Sakal Media
"राज"कारण " Rajkaran
सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे.ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट, ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्ष...
No dejes de visitar la web del podcast y apoyar a su creador: audiowallah.com
¿Dónde escuchar?
Podcasts en la app Replaio Radio Muy prontoLos podcasts llegarán muy pronto a la app. Instálala ahora y sé el primero en descubrir una forma totalmente nueva de vivir los podcasts
Episodios
टपाली मतांनी झाला होता लोकनेत्याचा पराभव 08.11.2024 11:01
पतंगराव कदम हे 1980 च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते.
मार्गारेट अल्वा, प्रभा रावः कणखर महिला नेत्या 01.11.2024 11:04
काँग्रेसच्या नेत्या मार्गारेट अल्वा आणि प्रभाव राव यांचं प्रशासकीय कौशल्य वाखाणण्याजोगं होतं.
अन् विठ्ठलराव तुपे पाटलांनी पुण्याच्या 'भाईं'ना आस्मान दाखवलं 25.10.2024 12:23
शरद पवारांचे खंदे समर्थक विठ्ठलराव तुपे पाटील सामाजिक कार्यामुळे पुण्यातील घराघरांत पोहोचले होते.
लातूरचा नावलौकिक वाढवणारे 'आप्पा' 18.10.2024 10:54
वैद्यकीय, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात डॉ. गोपाळराव पाटील यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे.
पगार, पेन्शन विद्यार्थ्यांवर खर्च करणारे शिक्षणमहर्षी 11.10.2024 13:57
मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी आग्रही राहिलेल्या आलुरे गुरुजींनी डोनेशन न घेता शिक्षकांची नियुक्ती केली.
मातब्बर राजघराण्यातील आई-मुलातील गाजलेला वाद 04.10.2024 12:59
माधवराव शिंदे आणि त्यांच्या मातुःश्री राजमाता विजयाराजे यांच्यातील वाद टोकाला गेले होते.
कथित सिंचन घोटाळ्यांचा रंजक प्रवास 27.09.2024 11:42
सिंचन घोटाळ्यांच्या आरोपावरून दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले, मात्र त्यातून विशेष काही समोर आले नाही.
गुजरातेत केशुभाईंनी रचला भाजपचा पाया 10.08.2024 11:17
केशुभाई पटेल हे गुजरातचे लोकनेते होते. गुजरातेत भाजपची पायाभरणी त्यांनी केली होती.
अशी पडली राज ठाकरेंच्या बंडाची ठिणगी 02.08.2024 13:07
शिवसेनेत आपल्याला डावलले जात आहे, अशी भावना राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली होती.
कॉम्रेड कृष्णा देसाईंची हत्या आणि शिवसेना 26.07.2024 10:55
परळचे तत्कालीन आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या कामगार संघटनांवरील वर्चस्वाच्या लढाईतून झाली होती.
यशवंतराव गडाखांनी बाळासाहेब विखेंना पराभूत केलं, पण... 05.07.2024 11:12
1991 च्या लोकसभा निवडणुकीत अहमनगरमध्ये शरद पवार-बाळासाहेब विखे पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता.
वसंतदादा पाटीलः गाव तेथे कार्यकर्ता असलेला मुख्यमंत्री 29.06.2024 13:10
राज्यातील सहकार, शिक्षण क्षेत्रातील प्रगतीची मुहूर्तमेढ वसंतदादा पाटील यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात रोवली होती.
वरचढ होण्याच्या भीतीने अंतुले यांना दखवला 'हात' 22.03.2024 15:05
1999 च्या निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघात माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांची लढत चंद्रकांत खैरे यांच्याशी झाली होती. हा मतदारसंघ शिवसेनचा बालेकिल्ला असला तरी मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. बाहेरुन आलेले अंतुले वरचढ ठरतील अशी भीती काही काँग्रेस नेत्यांना होती.
...सुबोध मोहितेंचे विमान जर चुकले नसते तर? 01.03.2024 10:06
नशिबात नसलं तर समोर आलेलंही हाती लागत नाही असं काहीसं माजी मंत्री सुबोध मोहितेंबाबत झालंय….एक विमान चुकल्यानं त्यांची विधान परिषदेची आमदारकी गेली आणि तेव्हापासून त्यांचं नशिब त्यांना सतत हुलकावण्या देतं….
मराठ्यांचा लढवय्या, जिगरबाज योद्धा (Maratha Reservation And Manoj Jarange Patil) 24.11.2023 14:13
बहुतांश राजकीय नेते मराठा समाजातील असतीलही, मात्र मराठा समाजातील सर्वच नागरिक श्रीमंत नाहीत. शेतीची विभागणी झालीये..... त्यामुळे बहुतांश जणांना चार-पाच एकरांपेक्षा अधिक जमीन नाही. त्याच पावसाचा भरवसा नसतो. पिके आली तरी त्याला भाव मिळेल की नाही याची शाश्वती नसते. महागाईचे संकट तर पाचवीला पूजलेलेच आहे. ही परिस्थिती अनुभवल्यामुळेच जरांगे पाटील यांनी हा गरजवंत मराठ्यांचा लढा सुरू केलाय
अकारण बदनाम आझमघढ | Infamous Azamgarh | RAJ’KARAN PODCAST 12.05.2023 10:06
अबू सालेम, जयपूर, अहमदाबाद दिल्ली बाँबस्फोटांच्या सूत्रधारांमुळे आझमगडचं नाव एकेकाळी चर्चेत आलं होतं. पण देशविरोधी कारवायांचं केंद्र म्हणून आझमगडला बदनाम करण्यापूर्वी त्याच्या इतिहासात डोकावल्यास वेगळंच सत्य समोर येतं.
मथुराचा लढा (Changes in Rape Related Law due to Tribal Girls fight) 10.03.2023 9:16
बलात्काराबाबतच्या कायद्यात आज अनेक कडक तरतुदी आहेत...या तरतूदी सहजासहजी केल्या गेलेल्या नाहीत...या तरतुदी बदलण्यात कारणीभूत ठरली ती एक अनाथ आदिवासी मुलगी...या मुलीसाठी देशभर छेडल्या गेलेल्या लढ्याची दखल राज्यकर्त्यांना आणि न्यायालयांना घ्यावी लागली आणि त्यातून बलात्कार कायद्यातले बदल अंमलात आले...
खेळातलं राजकारण आणि राजकारणातला खेळ | Politics in Cricket and Sports Field 27.01.2023 8:11
बऱ्याच वर्षांनंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत खरी निवडणूक झाली….राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार संघटनेच्या अध्यक्षपदी निवडले गेले…त्यानंतर आता या संघटनेकडून अपेक्षा वाढल्या आहेत…
राज आणि राणें एकत्र आले असते तर? 28.10.2022 5:40
नारायण राणे आणि राज ठाकरे हे दोन्ही उद्धव ठाकरेंचे विरोधक…मग हे दोघं एकत्र का आले नाहीत असा प्रश्न साहजिकच पडतो….खरंच का नाही आले दोघं एकत्र…
A Dispute Between Sharad Pawar and Madhavrao Godbole | का झाले होते शरद पवार आणि माधवराव गोडबोलेंमध्ये वाद... 14.10.2022 5:24
दिवंगत माजी केंद्रीय मंत्री माधवराव गोडबोले हे चर्चेतलं व्यक्तिमत्त्व....दिल्लीत त्यांच प्रस्थही मोठं होतं....याच गोडबोलेंनी दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांची बाबरी प्रकरणात पाठराखणही केली होती...हेच गोडबोले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात एकदा चांगलेच वाद झाले होते.....
राजकारणाचा प्रवास मोहिते पाटील घराण्याचा 07.10.2022 14:18
मोहिते-पाटील हे अकलूज तालुक्याच्या आणि परिणामी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारं घराणं..... त्यामुळे त्यांचे राजकारण संपू शकत नाही..... असं बोललं जातं काय आहे वस्तुस्थिती
कहाणी किस्सा कुर्सिका..ची 30.09.2022 5:53
एखादी लेखणी जशी राजकारण्यांच्या उरात धडक भरवू शकते...तसाच एखादा चित्रपटही राजकारण्यांच्या नाकाला झोंबू शकतो....हीच आजची आमची सत्यकथा आहे
Why Nitishkumar is an Important Person in Indian Politics | नितीशकुमारांचे का आहे देशाच्या राजकारणात महत्त्व 23.09.2022 15:44
नितीशकुमार यांचं राजकीय भान, त्यांची प्रशासकीय पकड, त्यांनी केलेली अनेक चांगली कामं असं सगळं जमेला धरूनही, सहकाऱ्यांनी निश्र्चिंत राहावं असे भरवशाचे नेते ते कधीच नव्हते. तरीही बिहारमध्ये नितीशकुमार हे दखलपात्र नेतृत्व आहे....हे मात्र सर्वांना मान्य करायलाच हवं.....
The only leader whose superfast paths were constantly interrupted | असे एकमेव नेते, ज्यांच्या सुपरफास्ट मार्गांमध्ये सातत्याने अडथळे आणले गेले 16.09.2022 8:42
देशभरात त्यांनी उभारलेल्या महामार्गांचा चित्रपट डोळ्यांपुढे मांडण्यात येतो.... गेल्या आठ वर्षांत तब्बल ७२ हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बांधणारे......दरदिवशी ३७ किलोमीटरचा महामार्ग बांधून रेकाॅर्डब्रेकर करणारे.... वडोदऱ्याजवळ २४ तासांत अडीच किलोमीटरचा चौपदरी सिमेंट काँक्रीटचा रस्ता उभारून विश्वविक्रम करणारे असे एकमेव नेते
कहाणी बारामतीतल्या एका संघर्षाची 09.09.2022 13:11
त्यामुळे नाराज काकडे गटाने कै. बाबालाल काकडे यांना मैदानात उतरवलं आणि इथून पवार-काकडे यांच्यातला राजकीय संघर्ष सुरू झाला.
Podcasts similares
Replaio no es editor de podcasts; los nombres de los programas, las portadas y el audio pertenecen a sus autores y se distribuyen a través de canales RSS públicos