Rajhans Prakashan
राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
Rajhansi Mohor is the official Marathi podcast of Pune based leading publication house Rajhans Prakashan, with literary legacy of over seven decades. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी जपणाऱ्या आणि सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या राजहंस प्रकाशनाचा नवीन उपक्रम…राजहंसी मोहोर पॅाडकास्ट. राजहंसी पुस्तकांची ॲाडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॅाडकास्टचं स्वरूप आहे. १ मे २०२४ पासून दर बुधवारी या पॅाडकास्टचा नवीन भाग प्रसारित होईल. दर बुधवारी, नवे पुस्तक, नवा लेखक! Produced by : Rajhans Prakashan Production and Design : SoundsGreat NM Audio Solutions LLP.
Autor
Rajhans Prakashan
Categoría
Web del podcast
Último episodio
15 de abr. de 2026
¿Dónde escuchar?
Podcasts en la app Replaio Radio Muy prontoLos podcasts llegarán muy pronto a la app. Instálala ahora y sé el primero en descubrir una forma totalmente nueva de vivir los podcasts
Episodios
शहाणा असशील तर लिहू नकोस...| Lokesh Shevde | Rajhans Prakashan 15.04.2026 8:43
लोकेश शेवडे लिखित शहाणा असशील तर लिहू नकोस हे पुस्तक नुकतंच राजहंसने प्रकाशित केलंय. या पुस्तकातील एका लेखातील निवडक भागाचं वाचन करताहेत अपर्णा जोग. पुस्तक खरेदीची लिंक - https://www.rajhansprakashan.com/product-details/shahana-asashil-tar-lihu-nakos-shahanae-asashal-tara Book - Shahana Asshil Tar Lihu Nakos... Author - Lokesh Shevde Narration - Aparna Joag Cover Design - Veerendra Tikhe Executive...
सुमन कल्याणपूर: सात्विक सुरांचा नंदादीप | Suman Kalyanpur | New Marathi Book 04.03.2026 34:04
स्त्रीत्व कसं असेल, तिच्या अलवार मनाला काय भावत असेल, तिचं हळुवार व्यक्त होणं कसं असेल, तर सुमनताईंसारखं..! प्रेमळ, समजूतदार, हळवं, शांत, समर्पित... शांतपणे तेवणारा नंदादीपच जणू. कोवळ्या नाजूक फुलांचा मंद सुगंध, पावसाची हलकीशी सर, झाडाची कोवळी पालवी, पानांवरील निर्मळ दवबिंदू किती उपमा द्याव्यात या आवाजाच्या व्यक्तिमत्त्वाला? त्यानं आपलं असं एक स्थान निर्माण केलं. पौर्णिमेच्या शीतल चांदण्याला जर स्...
Done That Been There | Meghana Pethe | Marathi Book Narration 25.02.2026 15:46
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/done-that-been-there-da-thata-bthaara हे भुयार आहे की विवर हे समजत नाही. आणि दिवा दाखवायला कुणी नाही. आठवणींच्या गच्च रानात हरवल्यावर हाक द्यायला कुणी नाही. मडक्यांची पुन्हा माती होताना कुणीच सोबत नाही. आणि या वाहत्या नदीच्या पाण्याचा ठाव घेता येत नाही. हे नीट उमगल्यावर माणूस स्वतःशी बोलू लागतो का ? आणि हे असं स्वतःशी बोलणंच असतं का लिहिण...
धुळाक्षरे ते शल्यकौशल्य | Dr Dnyaneshwar Dusane | Marathi Book Review 04.02.2026 26:06
Book link: https://www.rajhansprakashan.com/product-details/dhulakshare-te-shalyakaushalya-thhalikashhara-ta-shalyakashalya त्याच्याजवळ ना पैसा होता, ना कुणाचे पाठबळ. हातावरचे पोट असलेले आईवडील अन् गरिबीच्या उन्हात उभे राहिलेले घर. पण तो फक्त नावापुरता 'ज्ञानेश्वर' नव्हता. आपल्या बुद्धिमत्तेला त्याने चिकाटीची धार चढवली. विलक्षण जिद्द अन् अभ्यासाच्या सातत्यातून तो प्रख्यात शल्यविशारद झाला. हा अवघड...
