Sakal Media

"राज"कारण " Rajkaran

News MR ↓ Odcinki: 132

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे.ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्ष...

Koniecznie odwiedź stronę podcastu i wesprzyj twórcę: audiowallah.com

Autor

Sakal Media

Kategoria

News

Strona podcastu

audiowallah.com

Ostatni odcinek

9 paź 2026

Gdzie słuchać?

Podcasty w aplikacji Replaio Radio Już wkrótce

Podcasty trafią do aplikacji już wkrótce. Zainstaluj teraz i jako pierwszy zobacz nowe podejście do podcastów

Pobierz z Google Play Zainstaluj za darmo Android prawie 10 mln pobrań · ocena 4,8 iOS niedługo

Odcinki

RAJ'KARAN PODCAST : थेट अंबानींच्या प्रकल्पाला भिडले... एन. डी. पाटलांनी रायगडच्या शेतकऱ्यांसाठी असा लढा उभा केला की रिलायन्सलाही माघार घ्यावी लागली! 09.10.2026

एन. डी. पाटील म्हणजे सत्तेच्या खुर्चीपेक्षा शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा लढवय्या नेता. रायगडमधील SEZ प्रकल्पासाठी हजारो एकर शेतजमीन जाण्याचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा एन. डी. पाटील यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत आंदोलनाची धुरा हाती घेतली. कायदेशीर अभ्यास, मोर्चे, सभा आणि सातत्यपूर्ण संघर्षाच्या माध्यमातून त्यांनी हा लढा उभा केला. या आंदोलनामुळे सरकार आणि रिलाय...

RAJ'KARAN PODCAST : विधानसभेच्या अध्यक्षांवरच पेपरवेट फेकला... आणि त्यानंतर विधानसभेच्या टेबलवरून पेपरवेटच गायब झाले! 02.10.2026

विधानसभेच्या अध्यक्षांवर पेपरवेट फेकणारा आमदार, तुरुंगातून निवडणूक जिंकणारा नेता, काँग्रेसच्या दिग्गज मंत्र्यांना थेट आव्हान देणारा राजकारणी आणि स्वतंत्र विदर्भासाठी आयुष्यभर लढणारा ‘विदर्भाचा शेर’ म्हणजे जांबुवंतराव धोटे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक धक्कादायक आणि रंजक किस्से घडले. 1964 मध्ये विधानसभेच्या अध्यक्षांवर पेपरवेट फेकल्यानंतर त्यांचं सदस्यत्व रद्द झालं; मात्र तुरुंगात असतानाही जनते...

Sakal Chya Batmya | महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय ते इराणचे चलन निचांकी पातळीवर 30.09.2026

१ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय २ राज्यातील व्याघ्र प्रकल्पांचे गाभा क्षेत्र उद्यापासून उघडणार ३ रब्बी ज्वारीच्या मिनीकिट्स उपलब्ध करा; कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांचे केंद्राला पत्र ४ शेअर बाजारात ४ दिवस घसरण, लाखो कोटींचं नुकसान ५ इराणचे चलनमूल्य नीचांकी पातळीवर ६ भारताला पाचवं सुवर्ण, नीरुची एकटीची दोन गोल्ड ७ चित्रपट निर्मात्यांसह दिग्गज सेलिब्रिटी प्राप्तिकरच्या रडारवर स्क्र...

RAJ'KARAN PODCAST : श्रीधर नाईकांच्या हत्येने कोकण हादरलं; राणेंवर आरोप, कोर्टात खटला अन् निकालाने बदललं राजकारण! 25.09.2026

कोकणच्या राजकारणात एकेकाळी तरुण नेतृत्वाचा आक्रमक चेहरा म्हणून श्रीधर नाईक यांची ओळख होती. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी सिंधुदुर्गात संघटन उभं केलं आणि अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेने काँग्रेसला धक्का बसला आणि त्याच काळात नारायण राणे विजयी झाले. त्यानंतर 1991 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी...

