uk

BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

Health MR ↓ Епізодів: 963

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Обов'язково відвідайте сайт подкасту та підтримайте його автора: www.bbc.co.uk

Автор

BBC Marathi Audio

Категорія

Health

Сайт подкасту

www.bbc.co.uk

Останній епізод

25 бер 2026

Де слухати?

Подкасти в застосунку Replaio Radio Уже незабаром

Подкасти незабаром з'являться в застосунку. Встановіть уже зараз і першими побачте зовсім новий погляд на подкасти

Завантажити з Google Play Встановіть безкоштовно Android майже 10 млн завантажень · рейтинг 4,8 iOS незабаром

Епізоди

ग्रीन फटाके म्हणजे काय, ते किती परिणामकारक? | BBC News Marathi 13.11.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

पाऊस आला की हवेतलं प्रदूषण कमी का होतं? BBC News Marathi 10.11.2023

मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातल्या इतर शहरात प्रदुषणाची पातळी वाढत चालली आहे. त्यासाठी नुकतीच राज्यात एक खास मीटिंगही झाली. यात अनेक उपायांवर चर्चा झाली त्यात एक उपाय होता क्लाऊड सीडिंगचा, म्हणजे कृत्रिम पावसाचा. पण कृत्रिम पावसाने खरंच प्रदुषणाची पातळी कमी होते का? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन - अनघा पाठक निवेदन - एडिटिंग - सिद्धनाथ गानू

ओबीसी कोट्याविना मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे का? BBC News Marathi 09.11.2023

एवढ्या मोठ्या समाजाचं आरक्षण संपवण्याचा घाट गेल्या काही दिवसांपासून घातला जातोय. त्यासाठी मंत्रालयापासून खालपर्यंतचे लोकं जबाबदार आहेत.” छगन भुजबळांच्या या विधानानंतर राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरू झाल्याचं दिसतंय. मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये असा ओबीसी संघटनांचा आग्रह आहे. सरकारही तेच म्हणत आलंय पण कुणबी प्रमाणपत्रं देऊन मराठा समाजाला ओबीसी दर्जा देणं म्हणजे...

वारंवार बंदी घालूनही फटाके फोडण्याचं प्रमाण कमी का होत नाही? | BBC News Marathi 09.11.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

गाझामध्ये एका महिन्यात जितके मृत्यू झाले तितके युक्रेनमध्ये 21 महिन्यांतही झाले नाहीत BBC News Marathi 07.11.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

मास्क वापरून प्रदूषणापासून बचाव होतो का? | BBC News Marathi 06.11.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

अफगाण निर्वासितांना पाकिस्तानबाहेर काढण्याचा निर्णय पाक सरकारने का घेतला? BBC News Marathi 03.11.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

तुमचे आधार क्रमांक आणि वैयक्तिक माहिती विकली जात आहे का? BBC News Marathi 01.11.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

मोर्चे, आयोग, उपोषण - मराठा आरक्षण आंदोलनाच्या इतिहासाची सोपी गोष्ट |BBC News Marathi 01.11.2023

22 मार्च 1982ला अण्णासाहेब पाटील यांनी मंडल कमिशनला विरोध करत मुंबईत मराठा आरक्षणासह इतर 11 मागण्यांसाठीचा पहिला मोर्चा काढला. आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणीही त्यावेळी करण्यात आलेली होती. मात्र त्यांची एकही मागणी मान्य न झाल्याने अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली आणि आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज एकत्र यायला सुरुवात झाली. लेखन - नामदेव काटकर निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटि...

अपार क्रमांक म्हणजे काय? केंद्र सरकारची ‘एक देश, एक विद्यार्थी’ योजना काय? BBC News Marathi 31.10.2023

भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असणारी ‘एक देश, एक विद्यार्थी’ योजना नेमकी काय आहे. अपार क्रमांक काय आहे? आधार क्रमांक आणि अपार क्रमांक यामध्ये काही फरक आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधार क्रमांक असताना या नवीन अपार क्रमांकाची गरज आहे का? लेखन - आशय येडगे निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

इस्रायल - गाझा युद्धात हिजबुल्लाह उडी घेईल का? BBC News Marathi 20.10.2023

इस्रायल हमासबरोबर युद्धात गुंतलेलं असताना तिकडे लेबनॉन मधून हिझबुल्लाह इस्रायलवर हल्ला करू शकते का? हिझबुल्लाह राजकीय पक्ष आहे की कट्टरतावादी संघटना? पाहा सोपी गोष्ट.

