BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
सरकारी बँकांचं खाजगीकरणाने लोकांचं आर्थिक हित जपलं जाईल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 23.08.2022 6:21
बँकांच्या खाजगीकरणाचा मुद्दा अधून मधून कायम गाजतो. केंद्रसरकारने दोन सरकारी बँकांच्या खाजगीकरणाची तयारी सुरू केलेली असतानाच अलीकडे रिझर्व्ह बँकेनं आपल्या वेबसाईटवर एक संशोधनात्मक निबंध प्रसिद्ध केला. आणि यात चक्क सरकारी बँकांचं महत्त्व सांगताना खाजगीकरणासाठी अधिक व्यापक दृष्टिकोण ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आलीय. देशाच्या मध्यवर्ती बँकेनं अशाप्रकारे लेख प्रसिद्ध केल्यामुळे हा सरकारला ‘घरचा आहेर’...
हेरगिरीच्या या जहाजामुळे भारत-चीन संबंध आणखी चिघळतील? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 20.08.2022 5:30
चीनचं एक हेरगिरी करणारं जहाज मागचे काही दिवस श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात तैनात आहे. तिथं ते युद्धाभ्यास करणार आहे. पण, त्यामुळे भारताची चिंता मात्र वाढलीय. या जहाजात अत्याधुनिक रडार यंत्रणा आहे, ज्यामुळे चीन भारतीय क्षेपणास्त्रांची अचूकता आणि टप्पा यांचा माग काढू शकेल. आणि दुसरं म्हणजे चीन हंबनटोटा या लंकन बंदाराचा लष्करी कारवायांसाठी वापर करेल अशी भीती भारताला वाटतेय. तर चीन दक्षिण चिनी समुद्रात...
जॅकलिन फर्नांडेझला अडचणीत आणणारं खंडणी प्रकरण काय आहे? । BBC News Marathi 18.08.2022 4:31
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडेझ सध्या भलत्याच अडचणीत सापडली आहे. दोनशे कोटी रुपयांच्या खंडणीच्या एका प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने तिच्यावर आरोपपत्र दाखल केलं आहे. या खंडणी प्रकरणाबद्दल तिला माहिती होती. पण, तिने ती तपास यंत्रणेला वेळेवर दिली नाही, असा तिच्यावर आरोप आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे? आणि जॅकलिनशी याचा संबंध कसा आला पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरव...
बिल्किस बानो खटल्यातल्या दोषींची सुटका कशामुळे झाली? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 17.08.2022 6:13
बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या अकरा दोषींची अलीकडेच सुटका करण्यात आली. गुजरात सरकारच्या 1992मधल्या शिक्षा माफी धोरणाला अनुसरून हे निर्देश देण्यात आले. पण, सामूहिक बलात्कार आणि सात जणांची हत्या असे गंभीर आरोप असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा माफी मिळावी का? आणि जुन्या शिक्षा माफी धोरणात बदलाची आवश्यकता आहे का, यावरही चर्चा सुरू झाली आहे. केंद्रात आणि गुजरातमध्येही सत्तेत असलेल्या गुजरात सर...
देश विकसित आहे की, विकसनशील हे कसं ठरवलं जातं? । BBC News Marathi 17.08.2022 5:54
2047 पर्यंत देशाला पुन्हा विकसित देश बनवा, सामर्थ्यशाली बनवा अशी हाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिली. भारत हा विकसनशील देश आहे, तर अमेरिका, जर्मनी यासारखे देश म्हणजे विकसित देश, असं आपण ऐकत आलो आहोत. पण, मूळात विकसित देश आणि विकसनशील देश कुठले हे कसं ठरतं? जीडीपीचा आकार गृहित धरला तर भारत जगात पाचव्या स्थानावर आहे. तरीही आपण विकसनशील कसे? संयुक्त राष्ट्रसंघाने विकस...