RAJ'KARAN PODCAST : कट्टर विरोधक ते काँग्रेसचा मंत्री : यशवंतराव मोहितेंच्या ‘त्या’ एका सहीमागची भन्नाट राजकीय कहाणी 18.09.2026

काँग्रेसच्या धोरणांना विरोध करत शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे यशवंतराव मोहिते पुढे काँग्रेसमध्ये कसे आले? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या मोहितेंना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी काय भूमिका बजावली? एप्रिल 1960 मध्ये मजदूर किसान पक्ष विसर्जित केल्यानंतर मोहिते थेट काँग्रेसमध्ये येतील, अशी अपेक्षा होती. पण त्यांचा प्रवेश वेगळ्याच...

RAJ'KARAN PODCAST : एका मराठी माणसाच्या हाकेवर पंजाबमध्ये 1 लाख शेतकरी जमले... राज्यपालांना 6 दिवसं घरातचं अडकवून ठेवलं होतं 11.09.2026

स्वित्झर्लंडमधलं आरामदायी आयुष्य सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भारतात परतलेले शरद जोशी पुढे देशातील मोठे शेतकरी नेते बनले. शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून त्यांनी कांदा, ऊस आणि वीज दराच्या प्रश्नांवर आक्रमक आंदोलनं उभी केली. 1984 मध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांसोबत चंदीगडच्या राजभवनाला घातलेल्या घेरावाने तर देशाचं लक्ष वेधून घेतलं. जवळपास एक लाख हिंदू-शीख शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आणि सहा दिव...

RAJ'KARAN PODCAST : मंत्रिपद नाकारलेल्या विलासरावांनी अंतुलेंकडून लातूर जिल्हा मागितला; २५ वर्षांनी केली होती कृतज्ञतेची परतफेड 04.09.2026

१९८० मध्ये बॅरिस्टर ए. आर. अंतुले मुख्यमंत्री झाले, पण विलासराव देशमुखांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. नाराज असलेल्या विलासरावांनी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या सल्ल्याने अंतुलेंचा लातूरमध्ये भव्य सत्कार आयोजित केला. याच कार्यक्रमात विलासरावांनी अंतुलेंकडे एक मागणी केली—लातूरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्या. अंतुलेंनी व्यासपीठावरून क्षणार्धात ही मागणी मान्य केली. प्रशासकीय अडचणींवर मात क...

RAJ'KARAN PODCAST : 11 वेळा आमदार झालेले गणपतआबा 1999 मध्ये मुख्यमंत्री होता होता राहिले 28.08.2026

११ वेळा एकाच मतदारसंघातून आमदार होण्याचा विक्रम करणारे गणपतराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातील साधेपणा, प्रामाणिकपणा आणि अभ्यासू वृत्तीचं प्रतीक होते. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा आयुष्यभर खांद्यावर घेत त्यांनी सांगोल्याचं तब्बल ५५ वर्ष प्रतिनिधित्व केलं. दोन वेळा मंत्री झाले, मात्र १९९९ मध्ये त्यांचं नाव थेट मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आलं होतं. त्यांच्या पक्षाचे फक्त तीन आमदार असतानाही गणपतर...

RAJ'KARAN PODCAST : शंकरराव चव्हाणांच्या एका शब्दाखातर पतंगरावांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला; पुढे 5 वेळा संधी आली, पण हुकली! 21.08.2026

पतंगराव कदम यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९८० च्या विधानसभा निवडणुकीतील अवघ्या ८६ मतांच्या पराभवाने झाली. १९८५ मध्ये त्यांनी दमदार पुनरागमन करत विधानसभेत प्रवेश केला आणि पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं स्थान निर्माण केलं. १९९९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी पतंगराव कदमांचं नाव आघाडीवर होतं. मात्र ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांच्या विनंतीवर...

RAJ'KARAN PODCAST : बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देणार होते; पण एका निर्धारानं सगळं चित्रच बदललं... 14.08.2026

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा आणि वादग्रस्त अध्याय म्हणजे आणीबाणीला दिलेला पाठिंबा. इंदिरा गांधींच्या काँग्रेससोबतची जवळीक, १९७७ आणि १९७८ मधील निवडणुकीतील पराभव, शिवाजी पार्कवरील राजीनाम्याचा भावनिक प्रसंग आणि त्यानंतर शिवसेनेने घेतलेली हिंदुत्वाची वाटचाल, या सगळ्याने पक्षाचं राजकारण बदललं. एकेकाळी काँग्रेसच्या बाजूने उभ्या असलेल्या शिवसेनेने पुढे काँग्रेसशी संबंध...

