Dwitiya Sonawane

ग्रंथप्रेमी - Granthpremi

Arts MR ↓ 85 episodios

ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi

Autor

Dwitiya Sonawane

Categoría

Arts

Web del podcast

granthpremi.com

Último episodio

10 de jul. de 2026

¿Dónde escuchar?

Podcasts en la app Replaio Radio Muy pronto

Los podcasts llegarán muy pronto a la app. Instálala ahora y sé el primero en descubrir una forma totalmente nueva de vivir los podcasts

Descárgala en Google Play Instálala gratis Android 5 M+ de descargas · valoración de 4,8 iOS muy pronto

Episodios

आषाढी वारी २०२६ | पंढरपूर वारीचं व्यवस्थापन चालतं कसं? MBA मध्ये शिकवावं असं नियोजन | डॉ रूपाली शिंदे 10.07.2026

आषाढी वारीच्या मुहूर्तावर लाखो पावलं पुन्हा पंढरीच्या वाटेला लागली आहेत. असंख्य वारकरी, ७०० वर्षांची अखंड परंपरा — आणि आजवर एकही चेंगराचेंगरीची घटना नाही. कोणतीही केंद्रीय यंत्रणा नसताना हे घडतं तरी कसं? पंढरपूरची वारी म्हणजे केवळ एक यात्रा नव्हे — ती महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. "जिथं वारकरी, तिथपर्यंत महाराष्ट्र" असं रंगनाथ पठारे का म्हणतात? पालखीची परंपरा तुकोबांनी नव्हे, तर त्यांच्या पुत्...

म्हणून Kangchenjunga सर्वात deadly शिखर आहे.. | Mountaineer Anand Mali Podcast | Granthpremi मराठी 03.07.2026

या पॉडकास्ट मध्ये आपल्यासोबत आहेत 'एव्हरेस्ट वीर' आणि गिर्यारोहक आनंद माळी. जगातलं तिसरं सर्वोच्च आणि तांत्रिकदृष्ट्या सर्वात अवघड असे 'कांचनजुंगा' शिखर सर करताना त्यांच्यावर नेमके कोणते प्रसंग ओढवले, 'रेनिंग रॉक्स' (वरुन कोसळणारे दगड) आणि मृत्यूचं दुसरं नाव असलेल्या 'हँगिंग ग्लेशियर' मधून वाट काढताना आलेल्या अडचणी, जेव्हा एका मिनिटाच्या चुकीमुळे जीव जाऊ शकतो, अशा वेळी गिर्यारोहक नेमका काय निर्णय...

राजाराम महाराजांना आश्रय देऊन औरंगजेबाला आव्हान देणारी वीरांगणा | बेदनूरची राणी चेन्नम्मा | #history 26.06.2026

इतिहासाने जिच्या शौर्याची दखल घेतली, पण आपण मात्र विसरलो — ती केळदी-बेदनूरची राणी चेन्नम्मा. नि. मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी लिखित "अपराजिता — गाथा भारतीय वीरांगणांची" या ग्रंथातून Granthpremi अभिवाचनात आज तिची अविश्वसनीय गाथा जिवंत होतेय! या भागात आपण राणी चेन्नम्मा यांचा इतिहास पाहणार आहोत, जो आजच्या पिढीला व्यवस्थापन, शौर्य आणि धैर्याचे मोठे धडे देतो. काय पाहाल या व्हिडिओमध्ये : • साध्या व्यापार...

भारताचे पहिले पॅरा-ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणारा जवान | Real Story of Chandu Champion | मुरलीकांत पेटकर 19.06.2026

तो फक्त एकवीस वर्षांचा असताना पाकिस्तानी गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळण केली, तेव्हा सैनिक म्हणून देशाची सेवा करण्याच्या त्याच्या स्वप्नांची क्षणार्धात राख झाली. अनंत अडचणींचा सागर समोर उभा राहिला, पण त्याने हातपाय मारणं थांबवलं नाही. पायांमधली शक्ती त्याने बाहूंमध्ये एकवटली. मनाचा निग्रह करून पाण्यात असा सूर मारला की, हायडेलबर्गच्या जागतिक जलतरण स्पर्धेत विश्वविक्रम नोंदवून त्याने देशाला सुवर्णप...

