Sakal Media

"राज"कारण " Rajkaran

News MR ↓ 132 episodios

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे.ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्ष...

No dejes de visitar la web del podcast y apoyar a su creador: audiowallah.com

Autor

Sakal Media

Categoría

News

Web del podcast

audiowallah.com

Último episodio

9 de oct. de 2026

¿Dónde escuchar?

Podcasts en la app Replaio Radio Muy pronto

Los podcasts llegarán muy pronto a la app. Instálala ahora y sé el primero en descubrir una forma totalmente nueva de vivir los podcasts

Descárgala en Google Play Instálala gratis Android casi 10 M de descargas · valoración de 4,8 iOS muy pronto

Episodios

RAJ'KARAN PODCAST | भास्कर जाधव, सतेज पाटील 31.10.2025

विधानसभा आणि विधान परिषद या राज्यातील दोन्ही सभागृहांमध्ये सध्या विरोधी पक्षनेता नाही. सत्ताधारी पक्षांकडून किमान १० टक्के सदस्यसंख्येकडे लक्ष वेधले जात आहे, तर विरोधी पक्षांकडून आतापर्यंतच्या परंपरेची उदाहरणे दिली जात आहेत. राज्यासमोर सध्या अतिवृष्टी, बेरोजगारी, महागाई, आरक्षणाचे वाद यांसारखे अनेक गंभीर प्रश्न आहेत. अशा काळात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन जनतेच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षि...

RAJ'KARAN PODCAST | BMC निवडणूक ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई! 24.10.2025

राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेतील घडामोडींवर केंद्रित झाले आहे. मुंबई महापालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे, परंतु मागील दशकात भाजपची ताकदही लक्षणीयरीत्या वाढली आहे. आता शिवसेनेतील फूटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर ही निवडणूक सावरण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, प्रभागरचनेमध्ये सोयीप्रमाणे बदल केल्याचा आरोप होत असून, त्...

RAJ'KARAN PODCAST | अतिवृष्टीमुळे भाजप टेन्शनमध्ये : निवडणुका जिंकण्याचे आव्हान 17.10.2025

पूरस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या तर आधी महापालिका निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने शिंदेंच्या शिवसेनेशी युती केली तरी अन्य महापालिकांत भाजपला मित्रपक्षाची गरज नाही. स्वबळावरच निवडणुका लढविल्यास पक्षाला जास्त फायदा होऊ शकतो, अशी कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांची भावना आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील युतीचा विषय ला...

RAJ'KARAN PODCAST | धुमसणाऱ्या लडाखमधील भडका, ऐका भुमिपुत्राच्या तोंडून... 10.10.2025

लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या आणि घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी नुकतेच तेथे मोठे आंदोलन झाले. लडाखचे संकट संपलेले नसून, ते अद्याप कायम आहे. लडाखच्या जनतेसाठी सोनम वांगचुक यांची भूमिका, त्यांचे ठाम राहणे सरकारने मांडलेल्या रचितकथनापेक्षा अधिक वजनदार आहे. लडाखमधील नागरिकांचा त्यांच्या आंदोलनाला आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा कायम आहे. तो का आहे? आणि हा भडका नेमका का पडला...

RAJ'KARAN PODCAST | संघर्षात निवड ते सुप्रिया सुळेंचं राजकीय लॉन्चिंग : शरद पवार यांना नाशिक नेहमीच जवळचे का वाटते? 03.10.2025

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) नुकतेच प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. तसेच कांदाप्रश्नी आक्रोश मोर्चाही आयोजित केला होता. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश देणाऱ्या नाशिकमध्ये विधानसभेत मात्र अपेक्षित यश मिळवता आले नाही. शरद पवार यांना नाशिक जिल्ह्याने सातत्याने साथ दिली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महायुतीला शह देण्यासाठी पवारांनी ना...

RAJ'KARAN PODCAST | महाराष्ट्राच्या सुरक्षाव्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलणारा मराठमोळा अधिकारी... 26.09.2025

पोलिस दलात उच्च पदांवर असलेले अनेक जण न्यायाची, सत्याची कास धरण्यात, कायद्याची यथायोग्य अंमलबजावणी करण्यात, कायद्यासमोर सर्वांना समान लेखण्यात कमी पडतात. पण सदानंद दाते यांच्यासारखे काही त्यास अपवाद आहेत. घटनेचा मान राखण्याची शपथ तंतोतंत पाळणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये दाते यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. 

