Sakal Media

"राज"कारण " Rajkaran

News MR ↓ 132 episodios

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे.ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्ष...

No dejes de visitar la web del podcast y apoyar a su creador: audiowallah.com

Autor

Sakal Media

Categoría

News

Web del podcast

audiowallah.com

Último episodio

9 de oct. de 2026

¿Dónde escuchar?

Podcasts en la app Replaio Radio Muy pronto

Los podcasts llegarán muy pronto a la app. Instálala ahora y sé el primero en descubrir una forma totalmente nueva de vivir los podcasts

Descárgala en Google Play Instálala gratis Android casi 10 M de descargas · valoración de 4,8 iOS muy pronto

Episodios

सोसायटीचे अध्यक्ष ते मुख्यमंत्री अन् पंतप्रधान... 02.05.2025

सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या एच. डी. देवेगौडा यांना पंतप्रधानपद भूषवण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना खतावर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता.अय्यूब कादरी

चित्रपटसृष्टी अन् राजकारणातलाही जादूगर! 25.04.2025

एम. जी. रामचंद्रन हे अत्यंत संवेदनशील होती. भारतातील कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री होणारे ते पहिलेच अभिनेते होते. अय्यूब कादरी

पटकथालेखक ते मुख्यमंत्री अन् प्रगत तमिळनाडूची पायाभरणी 18.04.2025

पेरियार ई. व्ही. रामास्वामी यांच्या मुशीत वाढलेल्या एम. करुणानिधी यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री असताना अनेक सुधारणावादी निर्णय घेतले. अय्यूब कादरी

प्रखर राजकीय संघर्ष, चढ-उतार पाहिलेल्या 'अम्मा' 11.04.2025

सभागृहात सत्ताधाऱ्यांकडून अपमान झाल्यानंतर जयललिता यांनी मुख्यमंत्री झाल्याशिवाय विधानसभेत पाऊल ठेवणार नाही, अशी शपथ घेतली होती. अय्यूब कादरी

तेलुगु चित्रपटसृष्टीचे शोमॅन, राजकारणातही यशस्वी 04.04.2025

तेलुगु चित्रपटांतील एन. टी. रामाराव यांच्या देव-देवतांच्या भूमिका घराघरांत पोहोचल्या होत्या. राजकारणातही लोकांनी त्यांना खूप प्रेम दिलं. एका चुकीमुळं जावयानं त्यांच्याविरोधात बंड केलं आणि त्यांना मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं होतं. अय्यूब कादरी

हजारो एकर दान केली, 'राजा'नं सामाजिक न्यायही दिला 28.03.2025

राजपूत जमीनदार कुटुंबात जन्मलेले, मांडा संस्थानचे राजा व्ही. पी. सिंह यांनी पंतप्रधान असताना मंडल आयोगाची अंमलबजावणीची केली. त्यामुळं त्यांना प्रस्थापित समाजांचा रोष सहन करावा लागला होता.

ज्योती बसूः देशाला दिशा दाखवली, मात्र 'पीएम'पदाची संधी हुकली 21.03.2025

ज्योती बसू यांच्याकडे 1996 मध्ये पंतप्रधान बनण्याची संधी चालून आली होती. मात्र पक्षाच्या भूमिकेमुळं ती संधी हुकली होती.

सोमनाथ चटर्जीः असा लोकसभा अध्यक्ष होणे नाही...! 14.03.2025

संसदीय लोकशाही आणि पक्षीय राजकारण, यात निष्ठा कुठे ठेवायची, हे सोमनाथ चटर्जी यांनी लोकसभेचे अध्यक्ष असताना दाखवून दिलं.

मौलाना आझादः प्रचंड विद्वत्ता, तशीच देशभक्ती 07.03.2025

मौलाना अबुल कलाम आझाद यांनी स्वातंत्र्यलढ्यात आणि देशाचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून महत्वाची भूमिका निभावली.  

