BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
सोपी गोष्ट पॉडकास्ट : बुद्धिबळात चीटिंगच्या आरोपांनी खळबळ का उडाली? | सोपी गोष्ट 29.09.2022 5:35
नीमनवर चीटिंगचे आरोप आहेत मात्र त्यानं ते नाकारले आहेत, पण याआधी ऑनलाईन खेळात चीटिंग केल्याचं मान्य केलंय. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि त्याचा बुद्धिबळावर काय परिणाम होईल? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंकडे आता कोणते पर्याय? | सोपी गोष्ट 28.09.2022 3:45
शिवसेनेचं निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' कोणाला मिळणार? याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाची सुनावणी निवडणूक आयोग सुरू करेल. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाअंतर्गत बहुमत सिद्ध करावं लागेल.
डार्ट मोहिमेतून नासा खरंच पृथ्वीचा जीव वाचवणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 27.09.2022 5:10
नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेनं सोमवारी आपलं एक यान जाणून बुजून एका लघुग्रहावर आदळवलं. नासाच्या डार्ट मोहिमेचाच हा भाग होता. आणि ही मोहीम पृथ्वीला वाचवण्यासाठी आखलेली होती. नासाची ही डार्ट मोहीम काय आहे? सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
पीएफआयच्या कार्यकर्त्यांवर भारतात कारवाई का होतेय? । BBC News Marathi 26.09.2022 5:49
मागच्या आठवड्यापासून राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालय यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. देशभरात 15 राज्यांमध्ये एकाच वेळी छापे घालून संघटनेच्या शंभरच्या वर कार्यकर्त्यांना या कारवाईत ताब्यात घेण्यात आलंय. ही संघटना आणि तिचे कार्यकर्ते देशात फुटीरतावादी कारवाया करत असल्याचा ठपका तपास यंत्रणेनं ठेवलाय. तर पीएफआय संघटनेकडूनही कारवाईचा निषेध होतोय. हे न...
मूनलाइटिंग म्हणजे काय? विप्रो, इन्फोसिस कर्मचाऱ्यांवर कारवाई का करतंय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 24.09.2022 5:18
भारतातल्या मोठ्या आयटी कंपन्या आता अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करू लागल्या आहेत, जे सकाळच्या शिफ्टला एका ऑफिसमध्ये पूर्णवेळ काम करत आहेत, आणि दुपारहून सुटी झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या एका कामातून पैसे कमावत आहेत. इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना ताकिद दिली आहे, तर विप्रोने चक्क 300 कर्मचाऱ्यांना याच कारणावरून कामावरून काढून टाकलंय. हा प्रकार आहे मूनलाइटिंग. हे चूक आहे की बरोबर? वैध आहे की बेकायदेशी...
इराणमध्ये महिला सार्वजनिकरीत्या हिजाब का जाळतायत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 22.09.2022 18:33
अलीकडे इराणमध्ये एका 22 वर्षीय महिलेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर तिथे महिलांचं आंदोलन चांगलंच पेटलंय. ही महिला हिजाबसक्तीचा विरोध करत होती. आणि तिला अटक केल्यानंतर पोलिसांच्या मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाल्याचा जनतेचा दावा आहे. इराण हा इस्लामिक रिपब्लिक देश आहे. आणि तिथे सार्वजनिक ठिकाणी महिलांनी काय परिधान करावं यासाठी कडक ड्रेसकोड आहे. त्या विरोधात 2014 पासून महिला तिथं आंदोलन करतायत. पण, या...
जगात आर्थिक मंदी खरंच येणार का? भारतावर काय परिणाम होईल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 21.09.2022 4:54
आधीच कोव्हिडमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. किंवा काही कुटुंबांनी घरातल्या कमावत्या व्यक्ती गमावल्या. आणि या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच जागतिक मंदीची भीती घोंघावत आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही तसा अंदाज वर्तवला आहे. खरंच 2023मध्ये मंदीची परिस्थिती उद्भवू शकते का? मंदी आली तर भारतावर त्याचा काय परिणाम होईल, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता...
खाजगी व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले तर काय करावं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 20.09.2022 4:43
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी वेतन का मिळतं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 19.09.2022 4:49
भारतात महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी पगार मिळतो हे पुन्हा एकदा एका संशोधन अहवालाच्या माध्यमातून उघड झालं आहे. समान पात्रता आणि क्षमता असूनही हे रोजगाराचं प्रमाण पुरुषांमध्ये 41 टक्क्यांनी जास्त आहे. वेतन आणि रोजगाराच्या बाबतीत फक्त स्त्री-पुरुष अशीच असमानता नाही तर अल्पसंख्यांक (मुस्लीम) आणि अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांनाही अशा असमानतेचा मुकाबला करावा लागत आहे. या परिस्थितीची कारणमीमांसा आणि उ...