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरचे अपघात कधी थांबणार? । BBC News Marathi 15.08.2022 5:19
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंच्या निधनानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या रस्त्यावरचा हा काही पहिलाच अपघात नाही आणि इथे दुर्घटनेत एखाद्या मोठ्या व्यक्तीचा जीव जाण्याचीही ही पहिलीच वेळ नाही. पण अनेक अपघात होऊनही इथे परिस्थिती का सुधारत नाही, असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
रुपी बँक का बंद झाली? । BBC News Marathi 15.08.2022 6:00
रिझर्व्ह बँकेनं अखेर पुण्याच्या जुन्या रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला. 22 सप्टेंबरपासून बँक कुठलेही व्यवहार करू शकणार नाही. 112 वर्षं जुन्या बँकेवर ही वेळ का आली? आणि महत्त्वाचं म्हणजे राज्यातल्या सहकारी बँकांना नेमकं कुणाचं ग्रहण लागलंय? कारण, आकडेवारी असं सांगते की, 2017 पासून तब्बल 67 सहकारी बँका बंद झाल्या आहेत. आणि इतर अनेक बँका याच मार्गावर आहेत. तेव्हा सहकारी बँकांवर ही वेळ का आली तेच...
नितिश कुमार विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतील का ? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 11.08.2022 5:43
नितिश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना थेट भाजपा आणि नरेंद्र मोदींना आव्हानच देऊन टाकलं. पक्ष संपण्याची भीती की राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा... नेमकं काय कारण आहे जे नितीशकुमारांना इथपर्यंत घेऊन आलंय? स्वतःचा पक्ष वाचवण्याबरोबरच नितिशकुमार नरेंद्र मोदींना राष्ट्रीय पातळीवर आव्हान देऊ शकतील का? नितिश कुमार यांच्यासाठी काय आहेत जमेच्या बाजू आणि कुठल्या त्यांच्य...
डोनाल्ड ट्रंप यांच्या घरावर एफबीआयने छापे का मारले? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 10.08.2022 5:55
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या फ्लोरिडातल्या घरावर अलीकडेच एफबीआयने छापा मारला. एका माजी अध्यक्षाच्या घरावर सरकारी यंत्रणेचा छापा पडण्याची ही पहिलीच खेप आहे. आणि त्यावरून अमेरिकेत भरपूर चर्चा होत आहे. ट्रंप यांनी अर्थातच हा त्यांच्याविरोधातला राजकीय डाव असल्याचं म्हटलंय. तर विरोधकांनी ट्रंप यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केलीय. अमेरिकेत नेमकं काय सुरू आहे. आणि ट्रंप यांच्या...
नितिश कुमार आणि भाजपा मध्ये वादाची ठिणगी कुठे पडली? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 09.08.2022 6:30
महाराष्ट्रातील सत्तानाट्य अजून पुरतं संपलेलं नाही. इतक्यात दूर बिहारमध्ये नवीन नाट्य आकार घेतंय. जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितिश कुमार यांनी भाजपाबरोबर काडीमोड घेण्याचा निर्णय घेतलाय. आणि सगळं अपेक्षेप्रमाणे घडलं तर तिथे जदयू, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस असं महागठबंधन सरकार अस्तित्वात येऊ शकतं. भाजपा आणि नितिश कुमार यांचे संबंध कायम तिखट-गोडच होते. पण, सरकार पाडण्या इतकं अलीकडे काय घडलं? या वा...
वादग्रस्त ठरलेला फौजदारी प्रक्रिया कायदा नेमका काय आहे? । सोपी गोष्ट 658 08.08.2022 6:30
अलीकडेच देशात फौजदारी प्रक्रिया (ओळख) 2022 कायदा लागू झाला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात हा कायदा संमत झाला असला तरी गदारोळ दोन्ही ठिकाणी झाला. आणि या नव्या कायद्याला विरोधही होतोय. गुन्हेगारांबरोबरच ‘इतर व्यक्तीं’ची जैव-शारीरिक माहिती साठवून ठेवण्याची तरतूद या कायद्यात आहे. आणि हा त्या लोकांच्या गोपनीयता आणि खाजगीपणाच्या अधिकारावर घाला आहे, असा आरोप होतोय. हा नेमका कायदा काय आहे आणि त्याला इतका...
शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या नवीन प्रभाग रचनेचा भाजपला फायदा? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 05.08.2022 6:46
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय तो आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना पुन्हा एकदा बदलण्याचा. 2017 साली तेव्हाच्या देवेेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसारच आता महापालिका निवडणुका होतील. हा निर्णय का महत्त्वाचा आहे आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुक...
