यापैकी मोठी जखम कशी बरी झाली त्याची गोष्ट. साधा, सोपा, नैसर्गिक तोच सर्वात जलद उपाय. ही गोष्ट. निसर्गोपचाराची शक्ती दाखवणारी आणि आत्मविश्वास वाढवणारी. तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vid...

60@60 13.09.2023

माझ्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी १२ तासांत ६० किमी अंतर चालले त्याची ही गोष्ट. आणि त्यानंतर लगेच नेहमीसारखी कामाला लागले, एकही दिवस शिणवटा आला नाही, हा गोष्टीचा उत्तरार्ध. का, कसं, कशासाठी, कुठे, केव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एपिसोडमध्ये आहेत. ६० किमी हा काही विशेष पराक्रम नाही, तुम्ही खरोखरचे मोठे पराक्रम केले असतील तर मला कळवा, आपण ते सर्वांपर्यंत पोचवू. किंवा असं काहीतरी तुम्ह...

थकवा Fatigue 06.09.2023

भयंकर थकवा ही भयंकर समस्या असू शकते. खूप शारीरिक कष्ट, श्रम, हालचाल यांनी थकवा येणं हे स्वाभाविक आहे, आणि तो भरून निघणं आणि पुन्हा उत्साह येणं हेही स्वाभाविक आहे.  सतत असणारा थकवा नुसत्या गोळ्या इंजेक्शनांनी बरा होत नाही. त्याची कारणं शोधून ती दूर करणं आणि शरीराला मदत करणं याने थकणं-भरून निघणं हे चक्र सुरळीत चालू रहातं. कोणत्याही वयाच्या, कोणत्याही व्यवसायातील व्यक्तीला शारीरिक कष्टांनी, मानसिक ता...

कर्बोदके Carbohydrates 26.08.2023

कर्बोदकं सदैव वादात अडकलेली असतात. एका बाजूला लो कार्ब डाएटचा हिरीरीने पुरस्कार करणारे आणि दुसऱ्या बाजूला हाय कार्ब डाएटच कसं आवश्यक आहे हे पटवून सांगणारे तज्ज्ञ असतात. तुम्ही यांच्या मध्ये कुठेतरी असाल. पण पुष्कळांच्या मनात शंका असतेच की कार्ब्ज खाऊ की नको? मी जास्त तर खात नाहीये ना? कार्ब्ज कमी पडली तर प्रोटीन लॉस तर होणार नाही ना? ही कर्बोदकं शरीरात नेमकं असं काय करतात की जेणे करून माणसांना त्य...

जीवनसत्त्वे आणि खनिजे Vitamins and Minerals 19.08.2023

आज आपण मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा जीवनसत्त्वं आणि खनिजं यांच्याबद्दल बोलणार आहोत. फक्त मायक्रोग्राम आणि मिलिग्राममध्ये आवश्यक असणारे अन्नघटक इतकं अत्यावश्यक काम करत असतात की त्या मायक्रोग्राममधला एक कण दोनचार दिवस कमी पडला तर आपल्या जीवनक्रियांवर परिणाम होतो. म्हणूनच त्यांना जीवन-सत्त्व म्हटलं आहे.  नियोजन - स्वयंपाकाचं, स्वास्थ्याचं या भाग तुम्ही इथे ऐकू शकता. तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड क...

शक्तिमान प्रथिने Powerpacked Proteins 12.08.2023

प्रथिनं – प्रोटीन्स आपल्या शरीरात जात आहेत, ती कमी पडत नाहीत ना, याबद्दल किशोरवयीन मुलामुलींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना अत्यंत काळजी असते. ती बरोबरच आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाची काळजी असायला हवी ती म्हणजे ती शरीरात शोषली जात आहेत ना, म्हणजेच अंगी लागत आहेत ना, म्हणजेच पचत आहेत ना याची. दूध - सत्य आणि मिथ्य या भाग तुम्ही इथे ऐकू शकता. तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक...

कानफाट्या स्निग्ध पदार्थ! 05.08.2023

या भागात आपण बोलणार आहोत स्निग्ध पदार्थ उर्फ चरबी उर्फ फॅट्स बद्दल. स्निग्ध! किती गोड, स्नेहाळ, शांत शब्द आहे ना! पण बहुतेक याचा धसका घेतल्यासारखं वागतात. आणि तसं करताना आपण किती विनोद करतो आणि सहज जे खाल्लं जातं, पचतं, अंगी लागतं, त्याऐवजी अधिक गुंतागुंतीचं, अधिक महाग, अधिक जड असं फॅट कसं खातो तेही मी सांगणार आहे.  तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा.  तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा....

