BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

Health MR ↓ 963 episódios

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: www.bbc.co.uk

Autor

BBC Marathi Audio

Categoria

Health

Site do podcast

www.bbc.co.uk

Último episódio

25 de mar de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

सोपी गोष्ट पॉडकास्ट : पेटीएमच्या शेअरची किंमत का कोसळली? 23.11.2021

पेटीएमची मालक कंपनी One 97 Communications च्या IPO साठी लोकांनी भरपूर बोली लावली. पण प्रत्यक्ष बाजारात त्याच्या शेअर्सची किंमत घसरली आणि अनेकांना मोठ्या प्रमाणात तोटा झाला. पेटीएमला शेअर मार्केटमध्ये भाव का नाही मिळाला? येणाऱ्या काळात इंटरनेट कंपन्यांच्या IPO बद्दल काय सावधगिरी बाळगायची? संशोधन- सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट: अब्राहमी धर्म नेमका काय आहे? 19.11.2021

धर्मावरून होणारे वाद हे तसे जगाला नवीन नाहीत. इस्त्रायलमधला ज्यू-ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मियांमधला संघर्ष तसंच भारतातलं हिंदू-मुस्लीम द्वंद्वं अशी ज्वलंत उदाहरणं त्यासाठी देता येतील. या धार्मिक वादांमधून मोठी मोठी युद्धं घडलीत. आणि आंतरराष्ट्रीय राजकारण पेटलंय. ईजिप्त, इस्त्रायल आणि मध्य-पूर्व देशांमध्ये सध्या नवा धार्मिक वाद उभा राहतोय तो अब्राहमला देव मानणाऱ्या अब्राहमी धर्मावरून. काय आहे हा नवी...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : रझा अकादमी काय आहे? अमरावती दंगलीशी संस्थेचा संबंध आहे का? 18.11.2021

त्रिपुरातील हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमरावती, मालेगाव, नांदेड, औरंगाबादसह इतर काही ठिकाणी मुस्लीम संघटनांनी बंद पुकारला होता. काही ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनाला अमरावती, मालेगावसह काही ठिकाणी हिंसक वळण लागलं. या हिंसाचाराच्या मागे रझा अकादमी असल्याचा आरोप काही नेत्यांनी केला आहे. रझा अकादमी म्हणजे काय आहे? ही संस्था कोणाची आहे? त्यांची कार्यपद्धती काय? रझा अकादमी राजकीय पक...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: एक शब्द बदलला म्हणून भारतावर टीका का होते आहे? | सोपी गोष्ट 471 17.11.2021

हवामान बदलाचा मुद्दा निघाला की आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची भूमिका आणि धोरणं अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. ग्लासगोमध्ये नुकतीच पार पडलेली COP26 हवामान परिषदही त्याला अपवाद नव्हती. या परिषदेअखेर सर्व सहभागी देशांमध्ये नवा 'हवामान करार' झाला. पण त्यानंतर भारत आणि चीन या दोन देशांवर टीका होते आहे. संशोधन - नवीन खडका, रजनी वैद्यनाथन लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारतात वाढत जाणाऱ्या प्रदूषणाची काय कारणं आहेत? 16.11.2021

जगातल्या कोणत्याही ठिकाणी असलेल्या प्रदुषणापेक्षा दहापट जास्त प्रदुषण उत्तर भारतात आहे. हे प्रदुषण पसरत जातंय आणि यामुळे भारतातील लोकांचं आयुष्य अडीच ते 10 वर्षांनी कमी होऊ शकतं असा अंदाज शिकागो विद्यापीठाच्या संशोधनाने व्यक्त केला आहे. भारतातील प्रदुषणामागे काय कारणं आहेत? संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले.

सोपी गोष्ट पॉडकास्ट : तुमची कार महाग होण्याची ही आहेत 4 मोठी कारणं 16.11.2021

एकीकडे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेत आणि दुसरीकडे कारची किंमतही वाढलीय. महागाईचा दुहेरी फटका का बसतो आहे? भारतासह जगभरात कारच्या किमती का वाढल्या आहेत? जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागात. संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले.