पहिल्या भाषणामध्ये ही चूक करू नका.. | Overcoming Stage Fear | प्रभावी भाषणकला | Granthpremi 12.06.2026

भाषण करायला जाताना सोबत कोणाला न्यावे? ही एक चूक तुमचे संपूर्ण भाषण बिघडवू शकते! 🤫👇 भाषणाची वेळ जवळ आली की छातीत धडधड व्हायला लागते? स्टेजवर जाण्यापूर्वी एक अनामिक भीती सतावत असते. 'आपले भाषण चांगले होईल का?', 'आपली फजिती तर होणार नाही ना?' अशा अनेक शंकां मनात घोंगावत असते. पण तुम्हाला माहीत आहे का, की अशा वेळी तुमच्यासोबत कोणती व्यक्ती उभी आहे, यावरच तुमचे यश अवलंबून असते? 'ग्रंथप्रेमी'च्या आजच...

सिंधचा रक्तरंजित इतिहास - 2 | Dahir & family gave their lives for the soil ? | Kaka Vidhate | Sindh History 05.06.2026

आपल्या मातीसाठी प्राणांचे बलिदान देणारे सिंधचे राजा दाहिर आणि त्याच्या संपूर्ण परिवाराची शौर्यगाथा या दुसर्‍या भागात आपण समजून घेणार आहोत ज्येष्ठ कादंबरीकार आणि इतिहास तज्ञ श्री काका विधाते यांच्याकडून! Unearth the dramatic history of the Battle of Sindh and the legendary resistance of its last Hindu ruler, King Dahir. King Dahir & his entire family sacrificed their lives for Sindh! The story of h...

नामस्मरण कसे करावे ? | ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात काय सांगतात ? | अभिवाचन | Granthpremi मराठी 29.05.2026

"आम्हाला देवाचं नाव घ्यायला आवडतं, पण नामस्मरण करताना मनात हजारो विचार येतात, एकाग्रता होत नाही!" ही तुमचीही समस्या आहे का...? काळजी करू नका. 'गोष्टीरूप हरिपाठ' या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीतील अत्यंत महत्त्वाचा भाग आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या विशेष भागात आपण पाहणार आहोत की, कोणत्याही सद्गुरूंचा अनुग्रह मिळालेला नसला, तरीही सामान्य प्रापंचिक माणूस दैनंदिन कामे करताना देखील (जसे की स्वयंपा...

सिंधचा रक्तरंजित इतिहास - 1| The last Hindi King of Sindh - Raja Dahir | Kaka Vidhate| Sindh History 22.05.2026

तब्बल ७० वर्षे, अरबांची १४ आक्रमणे, या हिंदुशाही राजवटीने - सिंधने परतवून लावली. अवघ्या १७ वर्षांचा मोहम्मद बिन कासिम, ज्याने भारतावर १५ वे यशस्वी आक्रमण घडवून आणले, तेंव्हा हिंदू राजा दाहिर तिथे राज्य करत होता. असे काय घडले की ७११ मधील १५ व्या आक्रमणात भारताचे सिंध हे अभेद्य प्रवेशद्वार कोलमडले? या संपूर्ण युद्धाचा टर्निंग पॉईंट काय होता? जिंकत आलेली लढाई एका क्षणात पराभवात कशी बदलली? 'ग्रंथप्रेम...

जाणून घ्या मन जिंकण्याची कला | प्रभावी भाषणकला | रवींद्र देसाई | अभिवाचन | Granthpremi मराठी 15.05.2026

तुमचं म्हणणं कोणीच ऐकत नाहीये का? मग पहा संवादाचं मानसशास्त्र! आपल्याला अनेकदा वाटतं की 'भाषण' म्हणजे फक्त स्टेजवर उभं राहून ओरडणं. पण तुम्हाला माहितीये का? प्रभावी भाषण ही खरं तर संवादाची कला आहे जी तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांशी किंवा ऑफिसमध्ये बोलतानाही वापरू शकता. या व्हिडिओमध्ये आम्ही रवींद्र देसाई यांच्या 'प्रभावी भाषण कला' या पुस्तकातील अशा काही टिप्स शेअर केल्या आहेत, ज्यामुळे लोक तुमच्या...

Secrets of Ayurveda Cooking | वैद्य रूपाली पानसे | आयुर्वेद आणि आहार | Granthpremi मराठी 08.05.2026

तुमचा रोजचा स्वयंपाक एक 'कला' आहे? डॉक्टर रूपाली पानसे यांच्या मते, ते त्याही पलीकडे जाऊन एक प्रगत 'सायन्स' आहे! या खास भागात, आम्ही केवळ कॅलरीज मोजण्यापेक्षा आपल्या शरीराचा 'अग्नी' आणि 'प्रकृती' समजून घेण्यावर भर दिला आहे. 'फूड पिरॅमिड' ही संकल्पना आता जुनी झाली असून, आपण आपल्या ताटातील अन्न (My Plate) आयुर्वेदाच्या नजरेतून कसे पाहावे, हे या पॉडकास्टमध्ये उलगडले आहे. आपल्याला पडणाऱ्या मूलभूत प्रश...