तंतुमय पदार्थ Dietray fiber 30.07.2023

प्रत्यक्ष न पचता पचनक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा, आतड्यांचं आरोग्य चांगलं राखणारा, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारा, साखरेची पातळी नियंत्रित ठेवणारा,वजन आटोक्यात ठेवणारा अत्यंत महत्त्वाचा, बहुगुणी पण दुर्लक्षित अन्नघटक म्हणजे तंतुमय पदार्थ.  One of the most important factor for digestion, that keeps the gut healthy, reduces cholesterol, controls blood sugar, controls weight - A crucial...

पावसाळ्यात नाही भिजायचं तर कधी? It's Mad Monsoon!!! 07.07.2023

भिजणं, वारा खाणं, ऊन अंगावर घेणं, समुद्रात लाटांशी मस्ती करणं, डोंगर दऱ्या पालथ्या घालणं, हाडापर्यंत कुडकुडणं, वाऱ्याची शांत झुळुक, हसरं चांदणं अंगावर घेणं हा सगळा त्या निसर्गाचा स्पर्श आहे. चला, पावसाळ्याच्या निमित्ताने निसर्गाला स्पर्श करायला, त्याच्या कुशीत शिरायला सुरुवात करू या.  तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. तुमच्या वर्षासहलींचे फोटो पाठवा,  तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा....

शाळेचा डबा School Tiffin 27.06.2023

रोज रोज काय द्यायचं नवीन डब्यात? पौष्टिक, चविष्ट, पोटभरीचं, आधुनिक, झटपट, नाविन्याचं... तेही रोज म्हणजे रोज.  एक नाही तर तीन तीन डब्यांचं!  ऐका तर, हे सगळे निकष पूर्ण करणारे- शिवाय कमीत कमी प्रक्रिया केलेले, खरोखर अंगी लागणारे वैविध्यपूर्ण पदार्थ - शाळेच्या डब्यासाठी!  तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. शाळेच्या डब्याच्या खास तुमच्या अशा रेसिपीज, तुमचे प्रयोग मला सांगा, म्हणजे ते प्र...

योग दिन विशेष Yog Day Special 20.06.2023

योग म्हणजे केवळ योगासने नाही शारीरिक कसरती नाही, श्वासोच्छ्वासाचे वेगवेगळे प्रकार नाही. मग योग म्हणजे काय? शरीरं मन, बुद्धी, आतमा यांचं एकीकरण - योग साधण्याच्या आठ पायऱ्या. एक सम्यक जीवनपद्धती. सांगत आहेत तरुण योगसाधक श्रुती शिंदे आणि गायत्री शेटे. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prak...

मुलींनो तुमची त्वचा कशाला घाबरते? Scary Skincare 06.06.2023

शृंगार तातडी आणि अंगाची निघाली कातडी अशी एक रोखठोक म्हण मराठीत आहे.  सौंदर्यप्रसाधने, समजुती, गैरसमजुती आणि पर्याय यांच्याबद्दल ऐका या एपिसोडमध्ये. तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar   https://www.in...

कमीच होत नाही I'm not losing it 22.05.2023

काहीही करा, कमीच होत नाही.  डाएट बदला, व्यायाम बदला, कशानेच कमीच होत नाही.  मग निसर्गोपचाराकडे याचं काय उत्तर आहे? निसर्गोपचाराकडे याचा अगदी रामबाण उपाय आहे. सस्ता और टिकाऊ उपाय आहे.  शिवाय त्याचा आणखी एक फायदा आहे. तो म्हणजे लठ्ठपणाबरोबर किंवा वाढत्या वजनाबरोबर जी मित्रमंडळी मुक्कामाला आलेली असतात – धाप लागणे, खूप घाम येणे, त्वचाविकार इथपासून ते रक्तदाब, थायरॉईड, मधुमेह इथपर्यंत – ते सगळे निघून ज...

मोठ्ठी तिची सावली Mother's Day Special 13.05.2023

खाण्यापासून ते झोपेपर्यंत, चांगल्या सवयी लावाव्या अशी आईची तळमळ. आणि मला समजतंय ग मी काय करतेय ते हे मुलाचं म्हणणं. यात आपण कॉमन मिनिमम नाही तर म्युच्युअल ॲबंडंट प्रोग्राम बघणार आहोत.    आईने मुलांसाठी काय करावं आणि मुलांनी आईसाठी काय करावं.....काही सवयी आईसाठी आणि काही सवयी मुलांसाठी.आई आणि मुलांनी एकमेकांचे लाड करण्याची ही अष्टसूत्री.  तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगाय...