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 04.08.2022 4:45
सणासुदीचे दिवस तोंडावर आले असताना केंद्रसरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना एक खूशखबर दिली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यांत 4%ची वाढ होणार आहे. तसंच निवृत्ती वेतनाच्या वितरण प्रणालीतही सुटसुटीतपणा येणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या आखणी कुठल्या शिफारसींना केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलीय. आणि त्याने आपल्या पगारावर काय परिणाम होणारए पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद प...
गोल्ड एक्सचेंजमुळे सोन्याचे दर कमी होतील का? BBC News Marathi सोपी गोष्ट 03.08.2022 4:58
अलीकडेच देशाचं पहिलं आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज स्थापन करण्यात आलंय. सोनं आणि चांदी फिजिकल स्वरुपात इथं ट्रेड होणार आहे. त्यामुळे सोनार आणि इतर वित्तीय संस्थाही थेट आंतरराष्ट्रीय बाजारातून सोनं विकत घेऊ शकतील. याआधी रिझर्व्ह बँकची मान्यता असलेल्या काही बँका आणि संस्थाच सोनं बाहेरून आणू शकत होत्या. याचा परिणाम सोन्याचे दर कमी होण्यावर होईल का? ग्राहकांना इतर काय फायदे यातून मिळू शकतील? पाहूया सो...
संजय राऊत प्रकरण: राजकीय नेत्यांनी ईडीचा धसका का घेतलाय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 02.08.2022 6:07
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा ईडीचा राजकीय वापर झाल्याचे आरोप होत आहेत. असे आरोप नरेंद्र मोदी सरकारवर सातत्याने होत आलेले आहेत. नेत्यांवरील कारवाई ईडीला शक्य होते ती मनी लाँडरिंग विरोधी कायद्याचा वापर करून. आणि 2005मध्ये हा कायदा लागू झाल्यापासून त्यात अनेकदा असे बदल किंवा सुधारणा करण्यात आल्यात ज्यामुळे या नेत्यांना जामीन मिळणं कठीण झालंय. या कायद्यामध्ये झालेले बदल आज समजून...
भारतात लहान मुलांमध्ये लठ्ठपणा का वाढतो आहे?। BBC News Marathi 02.08.2022 5:44
भारतात लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे. वेळीच उपाय केले नाहीत तर यातून आरोग्याच्या नव्या समस्या उभ्या राहतील असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. संशोधन – गीता पांडे निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
रणवीर सिंगला न्यूड फोटोशूट प्रकरणी शिक्षा होऊ शकते का? BBC News Marathi सोपी गोष्ट 29.07.2022 5:13
आपल्या न्यूड फोटोग्राफीमुळे बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या वादात सापडलाय. त्याच्यावर मुंबई पोलीसांकडे तक्रारही दाखल झाली आहे. अमेरिकन मासिकासाठी काढलेले फोटो रणवीर सिंह यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केले होते. हे फोटो अश्लील असल्याचा आरोप होतोय. पण, अश्लीलतेविषयीचा भारतीय कायदा काय सांगतो? त्यानुसार रणवीरला शिक्षा होऊ शकते का, याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - प्रियंका झा...
भारतीय नागरिकत्व सोडून परदेशात जाणाऱ्यांची संख्या का वाढतेय? BBC News Marathi सोपी गोष्ट 28.07.2022 4:55
दरवर्षी दीड लाखांच्या वर उच्चशिक्षित, कुशल भारतीय तरुण भारतीय नागरिकत्वाचा त्याग करतात. अर्थात, भारत सोडून ते अमेरिका, युरोप किंवा ऑस्ट्रेलिया अशा प्रगत देशांचा आसरा घेतात. तिथलं राहणीमान, शिक्षण - नोकरीच्या संधी यांची भुरळ तरुणांना पडते. पण, त्यामुळे भारतात ‘ब्रेनड्रेन’ सारखी परिस्थिती उद्भवते. तरुण स्थलांतराची ही समस्या आणि त्याची कारणं पाहूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - शुभम किशोर लेखन, निवेदन -...