RAJ'KARAN PODCAST : एक सल्ला... 39 परवानग्या... डी. वाय. पाटील यांचं आयुष्य बदलणारे दोन प्रसंग! 07.08.2026

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या यशामागे फक्त त्यांची मेहनत नव्हती, तर दोन दिग्गज नेत्यांचा मोलाचा वाटा होता—राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटील. राजारामबापूंनी त्यांना राजकारणात संधी दिली, तर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा दिली. राजकीय मतभेदांच्या काळातही डी. वाय. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शकाशी निष्ठा कायम ठेवली. पुढे वसंतदादांनीही जुने मतभेद विसरून त्यांच्या शैक्षणिक संस्थांना ३९...

RAJ'KARAN PODCAST : "निखिल आपलाच बच्चा आहे" म्हणणारे सुरेश जैन पलटले... खडसेंच्या मुलाचा बालेकिल्ल्यातच पराभव झाला… 31.07.2026

२०१० च्या जळगाव विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण दिलं. राज्यात शिवसेना-भाजपची युती असतानाही सुरेशदादा जैन यांनी पडद्यामागून खेळलेल्या राजकीय डावामुळे निखिल खडसे यांचा अवघ्या १६ मतांनी पराभव झाला. या एका निकालानंतर एकनाथ खडसे आणि सुरेशदादा जैन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला. पुढे घरकुल घोटाळा, अटक, न्यायालयीन लढाया आणि जळगावच्या बदलले...

RAJ'KARAN PODCAST : दोन खेळ्या फसल्या... पण मराठी माणसानं भाजपला सत्तेपर्यंत नेऊन दाखवलं : शेवटची रिस्क मात्र महागात पडली 24.07.2026

भाजपला केवळ दोन लोकसभा जागांवरून राष्ट्रीय सत्तेपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रमोद महाजन हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी रणनीतीकारांपैकी एक मानले जातात. आधुनिक निवडणूक व्यवस्थापन, डेटा-आधारित प्रचार, मीडिया प्लॅनिंग आणि एनडीएची यशस्वी मोट बांधण्यामागील त्यांची भूमिका या भागात उलगडली आहे. १३ दिवसांचं वाजपेयी सरकार, एका मताने पडलेलं सरकार, एनडीएची सत्ता, 'इंडिया शायनिंग' मोहिमेची...

RAJ'KARAN PODCAST : ज्या बंगल्यात जन्म झाला... त्याच बंगल्यात तब्बल ५५ वर्षांनी मंत्री म्हणून गृहप्रवेश! 17.07.2026

लोकनेते बाळासाहेब देसाईंपासून ते आजचे मंत्री शंभूराज देसाई आणि चौथ्या पिढीतील यशराज देसाई यांच्यापर्यंतच्या प्रेरणादायी राजकीय प्रवासाची ही गोष्ट. शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारी निर्णय, शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेतील भूमिका, कोयना भूकंपातील मदतकार्य, मुख्यमंत्रीपद हुकल्याची चर्चा, शिवसेनेतील प्रवेश, संघर्षातून मिळवलेले यश आणि तब्बल ५५ वर्षांनंतर ज्या 'मेघदूत' बंगल्यात जन्म झाला त्याच बंगल्यात मं...

RAJ'KARAN PODCAST : सोनिया गांधी नऊवारी नेसून उतरल्या होत्या शरद पवारांच्याविरोधात मैदानात; अनंतराव थोपटेंसाठी पणाला लावली होती ताकद! 10.07.2026

१९९९ मध्ये शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी काँग्रेसमधून बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. या बंडानंतर सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रात थेट शरद पवारांच्या राजकीय बालेकिल्ल्यात उतरून काँग्रेसची ताकद दाखवण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये अनंतराव थोपटे यांच्या प्रचारासाठी त्यांनी नऊवारी साडी नेसून सभा घेतली. या सभेमागील राजकीय रणनीती, शरद पवार विरुद्ध सोनिया गांधी...

