BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Husk at besøge podcastens hjemmeside og støtte skaberen: www.bbc.co.uk

Forfatter

BBC Marathi Audio

Kategori

Health

Podcastens hjemmeside

www.bbc.co.uk

Seneste episode

25. mar. 2026

Hvor kan du lytte?

Podcasts i appen Replaio Radio Kommer snart

Podcasts kommer snart til appen. Installer nu, og vær den første til at se en helt ny tilgang til podcasts

Hent den på Google Play Installer gratis Android næsten 10 mio. downloads · 4,8 i bedømmelse iOS snart

Episoder

ट्विटर, मेटा आणि ॲमेझॉनवर नोकर कपातीची वेळ का आली आहे? BBC News Marathi 15.11.2022

बदलतं बिझनेस मॉडेल आणि अनिश्चित अर्थव्यवस्थेने संपूर्ण तंत्रज्ञान उद्योगात मोठी घसरण झाली आहे. इलॉन मस्कने कंपनी विकत घेतल्यानंतर काही दिवसांतच ट्विटरमधल्या 50% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. नोहेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात मेटा या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या मालक कंपनीने 11,000 कर्मचार्‍यांना काढून टाकत असल्याची घोषणा केली. म्हणजे एकूण कर्मचाऱ्यांपैकी 13 टक्के. जर अ‍ॅमेझॉनने10,000 कर्मचाऱ्यांना...

डायबेटीस बरा होऊ शकतो का? तो रोखण्यासाठी काय करायचं? BBC News Marathi 15.11.2022

काही वेलनेस सेंटर आणि ऑनलाईन शॉपिंग पोर्टल्स कडून अशी जाहिरात केली जाते की त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांमधून मधुमेह पूर्णपणे बरा होतो. पण मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो का? जागतिक मधुमेह दिनानिमित्त याबाबत सविस्तर पाहणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये... लेखन - पद्मा मीनाक्षी, प्राजक्ता पोळ निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

G20 परिषदेच्या चिन्हातलं कमळ भारताचं की भाजपचं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 12.11.2022

G20 राष्ट्रगटाचं अध्यक्षपद आता भारताकडे आलंय. त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी G20 अध्यक्षपदाच्या नव्या लोगोचं 8 नोव्हेंबरला अनावरण केलं आणि एका वादाला तोंड फुटलं. या लोगोतल्या कमळावर विरोधी पक्षांनी टीका केलीय. नेमके काय आक्षेप आहेत? सरकारची या लोगोमागची भूमिका काय आहे? आणि मुळात G20चं अध्यक्षपद म्हणजे नेमकं काय असतं? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमधून. लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग...

शिवचरित्रावरील चित्रपट हे कलाकारांचं स्वातंत्र्य की इतिहासाचा विपर्यास? BBC News Marathi 10.11.2022

मराठीत सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत सिनेमांची लाटच आली आहे. पण या सिनेमांतून खरंच इतिहास मांडला जातो आहे का? की या सिनेमांच्या माध्यमातून आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचा किंवा राजकीय अजेंडा पुढे ढकलण्याचा प्रयत्न होतो? लेखन – अमृता कदम निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

डोनाल्ड ट्रंप या निवडणुकीनंतर पुन्हा कमबॅक करतील का? | BBC News Marathi 08.11.2022

आठ नोव्हेंबरला अमेरिकेत तिथल्या संसदेसाठी निवडणुका होतायत. या मिडटर्म इलेक्शन म्हणजे मध्यावधी निवडणुकांकडे जगाचंही लक्ष लागलं आहे. मिडटर्म इलेक्शन इतकं महत्त्वाचं का आहे? या निवडणुकीच्या निकालाचा अमेरिकेच्या राजकारणावर आणि पर्यायानं जगावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊयात. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : बलात्कार पीडितेची केली जाणारी '2 फिंगर टेस्ट' काय असते? 04.11.2022

बलात्कार पीडितेवर करण्यात येणाऱ्या '2 फिंगर टेस्ट'वर सुप्रीम कोर्टाने बंदी आणली आहे. महिलेवर बलात्कार झालाय का नाही? हे तपासण्यासाठी ही चाचणी करण्यात येते.

सोपी गोष्ट पॉडकास्ट : कुंकू-टिकलीचा महिलांच्या कर्तृत्वाशी संबंध आहे का? 03.11.2022

महिला पत्रकारानं टिकली लावली नाही म्हणून तिच्याशी बोलायला शिवप्रतिष्ठान संघटनेच्या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी नकार दिला. 2 नोव्हेंबर 2022 रोजी मंत्रालयात हा प्रकार घडला, त्यानंतर राज्याच्या महिला आयोगानं भिडे यांना नोटीस पाठवली आहे. सोशल मीडियावरही तीच्या निधनानंतर महिलांचं कर्तृत्त्व संपतं का? याविषयी चर्चा सुरू आहे. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : डिजिटल रुपी म्हणजे काय? 02.11.2022

