PustakGappa Podcast

पुस्तक गप्पा (पुस्तकगप्पा)

Arts MR ↓ 27 episodios

मराठी साहित्य, नाटके , सिनेमे इत्यादींचं आकलन, आस्वाद, आणि क्वचित टीकाटिप्पणीPustak GappaPustakGappa

No dejes de visitar la web del podcast y apoyar a su creador: pustakgappa.blogspot.com

Autor

PustakGappa Podcast

Categoría

Arts

Web del podcast

pustakgappa.blogspot.com

Último episodio

19 de abr. de 2026

¿Dónde escuchar?

Podcasts en la app Replaio Radio Muy pronto

Los podcasts llegarán muy pronto a la app. Instálala ahora y sé el primero en descubrir una forma totalmente nueva de vivir los podcasts

Descárgala en Google Play Instálala gratis Android casi 10 M de descargas · valoración de 4,8 iOS muy pronto

Episodios

वॉल्डन प्रकाशनाचे संचालक अभिषेक धनगर यांच्याशी गप्पा 19.04.2026

पुस्तकं वाचायचं वेड. मग जमवायचं. मग विकायचंही वेड! त्यापायी या माणसानं चांगली नोकरी सोडून दिली. आणि मग तर प्रकाशन काढून पुस्तकांच्या निर्मितीत उतरला. कुठून सुचतात असली भाग्यवान खुळं? कशी परवडतात? काय देतात? 'वॉल्डन प्रकाशना'च्या अभिषेक धनगर यांच्याशी याबद्दल गप्पा #पुस्तकगप्पा च्या पंचविसाव्या सत्रात. सहभाग: अभिषेक धनगर, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य

सानियाशी गप्पा आणि ’स्थलांतर’ची इ-आवृत्ती 07.02.2026

पुस्तकगप्पा सत्र चोविसावे या वर्षातल्या पहिल्या #पुस्तकगप्पा सानियाशी. निमित्त आहे ’भास प्रकाशना’तर्फे प्रकाशित होत असलेल्या ’स्थलांतर’ या तिच्या कादंबरीच्या इ-प्रतीचं. मांजरपावलांनी येणार्‍या आणि त्यांच्या वेगळेपणानं थक्क करून जाणार्‍या; अनाग्रही, मितभाषी आणि लखलखीत विधान करणार्‍या तिच्या कथा. तशाच तिच्या कादंबर्‍याही. त्यातही ’स्थलांतर’ विशेष आवडीची. ती प्रथम प्रकाशित झाल्याला तीस वर्षं उलटून गे...

पुस्तकगप्पा : ऋषिकेश दाभोळकरांशी गोष्टदिंडीबद्दल गप्पा 07.04.2025

ऋषिकेश दाभोळकर हा आमचा मित्र ‘कुल्फी’ या मुलांसाठीच्या नियतकालिकाचा आणि ‘अटक मटक’ या वेबसाइटचा संपादक. अलीकडेच त्यानं ‘गोष्टदिंडी’ नावाचा अनोखा उपक्रम पार पाडला. पाठीवर पुस्तकं लादून तो चालत सुटला, वाटेत लागणार्‍या शाळांमधून मुलांना गोष्टी सांगितल्या आणि त्यांना पुस्तकं दाखवली, त्यांच्याशी गप्पा मारल्या. या उपक्रमामधले त्याचे अनुभव अद्भुत आणि उद्बोधक दोन्ही होते. त्यांबद्दल त्याच्याशी गप्पा.

पपायरस प्रकाशनच्या भूषण आणि श्रीपाद यांच्याशी पुस्तकांच्या भौतिक रूपाबद्दल केलेल्या गप्पा. 06.01.2025

आपण गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे, भूषण कोलते आणि श्रीपाद चौधरी पपायरस या प्रकाशन संस्थेचे संस्थापक आहेत. ते पुस्तकांचं दुकानही चालवतात. पपायरसच्या पुस्तकांची निर्मितिमूल्यंही फारच वाखाणण्यासारखी असतात. खेरीज - त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीबद्दल, कागद - रंग - टंक - बांधणी - टिकाऊपणा… याबद्दल त्यांचा स्वतःचा पुष्कळ विचार आणि ठाम मतं आहेत.  मेघना आणि जितेन यांनी भूषण आणि श्रीपाद यांच्याशी त्याबद्दल...

