BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Husk at besøge podcastens hjemmeside og støtte skaberen: www.bbc.co.uk
Forfatter
BBC Marathi Audio
Kategori
Podcastens hjemmeside
Seneste episode
25. mar. 2026
Hvor kan du lytte?
Podcasts i appen Replaio Radio Kommer snartPodcasts kommer snart til appen. Installer nu, og vær den første til at se en helt ny tilgang til podcasts
Episoder
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना मृत्यूंचा आकडा मोदी सरकारने कमी दाखवला का? 21.07.2021 5:12
कोरोनामुळे आतापर्यंत भारतात चार लाखांपेक्षा अधिक मृत्यू नोंदवले गेले आहेत. पण प्रत्यक्षात हा आकडा त्याहूनही जास्त असेल असा अंदाज अभ्यासक वर्तवत आहेत. कोरोनाच्या काळात जून 21 पर्यंत भारतात 34 लाख ते 47 लाखांदरम्यान अतिरिक्त मृत्यू झाले असल्याचा संशोधकांचा दावा आहे. भारत सरकारने अतिरिक्त मृत्यूंची आणि त्यातून कोव्हिड मृतांची संख्या जाहीर करावी अशी मागणी केली जातेय. हे सगळं समजून घ्या आजच्या सोपी गोष...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: पॉर्न पाहणं, बनवणं हा भारतात गुन्हा आहे का? 20.07.2021 5:35
उद्योगपती राज कुंदरा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. पॉर्न फिल्म्सशी संबंध असल्यावरून त्यांना अटक झालीय आणि अनेक वेगवेगळ्या कलमांअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेलेत. भारतात 2015 मध्ये 850 पेक्षा जास्त पॉर्न वेबसाईट्स बॅन केल्या गेल्या. चाईल्ड पॉर्नोग्राफी हा भारतात गुन्हा आहे. पण सर्व प्रकारचं पॉर्न पाहणं हा गुन्हा आहे का? कायदा नेमकं काय म्हणतो? या संवेदनशील विषयाची ही सोपी गोष्ट. संशोधन,...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: पेगॅसस स्पायवेअर वापरून भारतीय पत्रकारांवर पाळत ठेवली गेली? 19.07.2021 5:37
जगभरातल्या 15 माध्यमसंस्थांनी एकत्र येऊन केलेल्या एका तपासात असं दिसून आलंय की भारतातले 40 आणि जगातले 1400 लोक पेगॅसस नावाच्या एका स्पायवेअरच्या सहाय्याने पातळीखाली होते. हे स्पायवेअर NSO या इस्रायली कंपनीच्या मालकीचं आहे. पण या कंपनीने हे सगळे दावे फेटाळले आहेत. आपण हे तंत्रज्ञान फक्त सरकारांनाच विकतो असं या कंपनीचं म्हणणं आहे. मग याचा अर्थ खुद्द सरकारांनीच या लोकांवर पाळत ठेवली का? हे सगळं कसं क...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : देशद्रोहाचा कायदा रद्द करावा का? 16.07.2021 5:48
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षं झाली तरी देशाला देशद्रोहाच्या कायद्याची गरज आहे का असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांनी केंद्रसरकारला विचरलाय. आणि बरोबरच या कायद्याचा राजकीय गैरवापर होत असल्याचं मतही व्यक्त केलं आहे. देशद्रोहाचा कायदा ब्रिटिशांनी 1870मध्ये आणला. आणि त्याचा वापर भारतीय स्वातंत्र्य चळवळ मोडून काढण्यासाठी केला. पण, स्वातंत्र्यानंतरही सत्ताधारी पक्षाकडून...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : इलेक्ट्रिक कार, बाईक खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? 15.07.2021 6:23
वाहनांच्या गर्दीमुळे होणारं हवेतलं प्रदूषण टाळायचं असेल तर एक उपाय म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेइकल्स... इ-कार किंवा इ-बाईक हे वाहन क्षेत्रातलं आपलं भवितव्य आहे असं सगळेच मानतात. केंद्रसरकारनेही वेळोवेळी इ-वाहनांना प्रोत्साहन देण्याविषयी सुतोवाच केलंय. त्यालाच अनुसरून आता महाराष्ट्रात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नवी ई-पॉलिसी आणली आहे. 2025 पर्यंत नवीन वाहनांच्या खरेदीत 10% वाहनं ह...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज आहे का? 14.07.2021 5:59
