Alpana Deo

Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast

"Manatalं Ani Mana Sarkha", this podcast is our little corner to pause and reflect — to talk about who we are, the relationships we hold close, the dreams we chase, the messiness of life, and yes… those small, beautiful moments that make it all worthwhile. Sometimes, I’ll speak from the heart. Sometimes, a guest will join us to share their journey. And sometimes, a single question will spark a conversation — a journey we’ll take together, in search of meaning, connection, and maybe even a few answers.

Vizitează neapărat site-ul podcastului și susține-i creatorul: podcasters.spotify.com

Autor

Alpana Deo

Categorie

Education

Site-ul podcastului

podcasters.spotify.com

Cel mai nou episod

1 oct. 2026

Unde asculți?

Podcasturi în aplicație Replaio Radio În curând

Podcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor

Descarcă din Google Play Instalează gratuit Android aproape 10 mil. descărcări · nota 4,8 iOS în curând

Episoade

स्वतःच्या पायावर emotionally उभं राहणं म्हणजे काय? 01.10.2026

आज आपण एका अत्यंत सुंदर आणि महत्वाचा विषयावर बोलणार आहोत- emotional strength. emotional strength ची सुरुवात होते ... “आत्ता मला काय वाटतंय?” इथून. कारण आपण अनेकदा भावना समजून घेण्याआधीच त्यावर action घेतो. राग आला - बोलून टाकलं. दुःख झालं - स्वतःला busy केलं. कोणी hurt केलं - लगेच स्वतःला समजावलं, “काही नाही, मला काही फरक पडत नाही.” पण... फरक पडला असेल तर पडू द्या ना. Emotionally strong असण्याचा अ...

Praise की Overpraise? - मुलांचं खरं Self-Esteem कसं बनतं? 18.09.2026

कधी विचार केला का … Praise आणि Overpraise यात फरक आहे का? माझ्या अलीकडच्या एका coaching session मध्ये आम्ही याच विषयावर बोलत होतो - मुलांनी काही चांगलं केलं, तर त्याचं appreciation करणंजितकं महत्त्वाचं आहे, तितकंच. ते चुकीचं करताना correctionकरणंही महत्त्वाचं आहे. पण appreciation म्हणजेफक्त "Good job!" असं म्हणणं नाही. त्याऐवजी म्हणा - "तुला हे कठीण वाटत होतं, तरी तू पुन्हा प्रयत्न...

वेगवेगळ्या वाटा, एकच ध्येय – The Foundations Montessori 18.08.2026

कधी कधी दोन पूर्णपणे वेगळे प्रवास… एकाच ध्येयासाठी एकत्र येतात. एक प्रवास… आर्मी background मधून आलेल्या शिस्तीचा. जिथे adaptability, strength आणि resilience हे जीवनाचे भाग झाले. आणि पुढे researchच्या जगात जाऊन… प्रश्न विचारण्याची, समजून घेण्याची आणि खोलवर विचार करण्याची सवय तयार झाली. दुसरा प्रवास आहे corporate world मधला. Systems, leadership, planning आणि execution यांच्या अनुभवातून तयार झालेला...

Logic ते Passion - मनाने घेतलेला U-Turn 10.08.2026

कधी कधी आयुष्य आपल्या हातात कॅल्क्युलेटर देतं…आणि आपण मात्र हातात स्क्रिप्ट घ्यायची स्वप्नं पाहत असतो. आज आपल्या सोबत आहेत अशी एक व्यक्ती ज्यांनी सुरक्षित इंजिनिअरिंग करिअर सोडून स्वतःच्या मनाचा आवाज ऐकला… आणि अभिनेता, दिग्दर्शक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. हा फक्त करिअर change प्रवास नाही…हा आहे धाडसाचा, स्वतःला शोधण्याचा आणि ‘मनातलं मान्य करण्याचा’ प्रवास. करिअर बदलणं म्हणजे फक्त profe...