RAJ'KARAN PODCAST | एकनाथ शिंदेंचा 'बाण' कोणाच्या वर्मी लागणार? 19.09.2025

गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचा मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये दौरा झाला. लोकसभेत मराठवाड्यातील एकमेव खासदार आणि विधानसभेत जिल्ह्यात सहा आमदार असे घवघवीत यश मिळाल्यानंतर शिंदे तब्बल 14 महिन्यानंतर संभाजीनगरच्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आले. अर्थात निमित्त होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पूर्वतयारी आणि पक्षांतर्गत कुरबु...

RAJ'KARAN PODCAST | देवेंद्र फडणवीस 'मराठा' समाजाचे नवे राजकीय नायक? 12.09.2025

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मुंबईत का धडकले, सरकारने आंदोलकांना थोपविण्यासाठी काय प्रयत्न केले, मुंबईतील मराठा आंदोलन सरकारने कशा पद्धतीने हाताळले... या सर्वच प्रश्नांवर चर्चा करण्याची गरज आहे. आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी एकीकडे प्रशासकीय यंत्रणा मार्ग काढत असताना राजकीय पातळीवर आंदोलन कसे हाताळले गेले, हेही तपासणे गरजेचे आहे.

RAJ'KARAN PODCAST | संघशताब्दी निवडणूक इच्छुकांसाठी नामी संधी 05.09.2025

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात असल्यानंतर संघाच्या संपर्कामुळे आगामी निवडणुकीत मदत होईल, उमेदवारी मिळविण्यात अडचणी येणार नाहीत असे इच्छुकांना वाटत आहेत. त्यामुळे संघाच्या कामाकडे एक नामी संधी म्हणून भाजप कार्यकर्ते पाहत आहेत. 

RAJ'KARAN PODCAST | एका एका शिलेदाराने अडचणीच्या काळात काढला पळ; मराठवाड्यात काँग्रेसचा हात दुबळा! 29.08.2025

मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपूडकर भाजपात दाखल झाले. तर परतूरचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

RAJ'KARAN PODCAST | संघाच्या मुशीत घडलेला नेता पुन्हा भाजपमध्ये... अण्णा डांगेंनी घरट्यासाठी बदललं अंगण  22.08.2025

80-90 च्या दशकातील काँग्रेस नेतृत्वाला कट्टरपणे विरोध करणारे नेतृत्व म्हणून अण्णासाहेब डांगे यांची ओळख होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अनेक पराभव पचवत भाजप रुजवण्यासाठी प्रयत्न केले. आता पुन्हा ते भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे भाजपला त्याचा फायदाच होईल. 

RAJ'KARAN PODCAST | कबुतरांच्या प्रश्नावरून कोंडी : प्रश्न मुंबईतील 25 टक्के मतांचा आहे.. 15.08.2025

मुंबई शहरात कबुतरप्रेमी नागरिक आक्रमक झाले आहेत, तर तिकडे कोल्हापूरातील शिरोळ येथील मठामधील माधुरी हत्तीणीला वनतारा पुनर्वसन केंद्रात नेल्याने हजारो नागरिक रस्त्यावर आले आहेत. या दोन्ही प्रकरणांत जैन समाज हा समान धागा आहे.

RAJ'KARAN PODCAST | Honey Trap Scandal : ‘हनी ट्रॅप’ फक्त संशयाचे धुके ! धूर निघतोय आग असेलच? 08.08.2025

राज ठाकरे जेथे जातील तेथे प्रसारमाध्यमे पोहोचतातच. ते प्रसारमाध्यमांना काही ना काही बातम्या पुरवतातच. इगतपुरीच्या या ‘रिसॉर्ट’वर ठाकरेंनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद साधला. त्या गप्पांच्या ओघात त्यांनी ‘तुमच्या नाशिकमध्ये काय चाललेय हे तुम्हाला माहीत नाही का? असा सवाल पत्रकारांना केला. तिथूनच 72 अधिकारी, राजकीय नेत्यांच्या ‘हनी ट्रॅप’च्या चर्चेला तोंड फुटले.

RAJ'KARAN PODCAST | मराठीचा लळा प्रेमाने लागावा... पण त्यासाठी काय करायचं हेही राज्यपालांनी सांगायला हवे! 01.08.2025

मराठी भाषा मारहाण करून शिकून येणार नाही, असे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. मात्र आवड, सहिष्णुता आणि परप्रांतीयांना मराठी भाषेचा लळा लागावा, यासाठी प्रेमाने काय करता येईल, याबाबतचे मार्गदर्शन राज्यपालांनी करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर मराठीच्या हितासाठी राज्यपालांनी राज्य सरकारलाही काही गोष्टी सांगणे अत्यंत गरजेचे आहे.