हरित हिंदुत्व | Dileep Kulkarni | Rajhans Prakashan 21.01.2026 16:56
हिंदुत्वा'ची दोन मूलभूत वैशिष्ट्यं म्हणजे आध्यात्मिक जीवनदृष्टी, आणि त्यातून घडणारी संयमित उपभोगाची जीवनशैली. तसं जगणं, म्हणजेच खऱ्या अर्थानं 'धर्मपालन'; कारण, त्यातूनच पर्यावरणाची 'धारणा' सुनिश्चित होऊ शकते. पश्चिमी विचार-आचारांच्या प्रभावामुळे आपणच त्याला सोडचिट्ठी दिलेली आहे! त्यामुळे, साऱ्या जगाप्रमाणेच आपल्यालाही पर्यावरणाच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा काळात, सध्याचं भरकटलेलं...
वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार | काळ्यानिळ्या रेषा | Raju Baviskar | Rajhans Prakashan 14.01.2026 37:24
‘काळ्यानिळ्या रेषा' हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या अनुभवांना शब्दांमधून वाट करून दिली आहे. आपल्या वाट्याला आलेले गावकुसाबाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे समंजसपणे उलगडत ते वाचकांना आपल्या चित्रांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत घेऊन जातात. एका सर्जनाची मुळे द...
नाट्यभारती: ७० वर्षांचा अनोखा प्रवास | Rajhans Prakashan | Natyabharati 24.12.2025 35:45
नाटक म्हणजे अल्प रंगमंचसज्जा, सशक्त कथानक अन् सामर्थ्यवान भावदर्शी अभिनय यांच्या बळावर प्रेक्षकांना स्वतःचा, आसपासचा आणि व्यापक समाजाचा गंभीर विचार करायला लावणारं एक महत्त्वाचं माध्यम आहे, हे या नाट्यसंस्थेनं आपल्या नाट्यकार्यातून दाखवून दिलं. बृहन्महाराष्ट्रातील मराठी जनांची नाळ आजही मराठी भाषा आणि महाराष्ट्रीय संस्कृतीशी जोडलेली आहे, ही गोष्ट अधोरेखित करणारा इंदौरच्या रंगकर्मीचा सात दशकांचा सर्ज...
मेड इन चायना | Girish Kuber | Marathi Book Narration 10.12.2025 10:49
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/made-in-china-mada-ina-cayanaआपला शेजार आपल्याला बदलता येत नाही. गेली अनेक शतकं आपला शेजारी असलेल्या चीनबरोबरचे आपले संबंध विलक्षण गुंतागुंतीचे. विशेषत: माओंच्या कारकिर्दीत झालेल्या १९६२ च्या युद्धानंतर हे संबंध चांगलेच ताणले गेले. वास्तविक आजचा चीन आणि माओंचा चीन यात जमीन - अस्मानाचा फरक. साम्यवादाचं नाव लावणाऱ्या चीनमध्ये आज प्रत्यक्षात...
ऑक्सिजन: पर्यावरणाच्या समस्येला भिडणारी भविष्यवेधी कादंबरी 03.12.2025 11:48
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/oxygen-oikasajana पृथ्वीवरच्या वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण असतं वीस टक्के. हे प्रमाण कायम राखण्यात वनस्पतींचा वाटा महत्त्वाचा. हे प्रमाण घसरू लागलं ! दहा टक्क्यांहूनही खाली घसरलं! आणि जगात एकच हाहाकार माजला. या समस्येवरचा तोडगा काय? तो शोधताना जगातील राष्ट्र दोन गटांत विभागली गेली. पंचेचाळीस प्रगत राष्ट्रांचा तोडगा होता झाडांविना जीवन. तर...