यशापलीकडचं यश - Growth Mindsetचा प्रवास 28.07.2026

आज आपल्यासोबत आहेत Behavioral Expert आणि High Performance Leadership Coach AditiSurana. Aditi गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना, त्यांच्या thought process ला समजून घेण्यास, स्वतःच्या patterns ओळखण्यास आणि अधिक जागरूक, confident आणि purposeful जीवन जगण्यास मदत करत आहे. तिचं काम केवळ performance वाढवण्यापुरतं limited नाही, तर आतून बदल घडवून आणणं, स्वतःकडे नव्या दृष्टीकोनातून बघायला शिकवणं आणि growth m...

नृत्य नाही, तर अनुभव 15.07.2026

आपल्या guest series मधे, जिथे संवाद प्रश्न - उत्तरांचा नसून अनुभवांचाअसतो, आज माझ्यासोबत बसलेली व्यक्ती ही फक्त एक कलाकार नाही - ती माझी गुरु आहे. जिच्या तालात शिस्त आहे, भावात प्रामाणिकपणा आहे, आणि खूप काही शिकवण्याची ताकद आहे. आज आपण तिचा प्रवास विचारणार नाही, तर तिच्या अनुभवातून स्वतःकडे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. नृत्य, आयुष्य आणि मन - या तिन्हींचा एक सुंदर संवाद आज इथे घडणार आहे. स्वागत कर...

आजी-आईंच्या स्वयंपाकातलं विज्ञान: Heritage Food आणि Kitchen Chemistry 01.07.2026

आपल्या guest series मधे आजचा guest करता, “निवृत्ती नंतरच, ज्येष्ठांच, मनासारखं जगण सुरू होतं” हे वाक्य अगदी योग्य ठरेल. हयांनी OrganicChemistry मधे M.Sc नंतर ३५ वर्ष हा विषयशिकविला. आणि retirement नंतर, आपल्या ज्ञानाचा उपयोग, समाजा करता व्हावा ह्या विचारेने हयांनी जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू केला. तो म्हणजे Nutritionist, Heritage Food Expert म्हणून. आज आपल्या सोबत आहेत सौ. रेखा दिवेकर - Nutritioni...

राहुल पाटील - Engineer मन… Podcaster हृदय 16.06.2026

आपण सगळे आयुष्यात काही ना काही ‘योग्य’ निर्णय घेतो…Degree योग्य. Job योग्य. Salary योग्य. पण एक प्रश्न मात्र मनाच्या कोपऱ्यात शांतपणे बसलेला असतो… हे सगळं ‘मनासारखं’ आहे का? मनातलं दाबून ठेवणं सोपं असतं…पण मनासारखं जगणं — त्यासाठी धैर्य लागतं. आपल्या सोबत आहेत अशी व्यक्ती ज्यांनी योग्य आयुष्य निवडलं होतं… पण एका क्षणी त्यांनी मनातलंऐकायचं ठरवलं. Engineer ते America मधील #1 Marathi Podcaster म्हणजे...

शोध अंतर्मनाचा – ज्योतिषापासून ब्रह्मविद्येपर्यंतचा प्रवास 03.06.2026

आज आपल्या सोबत आहेत एक अशी व्यक्ती ज्यांचा प्रवास खूप वेगळा आणि प्रेरणादायी आहे. जवळपास १२ वर्ष ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास आणि प्रॅक्टिस, त्यानंतर ब्रह्मविद्येचा सखोल अभ्यास आणि गेली 15 वर्ष अध्यापन, आणि त्यासोबतच एक अत्यंत आध्यात्मिक अनुभव- नर्मदा परिक्रमा. माझ्यासाठी हा संवाद आणखी खास आहे कारण त्या माझ्या ब्रह्मविद्येच्या गुरुही आहेत, आणि त्यांच्या मार्गदर्शनातून मला स्वतःलाही खूप काही...

आईपणाची नवी व्याख्या 09.05.2026

आजचा एपिसोड खूप खास आहे… कारण आज आपण बोलणार आहोत मदर्स डे बद्दल. पण आजचा हा भाग “आई म्हणजे त्यागाची मूर्ती” किंवा “आई स्वतःसाठी जगत नाही” अशा नेहमीच्या चौकटीतला नाही.एक empowered आई म्हणजे perfect आई नाही. ती अशी आई आहे —जी स्वतःची स्वप्नं जपते, स्वतःच्या mental health ला महत्त्व देते, मदत मागायला घाबरत नाही, आणि दुसऱ्या आईलाही हात देऊन पुढे नेत असते. कारण मुलं आपल्या शब्दांपेक्षा, आपलं जगणं जास्त...