11 जुलै या जागतिक लोकसंख्या नियंत्रण दिनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यासाठी प्रस्तावित लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा मसुदा जाहीर केला. दोन पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना आरक्षण, सरकारी अनुदान मिळणार नाही, असं हा कायदा सांगतो. आसाम, कर्नाटक या इतर राज्यांतही तशा प्रकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. देशाचा लोकसंख्या वाढीचा दर 2.1% च्या आत राखणं हे या कायद्यांचं उद्दिष्ट आहे. प...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : सरकार पेट्रोल,डिझेलचे दर कमी का करत नाही? 13.07.2021 6:07
देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल पाठोपाठ डिझेलनेही दरांची शंभरी गाठली आहे. इंधनाच्या किमती आटोक्यात ठेवायच्या असतील तर केंद्राने उत्पादन शुल्क आणि राज्यसरकारने मूल्यवर्धित कर कमी करणं गरजेचं आहे. पण, त्यामुळे सरकारला मिळणारा महसूल बुडेल या भीतीने दोन्ही सरकारं हे कर कमी करत नाहीएत. सामान्यांवर मात्र त्यामुळे महागाईचा बोजा पडतोय. पेट्रोलचे दर सरकार का कमी करत नाही जाणून घेऊया सोपी गोष्ट...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : सौर वादळ म्हणजे काय? 12.07.2021 5:30
अमेरिकेतली हवामानाचा अंदाज व्यक्त करणारी वेबसाईट स्पेसवेदर डॉट कॉमवर सध्या एक इशारा झळकतोय. सूर्याच्या वातावरणात तयार झालेलं एक वादळ अती प्रचंड वेगाने अंतराळात फिरून आता पृथ्वीच्या दिशेनं सरकतंय. आणि ते पृथ्वीवरही धडकू शकतं. पण सोलार स्टॉर्म किंवा हे सौर वादळ नेमकं असतं काय? यामुळे आपल्यावर नेमका काय परिणाम होणार आहे? यामुळे पृथ्वीवरचं तापमान अचानक वाढेल का? इंटरनेट, जीपीएस बंद पडेल का? या सगळ्या...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : महिलांची ऑनलाईन बदनामी कशी थांबवायची? 10.07.2021 5:40
तुम्ही महिला असाल. आणि एकेदिवशी अचानक तुम्हाला कळलं की, तुमचा फोटो आणि सोशल मीडियावरची तुमची इतर माहिती वापरून इंटरनेटवर तुम्हाला बदमान करण्यात येतंय तर? फक्त बदनामीच नाही तर तिथं तुमच्याबद्दल अश्लील बोललं जातंय आणि तुम्हाला चक्क विकायला काढलंय तर? संताप तर येईलच पण, त्याचबरोबर काही क्षण अगदी असहाय्य पण वाटेल. काही मुस्लीम महिलांच्या बाबतीत अलीकडे तसंच झालंय. सुल्ली डिल्स नावाचं एक ओपन सोर्स ॲप त्...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : अफगाणिस्तानातील युद्धाची 20 वर्षं 09.07.2021 6:59
अफगाणिस्तानमध्ये सध्या नेमकं काय चाललंय? अमेरिकन सैन्य तिथून माघार का घेतंय? आणि अमेरिकेनं माघार घेतल्यावर पुन्हा तिथं तालिबानी राज्य येऊ शकेल का? अल् कायदा पुन्हा सक्रिय होईल का? असे कितीतरी प्रश्न सध्या तिथली परिस्थिती बघून विचारले जातायत. तसा हा देश गेली 20 वर्षं दहशतवाद आणि युद्धामुळे होरपळतोय. पण आता तिथं नेमकं काय घडतंय हे जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये... लेखन - ऋजुता लुकतुके निवेदन - ऋजुता लु...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारतात 95% लग्नांमध्ये दिला जातो हुंडा 08.07.2021 6:54
देशात हुंडाविरोधी कायदा 1961पासून अस्तित्वात असूनही 95% लग्नांमध्ये अजूनही हुंडा स्वीकारला जातो आणि दिला जातो. हा धक्कादायक अहवाल जागतिक बँकेनं दिला आहे. त्यासाठी बँकेच्या एका गटाने 27 राज्यांमधली 40,000च्या वर लग्नांमध्ये झालेल्या खर्चाचा अभ्यास केला आहे. काही ठिकाणी थेट हुंडा न देता त्याचं स्वरुप बदललंय. त्यामुळे आज पुन्हा वेळ आलीय हुंडा या दुष्ट आणि महिलांसाठी अन्यायकारक सामाजिक प्रथेबद्दल बोलण...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : नरेंद्र मोदींना मंत्रिमंडळ विस्तार का करायचाय? 07.07.2021 5:48