RAJ'KARAN PODCAST : शिवसेनेतील दोन मोठ्या भूकंपांमागे एकच छुपी गोम; 'मुंबई विरुद्ध घाटी' संघर्षाचा संपूर्ण इतिहास! 03.07.2026

छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे फक्त सत्तेची महत्त्वाकांक्षा नव्हती. तर त्यामागे शिवसेनेतील अनेक वर्षांचा 'कोकण विरुद्ध घाट' हा अंतर्गत संघर्हीष दडला होता. १९९१, २०२२ आणि २०२६ या ३ ऐतिहासिक बंडांची तुलना करत हा पॉडकास्ट शिवसेनेतील प्रादेशिक सत्तासंघर्ष, मातोश्रीभोवतीचं नेतृत्व, घाटावरील नेत्यांची नाराजी आणि त्यातून घडलेले राजकीय भूकंप उलगडतो. भुजबळांच्या बंडातील १७ आमदारांपासून ते शिंदे...

RAJ'KARAN PODCAST : भास्कर जाधवांनी पहिल्यांदा शिवसेना मिलिंद नार्वेकरांना नडूनच सोडली होती... 22 वर्षांच्या वादाची फुल हिस्ट्री! 26.06.2026

भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. "नार्वेकर कोण लागून गेला?" या वक्तव्यामुळे २२ वर्षांपूर्वीचा संघर्ष पुन्हा समोर आला. २००४ मध्ये तिकीट कापल्याचा आरोप करत भास्कर जाधवांनी शिवसेना सोडली होती. त्यावेळी त्यांनी मिलिंद नार्वेकरांवर गंभीर आरोप केले होते. मात्र २०१९ मध्ये याच नार्वेकरांनी जाधवांची शिवसेनेत घरवापसी घडवून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. मग नेम...

RAJ'KARAN PODCAST : भुजबळांचा 'गेम ओव्हर' झाला होता... पण विधानसभा अध्यक्षांच्या एका निर्णयाने महाराष्ट्राचं राजकारणच फिरलं! 19.06.2026

1991 मध्ये शिवसेनेचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवला. पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचं आमदारपद जाणं निश्चित मानलं जात असतानाच विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी दिलेल्या एका ऐतिहासिक निर्णयाने संपूर्ण खेळच बदलून गेला. 16 आमदार परत फिरल्यानंतरही भुजबळ कसे वाचले? काय होती कायद्यातील ती पळवाट? आणि या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजका...

RAJ'KARAN PODCAST : 50 मृत्यू, 2000 जणांना अटक अन् डॉक्टरकीचा काळाबाजार : इतिहासातील थरकाप उडवणारा रक्तरंजित घोटाळा! 12.06.2026

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संताप उसळला असतानाच पुन्हा चर्चेत आलाय मध्य प्रदेशातील कुप्रसिद्ध ‘व्यापम’ घोटाळा. हजारो कोटींच्या या रॅकेटमध्ये मेडिकल प्रवेश, सरकारी नोकऱ्या, दलाल, अधिकारी, राजकारणी आणि संशयास्पद मृत्यूंची मालिका समोर आली होती. तब्बल ५० मृत्यू, २००० पेक्षा अधिक अटक आणि सीबीआय चौकशीमुळे हादरलेलं शिवराज सिंह चौहान सरकार… नेमकं काय होतं व्यापम प्रकरण? कसा चालत होता हा काळाबाजार? आण...

RAJ'KARAN PODCAST : वानखेडेनंतर शिवसैनिकांनी दिल्लीचं 'कोटला' स्टेडियम गाजवलं; ठाकरेंच्या एका विरोधानं वाजपेयींचं सरकार हादरलं होतं! 05.06.2026

१९९९ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याला विरोध करत शिवसैनिकांनी थेट दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमची खेळपट्टी उखडली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर घडलेल्या या धक्कादायक आंदोलनामुळे संपूर्ण देश हादरला होता. केंद्र सरकार, BCCI आणि सुरक्षा यंत्रणा अडचणीत आल्या होत्या. सामना दिल्लीहून चेन्नईला हलवावा लागला आणि अखेर लालकृष्ण अडवाणींना स्वतः मुंबईत येऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घ...