पपायरस प्रकाशनच्या भूषण आणि श्रीपाद यांच्याशी पुस्तकांचं संपादन, प्रकाशन, वितरण आणि पुस्तक व्यवहार याबद्दल गप्पा 04.01.2025

भूषण कोलते आणि श्रीपाद चौधरी पपायरस या प्रकाशन संस्थेचे संस्थापक आहेत. ते पुस्तकांचं दुकानही चालवतात. पपायरसच्या पुस्तकांची निर्मितिमूल्यंही फारच वाखाणण्यासारखी असतात. मेघना आणि जितेन यांनी भूषण आणि श्रीपाद यांच्याशी पुस्तकांचं संपादन, प्रकाशन, वितरण आणि एकंदरच पुस्तक व्यवहार याबद्दल केलेल्या गप्पा.  सहभाग: भूषण कोलते, श्रीपाद चौधरी, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य पुस्तकगप्पा लिंक्स:  पॉडकास्ट   ...

पेगी मोहन यांच्या "वाँडरर्स किंग्स मर्चंट्स" बद्दल चिन्मय धारूरकर यांच्याशी गप्पा 14.12.2024

पेगी मोहन यांचं 'वाँडरर्ज, किंग्ज, ॲंड मर्चंट्स - दी स्टोरी ऑफ इंडिया थ्रू इट्स लँग्वेजेस' हे अलीकडच्या काळातलं एक महत्त्वाचं पुस्तक. भाषाविज्ञान आणि सामाजिक-सांस्कृतिक इतिहास यांचा मिलाफ साधत भारतीय भाषांचा इतिहास उलगडत नेणारं हे पुस्तक जितकं संशोधकीय शिस्तीतलं आहे, तितकंच ते एखाद्या रहस्यकथेसारखं उत्कंठावर्धक आहे. खास भारतीय पद्धतीनं भाषांची वैशिष्ट्यं उलगडणारं आहे, आणि भारताच्या वैविध्यपूर्ण इत...

पुस्तकगप्पा : आपल्यापर्यंत पोचणारं रामायण-महाभारत 30.09.2024

आपल्यापर्यंत पोचणार्‍या रामायण-महाभारत या महाकाव्यांविषयी 'पुस्तकगप्पा'चा हा कार्यक्रम. संस्कृत भाषा, दक्षिण आशियायी धर्म आणि इतिहास या विषयांचा अभ्यासक हेमंत राजोपाध्ये  आणि महाभारत-रामायण या दोन्ही महाकाव्यांशी संबंधित पुस्तकांच्या वाचक म्हणून मेघना भुस्कुटे आणि नर्मदा खरे हे या गप्पांमध्ये सामील झाले. सहभाग : हेमंत राजोपाध्ये, नर्मदा खरे, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.

पुस्तकगप्पा : ऋषिकेश गुप्ते यांच्याशी गप्पा 09.12.2023

हृषीकेश गुप्ते हे सध्याचे आघाडीचे भयकथालेखक. खरंतर असं लेबल लावणं त्यांना अन्यायकारकच ठरेल. त्यांच्या गूढकथा, भयकथा, रहस्यकथा... बघता बघता नकळत मानसशास्त्रीय गुंत्यात वा अद्भुताच्या प्रांतात कधी खेचून नेतात कळत नाही. त्यांच्याशी त्यांच्या कथाकादंबर्‍यांबद्दल आणि त्यांच्या लिहिण्यावाचण्याच्या आवडीनिवडींबद्दल गप्पा. सहभाग : ऋषिकेश गुप्ते, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.

पुस्तकगप्पा : चिन्मय दामले यांच्याशी पाकपुस्तकांच्या इतिहासाविषयी गप्पा 31.08.2023

चिन्मय दामले यांच्याशी मराठी पाकपुस्तकांबद्दल गप्पा. मराठी पाकपुस्तकांचा आर्थिक, राजकीय, सामाजिक इतिहास अतिशय मजेशीर आणि उद्बोधक आहे. त्याबद्दल आणि तिथून आजवर झालेल्या पाकपुस्तकांच्या प्रवासाबद्दल चिन्मय दामले यांच्याशी मारलेल्या गप्पा. सहभाग : चिन्मय दामले, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.

