BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
रुपया घसरल्यामुळे माझ्या खिशावर काय परिणाम होईल । BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 16.07.2022 5:51
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर जाऊन पोहोचलाय. गुरुवारी तो काही सेकंदांसाठी का होईना 80 च्याही पार गेला. आणि तज्ज्ञांचं तर असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात तो आणखी खाली म्हणजे अगदी 81 रुपयापर्यंत घसरू शकतो. असं नुसतं ऐकायला थोडंस किचकट वाटतं ना! आणि याचा माझ्याशी काय संबंध असंही तुम्हाला वाटेल. पण, रोजच्या जीवनात आपल्या खिशावर याचा अप्रत्यक्ष परिणाम होतच असतो. आणि देशाच्...
उबर फाईल्स प्रकरण काय आहे? । BBC News Marathi 14.07.2022 5:44
ओला किंवा उबर टॅक्सी आपल्या सगळ्यांसाठी सोयीची. आणि आरामदायी प्रवासामुळे आपली या सेवांना पसंती असते. पण, अलीकडेच उबर कंपनीतं कामकाज कसं चालतं किंवा कसं बेकायदेशीर पद्धतीने चालतं याचा खुलासा कऱणाऱ्या काही फाईल्स कंपनीच्याच माजी अधिकाऱ्याने उघड केल्या आहेत. त्यावरून जगभर गाजलेली ही सेवा किती सुरक्षित आहे असा प्रश्न निर्माण झालाय. उबर कंपनीविषयी असं या फाईल्समध्ये नेमकं काय आहे, पाहूया सोपी गोष्टमध्य...
श्रीलंकेपासून भारताने काय धडा घ्यावा । BBC News Marathi 14.07.2022 6:57
श्रीलंका देशावर जशी दिवाळखोरीची वेळ आली आहे, तशीच ती भारतावर येईल का अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. काहींनी भारतातल्या महागाईकडेही बोट दाखवलं. आणि अशीच परिस्थिती भारतातही येऊ शकते, अशी भीतीही व्यक्त केली. खरंच भारतात महागाई नियंत्रणाबाहेर जाऊ शकते का? आणि श्रीलंकेच्या संकटातून भारताने काय धडा घ्यायला पाहिजे, हे आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया… संशोधन - सरोज सिंह लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिट...
K2 हा धूमकेतू पृथ्वीवर आदळेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 12.07.2022 4:41
येत्या 14 जुलैला पृथ्वीच्या अगदी जवळून ‘के2’ हा मोठा धूमकेतू जाणार आहे. हा धूमकेतू तब्बल 18 किमी लांब आहे. त्यामुळे साध्या दुर्बीणीला तो दिसू शकणार आहे. त्याच्यापासून पृथ्वीला धोका आहे का? हे धूमकेतू कुठून आणि का येतात? आणि ते आदळले तर काय होऊ शकतं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
श्रीलंकेचं आर्थिक गणित कुठे फसलं? । BBC News Marathi 11.07.2022 6:49
श्रीलंकेतली आर्थिक प्रश्न दिवसेंदिवस चिघळतोय. महागाई आणि वस्तूंच्या तुटवड्यामुळे वैतागलेल्या आंदोलनकर्त्यांनी रविवारी राष्ट्राध्यांच्या सरकारी निवासस्थानावरच हल्ला केला. या आंदोलनामुळे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना निवासस्थान सोडावं लागलं. आणि ते पळून गेले. देशात परकीय चलनाचा अभूतपूर्व तुटवडा जाणवतोय. पण, मूळात श्रीलंकेवर ही परिस्थिती काय ओढावली? देशाचं आर्थिक गणित कुठे बिघडलं? जाणून घेऊया आज सो...
काँग्रेस पक्षाने तीन वेळा निवडणूक चिन्ह का बदललं? BBC News Marathi | सोपी गोष्ट 09.07.2022 7:09
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या गटाने वारंवार आपणच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. आणि फक्त पक्षावरच नाही तर पक्षचिन्ह म्हणजे धनुष्य-बाणावरही त्यांनी दावा आहे. तर उद्धव ठाकरे यांनीही धनुष्य बाण आपलाच असल्याचं म्हटलंय. यावरून पक्ष आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह याविषयीही चर्चा होऊ लागलीय. त्या निमित्ताने सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया भारतातल्या सगळ्यात जुन्या पक्षाविषयी ज्यांनी तीनदा निवडणूक चिन्ह...
