BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Husk at besøge podcastens hjemmeside og støtte skaberen: www.bbc.co.uk

Forfatter

BBC Marathi Audio

Kategori

Health

Podcastens hjemmeside

www.bbc.co.uk

Seneste episode

25. mar. 2026

Hvor kan du lytte?

Podcasts i appen Replaio Radio Kommer snart

Podcasts kommer snart til appen. Installer nu, og vær den første til at se en helt ny tilgang til podcasts

Hent den på Google Play Installer gratis Android næsten 10 mio. downloads · 4,8 i bedømmelse iOS snart

Episoder

सोपी गोष्ट पॉडकास्ट : आशा सेविकांना किटमध्ये रबरी लिंग देण्यावरून वाद का झाला? 22.03.2022

आशा सेविकांना कुटुंब नियोजन आणि लैंगिक आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी जी किट्स दिली जातात त्यात एक रबरी लिंग देण्यात येण्यावरून वाद झाला आहे. अशाप्रकारची मॉडेल्स वापरणं आशा सेविकांना अवघडल्यासारखं करू शकतं असा काहींचा दावा आहे तर मुळात यात नवीन काही नसून यापूर्वीही अशाप्रकारची मॉडेल्स वापरली जात होती असं प्रशासन आणि काही आशा सेविकांनी सांगितलं आहे. काय आहे हा वाद? संशोधन – बीबीसी मराठी ल...

गोड पदार्थ, साखर खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडतं का? सोपी गोष्ट पॉडकास्ट 18.03.2022

साखर सोडली की आरोग्य सुधारतं असा अनेकांचा समज आहे. अनेक लोक साखरेला आपला शत्रू मानतात. निरोगी राहण्यासाठी साखरेचा त्याग करायला हवा का? साखर खाल्ल्यामुळे आजार होतात का? तज्ज्ञ काय सांगतात? ऐका आजची सोपी गोष्ट. संशोधन, लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : अजित पवारांनी अर्थसंकल्पात शिवसेनेला कमी वाटा दिला का? 18.03.2022

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी शिवसेनेला सर्वांत कमी वाटा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र भरभरून बजेट मिळालं असा दावा देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत चर्चेदरम्यान केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये निधीवाटपावरून कुरबूर का आहे? याचे काय परिणाम होतील? संशोधन - दीपाली जगताप लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : – काश्मीरमध्ये ‘या’ 5 कट्टरतावादी संघटनांनी पसरवला होता हिंसाचार 16.03.2022

काश्मिरी पंडितांचा मुद्दा सध्या चर्चिला जातोय. त्यांना काश्मिरातून पलायन करायला भाग पाडण्यात कोणत्या संघटनांचा हात होता? काश्मिरी पंडितांविरुद्ध हिंसाचार कुणी घडवून आणला होता? काश्मिरमध्ये हिंसाचार करणाऱ्या या 5 कट्टरतावादी संघटनांबद्दल जाणून घ्या. संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट: उष्माघात म्हणजे काय? तो कसा टाळायचा? 16.03.2022

मुंबईत पारा चढलाय. मुंबईकरांना उन्हाचे चांगलेच चटके जाणवतायत. अशावेळी उष्माघात म्हणजे हीट स्ट्रोकचीही भीती असते. हे काय असतं? त्यापासून कसं वाचायचं? पाहा ही सोपी गोष्ट.

सोपी गोष्ट पॉडकास्ट: काश्मिरी पंडितांचं पलायन कसं झालं होतं? 14.03.2022

19 जानेवारी 1990 हा दिवस काश्मिरी पंडितांसाठी खूप वेदनादायी आहे. यात दिवशी काश्मिरातून पंडितांचं पलायन सुरू झालं. पाकिस्तानधार्जिण्या घोषणा आणि हिंदूंना धमकवणाऱ्या घोषणांचा जोर वाढत असताना जीव मुठीत धरून अनेक काश्मिरी हिंदू कुटुंबं काश्मीर खोरं सोडून गेली. हे सगळं का आणि कसं झालं? सोपी गोष्टच्या या भागातून जाणून घ्या. संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट – अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचा अर्थ 7 सोप्या मुद्द्यांत 11.03.2022