इस्रायलवर हमासने हल्ला केला, पण त्यामागे इराणचा हात होता? BBC News Marathi 19.10.2023

7 ऑक्टोबरला हमासने गाझामधून इस्रायलवर हल्ले केले. गेली अनेक वर्षं काहीशी बॅकफुटवर वाटत असलेली हमास संघटना इतका मोठा हल्ला केवळ स्वतःच्या जोरावर करू शकते का, हा प्रश्न लगेचच उभा राहिला आणि संशयाची सुई वळली इराणकडे. खरंच हमासचा हल्ला इराणच्या पाठिंब्याने झाला होता का? पाहू या या सोपी गोष्टमध्ये

इस्रायलने जेव्हा 6 दिवसांच्या युद्धात गाझा काबीज केलं BBC News Marathi 17.10.2023

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष नवीन नाही. 1948 साली स्थापना झालेल्या इस्रायलने आजवर अनेकदा आपल्या शेजाऱ्यांशी लढाई केली आहे. 1967 साली झालेल्या लढाईत इस्रायलने निर्णायक विजय मिळवला होता. फक्त 6 दिवसांत इस्रायलने सीरिया, जॉर्डन आणि इजिप्तचा भूप्रदेश काबीज करत विजय मिळवला होता. काय होतं हे युद्ध? पाहा. निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

इस्रायल - पॅलेस्टाईन संघर्ष होतोय ती गाझा पट्टी आहे तरी काय? BBC News Marathi 12.10.2023

मासच्या ताब्यात असलेल्या गाझा पट्टीतून आधी इस्रायलवर हल्ला झाला आणि त्यानंतर इस्रायलने गाझावर बॉम्बहल्ले सुरू केले. आकाराने मुंबईपेक्षा लहान असणारा हा भाग या युद्धात एवढा महत्वाचा का आहे? तिथे राहणाऱ्या सामान्य लोकांची परिस्थिती नेमकी काय आहे? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

इस्रायल की पॅलेस्टाईन? भारत नेमका कुणाच्या बाजूने? BBC News Marathi 12.10.2023

भारताच्या फाळणीच्या काळातच इस्रायलचा जन्म होत होता. त्या दरम्यान गांधीजींनी इस्रायलच्या स्थापनेलाच विरोध केला होता, त्यामुळे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणावर बराच काळ गांधींचा प्रभाव राहिला. मात्र मागील तीन दशकांमध्ये भारत इस्रायलचा मित्र बनला आहे. नेमके भारत इस्रायल संबंध आणि पॅलेस्टाईनबद्दलची भारताची भूमिका कशी बदलत गेली? पाहा ही सोपी गोष्ट निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अर...

राज ठाकरेंचं टोल आंदोलन, पण टोल कुठे, कसा आकारला जाऊ शकतो? BBC News Marathi 11.10.2023

आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा टोलमुक्तीचा प्रश्न चर्चिला जातोय. पण मुळात टोल का घेतात? टोलचे नियम काय आहेत? रोड आणि टोल टॅक्स वेगळाय का? याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

इस्रायल हमास संघर्षाचा आपल्यावर काय परिणाम? 5 प्रश्न, 5 उत्तरं | BBC News Marathi 10.10.2023

हमास या सशस्त्र कट्टरतावादी संघटनेने इस्रायलवर 7 ऑक्टोबरला मोठमोठे मिसाईल हल्ले केले. प्रत्युत्तरात इस्रायलने गाझा पट्टीसह पॅलेस्टिनी गडांवर हल्ले केले आहेत. आतापर्यंत शेकडो मृत्यू झालेत, हजारो विस्थापित झालेत, आणि कित्येक जण अजूनही या संघर्षात अडकलेत. पण जगात आणखी एक युद्ध का पेटलंय? आणि त्याचे आता आपल्यावर काय परिणाम होतील? पाहा तुमच्या मनातल्या 5 प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्ता...