दुबई काल आणि आज | Dubai | Marathi Book Review 05.11.2025 15:39
दुबई म्हणजे वाळवंटात निर्मिलेले जणू नंदनवनच ! जिद्द, मेहनत आणि दुर्दम्य आशावाद या त्रिगुणांच्या जोरावर अरबी माणसाने सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. पाण्याच्या चार घोटांसाठी वणवण करणारा हा अरब आज सेंट्रली एअरकंडिशन घरातील सुखासीन आयुष्य जगतोय. हा बदल 'याचि देही याचि डोळा' अनुभवणाऱ्या मेघना अशोक वर्तक. १९७६ ते २०२५ या कालखंडात मेघनाताईंनी आपले पती श्री. अशोक वर्तक यांच्याबरोबर दुबईत वास्तव्य...
एका स्थापत्य अभियंत्याची कर्तृत्वगाथा | पाषाणाचे पाझर | Rajhans Prakashan 29.10.2025 38:36
सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भूत असतं याचा प्रत्यय देणारं विलक्षण आत्मचरित्र म्हणजे विवेक गाडगीळ लिखित पाषाणाचे पाझर. हे चरित्र म्हणजे जवळजवळ पाऊणशे वर्षांच्या काळाचे कोलाज आहे! संगमनेरसारख्या छोट्या गावातलं बालपण, नंतर शिक्षणाच्या निमित्तानं गावाबाहेरचं वास्तव्य तर सिव्हिल इंजीनिअर झाल्यावर भारतभर आणि भारताबाहेरही केलेली मुशाफिरी या पुस्तकात आहे. पण हे पुस्तक म्हणजे केवळ अनुभवांचा पट किंवा डायरी लिह...
अलौकिक अंटार्क्टिका | Antarctica Travel Story | Rajhans Prakashan 15.10.2025 13:24
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/antarctia-atarakataka निसर्गाविषयीचे अपार कुतूहल आणि साहस करण्याची मनाची तयारी या बळावर कोल्हापुरातील एक सुविद्य मध्यमवर्गीय दांपत्य शिडाच्या बोटीतून अंटार्क्टिका मोहिमेवर जाते. एके काळी समुद्रबंदीच्या बेडीने आपल्या समाजाला जखडून ठेवले होते, याचे आज आश्चर्य वाटेल. तो काळ आता मागे पडला आहे. मात्र डॉ. गायत्री आणि डॉ. गुरुदास हर्षे यांनी इतर...
एक होता कार्व्हर | Veena Gavankar | Rajhans Prakashan 08.10.2025 8:29
Ek Hota Carver Book Link - https://www.rajhansprakashan.com/product-details/ek-hota-carver-eka-hata-karavahara-dalkasa-aavatata जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, वीणा गवाणकर आणि राजहंस प्रकाशन यांचं नातं अद्वैत आहे. वीणाताईंच्या अभ्यासू लेखणीतनं साकारलेल्या एक होता कार्व्हर या चरित्रानं मराठी साहित्यात इतिहास रचला. वीणाताईंचं कार्व्हर वाचलं नाही असा रसिक वाचक मिळणं अवघड. १९८१ साली प्रकाशित झालेल्या पहिल्य...
अफाट विश्वाचा सुबोध परिचय | Dr Girish Pimple | Rajhans Prakashan 01.10.2025 37:22
आकाश संपते, तिथे सुरू होते अथांग ‘अंतराळ’. या अंतराळात पसरले आहे आपले अफाट विश्व. कोट्यवधी दीर्घिका, अब्जावधी ग्रह-तारे न्युट्रॉन तारे, क्वेसार, कृष्णविवरे अशा अनेक घटकांनी बनलेले हे विश्व. आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा चमत्कारांनी अन् घटनांनी भरलेले हे विश्व. या अनंत विश्वांचा वेध घेण्याचा अथक प्रयत्न जगभरचे खगोलशास्त्रज्ञ पिढ्यानपिढ्या करत आहेत. लहानथोरांच्या मनात एकाच वेळी कुतूहल अन् जिज्ञास...
घुमक्कडी: कविता महाजन यांचे अखेरचे पुस्तक | Rajhans Prakashan | Marathi Book Narration 24.09.2025 7:52
Ghumakkadi Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/ghumakkadi कविता महाजन यांचे 'घुमक्कडी' हे अनोखे पुस्तक नुकतेच राजहंस प्रकाशनाने वाचकांच्या भेटीस आणले आहे. 'ब्र', भिन्न, 'मृगजळीचा मासा' , 'ग्राफिटी वॉल', 'ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम' , 'समुद्रच आहे एक विशाल जाळं' या सारखी गाजलेली पुस्तके कविता यांनी राजहंससाठी लिहिली. 'घुमक्कडी' या पुस्तकात भटकंती आणि त्या-त्या परिसरातील उत्...