'रॉकेट्री' फेम नंबी नारायण, ज्यांना गद्दारीच्या आरोपात अडकवलं गेलं... सोपी गोष्ट BBC News Marathi 07.07.2022 5:42
आर माधवन आणि शाहरुख खान यांच्या मुख्य भूमिका असलेला रॉकेट्री सिनेमा सध्या गाजतोय. इस्त्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या आयुष्यावर तो बेतलेला आहे. ही कहाणी खरंच थरारक आहे. रॉकेट तंत्रज्ञान परस्पर पाकिस्तानला विकल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. देशाने त्यांच्यावर गद्दारीचा आरोप केला. पण, शेवटी गुन्हे अन्वेषण विभागाने चार वर्षांनी त्यांना क्लिनचिट दिली. आता आपल्याविरोधात बनावट कट रचणाऱ्यांचा तप...
सेक्स स्कँडलमुळे पडणार युकेमध्ये बोरीस जॉन्सन सरकार? BBC News Marathi सोपी गोष्ट 06.07.2022 5:17
महाराष्ट्रात जसं मागचे पंधरा दिवस एक सत्तानाट्य घडून आलं, तसंच वातावरण सध्या युकेमध्ये आहे. पंतप्रधान बोरिस बेकर यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे खासदार नाराज आहेत. आणि त्यातून मागच्या एका महिन्यात दुसऱ्यांदा त्यांच्यावर पंतप्रधानपद गमावण्याचं संकट घोंघावतंय. यावेळी केंद्रस्थानी आहेत त्यांचे निकटचे सहकारी आणि खासदार ख्रिस पिंचर. असं नेमकं काय घडतयं युकेमध्ये? पाहूया सोपी गोष्ट… संशोधन - टीम बीबीसी लेख...
रेस्टॉरंटकडून बिलामध्ये आकारला जाणारा सर्व्हिस चार्ज कसा रद्द कराल?। BBC News Marathi 06.07.2022 3:58
आपल्या हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटच्या बिलामध्ये सर्व्हिस चार्ज आकारला जातो. सर्व्हिस चार्ज म्हणजेच सेवाशुल्क. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एकप्रकारची 'टिप' असते जी ग्राहकांकडून सक्तीने वसूल केली जाते. पण आता सर्व्हिस चार्ज रद्द करण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकारणाने दिले आहेत. संशोधन, लेखन - दीपाली जगताप निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
एकनाथ शिंदे आणि चंद्राबाबू यांच्या बंडातील साम्य । BBC News Marathi 04.07.2022 5:01
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेलं बंड आणि 27 वर्षांपूर्वी आंध्रप्रदेशमध्ये तेलगू देसममध्ये झालेलं एक बंड यामध्ये राजकीयदृष्ट्या भरपूर साम्य आहे. तिथेही बंडखोर नेते चंद्राबाबू नायडू यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. आणि पुढे जाऊन पक्षाचं अध्यक्षपदही त्यांच्याकडेच आलं. याबाबतीत एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवर दावा असला तरी तो मुद्दा न्यायालयात जाणार आहे. पण, आंध्रमधलं ‘ते’ बंड उद्धव ठाकरेंसाठी भ...
नवे कामगार कायदे सोप्या शब्दात । BBC News Marathi 01.07.2022 5:46
जुलै महिन्यापासून नवीन कामगार कायदे प्रत्यक्षात आणण्याचा केंद्रसरकारचा प्रयत्न आहे. आणि तसं झालं तर आपली कामाची पद्धत आणि आपल्याला हातात मिळणारा पगार असे मूलभूत बदल आपल्या प्रोफेशनल आयुष्यात होणार आहेत. काय आहेत हे नवे कामगार कायदे आणि मूळ कायद्यांमध्ये नेमके काय बदल झाले आहेत हे समजून घेऊया… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, पण अडचणी कायम? | BBC News Marathi 01.07.2022 4:39
एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांच्यासमोरच्या अडचणी संपलेल्या नाहीत. आम्ही शिवसेनेतच आहोत, आम्ही पक्ष सोडलेला नाही, असे शिंदे समर्थक आमदार वारंवार करत आहेत. पण आता ते भारतीय जनता पक्षात विलीन होणार की आणखी कोणतं पाऊल उचलणार? त्यांच्यासमोर कोणते पर्याय आणि अडचणी आहेत? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www....