RAJ'KARAN PODCAST : बाळासाहेबांच्या एका निर्णयाने बदलला सत्तेचा खेळ : गोष्ट शिवसेनेतील सर्वात मोठ्या संघर्षाची 29.05.2026

शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सत्तासंघर्षाची ही Inside Story! बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर पक्षाचा वारसदार कोण होणार? राज ठाकरे की उद्धव ठाकरे? 1990 च्या दशकातील शिवसेनेतील वाढत गेलेले मतभेद, रमेश किणी प्रकरणानंतर बदललेलं राजकीय समीकरण, 1997 आणि 2002 च्या मुंबई महापालिका निवडणुका, आणि अखेर उद्धव ठाकरेंसाठी तयार करण्यात आलेलं ‘कार्याध्यक्ष’ पद… या सर्व घटनांनी महाराष्ट्राचं राजकारण कायमचं बद...

RAJ'KARAN PODCAST : एका नौदल प्रमुखांमुळे पाडलं होतं वाजपेयींचं सरकार; दिल्ली हादरवणाऱ्या बंडाची Inside Story 22.05.2026

१९९८-९९ मध्ये भारताच्या राजकारणात असा संघर्ष घडला, ज्यामुळे थेट केंद्र सरकारच कोसळलं. नौदल प्रमुख अॅडमिरल विष्णू भागवत यांनी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निर्णयाला उघड विरोध केला आणि त्यानंतर त्यांची बडतर्फी झाली. या प्रकरणात जयललिता, सोनिया गांधी, सुब्रह्मण्यम स्वामी, शरद पवार यांसारख्या दिग्गज नेत्यांची एंट्री झाली आणि अखेर अटलबिहारी वाजपेयी सरकार एका मताने कोसळलं. भारताच्या लोकशाही, सै...

RAJ'KARAN PODCAST : नरसिंहरावांचं सरकार वाचवायला शिवसेना खासदार धावला : बाळासाहेबांनी राजकारणातूनच संपवलं 15.05.2026

१९९३ मध्ये पी. व्ही. नरसिंहराव सरकारविरोधात अविश्वास ठराव आला होता. सरकार अल्पमतात जाण्याची शक्यता असताना शिवसेनेचे परभणीचे खासदार अशोक देशमुख यांनी निर्णायक भूमिका बजावल्याची चर्चा झाली. JMM लाचकांडात मध्यस्थी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि देशभर खळबळ उडाली. बाळासाहेब ठाकरे यांनी याला थेट गद्दारी मानत देशमुखांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. त्यानंतर १९९६ च्या निवडणुकीत सामान्य शिवसैनिक सुरेश जा...

RAJ'KARAN PODCAST : एक आरोप आणि महाराष्ट्राचं राजकारण हादरलं; राज ठाकरेंना बसला होता सर्वात मोठा राजकीय सेटबॅक 08.05.2026

१९९६ साली घडलेल्या रमेश किणी हत्याकांडाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती. त्या वेळी शिवसेनेचे उदयोन्मुख नेते राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. विरोधकांनी या प्रकरणाला राजकीय रंग देत ‘मातोश्री’पर्यंत मुद्दा नेला. वाढत्या दबावामुळे तपास CBI कडे सोपवण्यात आला. दीर्घ चौकशीनंतर राज ठाकरे यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत आणि त्यांना क्लीन चिट देण्यात आली. मात्र या...

RAJ'KARAN PODCAST : सिंगूर ते नंदीग्राम: ममता बॅनर्जींनी कसं संपलं बंगालमधलं डाव्यांचं राज्य? 01.05.2026

पश्चिम बंगालमध्ये तब्बल 34 वर्षे डाव्या आघाडीची सत्ता अबाधित होती. शेतकरी धोरणांमुळे निर्माण झालेला भक्कम जनाधार हा त्यांच्या यशाचा मुख्य आधार होता. मात्र 2000 नंतर औद्योगिकीकरणाच्या नावाखाली जमिनी अधिग्रहणाच्या निर्णयांनी परिस्थिती बदलली. सिंगूर, नंदीग्राम आणि लालगड या आंदोलनांनी राज्यात मोठा असंतोष निर्माण केला. ममता बॅनर्जी यांनी या असंतोषाला राजकीय रूप देत स्वतःला सामान्य जनतेचा आवाज म्हणून उभ...

Słuchaj podcastu "राज"कारण " Rajkaran w Replaio

Radio i podcasty w jednej aplikacji - za darmo, bez zakładania konta. Zainstaluj już dziś i nie przegap premiery

Pobierz z Google Play

Replaio nie jest wydawcą podcastów; nazwy audycji, okładki i audio należą do ich autorów i są rozpowszechniane przez publiczne kanały RSS