महादेव, बाळकृष्ण आणि गोकुळाचे रहस्य! | आनंद योग - अनिल फडणवीस | ग्रंथप्रेमी 01.05.2026

कृष्णलीलांमध्ये काय योग रहस्य दडले आहे हे समजण्यासाठी ही कथा नक्की ऐका! आपण अनेकदा म्हणतो की "संसार आहे तर दुःख असणारच." पण या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याच पौराणिक कथांमध्ये, अध्यात्म आणि योगमार्गात आहे का? या भागात आपण अनिल फडणवीस यांच्या 'आनंद योग - ध्यानासहित' या पुस्तकातील एक अतिशय सुंदर अशी "बाळकृष्ण आणि महादेव यांची भेट" ही कथा ऐकणार आहोत. या भागात आपण पाहणार आहोत: • गोकुळ आणि मानवी...

मुलांच्या हातात मोबाईल देण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा | Cyber Parenting | Mukta Chaitanya | Granthpremi 24.04.2026

तुमचं मूल रात्री २ वाजेपर्यंत मोबाईलवर काय करतंय? आजच्या काळात मोबाईल आणि इंटरनेट ही दुधारी तलवार झाली आहे. १० वर्षांखालील मुलं देखील रात्री जागी राहून गेमिंग आणि सोशल मीडियामध्ये गुंतलेली आहेत, हे जितकं धक्कादायक आहे तितकंच भयानकही! "सायबर पालकत्व" या पुस्तकाच्या लेखिका मुक्ता चैतन्य यांच्याबरोबर आपण या पॉडकास्ट मध्ये खालील विषयांवर चर्चा केली आहे: • मुलांच्या झोपेच्या समस्या आणि त्यामागील 'डिजिट...

थोरले बाजीराव पेशवे खरा इतिहास 8 | The Tragic Death of Bajirao Peshwa | Kaka Vidhate | Maratha History 03.04.2026

बाजीराव-मस्तानीच्या नात्याकडे आपण आजवर केवळ एकाच नजरेतून पाहिले. पण या प्रकरणामागे एक मोठे राजकीय षडयंत्र दडलेले होते. त्या षडयंत्राचा सुत्रधार कोण ? चिमाजी अप्पा, राधाबाई आणि नानासाहेब यांची भूमिका काय होती? काही इतिहासकारांनी आणि लेखकांनी बाजीरावांवर मस्तानीमुळे कर्तव्य विसरल्याचा आरोप केला, मस्तानीचे आणि सोबत बाजीरावांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला, पण खरा इतिहास काय सांगतो? ऐतिहासिक काग...

थोरले बाजीराव पेशवे खरा इतिहास 7 | The Mastani Conspiracy | Kaka Vidhate | Maratha History #Bajirao 27.03.2026

बाजीराव-मस्तानीची कहाणी आपण सर्वांनी ऐकली आहे, पण आपल्याला जे सांगितलं गेलंय, ते सत्य आहे का? मस्तानी कलावंतीण (नाटकशाळा) होती की कुलवती ? मराठी बखरींनीच मस्तानी कुंवरचे अवमूल्यन केले का..? पेशव्यांच्या कारकुनांनी त्यांच्या आणि बाजीरावांबद्दल हीन भाषा का वापरली..? शनिवारवाड्यातला मस्तानी महाल का नष्ट करण्यात आला ? 'एक अस्सल चिठोर सर्व बखरींच्या बहुमताला हाणायला पुरेसे आहे' असं इतिहासाचार्य राजवाडे...

थोरले बाजीराव पेशवे - खरा इतिहास 6 : Bajirao's Bhopal Victory & Vasai Conquest | ग्रंथप्रेमी मराठी पॉडकास्ट | काका विधाते 06.03.2026

परकीय आक्रमणे आणि मराठ्यांचा भीमटोला: जेव्हा इराणचा क्रूरकर्मा नादिरशहा भारतावर चालून आला, तेव्हा दिल्ली रक्ताने माखली होती. अवघ्या तीन तासांत ३० हजार निष्पाप लोकांची कत्तल आणि मयूर सिंहासनासह कोट्यवधींची लूट घेऊन जाणारा हा 'मौत का सौदागर' नेमका कोण होता? नादिरशहाच्या या आक्रमणामागे निजामाची आणि सादत खानाची फितुरी कशी होती, याचा पर्दाफाश या भागात करण्यात आला आहे. अशा कठीण काळात, जेव्हा मुघल साम्रा...