रिझर्व्ह बँकेने डिजिटल रूपी हे नवं चलन लागू केलं आहे. आता आपल्या खिशातला रुपया डिजिटल कसा झालाय? तो ऑनलाईन ट्रान्झॅक्शनपेक्षा वेगळा कसा असेल? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : ब्राझिलमधल्या सत्तापालटाचा भारताला फायदा होईल? 01.11.2022

ब्राझीलमध्ये उजव्या विचारसरणीचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना हरवून डाव्या विचारसरणीचे माजी राष्ट्राध्यक्ष लुला ड सिल्वा पुन्हा सत्तेत आले आहेत. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीच्या निकालाकडे पर्यावरणाचा विजय म्हणूनही पाहिलं जातंय. लुला पुन्हा सत्तेत येण्याचा भारत-ब्राझील संबंधांवर काय परिणाम होईल? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : गर्दीत अपघात टाळण्यासाठी काळजी घ्यायला हवी? 31.10.2022

मांढरदेवी यात्रा आणि मुंबईच्या एलफिन्स्टन ब्रिजवरील दुर्घटनाही तुम्हाला आठवत असतील. अशा दुर्घटनांसाठी कोण जबाबदार किंवा त्या कशा टाळता येतील यावरही अनेकदा चर्चा होते. पण गर्दीत अडकल्यावर काय काळजी घ्यायला हवी?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : इलॉन मस्कनी ट्विटरच्या सीईओला का काढलं? 28.10.2022

जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसानं जगातल्या सर्वात प्रभावशाली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपैकी एकाची खरेदी केली आहे. इलॉन मस्क आता ट्विटरचे मालक बनले आहेत, त्यांनी कंपनीचा ताबा घेताच सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी झाल्याचं वृत्त आहे. मस्क यांनी असं का केलं?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारतीयांचं आरोग्य हवामान बदलामुळे धोक्यात? 27.10.2022

भारतात उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 55 टक्के वाढ झाल्याचं लॅन्सेट या मेडिकल जर्नलच्या ताज्या अहवालात म्हटलं आहे.नेमकं हा अहवाल काय सांगतो आणि हवामान बदलाचा माणसाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आहे? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

दिवाळीच्या फराळाचे हे पदार्थ कुठून आले? BBC News Marathi | सोपी गोष्ट पॉडकास्ट 27.10.2022

लाडू, चकली, शेव, करंजी, शंकरपाळे, अनारसे... ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना? अशा फराळाशिवाय दिवाळीचा सण अपुरा वाटतो. दिवाळीत प्रत्येक भारतीय घरात फराळ केला जातो, प्रांतागणिक त्यात वैविद्ध आढळतं, पण पण तुम्हाला माहीतेय यातले काही पदार्थ परदेशातून आपल्याकडे आलेत आणि आता अगदी आपलेच झालेत! आजच्या सोपी गोष्टमध्ये जाणून घेणार आहोत, हीच दिवाळीच्या फराळाची गोष्ट. संशोधन - रश्मी वारंग निवेदन – जान्हवी मुळ...

दिवाळीचे फटाके कुठून आले? BBC News Marathi | सोपी गोष्ट पॉडकास्ट 27.10.2022

दिवाळी किंवा दीपावली – म्हणजे दिव्यांची रास. मग दिव्यांसोबतच फटाके या उत्सवाचा भाग कधी झाले? भारतात फटाके आले तरी कुठून? ते मुघलांनी आणले होते का? पाहा ही सोपी गोष्ट. संशोधन - राजीव लोचन, इतिहासकार, पंजाब विद्यापीठ निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

दिवाळीत सूर्यग्रहण, 'या' समजुती किती खऱ्या, किती खोट्या? 24.10.2022

ग्रहणकाळात काय करायचं, काय नाही करायचं याचे सल्ले देणारे अनेक व्हीडिओ यूट्यूबवरही दिसून येतात. पण ग्रहण म्हणजे नक्की काय, त्याच्या समजुती खरंच योग्य आहेत का, ऐका सोपीगोष्टमध्ये.

सोपी गोष्ट पॉडकास्ट : बीटीएस हा के-पॉप बँड लोकप्रिय का आहे? 19.10.2022

बीटीएस हा जगप्रसिद्ध दक्षिण कोरियन बँड लवकरच सक्तीच्या सैन्यसेवेसाठी दाखल होणार आहे. हा बँड इतका लोकप्रिय का आहे आणि त्यांना सैन्यात सेवा का करावी लागते आहे, जाणून घेऊयात. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

शी जिनपिंग चीनमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास भारतावर काय परिणाम होईल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 18.10.2022

चीनमध्ये शी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याच्या तयारीत आहेत. चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब होईल. पण जिनपिंग पुन्हा सत्तेत आले, तर त्याचा भारतावर कसा परिणाम होईल? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/international-63285315

भारत खरंच भुकेला आहे का? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi 17.10.2022