महाराष्ट्राचा 2022-23 साठीचा अर्थसंकल्प अजित पवारांनी मांडला. महाराष्ट्राला 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याचा निर्धार व्यक्त करत अजित पवारांनी अनेक घोषणा केल्या. काही जुन्या, काही नव्या. या अर्थसंकल्पाचा अर्थ आणि त्याचा तुमच्यावर होणारा परिणाम जाणून घ्या 7 सोप्या मुद्द्यांमध्ये. संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट – गिरीश महाजन यांचं जळगाव प्रकरण काय आहे? 10.03.2022

भाजप नेत्यांना संपवण्यासाठी राज्य सरकारने कट केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्या एका जुन्या प्रकरणात मकोका लावण्यासाठी राज्य सरकारने वकिलांना हाताशी धरून कट रचला असा फडणवीसांचा आरोप आहे. पण हे मूळ प्रकरण काय होतं? संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट - झुंड, पावनखिंड चित्रपटांवरून जातीय वाद का झाला? 10.03.2022

गंगूबाई काठियावाडी, झुंड आणि पानवखिंड हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरात सुरू आहेत. पण त्याचवेळी यांच्याभोवती काही नवीन प्रश्न उभे राहिले. कोणत्या चित्रपटाला पसंती द्यायची यावरून सुरू झालेली चर्चा जातीय अस्मितांवर कशी पोहोचली? बहुजन विरुद्ध अभिजन असं या सगळ्याला स्वरुप का आलं? जाणून घेऊ या सोपी गोष्टच्या या भागातून. संशोधन – जान्हवी मुळे लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट - अणूबॉम्ब वापरण्याचे अधिकार कुणाकडे असतात? 08.03.2022

युक्रेन रशिया युद्धात रशिया अण्वस्त्र वापरेल का ही भीती व्यक्त केली जात आहे. अण्वस्त्र आहेत म्हणून एखाद्या देश ती सहज वापरू शकतो का? जगात असे कोण लोक आहेत ज्यांच्याकडे ती वापरण्याचा अधिकार आहे? जाणून घ्या या सोपी गोष्ट मधून. संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

राज्य सरकारला राज्यपालांना पदावरून काढण्याचा अधिकार असतो का? 04.03.2022

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातलं सख्य जगजाहीर आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उद्घाटनाला, राज्यपालांना आपलं अभिभाषण अर्ध्यात सोडून जावं लागलं. राज्य सरकार राज्यपालांबद्दल राष्ट्रपतींकडे तक्रारही देणार आहे. या तक्रारीतून काय साध्य होईल? राज्य सरकारकडे राज्यपालांना पदावरून बाजूला करण्याचा अधिकार आहे का? संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट: जगात कुठल्या देशांकडे आहेत अण्वस्त्र? 01.03.2022

रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतीच देशाच्या अण्वस्त्र यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश त्यांना आहेत. पण, ही धमकी आहे की, पुतिन खरंच अण्वस्त्राचा वापर करायला मागे पुढे पाहणार नाहीत. या दोन्ही परिस्थिती या युद्धाचं स्वरुप काय असेल. देशात किती देश आहेत ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत? पाहूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिं...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : युक्रेन रशिया युद्धाचे तुमच्यावर हे 5 परिणाम होऊ शकतात 25.02.2022

युक्रेन आणि रशियात युद्ध भडकलंय. युरोपाबरोबरच सगळ्या जगाचं लक्ष त्याकडे लागलंय. पण इथे भारतात बसून तुमच्या माझ्यावर याचे परिणाम कसे होऊ शकतात? आपला याच्याशी थेट संबंध कसा येणार आहे? जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागामधून. संशोधन – सरोज सिंह लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले

व्लादिमीर पुतिन यांना युक्रेन का जिंकायचंय? सोपी गोष्ट पॉडकास्ट 24.02.2022

दोन शेजारी देशांमधल्या कुरबुरी तशा नव्या नाहीत. पण युक्रेन आणि रशियामधला संघर्ष युद्धाच्या शक्यतेपर्यंत पोहोचला आहे. त्यात पुतिन यांनी युक्रेनमधल्या दोनेस्क आणि लुहांस्क या दोन भागांचं स्वातंत्र्य मान्य केलं आहे. तसंच युक्रेन स्वतंत्र राष्ट्र म्हणून कधी अस्तित्वात नव्हताच अशा आशयाचं विधानही त्यांनी केलंय. पुतिन यांच्या मनात युक्रेनविषयी एवढी चीड का आहे? लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: रशिया ‘या’ तीन मार्गांनी रशियावर हल्ला करू शकतो… 22.02.2022

रशियाने युक्रेनमध्ये रणगाडे घुसवल्याचा आरोप करत आता ग्रेट ब्रिटनने रशियावर निर्बंध लादले आहेत. युरोपमध्ये आता खऱ्या अर्थाने युद्धाचे ढग जमू लागले आहेत. रशियाने मात्र आपली भूमिका हल्ला करण्याची नाही हीच ठेवली आहे. पण, त्याचबरोबर युक्रेन सीमेवर दोन लाखांच्या जवळपास सैनिक उभे करत त्यांनी आपली युद्धसज्जताही दाखवून दिली आहे. जर रशियाने खरंच हल्ला केला तर त्यांच्यासमोर कुठले तीन पर्याय आहेत हे युद्ध रणन...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: रशिया जगावर महायुद्ध लादत आहे का? 21.02.2022

‘रशिया, युरोप आणि जगावर दुसऱ्या महायुद्धानंतरचं मोठं युद्ध लादण्याच्या उंबरठ्यावर आहे,’ असं मोठं विधान ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केलं आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष झालाच तर तो अख्खं जग व्यापेल अशी भीती पाश्चात्य देशांमध्ये स्पष्ट दिसतेय. नेमकं या दोन देशांमध्ये काय सुरू आहे, युद्ध होईल का, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिं...

तुमच्याबद्दल अप्रिय माहिती इंटरनेटवरून डिलिट करता येईल का? । सोपी गोष्ट पॉडकास्ट 18.02.2022

‘राईट टू बी फरगॉटन’ म्हणजे विसरण्याच्या अधिकारावर सध्या मीडियामध्ये भरपूर चर्चा होतेय. गोपनीयतेच्या अधिकाराशी मिळताजुळता असा हा प्रकार आहे. तुमच्या बद्दल इंटेरनेटवर उपलब्ध असलेली विशिष्ट जुनी सार्वजनिक माहिती डिलिट करण्याचा हा अधिकार आहे. आणि असा कायदा युरोपीयन देशांमध्ये अस्तित्वातही आहे. अशा कायद्याची आवश्यकता काय आणि भारतात केंद्रसरकारची यावर काय भूमिका आहे आज बघूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - गी...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारत खरंच लाहोर काबीज करू शकला असता का? 18.02.2022

भारतीय सैन्याकडे एकदा सोडून तीनदा लाहोर जिंकण्याची संधी होती…पण, काँग्रेसनं ती गमावली असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये निवडणूक प्रचारसभे दरम्यान केलं आहे. आता निवडणुकीचा प्रचार आहे म्हटल्यावर हे विधान राजकीयदृष्ट्या प्रेरित असणार हे आपण धरून चालूया. पण, इतिहासाच्या कसोटीवर हे विधान कितपत तग धरू शकतं. ज्या तीन युद्धांचा दाखला मोदींनी दिलाय तेव्हा खरंच भारतीय सैन्य लाहोर काबीज करण्य...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: स्लीप ॲप्निया आजार जीवघेणा आहे का? 18.02.2022

ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचा मृत्यू स्लीप ॲप्नियामुळे झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आहे. त्यानंतर या आजाराविषयी सगळीकडे कुतुहल निर्माण झालं आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर स्लीप ॲप्निया म्हणजे झोपेत श्वास घ्यायला अडथळा होणं. घोरणं हा ही त्याचाच एक सौम्य परिणाम आहे. पण म्हणजे या आजारामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? स्लीप ॲप्नियाबद्दल जाणून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीसी लेखन,...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: एबीजी शिपयार्ड कंपनीने बँकांना कसं फसवलं? 18.02.2022