बहुमत चाचणीत ऐनवेळी कहानीमे ट्विस्ट? । BBC News Marathi 30.06.2022 5:04
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या विधानसभेतली बहुमत चाचणी रोखण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला उद्या फ्लोअर टेस्टला सामोरं जावं लागेल. पण या बहुमत चाचणीत एखादा ट्विस्ट पाहायला मिळाला तरी आश्चर्य वाटायला नको. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61955517
एकनाथ शिंदे प्रकरणात चर्चेत आलेला नबाम रेबिया खटला काय आहे? । BBC News Marathi 28.06.2022 4:32
शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाचा संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. पण या सुनावणीदरम्यान वारंवार एका खटल्याचा दाखला देण्यात येत होता, तो म्हणजे नबाम रेबिया प्रकरण. पण नेमकं हे प्रकरण काय आहे? महाराष्ट्रातील आत्ताच्या राजकीय परिस्थितीत या प्रकरणाला नेमकं का महत्त्व आलंय? आणि त्याच्या आधारे कोर्टात काय युक्तीवाद झाला आहे? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक व...
अमेरिकेत गर्भपातावरून वाद, भारतात कायदा काय सांगतो? । BBC News Marathi 28.06.2022 6:19
अमेरिकेतल्या गर्भपाताच्या कायद्यासंदर्भातला एक निर्णय, म्हणजे रो विरुद्ध वेड खटला सध्या जगभर चर्चेत आहे आणि अमेरिकेचा जगावरचा प्रभाव पाहता या घटनेचा जगातल्या प्रत्येक स्त्रीशी संबंध आहे. नेमका हा निर्णय काय आहे? गर्भपाताच्या बाबतीत अमेरिकेच्या तुलनेत भारतात महिलांची स्थिती चांगली आहे का? लेखन – अनघा पाठक, मानसी दास निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marat...
एकनाथ शिंदेंना धनुष्य बाण मिळेल का? । BBC News Marathi 25.06.2022 7:51
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामध्ये त्यांच्याकडे दोन तृतियांश आमदार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत आपण खरे शिवसैनिक आहोत, अशी त्यांची भूमिका कायम आहे. अशावेळी ते शिवसेनेवरच दावा करतील का? आणि पुढे जाऊन पक्ष चिन्ह म्हणजे धनुष्य-बाण आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील का? किंबहुना ते तसं करू शकतील का, पाहूया आज सोपी गोष्टमध्ये… संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग...
एकनाथ शिंदेंची 'नाराजी' हे 'ऑपरेशन लोटस'च आहे, कारण...। BBC News Marathi 23.06.2022 6:36
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अंतर्गत विरोधांमुळे पडेल, असं राज्यातले भाजपचे नेते सतत म्हणत होते. पण आता सरकार खरंच पडायला आलेलं असताना मात्र हीशिवसेनेतली अंतर्गत समस्या आहे, असा पवित्रा त्यांनी घेतलेला दिसतो. पण हा खरंच 'शिवसेनेचे अंतर्गत विषय' आहे का? की या बंडखोरीचा रिमोट कंट्रोल भाजपकडे आहे? विश्लेषण – आशिश दीक्षित निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc...
एकनाथ शिंदेंनी पक्षांतर केलं तर सरकार पडेल? । BBC News Marathi 21.06.2022 5:03
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील काही आमदारांसह सुरत गाठलं आणि ते भाजपात जाण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली. पण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात असं थेट जाता येतं का? शिंदेंनी हे पाऊल उचललं, तर पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द होईल का? शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार पक्ष बदलून आपली आमदारकीही कायम ठेवू शकतात का? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://...