सलग दुसऱ्या वर्षी भारताची जागतिक भूक निर्देशांकात घसरण झाली आहे. एकीकडे सरकार हा निर्देशांक म्हणजे देशाची प्रतीमा मलिन करण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप करत आहे, तर दुसरीकडे कुपोषण ही देशातली मोठी समस्या असल्याचं तज्ज्ञ सांगतायत. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिक्षकांनी मुलांना मारहाण केली तर.. 13.10.2022

नोएडामध्ये घडलेल्या प्रकरणाचा पोलीस तपास करतायत. पण त्यामुळे शिक्षकांच्या शिक्षेच्या पद्धती चर्चेत आल्या आहेत. संशोधन – सुशीला सिंह निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा काय आहेत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 11.10.2022

दिल्लीमध्ये एका धर्मांतराच्या कार्यक्रमानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञा पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यातल्या आपण हिंदू देवीदेवतांची पूजा करणार नाही, अशा आशयाच्या प्रतिज्ञेवरून भाजप आणि आम आम आदमी पक्षामध्ये राजकारण सुरू झालं. आपच्या मंत्र्याला राजीनामाही द्यायला लागला. नेमकं काय झालंय? आणि मुळात आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा काय सांगतात? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारे...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिवसेनेचा निवडणूक चिन्हांचा इतिहास 10.10.2022

शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर अंधेरीतल्या पोटनिवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह दिसणार नाही. शिवसेनेनं दुसऱ्या एखाद्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. दरम्यान पक्षातल्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाने आता निवडणूक आयोगाकडे मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हांची मागणी केली आहे तर शिंदे गटानं त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा या चिन्हांची मागणी केली आहे. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे ए...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : महात्म गांधींना नोबेल पुरस्कार का मिळाला नाही? 06.10.2022

विज्ञानाच्या जगात नोबेल मिळणं म्हणजे तुमच्या कामगिरीवर, यशावर शिक्कामोर्तब झाल्यासारखं मानलं जातं. पण हे पुरस्कार सुरू करणारे आल्फ्रेड नोबेल कोण होते? त्यांनी हे पुरस्कार का सुरू केले ? गणितासारख्या विषयात नोबेल पुरस्कार का दिला जात नाही? महात्मा गांधींना नोबेल कधीच का मिळालं नाही जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

दसरा मेळावा का सुरू झाला? दसऱ्याला राजकीय महत्त्व का आलं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 05.10.2022

भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दसरा साजरा केला जातो, विशेषतः महाराष्ट्रात. इथे नागपूरपासून ते भगवानगड ते मुंबईपर्यंत, वेगवेगळ्या संस्था, संघटना, पक्ष आपापल्या परंपरेनुसार दसरा साजरा करतात. खूप आधीपासून दसऱ्याकडे राजकीय शक्तिप्रदर्शनाचा दिवस म्हणूनही पाहिलं जातं. हा दिवस इतका का महत्त्वाचा आहे? आणि याला राजकीय रंग कसा आला? पाहू या दसऱ्याची ही सोपी गोष्ट. वार्तांकन - टीम बीबीसी मराठी ले...

टोकनायझेशन ऑनलाईन बँकिंगमुळे सुरक्षित होणार आहे का? BBC News Marathi 04.10.2022

तुम्हाला गेल्या काही दिवसांत बँकेचा मेल, मेसेज आलं असेल. तुमच्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी टोकन तयार केलंय असं काहीतरी. सध्या ऑनलाईन शॉपिंगसाठी जोरदार सेल सुरू आहेत. तुम्ही UPI वापरून सहज सटासट ही खरेदी करताना ती अधिक सुरक्षित व्हावी म्हणून ही नवी प्रणाली आलीय – टोकनायझेशन. टोकनायझेशनसाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या २ वर्षांत अनेकदा मुदतवाढ दिली. पण आता मात्र हे करणं आवश्यक असणार आहे..

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मॅरिटल रेप आणि गर्भपाताबद्दल सुप्रीम कोर्ट काय महत्त्वाचं बोललंय? 30.09.2022

महिलेचं लग्न झालेलं असो वा नसो, गर्भधारणा तिच्या इच्छेने झाली असो वा नसो, 24 आठवड्यांच्या आत गर्भपात करण्याचा तिला अधिकार आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. भारतातल्या गर्भपाताच्या कायद्याचा इतिहास पाहता, हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. पण यामुळे नेमकं काय बदलणार? यात मॅरिटल रेपबद्दलही सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय? पाहूया आजची सोपी गोष्ट संशोधन – टीम बीबीसी निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिं...

Lyt til podcasten सोपी गोष्ट i Replaio

Radio og podcasts i én app - gratis og uden tilmelding. Installer i dag, og gå ikke glip af lanceringen

Hent den på Google Play

Replaio er ikke podcastudgiver; programmernes navne, coverbilleder og lyd tilhører deres ophavsmænd og distribueres via offentlige RSS-feeds.