कोरोना परिस्थितीमुळे थांबलेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार अखेर बुधवारी होणार अशी चर्चा सर्वत्र आहे. आणि यात महाराष्ट्रातून नारायण राणे आणि हीना गावित यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पण, नरेंद्र मोदी आताच का मंत्रिमंडळ विस्तार करत आहेत? यामागे राजकीय समीकरणं आहेत की प्रशासकीय सोय? पाहूया आजची सोपी गोष्टमध्ये... लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट : MPSC परिक्षांच्या गोंधळाला जबाबदार कोण? 06.07.2021 7:31
कोरोनाच्या काळात MPSC स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जोरदार फटका बसलाय. 2019पासून ही परीक्षा नियमित होत नाहीए, झाली तर नियुक्ती होत नाहीए आणि मुख्य स्पर्धा झाली तर मुलाखती होत नाहीएत. त्यामुळे रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील तरुण मुलांचा मात्र कोंडमारा होतोय. पण, MPSC परिक्षांच्या गोंधळाला नेमका जबाबदार कोण, याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये... संशोधन - ऋजुता लुकतुके...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : अजित पवार पुन्हा EDच्या रडारवर? 05.07.2021 6:35
ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई केली आहे. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकाचा आहे. त्यामुळे ईडीने केलेली कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि अजित पवार खरंच यात अडचणीत येऊ शकतील का, याविषयी बोलूया सोपी गोष्टमध्ये... लेखन...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : हिंदुत्व म्हणजेच खरं राष्ट्रीयत्व आहे का? 02.07.2021 6:49
प्यू रिसर्च या आंतरराष्ट्रीय संस्थेनं अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात 64% भारतीय हिंदूंनी हिंदुत्व म्हणजेच राष्टीयत्व असल्याची भावना व्यक्त केली आहे. हिंदू असणं म्हणजे खरा भारतीय असं त्यांना वाटतं! असं हिंदूंना का वाटतं, पूर्वीपासून त्यांना असं वाटत होतं, की अलीकडे ही भावना बळावली आहे. राजकीय आणि सामाजिक अंगांनी याचा परामर्श घेऊया सोपी गोष्टमध्ये... लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोस...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : हिंदुत्व म्हणजेच खरं राष्ट्रीयत्व आहे का? 01.07.2021 5:57
प्यू रिसर्च या आंतरराष्ट्रीय संस्थेनं अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात 64% भारतीय हिंदूंनी हिंदुत्व म्हणजेच राष्टीयत्व असल्याची भावना व्यक्त केली आहे. हिंदू असणं म्हणजे खरा भारतीय असं त्यांना वाटतं! असं हिंदूंना का वाटतं, पूर्वीपासून त्यांना असं वाटत होतं, की अलीकडे ही भावना बळावली आहे. राजकीय आणि सामाजिक अंगांनी याचा परामर्श घेऊया सोपी गोष्टमध्ये... लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोस...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : मुंबईतील मुलं तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित आहेत का? 29.06.2021 5:25
मुंबईत एप्रिल-जून महिन्यात झालेल्या एक सीरो सर्व्हेत 18 वर्षांखालील 51% मुलांमध्ये कोरोना अँटीबॉडीज् तयार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आधीच्या महिन्यात हे प्रमाण 39% होतं. याचा अर्थ एकतर या मुलांना आधी कोरोना संसर्ग होऊन गेला आहे. किंवा ते कोरोना संसर्गग्रस्तांच्या संपर्कात आले आहेत. तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्गाचा सगळ्यात जास्त धोका आहे असं बोललं जातं. त्या पार्श्वभूमीवर हा निकाल चांगलाच म्हणायला हव...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक्रमावरून वाद का झालाय? 28.06.2021 6:34
ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमाला विरोध आणि समर्थन का केलं जात आहे?