विजय माल्या, नीरव मोदी यांच्या कर्ज घोटाळ्यालाही मागे टाकेल असा 22,492 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा मागच्या आठवड्यात समोर आला आहे. आणि तो घडवून आणणारे एबीजी शिपयार्ड कंपनीने मालक आणि संचालक देश सोडून फरारही झाले आहेत. हा देशातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा बँक घोटाळा मानला जातोय. एबीजी कंपनीने एकूण 28 बँकांची फसवणूक कशी केली, समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतु...

शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं राजकारण का होतंय? | सोपी गोष्ट पॉडकास्ट 15.02.2022

अमरावतीमध्ये शिवाजी महाराजांच्या अनधिकृत पुतळ्याचं प्रकरण अजून मिटलेलं नाही. त्यात गेल्या आठवड्यात तिथल्या महापालिका आयुक्तांवरही शाईफेक करण्यात आली. नेमका वाद काय आहे आणि पुतळे उभारण्याविषयीची नियमावली काय सांगते? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन – जान्हवी मुळे, नितेश राऊत लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट: गौतम अदानींनी अंबानींना कसं मागे टाकलं? 11.02.2022

भारतातील आणि आशियातीलही सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण हे ठरवण्यासाठी सध्या गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यामध्ये जोरदार चुरस दिसून येत आहे. 29 जानेवारी आणि 8 फेब्रुवारी या दोन दिवशी गौतम अदानी यांनी चक्क मुकेश अंबानी यांना मागेही टाकलं. पण, मुकेश यांनी दुसऱ्याच दिवशी आपली जागा परत मिळवली. मुकेश अंबानी मागची दहा वर्षं आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण, गौतम अदानींनी मागच्या दहा वर्षांत मोठी...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : हिजाब घालणं हा घटनेने दिलेला अधिकार आहे का? 09.02.2022

कर्नाटकच्या दोन शहरांमधून सुरू झालेला वाद आता देशभरात पोहोचलाय. मुलींनी कॉलेजमध्ये हिजाब घालून यायचा की नाही यावरून वादंग पेटलाय. हिजाब घालणं हा धार्मिक स्वातंत्र्याचा भाग आहे. पण ते शैक्षणिक संस्थेच्या परिसरात घालण्याचाही अधिकार आहे का? त्यावर निर्बंध घालता येऊ शकतात का? संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट : लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यात स्पर्धा होती का? 07.02.2022

लता मंगेशकर आणि आशा भोसले, सख्ख्या बहिणी आणि श्रेष्ठ गायिका. एकाच काळात हिंदी, मराठी तसंच विविध भाषांमध्ये संगीत क्षेत्रात दोघी कार्यरत होत्या. पण या दोघींमध्ये स्पर्धा होती का? कधी एकमेकींमुळे संधी हुकली असं घडलं का? संगीत सौजन्य - सारेगामा, सोनी संशोधन – अमृता कदम लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मराठीला अभिजात दर्जा मिळण्याचं घोडं कुठे अडलंय? 04.02.2022

भारत सरकार मराठी भाषेला अभिजात दर्जा कधी देणार हा प्रश्न गेली काही वर्षं विचारला जातोय. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या समितीने त्यासंर्भातला अहवाल 2013 साली सादर केला. केंद्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने त्यासंदर्भातली शिफारस करणारा अहवाल मोदी सरकारला काही वर्षांपूर्वीच सादर केला. तेव्हापासून हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सरकार सांगत आलंय. मग गोष्टी कुठे अडल्या आहेत? संशोधन, लेखन, निवेदन – सिद्...

Lyt til podcasten सोपी गोष्ट i Replaio

Radio og podcasts i én app - gratis og uden tilmelding. Installer i dag, og gå ikke glip af lanceringen

Hent den på Google Play

Replaio er ikke podcastudgiver; programmernes navne, coverbilleder og lyd tilhører deres ophavsmænd og distribueres via offentlige RSS-feeds.