विश्वास पाटील यांची वास्तवदर्शी महागाथा | Lust for Lalbaug | Vishwas Patil 17.09.2025 15:51
विश्वास पाटील यांच्या राजहंसी पुस्तकांची लिंक - https://www.rajhansprakashan.com/authors-details/vishwas-patil-vashavasa-patal आजचा पॉडकास्ट हा खास आहे. कारण ज्येष्ठ साहित्यिक, राजहंसी लेखक, पानिपतकार विश्वास पाटील यांची साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. राजहंस परिवारातर्फे त्यांचं मनापासून अभिनंदन! यानिमित्तानं त्यांच्या लस्ट फॉर लालबाग य...
..आणि वयाच्या ८९ व्या वर्षी अल्लादियाखां यांनी गाजवली संगीत मैफल 10.09.2025 17:23
स्वातंत्र्यपूर्व काळात १९४४ साली मुंबईत विक्रमादित्य संगीत परिषद ही भव्य सांगितीक मैफलीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच्या अध्यक्षस्थानी होते न्यायमूर्ती जयकर. तर या मैफलीची सांगता झालेली उस्ताद अल्लादियाखां यांच्या गायनानं. वास्तविक तेव्हा अल्लादियाखां हे ८९ वर्षांचे होते. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी या परिषदेत सहभागी होण्यासाठी नम्रपणे नकार दिला होता. पण स्वतः बॅरिस्टर जयकर यांनी आग्रह केल्यानं त्...
एक अनघड प्रवास उलगडणारं फकिरी | Fakiri | Datta Bargaje | Rajhans Prakashan 03.09.2025 27:32
खरं तर हा सर्वसामान्य माणूस. चारचौघांसारखंच आयुष्य गेलं असतं त्याचं. बालपण, शिक्षण, मग नोकरी अन् पोटासाठीची पायपीट. पण या प्रवासात त्याला मिळाली सेवेची प्रेरणा, करुणेचा वसा. ती प्रेरणा, तो वसा घेऊन पुढे पीडितांसाठी तो काम करत राहिला. कुठेही थांबला नाही, दमला-भागला नाही, स्वत:च्या सुखाचा विचारही त्याच्या मनात आला नाही. तो निरंतर चालत राहिला. पडल्या-झडलेल्या आणि तुटक्या-फाटक्या माणसाला अडचणीतून मार्...
हाडाच्या शिक्षणतज्ज्ञाने शब्दबद्ध केलेले 'माझे शाळेतले प्रयोग' | Smita Gaud | Rajhans Prakashan 27.08.2025 41:51
गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर या छोट्याशा गावातील ‘विद्या मंदिर’ ही प्रयोगांची पहिली पायरी. मुलांमध्ये दडलेल्या उपजत क्षमतांचा विकास घडवणे हे या सा-या प्रयोगांचे लक्ष्य. वर्गात प्रत्यक्ष घडलेली अध्ययन-अध्यापन प्रकिया हा या प्रयोगविषयाचा गाभा. शिकणे आनंददायी व्हावे, शिक्षणातील साचलेपण जाऊन ते निर्झरासारखे प्रवाही व्हावे, या उद्दिष्टाने झपाटलेल्या एका शिक्षणतज्ज्ञाने रेखाटलेला हा अनोखा प्रवास. विद्य...
मी...अल्लादियाखां | Mi Alladiyakhan | Ashwini Bhide Deshpande | Marathi Book Podcast 13.08.2025 39:03
मरहूम उस्ताद अल्लादिया खांसाहेब...जयपूर-अत्रौली घराण्याच्या विद्यमान गायकीचे उद्गाते. जणू ‘गायनाचे गौरीशंकर'! त्यांच्या गायकीच्या आजच्या घडीला कार्यरत वारसदारांपैकी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे सांगत आहेत त्यांची चरितकहाणी. ख्यालगायनाच्या पद्धतीनुसार ‘रागबढत' किंवा ‘उपज' या अंगाने विस्तारत साकारलेली खांसाहेबांची ही जीवनकथा. त्यातून वाचकापुढे उलगडत जातं कधी सौंदर्यपूर्ण, प्रमाणबध्द स्थापत्यासारखं खांस...