अग्निपथसारख्या योजना भारताशिवाय कुठल्या देशांत आहेत? BBC News Marathi 20.06.2022 4:47
भारत सरकारने मंगळवारी (14 जून) लष्करातील अल्पकालीन नियुक्तीची अग्निपथ योजना जाहीर केली. जगात असे अनेक देश आहेत जिथं सैन्यात अल्प कालावधीसाठी भरती करण्यात येते. पण इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या देशांमध्ये लष्करात सेवा करणं सक्तीचं आहे. अशा योजनांचा काय परिणाम होतो? संशोधन – टीम बीबीसी लेखन – जान्हवी मुळे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
माऊंट एव्हरेस्टचा बेस कँप का हलवला जातोय? । BBC News Marathi 17.06.2022 6:25
नेपाळ सरकारने माऊंट एव्हरस्टचा बेस कँप दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतलाय. आता जिथं कँप आहे ती जागा ग्लेशियरवर आहे. आणि तिथला बर्फ झपाट्याने वितळतोय. आणि ठिसूळही झालाय. कसा आहे नवा बेस कँप? आणि नेपाळ सरकारवर ही वेळ का आली? पाहूया सोपी गोष्टमध्ये… संकलन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - शरद बढे
मोहम्मद पैगंबर विधेयक नेमकं काय आहे? । BBC News Marathi 16.06.2022 5:43
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या मुस्लीम प्रेषित महम्मद पैगंबर यांच्यावरील वक्तव्याचे पडसाद अजूनही देशभर उमटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात धार्मिक द्वेष विरोधी एक विधेयक संमत होण्याची मागणी होत आहे. 17 तारखेला या विधेयकाच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने मुंबईत एक मोर्चाही आयोजित केला आहे. ‘महम्मद पैंगबर विधेयक’ या नावाने चर्चा होत असलेलं हे विधेयक नेमकं काय आहे आणि राज्य...
मोदी सरकार दहा लाख नोकऱ्या आणणार कुठून? BBC News Marathi 15.06.2022 6:43
केंद्रसरकारने येत्या 18 महिन्यांमध्ये 10 लाख सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली आहे. यात रेल्वे, गृहखातं आणि संरक्षण खात्यातल्या नोकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सरकारने घोषणा तर केली. पण, एवढ्या नोकऱ्या सरकार आणणार कुठून? आणि सरकारी नोकऱ्यांमधून बेरोजगारीचा खरा प्रश्न सुटेल का? पाहूया सोपी गोष्टमध्ये… संकलन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय आहे? BBC News Marathi 14.06.2022 6:35
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची दोन दिवस चौकशी झाली. वर्तमानपत्राची 2000 कोटी रुपये किमतीची मालमत्ता चुकीच्या पद्धतीने आपल्या नावावर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर काँग्रेसनं राजकीय सूडबुद्धीने गांधी कुटुंबीयांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केलाय. 2012मध्ये समोर आलेलं हे नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय आहे, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संकलन - ऋजुता लुकतुके लेखन,...
परवेझ मुशर्रफ यांना नेमका काय आजार झालाय? BBC News Marathi 13.06.2022 6:06
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या मृत्यूबद्दल काही दिवसांपूर्वी अफवा पसरली होती. शेवटी त्यांच्या कुटुंबीयांनी एक पत्रक काढून ही अफवा असल्याचं स्पष्ट केलं. त्याचबरोबर मुशर्रफ यांना नेमकं काय झालंय याचीही माहिती दिली. मुशर्रफ यांना बरा न होण्यासारखा एक दुर्धर आजार झालाय अँमीलॉयडॉसिस. हा आजार अमेरिकेतही दोन लाख लोकांमागे एखाद्यालाच होतो. असा हा दुर्मीळ आजार नेमका काय आहे आणि परवेझ...
UPI मधून क्रेडिट कार्डचे पैसे खर्च करण्यात तुमचा फायदा आहे का? BBC News Marathi 10.06.2022 4:37
आपला फोन वापरून UPI च्या माध्यमातून तुम्ही आपल्या बँक अकाउंटमधले पैसे खर्च करत असाल. पण आपल्याकडे नसलेले पैसे खर्च करायचे असले तर? म्हणजे क्रेडिट कार्डवरचे पैसे तुम्ही UPI मधून खर्च करू शकलात तर? Reserve Bank ने तशी घोषणा केलीय. पण यामुळे काय साध्य होणार आहे? यातून तुमचा फायदा होईल का? संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.