नामिबियातून आलेले चित्ते भारताशी कसं जुळवून घेणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 16.09.2022 4:43
चित्ता हा सगळ्यात वेगवान आणि चपळ प्राणी. पण, 75 वर्षांपूर्वी हा प्राणी भारतातून नामशेष झाला. चित्त्यांचं पुन्हा भारतात पुनर्वसन करण्यासाठी आता केंद्रसरकारने नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ते भारतात मागवले आहेत. आणि त्यातले पहिले आठ चित्ते 17 सप्टेंबरला भारतात दाखल होणार आहे. चित्त्यांचा हा विमान प्रवास कसा असेल आणि महत्त्वाचं म्हणजे भारतात आणल्यावर ते इथल्या वातावरणाशी कसं जुळवून घेतली याविषयी...
मूल दत्तक घेण्यासाठीच्या नियमांमध्ये झाले ‘हे’ बदल BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 15.09.2022 5:17
भारतातल्या मुलं दत्तक घेण्याच्या कायद्यामध्ये अलीकडेच काही बदल करण्यात आले. त्यानुसार, दत्तक ग्रहणाची कायदेशीर प्रक्रिया आणि त्याची सुनावणी न्यायालयासमोर न होता जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर होईल. न्यायालयांवरचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय. पण, त्यामुळे दत्तक ग्रहणाची प्रक्रिया आधीपेक्षा सुटसुटित आणि लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात या प्रक्रियेच्या अंमलबज...
कोहिनूर हिरा कुठे आहे? दूर करा हे 6 गैरसमज BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 14.09.2022 5:09
कोहिनूर हिरा जगातल्या सगळ्यात मौल्यवान आणि वजनदार हिऱ्यांपैकी एक हिरा मानला जातो. भारतीयांच्या मनात या हिऱ्याचं एक वेगळं स्थान आहे. पण, त्याचबरोबर ब्रिटिशांनी हा हिरा भारताकडून लुटून नेला असा एक समज भारतीयांच्या मनात आहे. त्याचबरोबर या हिऱ्याबद्दल आख्यायिकाही खूप आहेत. आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया कोहिनूरविषयीचे सहा मोठे गैरसमज… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
ताडोबातले हत्ती जामनगरला हलवण्याला विरोध का होतोय? । BBC News Marathi 14.09.2022 5:26
महाराष्ट्राच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि गडचिरोली इथून तेरा हत्ती गुजरातच्या जामनगरमधल्या खाजगी प्राणी संग्रहालयात पाठवण्याचा निर्णय मे 2022मध्ये वन विभागाने घेतला. या निर्णयाला राज्य आणि केंद्रसरकारनेही परवानगी दिली आहे. पण, प्रश्न हा आहे की, आपल्या नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या प्राण्यांना बंदिस्त प्राणी संग्रहालयात का पाठवायचं? त्यासाठीच प्राणीहक्क संघटना आणि स्थानिक लोकांनीही याला विरोध...
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे अंत्यसंस्कार कसे होणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 09.09.2022 4:38
एलिझाबेथ द्वितीय यांनी ब्रिटिश साम्राज्यावर 71 वर्षं राज्य केलं. देशाला दुसऱ्या महायुद्धातून सावरताना बघितलं आणि पुढेही अशी अनेक स्थित्यंतरं पाहिली. ब्रिटिश जनतेशी आणि महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिश राजघराणं तसंच परंपरांशी त्या प्रामाणिक राहिल्या. आता त्यांच्यावरचे अंत्यसंस्कारही ब्रिटिश परंपरेला धरून आणि शासकीय इतमामात पार पाडण्यात येतील. पुढचे काही दिवस ब्रिटिश जनतेसाठी नेहमीसारखे नसतील. त्यांच्यासाठ...
भारत जोडो पदयात्रा राहुल आणि काँग्रेसला तारेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 08.09.2022 5:48
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो पदयात्रा’ तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून सुरू झाली आहे. भारतीय जनतेला एकत्र आणण्यासाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं असलं तरी राजकीय हेतूही लपवून ठेवलेला नाही. कारण, 2024 ची सार्वत्रिक निवडणूक आणि काँग्रेस पक्षाला तसंच राहुल यांच्या नेतृत्वाला उभारी देण्यासाठी देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षाचा हा निकराचा प्रयत्न आहे हे उघड आहे. पण, सध्याचा देशा...
राजपथाचा कर्तव्यपथ का केला जातोय? त्याचा इतिहास काय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 08.09.2022 4:58
राजपथाचं नाव आता कर्तव्य पथ असं केलं जाणार आहे. पण असा निर्णय का घेण्यात आला आहे? या रस्त्याचा इतिहास आणि महत्त्व काय आहे? संशोधन – विवेक शुक्ला लेखन - जान्हवी मुळे निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
पाकिस्तानात प्रलय कशामुळे आला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 06.09.2022 5:15
पाकिस्तानला गेले काही दिवस भीषण पुराचा सामना करावा लागतो आहे. एरवी कोरड्या आणि शुष्क मानल्या जाणाऱ्या इथल्या प्रांतांमध्येही अतीवृष्टीनं कहर केला आहे. यामागे काय कारणं आहेत? संशोधन – जॉर्जिना रेनार्ड निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/international-62256081
INS विक्रांत युद्धनौका भारतीय नौदलासाठी किती महत्त्वाची? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 03.09.2022 5:17
भारताची सर्वांत मोठी, स्वदेशी युद्धनौका INS विक्रांत 2 सप्टेंबर 2022ला भारतीय नौदलात दाखल झाली. 262 मीटर लांब, 45 हजार टन वजनी आणि 7500 हजार मैलांची रेंज असलेली ही युद्धनौका तयार व्हायला तब्बल २० हजार कोटी रुपये आणि १३ वर्षं लागली. आज भारताजवळच्या समुद्रात अनेक आंतरराष्ट्रीय हालचाली पाहायला मिळत आहेत. या सगळ्यात INS विक्रांतमुळे भारतीय नौदलाची शक्ती खरंच कशी वाढणारे? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्ट...