मैत्री संपत नाही… ती evolve होते... 24.03.2026

लहानपणी मैत्री खूप सोपी असते…एकत्र बसलो, हसलो… आणि आपण मित्र. पण मोठेपणी? वेळ नाही… priorities बदलतात…आणि conversations “let’s catch up” वर थांबतात. पण खरं काय आहेमाहिती आहे? मैत्री संपत नाही… ती बदलते. ती रोजच्या गप्पांमधून कधी कधी येणाऱ्या message मध्ये जाते. ती “always available” मधून“always there when needed” मध्ये बदलते. एक छोटासा message —“Hey, just checking on you”कधी कधी पुरेसा असतो एक नात...

आई-बाबा बदलले की आपण? 23.02.2026

लहानपणी…आई-बाबा म्हणजे आपलं पूर्ण जग असतं. त्यांचं प्रत्येक वाक्य — नियम असतो. त्यांचा प्रत्येक निर्णय — सुरक्षित वाटतो. पण… एक दिवस असाच अचानक जाणवतं… आई अजूनही तसंच बोलते, बाबा अजूनही तसंच सांगतो…पण आपल्याला ते सगळं आधीसारखं वाटत नाही. आणि मग मनात एक शांत प्रश्न उभा राहतो — आई-बाबा बदलले का… की आपल्या नजरेतून त्यांचंचित्र बदललं? आजच्या भागात… आपण हाच प्रवास समजून घेणार आहोत —बदलाचा नाही…समजुतीचा...

प्रेम की Performance?- आपण कोणती Love Language बोलतो? 11.02.2026

खरं प्रेम कधी audience शोधत नाही. ते claps शोधत नाही. ते सुरक्षितता शोधतं. जिथे आपण अभिनय न करता आपलं असू शकतो. आपल्या सर्वांचे आवड्ते आणि लाड्के पु ल देशपांडे यांच्या व्यक्तिरेखा आठवा— नवरा बायकोवर चिडतो,पण बाहेर पाऊस पडतोय म्हणून छत्री घेऊनजातो.बायको तक्रार करते,पण नवऱ्याच्या आवडत्या चपला उन्हात ठेवते.हेप्रेम dramatic नाही. हे Instagram-worthy नाही. पण हेखूप  खरं आहे. प्रेम performance नसतं. ते...

Love vs Attachment- ओळख कशी कराल?? 04.02.2026

Valentine Day जवळ आला की आपल्याला एक गोष्ट खूप romantic वाटते— “तो/ती माझ्याशिवाय नाही राहू शकत.” Dil To Pagal Hai चित्रपट आठवा… जिथे सांगितलं जातं— “Someone… somewhere… is made for you.” स्क्रीनवर हे जादूसारखं वाटतं. खूप सुंदर. खूप romantic. आणि social media? ते तर ही fantasy अजून मोठी करतं—  पण खरं प्रेम वेगळं असतं.  ते stories मध्ये,नसतं. Reels मध्ये नसतं. ते शांत असतं. जेव्हा एका मेसेजवर आपली...

आई की मी? – Motherhood पलीकडचं माझं अस्तित्व 26.01.2026

जर तू आई असशील… आणि कधी कधी स्वतःला विसरतेस, तर हा वेळ तुझ्यासाठी आहे.आई झाल्यावर आयुष्य अचानक बदलत नाही… ते हळूच बदलतं. आजचा हा एपिसोड ऐकताना तुला strong राहायची गरज नाही…फक्त प्रामाणिक राहा. आज आपण त्या ‘मी’ बद्दल बोलणार आहोत…जी motherhood च्या गडद सावलीत कधी कधी लपून जाते. हा एपिसोड कुणालाही exclude करत नाही…पण आज आपण खास आईंच्या आतल्या आवाजाला जागा देतोय. कारण आईला आधार म्हणजे पकडून ठेवणं नाही...