पुस्तकगप्पा : गौरी देशपांडे यांच्या कथात्म साहित्याविषयी गप्पा माया पंडित यांच्याशी 18.06.2023

गौरी देशपांडे यांच्या मराठी साहित्यातल्या विशेष श्रेयाविषयी, लोकप्रियतेविषयी, मर्यादांविषयी, तत्कालीन सामाजिक पार्श्वभूमीविषयी गप्पा. सहभाग : माया पंडित, जितेंद्र वैद्य, मेघना भुस्कुटे, नंदन होडावडेकर, रंजना निकते.

पुस्तकगप्पा : आदूबाळ याच्याशी मराठी संगीत नाटकांविषयी गप्पा 11.06.2023

सत्र पंधरावे : मराठी संगीत नाटकांच्या आर्थिक इतिहासाबद्दल अभ्यास करताना आदूबाळ यांनी अनेक पुस्तकं वाचली. त्या पुस्तकांविषयीच्या या गप्पा. पुस्तकांची यादी

पुस्तकगप्पा : पुस्तक परिचय : पिवळा पिवळा पाचोळा - अनिल साबळे 20.05.2023

पपायरस प्रकाशनाचा 'पिवळा पिवळा पाचोळा' हा अनिल साबळे लिखित कथासंग्रह 2021 साली प्रकाशित झाला. त्या कथासंग्रहाची ही ओळख.

पुस्तकगप्पा: अमोल उदगीरकर 15.05.2023

पुण्यामुंबईबाहेरच्या लोकांची सांस्कृतिक उपासमार... जुन्यात अडकून पडलेली समीक्षा... ताजं तरतरीत लिहिणारे नवे लेखक... वितरणव्यवस्थांचं गायब असणं... मराठी कंटेटची तहान आणि ती भागवण्याची इच्छाच नसलेले लेखक-दिग्दर्शक-निर्माते... दक्षिण भारतीय चित्रपटांचं ऋण... समाजमाध्यमांनी आणि मराठी संस्थळांनी लिहिते केलेले लोक... फेसबुक आणि ब्लॉग्सनी वाहता केलेला लेखक-वाचक संवाद... एक ना दोन - #पुस्तकगप्पा 'न- न...

पुस्तकगप्पा : समीना दलवाई 30.01.2023

हरिती प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या भटकभवानी' या ललित-वैचारिक लेखसंग्रहाच्या लेखिका समीना दलवाई यांची मुलाखत.

पुस्तकगप्पा: मायकेल पोलनच्या अन्नविषयक पुस्तकांच्या निमित्ताने 24.09.2022

पुस्तकगप्पा: सत्र बारावे सहभाग : मेघना भुस्कुटे, सई केसकर, प्राची देशपांडे, शिल्पा पाठक, नंदन होडावडेकर उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com

पुस्तकगप्पा : सुशील शुक्ल यांच्याशी गप्पा 'इकतारा' प्रकाशनाबद्दल 03.07.2022

पुस्तकगप्पा : सत्र अकरावे : सुशील शुक्ल यांच्याशी गप्पा 'इकतारा' प्रकाशनाबद्दल सहभाग : सुशील शुक्ल, सई केसकर, ऋषिकेश दाभोळकर, मेघना भुस्कुटे, ऋजुला कुलकर्णी, आरोही देशपांडे, विक्रमादित्य रानडे, अमोल करंदीकर उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com

पुस्तकगप्पा : इतिहास आणि फिक्शन : प्राची देशपांडेंसह 28.05.2022

पुस्तकगप्पा : सत्र दहावे : इतिहास आणि फिक्शन : प्राची देशपांडेंसह सहभाग : प्राची देशपांडे, नंदा खरे, मेघना भुस्कुटे, सई केसकर, नंदन होडावडेकर, अमोल करंदीकर उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com

पुस्तकगप्पा : किरण गुरव यांच्याशी गप्पा 23.04.2022

पुस्तकगप्पा : सत्र नववे: किरण गुरव यांच्याशी गप्पा सहभाग : किरण गुरव, मेघना भुस्कुटे, सई केसकर, नंदन होडावडेकर, अमोल करंदीकर उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com