The Untold Reality of Marathi Book Industry | Samir Gudhate & Vinamra Podcast | Granthpremi मराठी 20.02.2026

मराठीत काही पुस्तकं 'बेस्ट-सेलर' ठरतात, तर काही काळाच्या पडद्याआड का जातात? मराठी साहित्य विश्वात नवीन लेखक तर येत आहेत, पण प्रकाशक आणि वितरणाचं काय? सोशल मीडियाच्या युगात एखादं पुस्तक 'बेस्ट सेलर' कसं ठरतं? 'ग्रंथप्रेमी पॉडकास्ट'च्या या भागात Book Influencers समीर गुधाटे आणि विनम्र भाबल यांनी मराठी पुस्तक उद्योगातील वास्तव मांडले आहे. केवळ पुस्तक लिहून चालत नाही, तर 'लेखक' म्हणून स्वतःला कसं प्रो...

The Truth About "Toxic Masculinity" | Geetali Vi. Ma. Podcast Pt - II | ग्रंथप्रेमी मराठी 06.02.2026

सामाजिक कार्यकर्त्या गीताली वि.म. यांच्यासोबतच्या संवादाचा हा दुसरा भाग. या भागात 'मिळून साऱ्या जणी'चा ४० वर्षांचा थक्क करणारा प्रवास आणि जागतिक नेटवर्कचा उलगडा केला आहे. त्यांनी विवाहसंस्था, घटस्फोट आणि समतेवर आधारित नात्यांविषयी अत्यंत धाडसी आणि पारदर्शक विचार मांडून समाजाच्या ढोंगीपणाला आरसा दाखवला आहे. केवळ स्त्रियांच्या प्रबोधनावर न थांबता, पुरुषांमधील 'विषारी मर्दानगी' बदलून त्यांना संवेदनशी...

मुलींच्या मृत्यूला सासरच नाही, तर माहेरपण जबाबदार! | The Dark Reality of Patriarchy| डॉ. गीताली वि म | Granthpremi मराठी 23.01.2026

शिक्षण मिळालं, आर्थिक स्थैर्य आलं, तरीही सुखाच्या नावाखाली मुलींची घुसमट का? आजच्या काळात उच्चशिक्षित आणि स्वावलंबी मुली टोकाचं पाऊल का उचलत आहेत, या प्रश्नाचं अस्वस्थ करणारं उत्तर या भागात दडलंय. मिळून सार्‍याजणी या मासिकाच्या संपादक आणि कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. म. यांच्याशी मारलेल्या या गप्पा निव्वळ संवाद नाहीत, तर ते आरसा दाखवणारं वास्तव आहे. लग्नानंतर मुलीचं होणारं 'आदिम विस्थापन' (Primordi...

म्हणून मी निळावंती लिहिली...| सुमेध | महामाया निळावंती | अजातशत्रू | ग्रंथप्रेमी Podcast | Sumedh 10.01.2026

"लेखकाने आता influencer झाले पाहिजे.." - फिल्म इंडस्ट्री मध्ये पटकथाकार म्हणून काम करणारा सुमेध असे का म्हणाला? एखाद्या वेबसेरीजलाही मागे टाकतील अश्या महामाया निळावंती आणि अजातशत्रू या कादंबर्‍या लिहिणारा हा तरुण लेखक नेमका आहे कसा? त्याची creative process काय आहे? "निळावंती" कादंबरीची सुरुवात कशी झाली? निळावंतीला मिळालेले वाचकांचे प्रेम आणि गमतीदार किस्से.. पूर्ण वेळ लिखाण करून पैसा मिळू शकतो? हे...

म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ लिहिला.. | Anil Fadanvis | गोष्टीरूप हरिपाठ | Granthpremi मराठी 26.12.2025

माऊलींचा हरिपाठ माहीत नाही असा मराठी माणूस महाराष्ट्रात विरळाच! संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ जरी कानाला गोड वाटला आणि समजायला वरवर सोपा वाटला तरी त्याचा अर्थ आणि तत्वज्ञान खोल आहे. माऊलींच्या हरिपाठातील "सात पाच तीन दशकांचा मेळा" आणि "नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ" हे अभंग आणि त्याचा गूढ अर्थ समजून घेवूया ग्रंथप्रेमी मराठी पॉडकास्ट च्या या विशेष एपिसोड मध्ये गोष्टीरूप हरिपाठ पुस्तकाचे लेखक, य...