दौशाड: दुर्दम्य इच्छाशक्तीचं प्रतीक | Daushad Book | Rajhans Prakashan 06.08.2025 34:22
Doushad Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/doushad दुष्काळी भाग. पाण्याचं दुर्भिक्ष्य. हजार अडचणी उभ्या ठाकलेल्या. पण माणदेशातील माणसं हिंमतीनं जगत असतात, कधी मागं हटत नाहीत. आत्महत्येचा वेडा विचार मनात आणत नाहीत. या माणसांसारखीच एक वेलवर्गीय वनस्पती - ‘दौशाड'! इथल्या माणसासारखी जगणारी, ओढ्याकाठी, खडकावर, वाळूतसुद्धा पाणी नसताना वाढणारी. कितीही दुष्काळ असला; तरी ती दमत, थक...
गोष्ट रिझर्व्ह बँकेची | Goshta Reserve Bankechi | Rajhans Prakashan 30.07.2025 38:12
शेतकर्यांपासून कामगारांपर्यंत, उद्योगपतींपासून गृहिणीपर्यंत, अगदी नोकरदारापासून संतमहंतांपर्यंत प्रत्येकाचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष बँकेशी संबंध येतोच. जशी व्यक्तीची अथवा संस्थेची कुठली ना कुठली बँक, तशी बँकांची बँक, सार्या देशाची बँक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक. कधी स्थापन झाली ही बँक? कसा झाला या बँकेचा आजवरचा प्रवास? स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात काय होती या बँकेची भूमिका अन् कार्यपद...
मृत्यूचा शांत, संयत स्वीकार शक्य आहे? | Sobat Sanjvelchi | Rajhans Prakashan 23.07.2025 26:09
आपल्यापैकी बहुतेकजण मृत्यूला, विशेषत: वेदनादायी मृत्यूला घाबरतात. परंतु आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना ज्यांनी अत्यंत अवघड वाटणारे पर्याय स्वीकारले, अशा सामान्य व्यक्तींच्या, असामान्य जीवनस्पर्शी कथा डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी अगदी सहज सोप्या भाषेत अन् अत्यंत अनुकंपेने आपल्यासमोर आणल्या आहेत. त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले प्रसंग, त्यातील गूढता, ताणतणाव आणि त्याचबरोबर दिलासा देणारा हळुवार...
शिवचित्रांचा व शिवस्मारकांचा वेधक आढावा | Suhas Bahulkar | Marathi Podcast 16.07.2025 26:41
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/katha-shivchitranchya-vyatha-shivasmarakachya-katha-cataracaya-vayatha-shavasamarakacaya भारतीय इतिहासाला निर्णायक राष्ट्रीय वळण लावणारे महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! त्यांचे व्यक्तिमत्त्व समाजाला नेहमीच प्रेरणा देत आले. असंख्य चित्रकारांनी छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातले अगणित चित्तथरारक, रोमहर्षक प्रसंग चितारले; तर कित्येक शिल...
कथा शिवचित्रांच्या व्यथा शिवस्मारकांच्या | Suhas Bahulkar | Marathi Book 10.07.2025 23:26
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/katha-shivchitranchya-vyatha-shivasmarakachya-katha-cataracaya-vayatha-shavasamarakacaya भारतीय इतिहासाला निर्णायक राष्ट्रीय वळण लावणारे महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! त्यांचे व्यक्तिमत्त्व समाजाला नेहमीच प्रेरणा देत आले. असंख्य चित्रकारांनी छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातले अगणित चित्तथरारक, रोमहर्षक प्रसंग चितारले; तर कित्येक शिल...
Podcasts similares
Replaio no es editor de podcasts; los nombres de los programas, las portadas y el audio pertenecen a sus autores y se distribuyen a través de canales RSS públicos