RAJ'KARAN PODCAST | नरेंद्र मोदींची निवड कशी झाली होती... संघाचा रोल काय होता? 25.07.2025

2014 मध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. एकट्या भाजपला 282 जागा जिंकता आल्या. 1984 नंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले होते. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर 2019 आणि 2024 या लोकसभा निवडणुकांत भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला.

RAJ'KARAN PODCAST | खोतकर, शिरसाट, गायकवाड, राठोड... शिंदेंचे शिलेदारच शिवसेनेचं जहाज बुडवणार? 18.07.2025

मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेचा एक एक शिलेदार अडचणीत येत आहे. अर्जुन खोतकरांपासून सुरु झालेले संकट आता संजय शिरसाट यांच्यापर्यंत येऊन पोहचले आहे. या सर्वांमुळे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विशेषतः यामुळे शिंदे आणि शिवसेनेची प्रतिमा मालिन होत आहे

“बच्चू कडू : संघर्षातून उभा राहिलेला जनतेचा नेता” 11.07.2025

अपंग बांधवांच्या हक्कासाठी गाडी अडवणाऱ्या, आंदोलनातून सरकारला जागं करणाऱ्या आणि राजकारणात लोकाभिमुखतेची नवी ओळख निर्माण करणाऱ्या बच्चू कडू यांच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अपंगांचं न्यायासाठीचं आंदोलन, आणि मंत्री झाल्यावरही लोकांच्या दारात पोहोचणारा थेट भिडणारा नेता – हा आहे विदर्भातून उभा राहिलेल्या एका खऱ्या लोकनेत्याचा प्रवास

शालीन, सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचे धनी 04.07.2025

ज्येष्ठांचा सन्मान कसा राखायचा, राजकारणात शालीनता कशी जपायची, हे शिवराज पाटील चाकूरकर यांनी दाखवून दिलं आहे.अय्यूब कादरी

सुसंस्कृत, कलासक्त! जमिनीवरचे मुख्यमंत्री 27.06.2025

महाराष्ट्राला लाभलेल्या सुसंस्कृत राजकीय नेत्यांमध्ये, सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये विलासराव देशमुख यांची गणना होते.अय्यूब कादरी

द्रष्टे, शांत, संयमी राजारामबापू 20.06.2025

राजारामबापू पाटील यांनी शिक्षण, सहकारक्षेत्रात अमूल्य असं योगदान दिलं आहे. शालेय जीवनापासूनच ते देळाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते.अय्यूब कादरी

शिवसेनेचा धर्मनिरपेक्ष नेता 13.06.2025

उमरग्याचे दोनदा आमदार आणि धाराशिवचे एकदा खासदार राहिलेल्या प्रा. रवींद्र गायकवाड यांनी धर्मनिरपेक्षतेची मूल्ये खऱ्या अर्थाने जपली आहेत. अय्यूब कादरी

पुण्यातील 'त्या अनुभवानं कांशीराम यांना हादरवून टाकलं... 30.05.2025

आपण एक झालो तर राज्यकर्ती जमात बनू शकतो, याचं राजकीय आत्मभान दलित आणि अन्य मागासवर्गीयांमध्ये कांशीराम यांनी जागृत केलं होतं. अय्यूब कादरी

काँग्रेसचे संकटमोचक, आणीबाणीचे सूत्रधार 23.05.2025

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे हे इंदिरा गांधी यांचे विश्वासू होते. देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा मसुदा रे यांनीच तयार केला होता.

तत्त्वनिष्ठ, निर्भीड, स्पष्टवक्ते...! 16.05.2025

तत्त्वनिष्ठ राजकीय नेते, अशी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची ओळख होती. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा अंगभूत गुण होता.

रुग्णसेवा, राजकीय क्षेत्रातील पितामह 09.05.2025

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांचे आरोग्य, राजकीय क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहेअय्यूब कादरी

Escucha el podcast "राज"कारण " Rajkaran en Replaio

Radio y podcasts en una sola app - gratis y sin registro. Instálala hoy y no te pierdas el estreno

Descárgala en Google Play

Replaio no es editor de podcasts; los nombres de los programas, las portadas y el audio pertenecen a sus autores y se distribuyen a través de canales RSS públicos