सोपी गोष्ट पॉडकास्ट: नरेंद्र मोदींनी काश्मिरी नेत्यांबरोबर आत्ताच बैठक का घेतली? 25.06.2021 7:01
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मिरी नेत्यांबरोबर 24 जून या दिवशी दिल्लीत बैठक घेतली. केंद्र सरकारला काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यापूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना करायची आहे, पण प्रादेशिक पक्षांना हे मान्य नाही. काश्मिरी पक्ष 370 च्या मुद्द्यावर न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार आहेत, केंद्राच्या लेखी तो विषय संपला आहे. जर गेल्या दोन वर्षांत कुणाच्यात भूमिकेत बदल झाला नसेल तर ही बैठक घेतल्याने काय साध्य झालं...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: निपाह व्हायरस महाबळेश्वरमध्ये सापडला, संसर्गाचा धोका किती? 24.06.2021 4:58
महाबळेश्वरच्या एका गुहेत काही वटवाघुळांमध्ये निपाह व्हायरस सापडला. या व्हायरसचा यापूर्वी चार वेळा भारतात उद्रेक होऊन गेला आहे. केरळमध्ये 2018 साली या व्हायरसमुळे 18 लोकांचा मृत्यू झाला होता. निपाहवर अजूनही कोणतीही लस नाही किंवा ठोस उपचारपद्धतीही नाही. वटवाघुळांमधून निपाहचा संसर्ग माणसांना होण्याची शक्यता किती असते? या व्हायरसपासून सुरक्षित कसं राहायचं? या सगळ्याची उत्तरं देणारी आजची ही सोपी गोष्ट....
सोपी गोष्ट पॉडकास्ट : पवारांनी राष्ट्रीय आघाडीची घोषणा करणं का टाळलं? 23.06.2021 6:33
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी काल राष्ट्रमंचची बैठक झाली आणि पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं की, पवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इतर पक्षांची एकत्र आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांत आहेत का? काल त्याविषयी काही घोषणा होईल असंही वाटलं होतं. पण, प्रत्यक्षात मोदी विरोधात अशा राष्ट्रीय आघाडीबद्दल काहीच बोललं गेलं नाही. अशावेळी सोपी गोष्टमध्ये बघूया शरद पवार यांनी अशी घोषणा करणं का टा...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : शरद पवारांची पंतप्रधान होण्याची संधी कशी हुकली? 22.06.2021 7:06
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा देशातल्या विरोधी पक्षांची एकत्र मोट केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ते किती यशस्वी होतात हे येणारा काळच सांगेल. पण, यातून शरद पवार यांची देशाचा पंतप्रधान होण्याची कित्येक वर्षांची इच्छा पुन्हा वर आली की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. यापूर्वीही शरद पवार यांनी 1990 च्या दशकांत काँग्रेस पार्टीत अ...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : राम मंदिराच्या जागा खरेदीवरून घोटाळ्याचा आरोप का होतोय? 21.06.2021 5:49
अयोध्येतल्या प्रस्तावित राम मंदिरासाठी जागा खरेदी करताना घोटाळा झाल्याचा आरोप एकदा नाही तर दोनदा झालाय. समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टीने या मुद्यावरून राम जन्मभूमी न्यास ट्रस्ट आणि पर्यायाने भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय. तर राम जन्मभूमी ट्रस्टचे सचिव चंपत राय आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कुठल्याही प्रकारचा घोटाळा झाला नसल्याचं म्हटलंय. ट्रस्टने गोळा केलेले बहुतेक पैसे हे जनतेच्या वर्गणीतून ग...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात डेल्टा व्हेरियंटमुळे महिनाभरात येणार का? 18.06.2021 5:21
राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी सुरू आहे. गर्दी वाढली आणि लोकांनी आरोग्याचे नियम पाळले नाहीत तर महिन्या दोन महिन्यांतच राज्यात तिसरी लाट येऊ शकते अशा बातम्या आल्या पण यावर स्पष्टीकरण देताना कोव्हिड टास्कफोर्सच्या डॉक्टरांनी सांगितलं की त्यांनी अशी कोणतीही कालमर्यादा दिली नव्हती. वेगाने पसरणारा डेल्टा आणि नव्याने आलेला डेल्टा प्लस व्हेरियंट, तसंच इतर कारणांमुळे राज्यात पुढची लाट लवक...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोका कोला, पेप्सी सारखी पेयं आरोग्यासाठी वाईट असतात का? 17.06.2021 5:31
फुटबॉलर रोनाल्डोने कोकची बाटली सरकवून लोकांना पाणी प्या असं सांगितलं आणि नेहमी चर्चा होणारा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला. सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कोल्ड ड्रिंक्स पिणं आरोग्यासाठी हानीकारक असतं का? कोल्ड ड्रिंक्स प्यायल्यानंतर प्रसन्न वाटतं, मग ती शरीरात जाऊन अपाय कसा करू शकतात? त्यांचं व्यसन लागू शकतं का? या सगळ्याची उत्तरं आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग...
Lignende podcasts
Replaio er ikke podcastudgiver; programmernes navne, coverbilleder og lyd tilhører deres ophavsmænd og distribueres via offentlige RSS-feeds.