Breaking the Loop – पिढ्यानपिढ्या चाललेली सवय थांबवताना 12.01.2026

कधी लक्षात आलंय का… आपण निर्णय घेतो… पण प्रतिक्रिया जुनी असते. ताण आला की आवाज बदलतो. संधी आली की पाऊल थांबतं. हे होतं जून्या conditioning आहे”. “म्हणूनच ओळखीची सवय — जरी त्रासदायक असली… तरी मेंदू तिलाच ‘safe’ म्हणतो.” आज आपण चुका किंवा कमतरता याबद्दल बोलणार नाही. आज आपण मेंदू कसा आपल्याला जुने patterns repeat करायला भाग पाडतो — याबद्दल बोलणार आहोत। नोबेल प्राइज़ विजेते आणि मानसशास्त्र्ज्ञ Daniel...

"Busy असणं" म्हणजे यश की व्यस्ततेचं आकर्षण? 08.01.2026

आज कुणालाही विचारा — काय चाललंय? उत्तर जवळपास एकच असतं — खूप busy आहे! Going crazy. जणू busy’ असणं ही आपली ओळख झाली आहे.” Timothy D. Wilson यांच्या एका प्रसिद्ध अभ्यासात असं आढळलं की लोकांना रिकामेपणापेक्षा, व्यस्तता आवड़ते, मग ती व्यस्तता अर्थहीन का असे ना. ह्या मागचं कारण असं आहे कि - मनाला शांततेपेक्षा action सुरक्षित वाटतो. खूपदा व्यस्तता ही एक emotional shield असते. पण प्रश्न असा आहे कि why a...

Slow Living – ‘सगळं लगेच’च्या युगात, हळू जगणं 30.12.2025

Slow Living म्हणतलं कि तुमचा मनात कोणतं चित्र उभ राहतं? तुम्हाला स्वत:चा आयुष्यात  slow living ची  कल्पना करता येते का? ब-याचदा slow living ऐकताच लोकांचा मनात येते ती स्थिरता। काही लोकं ह्याला आळशीपणा देखील म्हणतात। काही असं ही म्हणतात कि मला आवडेल कधी तरी हे अनुभवायला पण अत्ता ? ना, माझाकडे हयासाठी वेळ नाही। आणि कहींना असं वाटत कि असेविषय फक्त म्हातारपणी बोलले जातात। आणि  इथेच मला हा quote सांगाव...

सुट्या तेव्हा आणि आता: आपल्या लहानपणीच्या आठवणी 16.12.2025

Holiday season आला, की एक वेगळीच ऊब मनात पसरते। दिवाळी, ख्रिसमस, new year vacation… हवेतच, एक softness, warmth, आणि आठवणींचा सुवास असतो. आज आपण बोलणार आहोत त्या सुट्ट्यांबद्दल,ज्या आपण जगल्या… आणि त्या सुट्ट्यांबद्दल ज्या आजची मुलं जगत आहेत. आणि parents म्हणून आपण कोणता सुंदर balance तयारकरू शकतो. When the holiday season arrives, a different kind of warmth spreads through the heart. Diwali, Christ...

जुनी नाती, नवीन आयुष्य 14.11.2025

जुनी नाती, नवीन आयुष्य. ऐकल्यावर थोडं फिल्मी वाटतं ना?पण विचार करा — आयुष्य पुढे जातं, वेळ बदलतो, आपण बदलतो…आणि नकळत आपण आपल्या जून्या  मित्रांपासून थोडे लांब जातो. “कधी तरी भेटूया” असं म्हणत म्हणत वर्षं निघून जातात. कधी कधी आपण विचार करतो — “जुनी नाती आता तशी राहिली नाहीत.” पण खरं तर, नाती बदलत नाहीत — आपल्या priorities बदलतात. आपण त्यांना वेळ देणं थांबवतो, आणि मग त्या नात्यांची गोडी कमी होते पण...