कल्याण सिंहः यूपीत हिंदुत्व रुजवलं, पण.... 28.02.2025

उत्तर प्रदेशात हिंदुत्व रुजवण्यात माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचा मोठा वाटा होता. 

मुलायमसिंह यादवः धर्मनिरपेक्ष राजकारणाचे चॅम्पियन 21.02.2025

उत्तर प्रदेशासह देशाच्या राजकारणात मुलायमसिंह यादव यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

होय, दिल्लीच्या शिल्पकार शीला दीक्षितच! 14.02.2025

शीला दीक्षित यांनी 15 वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात दिल्लीकरांचं जगणं सुकर केलं.

अरुण जेटलीः प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व 07.02.2025

नरेंद्र मोदी सरकारचे संकटमोचक, अशी अरुण जेटली यांची ओळख होती.

लालूप्रसाद यादवः मागासांचा, शोषितांचा आवाज 31.01.2025

कितीही आरोप झाले तरी बिहारच्या राजकारणात लालूप्रसाद यादव यांचं स्थान, महत्त्व अबाधित राहिलेलं आहे.

सुषमा स्वराजः आक्रमक अन् सुहृदयीही 24.01.2025

सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाला मानवी चेहरा मिळवून दिला. ट्वीटरचा योग्य वापर करून त्यांनी अनेकांना मदत केली होती.

लोकांना आता आर. आर. आबांची आठवण का येतेयं? 17.01.2025

डिसेंबर 2024 पासून राज्यात अभूतपूर्व अशा राजकीय, सामाजिक गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

जलसंधारणाचे प्रणेते, 'पंचायत राज'लाही बळकटी 09.01.2025

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची ओळख राज्यातील जलक्रांतीचे प्रणेते अशी आहे.

माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी बस तिकिटासाठी रांगेत! 03.01.2025

महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव ऊर्फ दादासाहेब कन्नमवार हे सुसंस्कृत, उत्तम असे प्रशासक होते. ते व्रतस्थ जीवन जगले.

कडक शिस्तीचे 'हेडमास्तर मुख्यमंत्री' 27.12.2024

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ म्हटलं जात. भ्रष्टाचारापासून दूर राहिलेला नेता, अशी त्यांची ओळख आहे

शेती, मातीवर श्रद्धा असणारे मुख्यमंत्री 20.12.2024

वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री असताना हरितक्रांतीच्या माध्यमातून महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं

अमानुष अत्याचार, धगधगतं मन अन् हादरवून टाकणारं हत्याकांड 14.12.2024

फुलन देवी यांची चंबळच्या खोऱ्यात दहशत होती. अल्पवयीन असताना झालेल्या अमानुष अत्याचाराचा बदला घेण्यासाठी त्यांनी बंदूक उचलली होती.

देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारे पंतप्रधान 06.12.2024

देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्यासाठी नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या मदतीनं उपाययोजना केल्या होत्या.

एेतिहासिकः पाच वर्षे अन् निकालही... 29.11.2024

गेली पाच वर्षं महाराष्ट्रानं अनुभवेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींवर एकदाचा पडदा पडला आहे.

जेव्हा एका मतानं झाला दोघांचा पराभव... 22.11.2024

 कर्नाटक आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत दोन उमेदवारांचा विजय केवळ एका मतानं हुकला होता.

अन् छगन भुजबळांना घाम फुटला, ते भूमिगत झाले! | Rajkaran Podcast 15.11.2024

शिवसेना सोडल्यानंतर शिवसैनिकांना घाबरून भूमिगत झालेल्या छगन भुजबळ यांना डॉ. पद्मसिंह पाटील यांनी संरक्षण दिलं होतं.

Escucha el podcast "राज"कारण " Rajkaran en Replaio

Radio y podcasts en una sola app - gratis y sin registro. Instálala hoy y no te pierdas el estreno

Descárgala en Google Play

Replaio no es editor de podcasts; los nombres de los programas, las portadas y el audio pertenecen a sus autores y se distribuyen a través de canales RSS públicos