म्हणून मुक्ताबाईंना आदिमाया म्हणतात.. | Dr Rupali Shinde Podcast Part - 2 | Granthpremi 05.12.2025

सगळं असूनही काहीतरी हरवल्यासारखं का वाटतं? नैराश्य का येतं? याचं उत्तर ७०० वर्षांपूर्वीच्या संत साहित्यात दडलेलं आहे. 'तैसी मुक्ताबाई आम्हांमधी' पुस्तकाच्या लेखिका डॉ. रूपाली शिंदे यांच्यासोबतचा संवाद या दुसर्‍या भागातही आपण चालू ठेवतोय. डॉ. शिंदे सांगतात की संत साहित्य म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर ते जगण्याचं बळ देणारं सत्व आहे. नरोटीची उपासना करण्यापेक्षा त्यातील खोबरं (तत्वज्ञान) जास्त महत्...

ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा उपदेश करणार्‍या मुक्ताबाई - भाग 1 | Dr. Rupali Shinde Podcast | Granthpremi मराठी 21.11.2025

संत ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करणारी अवघी 10 वर्षाची धाकटी मुक्ताई आणि ताटीचे अभंग माहीत नाहीत असा मराठी माणूस विरळाच! मुक्ताबाई, नामदेव महाराज आणि योगी चांगदेव यांच्याही गुरु होत्या. ते सर्व प्रसंग आपण जाणतोच. पण हे प्रसंग केवळ दंतकथा किंवा सिद्धी नाहीत त्यामागे खूप व्यापक आणि सर्व समाजाला उपयोगी असा खोल विचार आहे आणि म्हणून त्या संप्रदायाचे प्रेरणास्थान आहेत. या प्रत्येक कथेतून, मुक्ताबाईंकडून...

Across the Himalaya | Inside First Women’s Himalayan Traverse | Vineeta Muni Podcast | Granthpremi 07.11.2025

१९९७ साली, भारतातून, ८ महिलांनी हिमालयाच्या पूर्व टोकापासून ते पश्चिम टोकापर्यंत पायी सफर केली. ४५०० कि मी चा हा प्रवास त्यांनी १९८ दिवसात पूर्ण केला. ही जगातील पहिली अशी मोहीम होती ज्यामधे अरुणाचल प्रदेश ते लडाख इतका लांबचा पल्ला, जो ३ देशातून आणि ४० हून अधिक मोठ्या खिंडी चढून, फक्त महिलांच्या चमूने पार केला. विनीता मुनी एक उत्तम mountaineer तर आहेच. पण या मोहिमेत विनीता official फॉटोग्राफर म्हणू...

Science Behind Yoga and Meditation | Anil Fadanvis | आनंद योग | Granthpremi मराठी #AnandYog #Dhyaan 10.10.2025

सर्व जग ज्या योग साधनेला मान्यता देते तिथे आपण भारतीय मात्र योगाकडे काहीसं दुर्लक्ष करतो आणि तथाकथित मॉडर्न आणि महागड्या Zumba / Gym / Pillates च्या मागे धावतो. परदेशामध्ये शालेय शिक्षणात योग अंतर्भूत केला जातोय पण आपल्याकडे मात्र अजूनही त्याबाबतीत औदासिन्य आहे. आपल्याकडे योग म्हणजे योगासने, हे समीकरण अतिशय घट्ट रुजलेले आहे. पण मग योग म्हणजे नेमके काय? बरेच वर्षे योग करणार्‍या लोकांनाही अष्टांग यो...

Breaking Stereotypes: Marathi Woman’s Brave Journey | Dr. Madhavi Vaidya podcast - 2 | Granthpremi मराठी 26.09.2025

कवितेची गोडी विद्यार्थ्यांना लागावी म्हणून अनन्वय संस्थेची सुरुवात झाली. हे विद्यार्थी म्हणजे माझा बँक बॅलेन्स आहे असे माधवी ताई म्हणतात. फर्ग्यूसन कॉलेज मध्ये उत्तम काम सुरू असताना माधवी ताई संहिता लेखन आणि माहितीपट या क्षेत्राकडे वळल्या. 50 महितीपट त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी बनवले. त्यामधील कित्येक महितीपटांना राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय पारितोषिके मिळाली. या क्षेत्रात कुठलेही शिक्षण न घेता ह...

Escucha el podcast ग्रंथप्रेमी - Granthpremi en Replaio

Radio y podcasts en una sola app - gratis y sin registro. Instálala hoy y no te pierdas el estreno

Descárgala en Google Play

Replaio no es editor de podcasts; los nombres de los programas, las portadas y el audio pertenecen a sus autores y se distribuyen a través de canales RSS públicos