काँग्रेस आणि भाजपमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक कशी होते? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 01.09.2022 5:21
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधींनी 2019च्या जुलैमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी याच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष आहेत. आता तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा पक्षात अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. खरंच काँग्रेस आणि भाजपसारखे राष्ट्रीय पक्ष आपले अध्यक्ष कसे निवडतात? वार्तांकन - सरोज सिंग लेखन आणि निवेदन - दिपाली जगताप एडिटिंग - नि...
मोदक कुठून आले? भारतात कुठे कुठे मोदक बनतात? । BBC News Marathi 31.08.2022 4:05
श्रीगणेशाला मोदकांचा नेवैद्य आवडतो असं वर्णन पुराणापासून चालत आलं आहे. आई पार्वतीने गणेशाला अमृतयुक्त मोदक खायला दिला अशी कथा आहे. पण, ही पुराणातली कथा झाली. आपल्याकडे मोदक नक्की कुठून आले? गणपतीला मोदक दाखवण्याची परंपरा कधी आणि कुठून सुरू झाली? महाराष्ट्राखेरीज इतर कुठल्या राज्यांत मोदक बनवले जातात, पाहूया सोपी गोष्टमध्ये… निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
दुधाच्या किंमती कशामुळे वाढल्या? । BBC News Marathi 30.08.2022 4:02
दूध हा अनेक भारतीयांसाठी रोजच्या आहारातला महत्त्वाचा घटक आहे. पण गेल्या काही दिवसांत दुधाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे. यामागची कारणं काय आहेत? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
माणूस पुन्हा चंद्रावर का चालला आहे?। BBC News Marathi 29.08.2022 5:06
माणसाला पुन्हा चंद्रावर नेणारी मोहीम म्हणून नासाच्या आर्टेमिस प्रकल्पाकडे पाहिलं जातंय. यातला पहिला टप्पा म्हणजे आर्टेमिस-1. तांत्रिक कारणामुळे आर्टेमिस-1चं प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं आहे. ही मोहीम नेमकी काय आहे आणि ती का महत्त्वाची आहे? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
बेनामी संपत्ती म्हणजे काय? त्याविषयीचा कायदा वादात का सापडला? । BBC News Marathi 26.08.2022 6:10
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच बेनामी संपत्ती (प्रतिबंधक) सुधारणा कायदा 2016 मधल्या काही तरतुदी घटनाबाह्य ठरवल्या आहेत. या तरतुदींचा उपयोग सत्ताधारी पक्ष राजकीय सूडबुद्धीने करत असल्याचा आरोप होत होता. या नेमक्या कुठल्या तरतुदी आहेत? मूळात बेनामी संपत्ती म्हणजे काय? अशी कायद्याची गरज काय होती, पाहूया आज सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
अमेरिकेपासून श्रीलंकेपर्यंत अन्नटंचाई का निर्माण झालीय? BBC News Marathi सोपी गोष्ट 671 25.08.2022 5:34
कोरोनाचा उद्रेक, मंदी सदृश वातावरण आणि रशिया, युक्रेनमधील युद्धामुळे जगभरात महागाई वाढलीय. तसंच अमेरिकेपासून श्रीलंकेपर्यंत, जगाला अन्न टंचाईचा मुकाबला करावा लागतोय. जगभरात नेमकी काय परिस्थिती आहे? त्या मागची कारणं काय? आणि ही परिस्थिती किती काळ राहील पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
रशिया, युक्रेन युद्ध अजून संपत का नाहीए? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 24.08.2022 5:57
रशिया आणि युक्रेन मधील युद्धाला म्हणता म्हणता सहा महिने झाले. 24 ऑगस्टला खरंतर युक्रेनचा स्वातंत्र्यदिन आहे. पण, हा देश सध्या आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी लढतोय. दुसरीकडे रशियाचंही युद्धात मोठं नुकसान झालंय. तरीही दोन्ही देश मागे हटण्याचं नाव घेत नाहीएत. त्यामुळे युद्ध चिघळतंय. रशिया - युक्रेन युद्धात सध्या नेमकं काय सुरू आहे? संयुक्त राष्ट्रसंघ आणि पाश्चात्य देशांची नेमकी भूमिका काय आहे, प...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.