पुस्तकगप्पा : विश्वामित्र सिंड्रोम : गप्पा पंकज भोसले यांच्याशी 26.03.2022

पुस्तकगप्पा : सत्र आठवे : विश्वामित्र सिंड्रोम : गप्पा पंकज भोसले यांच्याशी सहभाग : पंकज भोसले, मेघना भुस्कुटे, सई केसकर, नंदन होडावडेकर, अमोल करंदीकर उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com

पुस्तकगप्पा : नंदा खरे यांच्याशी गप्पा : 'कहाणी मानवप्राण्याची' आणि इतर नॉन-फिक्शन 05.03.2022

पुस्तकगप्पा : सत्र सातवे : नंदा खरे यांच्याशी गप्पा : 'कहाणी मानवप्राण्याची' आणि इतर नॉन-फिक्शन सहभाग : नंदा खरे, मेघना भुस्कुटे, सई केसकर, नंदन होडावडेकर, (किरण लिमये) उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान : https://www.facebook.com/PustakGappa संपर्क : marathi.upakram@gmail.com

पुस्तकगप्पा : मेघना पेठे यांच्या साहित्याविषयी... 29.01.2022

पुस्तकगप्पा : सत्र सहावे : मेघना पेठे यांच्या साहित्याविषयी... सहभाग : मेघना भुस्कुटे, सई केसकर, शिल्पा पाठक, असिता आजगांवकर, सरिता सोमाणी, किरण लिमये, नंदन होडावडेकर, अमोल करंदीकर उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com

पुस्तकगप्पा : एम अ‍ॅंड द बिग हूम : कादंबरी आणि भाषांतर 26.12.2021

पुस्तकगप्पा : सत्र पाचवे: एम अ‍ॅंड द बिग हूम : कादंबरी आणि भाषांतर प्रमुख वक्ते : जेरी पिंटो, शांता गोखले । सहभाग : मेघना भुस्कुटे, सई केसकर, नंदन होडावडेकर, अमोल करंदीकर, (किरण लिमये) उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com/2021/09/blog-post_7.html फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com

पुस्तकगप्पा : रहस्यकथा, तपासकथा, साहसकथा, वगैरे... 28.11.2021

पुस्तकगप्पा : सत्र चौथे: रहस्यकथा, तपासकथा, साहसकथा, वगैरे... प्रमुख वक्ते : निखिलेश चित्रे, पंकज भोसले । सहभाग : मेघना भुस्कुटे, सई केसकर, अमोल करंदीकर, किरण लिमये, (नंदन होडावडेकर) उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com/2021/09/blog-post_7.html फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संपर्क: marathi.upakram@gmail.com

पुस्तकगप्पा : अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट 31.10.2021

पुस्तकगप्पा : सत्र तिसरे : अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट प्रमुख वक्ते : आनंद विंगकर । सहभाग : मेघना भुस्कुटे, किरण लिमये, सई केसकर, अमोल करंदीकर, (नंदन होडावडेकर) कार्यक्रमातल्या श्री. विंगकर ह्यांच्या मुलाखतीचा स्वतंत्र दुवा -  https://youtu.be/vaagAq3Yrr4 उपक्रमाचं माहितीपान : https://marathiupakram2021.blogspot.com/2021/09/blog-post_7.html फेसबुक पान: https://www.facebook.com/PustakGappa संप...

पुस्तकगप्पा': श्री. आनंद विंगकर ह्यांची मुलाखत 31.10.2021

मुलाखतकर्ते : किरण लिमये. 'पुस्तकगप्पा' कार्यक्रमाच्या तिसर्‍या सत्रात 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' ह्या कादंबरीवरल्या गप्पांचा भाग म्हणून ही मुलाखत प्रक्षेपित करण्यात आली. सहभागी : 'अवकाळी...'चे लेखक श्री. आनंद विंगकर आणि 'पुस्तकगप्पा'तर्फे किरण लिमये | दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१ मुलाखतीचं स्थळ : 'पपायरस' प्रकाशनाचे दुकान | सौजन्य : भूषण कोलते. ध्वनिचित...

Escucha el podcast पुस्तक गप्पा (पुस्तकगप्पा) en Replaio

Radio y podcasts en una sola app - gratis y sin registro. Instálala hoy y no te pierdas el estreno

Descárgala en Google Play

Replaio no es editor de podcasts; los nombres de los programas, las portadas y el audio pertenecen a sus autores y se distribuyen a través de canales RSS públicos