काय भुललासी वरलिया रंगा Reading healthy food lables 09.05.2023

हेल्दी, न्यूट्रिशस, पोषक, ग्रोथ, मिलेट्स ही की वर्ड्स आहेत आपल्याला अंध करण्याची.  म्हणजे आपण उघड्या डोळ्यांनी हे बौद्धिक अंधत्व स्वीकारतो. असं काहीतरी नाव असलं, की आपल्याला वाटतं, खरंच हेल्दी असणार, उगीच लिहितील का तसं? तरी आपण त्याची लेबल्स वाचतो. घटक पदार्थ वाचतो. तरीही आपल्याला काही कळत नाही, उमजत नाही,  या एपिसोडमध्ये आपण अशाच काही की वर्डस् गुंफलेल्या पदार्थाचीं लेबल्स वाचणार आहोत. आणि शेवटी...

दुखणं पोटाला अन् चिंधी डोक्याला symptoms? illness? 28.03.2023

उपचार कशावर होताहेत? लक्षणांवर की आजारावर? लक्षणं आणि आजार यांच्यातला फरक कसा ओळखायचा? आजार पटकन कसा बरा होतो? ऐका या भागामध्ये. म्हणजे दुखणं पोटाला अन् चिंधी कपाळाला, अशी अवस्था होणार नाही. What are you treating really? Symptoms or the illness? how do you differentiate between the two?  How do you CURE the illness quickly?  Listen to this episode and know about it!  तुम्ही प्रकृती पॉडकास्ट ऐकून क...

कळतं पण वळत नाही! 19.03.2023

कळतं पण वळत नाही, ही सार्वत्रिक अडचण आहे.  आरोग्यासाठी जे जे म्हणून करायचं ठरवावं, त्यात अनंत अडचणी येतात. मग दांडी-यात्रा सुरू होते...कळतं सगळं, पण वळत नाही. मग कसं वळवायचं मन ते ऐकूया या भागात.  निसर्गाने दिलेलं शरीर तंदुरुस्त राखायला निसर्गच मदत करतो. तुम्ही प्रकृती पॉडकास्ट ऐकून काय काय बदल केेले हे मला नक्की कळवा.  फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गा...

उपवास Fasting 10.03.2023

लंघनं परमौषधिं असं म्हटलं आहे ते खरंच आहे. पोटाला विश्रांती दिल्याने शरीरातल्या विषद्रव्यांचा निचरा होतो, शरीर ताजंतवानं होतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. उपास कसा करायचा आणि कसा सोडायचा, कधी, किती काळ करायचा, त्याचे काही साइड इफेक्ट्स होतात का. उपास करणं सोपं आहे, ते आपल्याला जमेल हा आत्मविश्वास देणारा हा एपिसोड ऐका आणि ऐकवा. Fasting is the best medicine. Fasting is the best health routine. Your b...

खेळाडू ते चँपियन sportsman to champion 25.02.2023

खेळाडू व्हायचंय? खेळाडूपासून चँपियन पर्यंत जायचंय? तुमच्या मुलांना खेळाडू व्हायचंय? फिटनेसमध्ये नवे विक्रम करायचेत? शरीर कमवायचंय? मॅरेथॉन धावायची आहे? तर मग हा एपिसोड ऐकलाच पाहिजे. हे अविश्वसनीयच सत्य आहे याची प्रचीती घेतलीच पाहिजे.  Are you a sportsperson? Want to become a champion? Want your kids to excel in sports? Wish to achieve new heights in fitness? Building your body? Training to run a m...

सकाळची स्वच्छता What a relief! 18.02.2023

आरोग्याचा मूलमंत्र कोणता - तर तो आहे प्रभाते मलदर्शनम्!  आरोग्य आणि अनारोग्य दोन्हींची सुरुवात होते ती पोटापासून. पोट साफ आहे की नाही हे कसं ओळखायचं? सकाळी पोट साफ करण्याची सवय लागणं   सोपं आणि महत्त्वाचं  कसंआहे? एकविसाव्या शतकातली धावती जीवनशैली आणि जुने नियम यांची सांगड अगदी सहज कशी घालायची? ऐका हा एपिसोड आणि आपली रोजची सकाळ निर्मळ आणि हलकीफुलकी करून टाका!  Both health and unhealth start at the...

Lyt til podcasten प्रकृती : आरोग्याचा पॉडकास्ट | Prakruti : Health Podcast i Replaio

Radio og podcasts i én app - gratis og uden tilmelding. Installer i dag, og gå ikke glip af lanceringen

Hent den på Google Play

Replaio er ikke podcastudgiver; programmernes navne, coverbilleder og lyd tilhører deres ophavsmænd og distribueres via offentlige RSS-feeds.