पिढ्यांमध्ये संवाद - Gen Z vs Gen X 07.11.2025

आपण सगळेच कुठेतरी एका पुलावर उभे आहोत — एका बाजूला आपली पिढी — Gen X — जी जबाबदारी, मूल्यं आणि अनुभव घेऊन चालते,आणि दुसऱ्या बाजूला आपली मुलं — Gen Z — जी स्वप्नं, स्वतंत्र विचार आणि स्वतःचं जग घेऊन उभी आहेत. कधी कधी आपलं बोलणं “lecture” वाटतं,आणि त्यांचं बोलणं आपल्याला “attitude” वाटतं. मग मध्ये उरतो — मौनाचा पूल. हा पूल म्हणजे “संवादाचा पूल.” पण तो नेहमी मजबूत असतो का?कधी कधी तो डळमळतो, कधी तुटतो...

आई, तुला आता कळतंय ना? 24.10.2025

“आई, तुला आता कळतंय ना?” हो, तुम्ही बरोबर ऐकलंत. एकेकाळीआपल्या मुलांकडून आपण ऐकायचो — “आई, तुला नाही कलणार.” हो ना। खरं तर हे वाक्य ऐकलं की मन थोडं चुरचुरतं. आपल्या सगळ्या प्रयत्नांना जणू कोणी नाकारलं, असं वाटतं. खरं तर सांगत असतात –“आई, माझं जग तुझ्यापेक्षा वेगळं आहे, तू थोडं माझ्याकडे ये.” पण आज आपण प्रयत्न करतोय ते “कळत नाही पासून आता कळतंय ना ” या टप्प्यापर्यंत पोहोचायचा. कारण जेव्हा आपण त्यां...

संस्कारांची शिदोरी... 09.10.2025

कधी असं वाटलंय का… की संस्कार  कधी कधी बंधन वाटतात? संस्कार म्हणजे फक्त नियम नाहीत…ते आपल्याला मार्ग दाखवतात — पण तो मार्ग, आपला असायलाच हवा. नाही तर ते आपल्याला ओझ वाटायलालागतात. संस्कार म्हणजे “आपण काय करतो” इतकंच नाही, तर “का करतो” हे समजून घेणंही आहे. कारण खरी संस्कृती तीच जी माणसाला मुक्त करते,बंधिस्थ नाही. मग प्रश्न असा — संस्कार आपल्याला घडवतायत  की थांबवतायत ? संस्कार… संस्कृती कि दडपण. तु...

Parenting आणि स्वतःला हरवणं – एक हळवी जाणीव 25.09.2025

Parenting… या शब्दातच किती भावना दडलेल्या आहेत ना?आपल्या मुलांचं जग सुंदर करण्यासाठी आपण किती काही करतो. पण या सगळ्यात… कधी असाप्रश्न तुमच्या मनाला स्पर्शून आहे का— मी कुठे आहे या सगळ्या प्रवासात? एका coaching session मध्ये मी एका आईला विचारलं— “तुम्हीस्वतःसाठी काय करता?” ती काही सेकंद शांत राहिली, आणि मग म्हणा— “खरं सांगू का, मला आठवतच नाही… मी शेवटचं स्वतःसाठी काय केलं होतं.” हे वाक्य ऐकून मला ज...

Enough Mindset म्हणजेच पुरेसं असण्याची जाणीव 18.09.2025

मागचा आठवड्यात, मी, listener choice series सम्पल्या बद्दल बोलले पण एक अत्यंत सुंदर विषय सूचविण्यात आला. - Enough Mindset. Digital creators, life coaches , growth mindset वर खूप काही share करतात. ज्यात मी देखील सामिल आहे। पण त्याच बरोबर, मी, Pause, आणि self-reflection ही सांगितलं आहे. आता गम्मत अशी आहे कि growth mindset, आपल्याला पुढ़े वाढण्यात प्रेरित करतो आणित्यामुळे कुणी थांबायला संगितलं तर ते आ...

Ascultă podcastul Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast în Replaio

Radio și podcasturi într-o singură aplicație - gratuit și fără înregistrare. Instaleaz-o azi și nu rata lansarea

Descarcă din Google Play

Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice