Sakal Media
"राज"कारण " Rajkaran
सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे.ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट, ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्ष...
No dejes de visitar la web del podcast y apoyar a su creador: audiowallah.com
¿Dónde escuchar?
Podcasts en la app Replaio Radio Muy prontoLos podcasts llegarán muy pronto a la app. Instálala ahora y sé el primero en descubrir una forma totalmente nueva de vivir los podcasts
Episodios
ओबीसींना ताकद देऊन काँग्रेसला हादरे देणारा नेता: व्ही. पी. सिंह 02.09.2022 6:53
पुण्यातील झुणका भाकर केंद्रात जाऊन तेथील भाकरीची चव चाखणारा, जनता दल नावाच्या प्रयोगातून आणि मंडलच्या आयोगातून काँग्रेसची पाळुमुळे खच्ची करणारा नेता
स्वतंत्र भारतातला पहिला घोटाळा 'जीप स्कँडल' 26.08.2022 4:33
दरवर्षी आपल्या देशात कुठल्या ना कुठल्या नव्या घोटाळ्याचा पर्दाफाश होतच असतो. बोफोर्स, चारा घोटाळा, २ जी स्पेक्टर्म स्कॅम अगदी अलीकडचा आॅगस्टा वेस्टलँड स्कॅम, सत्यम गैरव्यवहार असे काही गाजलेले घोटाळे..... १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि पुढच्या काही महिन्यातच एक मोठा गैरव्यवहार उघडकीला आला....
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दंड बनतो तरी कुठं 12.08.2022 3:59
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्ण गणवेशात दंडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे..... भरीव आणि उत्कृष्ट प्रतीचे दंड तयार होतात तरी कुठं हे घेऊयात या पाॅडकास्टच्या माध्यमातून जाणून……
कहाणी गणपती दूध पितो त्याची 05.08.2022 6:13
पण तोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गणपतीला दूध पाजून मोकळे झाले होते. पुढं काय झालं याची एक रंजक हकिकत
कोडं ६० लाखांचं…न उलगडलेलं 29.07.2022 6:16
सत्तरच्या दशकात देशात गाजलं ते नगरवाला प्रकरण….एका अज्ञात फोनवर स्टेट बँकेतून काढले गेले होते तब्बल ६० लाख रुपये…..नक्की कुणासाठी होती ही रक्कम….या प्रकरणात सहभागी असलेल्यांचं पुढं काय झालं याची एक रंजक हकिकत
राजभवन बनला होता स्मगलिंगचा अड्डा 22.07.2022 7:30
८० च्या दशकात राज्याला हादरवणारी एक घटना घडली होती…..त्याकाळात स्मगलिंग जोरात सुरु होतं…त्यासाठी स्मगलर्सनी एक सेफ जागा निवडली होती….ती म्हणजे मुंबईचे राजभवन….ऐका नक्की काय घडलं होतं त्यावेळी…..
काय घडलं १९९९ च्या नागपूर विधीमंडळ अधिवेशनातं? | What Happened in the 1999 Nagpur Winter Session? 15.07.2022 7:11
विधीमंडळाचे अधिवेशन म्हणजे कोणत्याही सरकारची कसोटीच. त्यातही काठावरील बहुमत असलेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्याला तर डोळ्यात तेल ठेवूनच कारभार करावा लागतो हे देखिल सत्य.....साहजिकच अशा सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधी पक्ष सतत प्रयत्न करतात.....विरोधकांच्या अशा खेळ्यांना अनेकदा सामोरे गेले होते दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख.... ही गोष्ट आहे १९९९ची.
Podcasts similares
Replaio no es editor de podcasts; los nombres de los programas, las portadas y el audio pertenecen a sus autores y se distribuyen a través de canales RSS públicos