कोरोना विषाणूचा उद्रेक वुहान मांस बाजारातूनच झाला - अहवाल | BBC News Marathi सोपी गोष्ट 27.07.2022 4:19
2019च्या डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार चीनच्या वुहानमधल्या मांस विक्री बाजारातूनच झाला असे निष्कर्ष आता ताज्या अहवालातूनही निघाले आहेत. संशोधकांच्या दोन वेगवेगळ्या गटांनी उपलब्ध डेटा आणि माहितीच्या आधारे तसे सबळ पुरावे असल्याचं म्हटलं आहे. हे अहवाल कोरोना विषाणूविषयी आणखी काय माहिती सांगतात, कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आला आहे का, पाहूया सोपी गोष्ट क्रमांक 650… लेखन - ऋजुता लुकतुके निवेदन - अमृ...
म्यानमारमध्ये खरंच नागरी युद्ध सुरू होईल का? । BBC News Marathi 26.07.2022 5:01
आपला शेजारी देश श्रीलंका सध्या आर्थिक अडचणी सापडलाय. तर दुसरीकडे, म्यानमारमध्येही यादवी युद्धा सदृश परिस्थिती आहे. परिस्थिती वेळोत आटोक्यात आली नाही तर तिथे नागरी युद्ध सुरू होईल असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघानेच दिलाय. असं नेमकं तिथं काय घडतंय? लष्कराच्या उठावानंतर परिस्थिती कशी चिघळली, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - बीबीसी बर्मीज् लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपती करण्यामागे भाजपची रणनिती काय आहे? सोपी गोष्ट पॉडकास्ट 648 25.07.2022 5:15
द्रौपदी मूर्मू यांनी देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली. त्याचबरोबर त्या देशाच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत. हीच त्यांची ओळख सध्या राजकीय दृष्ट्या चर्चेची बनलीय. भारतीय जनता पार्टीने आदिवासी महिलेला मुख्यमंत्री करून नेमकं काय साध्य केलं, यामागे पक्षाची काय रणनिती आहे यावर चर्चा सुरू आहे. सोपी गोष्टमध्ये शोधूया याच प्रश्नांची उत्तरं… संशोधन - सरोज सिंह लेखन, न...
भारत श्रीलंकेला इतकी मदत का करतोय? । BBC News Marathi 22.07.2022 6:17
श्रीलंका आर्थिक संकटात सापडल्यानंतर यावर्षी भारताने श्रीलंकेला चीनपेक्षा जास्त आर्थिक मदत केली आहे. पण, श्रीलंकेतल्या एका गटाकडून या मदतीवर टीकाही होतेय. काही आंदोलनकर्त्यांनी ‘देश अमेरिका, भारताकडे गहाण टाकू नका,’ सूर लावला आहे. तर काही नागरिकांनी भारताच्या मदतीचं कौतुकही केलंय. मूळात भारताबद्दल श्रीलंकन नागरिकांचं नेमकं मत काय आहे, तिथे चीनवर भारत वरचढ ठरेल का, याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्य...
इम्रान खानना पंजाबमधील विजयामुळे संजीवनी । BBC News Marathi 21.07.2022 4:34
पाकिस्तानचं पंतप्रधानपद गमावल्यावर इम्रान खान बॅकफूटवर गेले होते. पण नुकतंच पंजाब प्रांतातल्या पोटनिवडणुका जिंकून त्यांच्या पक्षानं कमबॅक केलं आहे. पाकिस्तानसाठीच नाही तर दक्षिण आशियासाठीही हा विजय महत्त्वाचा कसा आहे ? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
संजय पांडे अडचणीत का आले? BBC News Marathi 20.07.2022 4:37
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि राज्याचे माजी प्रभारी महासंचालक संजय पांडे यांना सक्तवसुली संचलनालयानं मंगळवारी 19 जुलैला अटक केली होती. दिल्लीतील कोर्टानं त्यांना 9 दिवस ईडीच्या कोठडीत पाठवलं आहे. शेअर बाजारासंदर्भातील एका प्रकरणात अवैधरित्या फोन टॅपिंग केल्याचा आरोप संजय पांडे यांच्यावर आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
ऋषी सुनक आणि युकेच्या पंतप्रधानपदाची शर्यत BBC News Marathi 19.07.2022 5:20
बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर आता युकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर आहे. ते ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान ठरू शकतात. पण ऋषी सुनक ही शर्यत जिंकू शकतात का? त्यांची आजवरची वाटचाल कशी होती? हे जाणून घेण्याआधी मुळात ब्रिटिश पंतप्रधानांची निवड कशी होते, त्याची माहिती करून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.