महादेव बेटिंग ॲप काय आहे? बॉलिवूडशी या सगळ्याचं काय नातं आहे? BBC News Marathi 06.10.2023

सोशल मीडियावरून लोकप्रिय झालेलं हे ॲप देशभर पसरलं. बघता बघता काही महिन्यांतच 12 लाखांहून अधिक सट्टेबाज 'महादेव बुक'मध्ये सामील झाले. हजारो प्रकारच्या बँक खात्यांमधून पैशांचे व्यवहार सुरू झाले, क्रिकेटपासून ते निवडणुकांपर्यंत सगळ्याच गोष्टीवर सट्टा लावला जाऊ लागला. ईडीने तपास हाती घेतल्यानंतर काही सिने आणि टीव्ही अभिनेत्यांनाही समन्स पाठवलं आहे. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरव...

जागतिक बँक म्हणते ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा वेग कमी झाला BBC News Marathi 05.10.2023

: स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणेनंतर भारतातील शौचालयांमध्ये वाढ झाली पण बांधलेल्या शौचालयांचा वापर किती होतोय याबाबत जागतिक बँकेचा एक अहवाल प्रकाशित झाला आहे. भारतात शौचालये वापरणाऱ्यांचं प्रमाण किती आहे? अनुसूचित जाती जमातींमध्ये शौचालय वापरण्याचं प्रमाण कमी होत आहे का? देशातील श्रीमंत आणि गरीब राज्यांची परिस्थिती काय आहे? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन : आशय येडगे निवेदन - सिध्दनाथ गानू एड...

बिहारप्रमाणे जातीनिहाय जनगणना महाराष्ट्रात करता येऊ शकेल का? BBC News Marathi 03.10.2023

बिहार सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केल्यानंतर अनेक राज्यांमध्ये ही मागणी जोर धरू लागली आहे. ही आकडेवारी काय आहे? बिहारने ही जनगणना नेमकी कशी केली? महाराष्ट्रातील राजकारणावर या घोषणेचा काय परिणाम होणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामुळे समाजातील वंचित घटकांना फायदा होऊ शकतो का? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन : आशय येडगे निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

मालदीवच्या निकालामुळे भारताचं नुकसान आणि चीनला फायदा होईल? BBC News Marathi 02.10.2023

मालदीवच्या निवडणुकांमध्ये 'इंडिया आऊट'ची घोषणा देणारे मोहम्मद मुइज्जू निवडून आले. गुंतवणूक आणि सामरिकदृष्ट्या भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मालदीववर खूप लक्ष केंद्रित केलं आहे. हे निवडणूक निकाल काय बदल घडवून आणू शकतील का? मोहम्मद मुइज्जू कोण आहेत? आता मालदीव कुणाच्या बाजूने असेल? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन : आशय येडगे निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

झिलँडिया पृथ्वीवरचा आठवा खंड बनू शकेल का? BBC News Marathi 28.09.2023

पृथ्वीवर शास्त्रज्ञांना एक नवीन खंड सापडल्याचा दावा 2017 मध्ये करण्यात आला. झिलँडिया नावाचा हा खंड नेमका कुठे आहे? तो किती मोठा आहे? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्ट मध्ये. निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

डेंग्यूवर अजूनही लस का बनू शकली नाही? | BBC News Marathi 27.09.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

अण्णा द्रमुकने NDA सोडल्याने भाजपला दक्षिणेची दारं बंद? BBC News Marathi 26.09.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

भारताच्या गुप्तहेर संस्थेमध्ये एजंट होण्यासाठी काय करावं लागतं? 25.09.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

Слухайте подкаст सोपी गोष्ट у Replaio

Радіо та подкасти в одному застосунку - безкоштовно й без реєстрації. Встановіть уже сьогодні та не пропустіть запуск

Завантажити з Google Play

Replaio не є видавцем подкастів; назви шоу, обкладинки та аудіо належать їхнім авторам і поширюються через публічні RSS-канали