सोपी गोष्ट पॉडकास्ट: एसटी संप भाजपमुळे चिघळतोय या आरोपात तथ्य किती? 12.11.2021

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भाजप नेते चिथावत आहेत, भरकटवत आहेत आणि ते नंतर त्यांची जबाबदारी घेणार नाहीत असा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे. भाजपचे नेते म्हणतात की हे लोकांचं आंदोलन आहे आणि सरकार अहंकारी आहे. दोन्ही बाजूने केल्या जाणाऱ्या या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? ऐकू या आजची सोपी गोष्ट. संशोधन- दीपाली जगताप लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट - महाराष्ट्र का गारठला? 11.11.2021

गेले दोन दिवस राज्यात संध्याकाळनंतर पारा घसरतोय. 10 नोव्हेंबरला पुण्यामध्ये 10 अंश सेल्शियस तापमान नोंदवण्यात आलं. इतरही ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा कमी आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच राज्यात इतकी थंडी का आली? यंदाचा हिवाळा कसा असणार आहे? उत्तर भारतात काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश अशा ठिकाणी ऑक्टोबर अखेरपासूनच बर्फवृष्टीला सुरुवात झालीय. हे सगळं कशामुळे होतंय? ला निना आणि एल निनो या हवामान विषयक संज्...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: इन्स्टाग्रामचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतोय का? 11.11.2021

इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अ‍ॅपचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक आणि प्रतिकूल परिणाम होतोय असा एक निष्कर्ष या अ‍ॅपची मुख्य कंपनी मेटाच्याच एका अंतर्गत अहवालात निघाला होता. आणि त्यानंतर अख्ख्या अमेरिकेत आणि हळू हळू जगभरात गहजब माजला. खरंच इन्स्टाग्रामचा असा परिणाम मुलांच्या मनावर होतो का? नेमका काय परिणाम होतो? आणि वाईट परिणाम टाळण्यासाठी काय करावं जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये... संशोधन...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: IPO म्हणजे नेमकं काय? 09.11.2021

दिवाळीचा हंगाम हा शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांसाठी आयपीओचा हंगाम म्हटला जातो. कारण, साधारण या सुमारास बाजारात नवीन आयपीओ म्हणजे इनिशिअल पब्लिक ऑफर्स येतात. पण, आयपीओ म्हणजे नेमकं काय, त्यात गुंतवणूक करावी की न करावी? गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन, लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाचा ‘हा’ जिन भारतीयांसाठी धोकादायक? 09.11.2021

कोरोना साथीच्या दोन वर्षांच्या काळात कोरोना अनेकदा बदलला; त्यात जनुकीय बदल झाले. त्याचवेळी शास्त्रज्ञांचा असाही अभ्यास सुरू होता की, कुठल्या प्रकारच्या लोकांना याचा धोका सर्वाधिक आहे आणि का? याचं एक उत्तर असं आहे की, दक्षिण आशियाई वंशाच्या लोकांमध्ये शास्त्रज्ञांना एक असा कोव्हिड जिन्स आढळून आला आहे ज्यामुळे फुप्फुसाला इजा होऊन कोव्हिडमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण या लोकांमध्ये दुप्पट आहे. पण, म्हणू...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : एसटी महामंडळाचं विलीनीकरण करावं अशी मागणी का होतेय? 05.11.2021

गेली काही वर्ष राज्यातली परिवहन सेवा तोट्यात आहे. कोव्हिडच्या लॉकडाऊनचा एसटीलाही मोठा फटका बसला. लॉकडाऊनचा बराच काळ एसटीची सेवा पूर्णपणे बंद होती. तर एसटी सेवा सुरू झाल्यानंतरही प्रवाशी संख्येत घट झालेली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत व्हावेत, पगारवाढ मिळावी, घरभाडं भत्ता आणि महागाई भत्ता वाढवावा या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर राज्य सरकारने महागाई भत्ता आणि घरभाडं भत्ता वाढवण...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शेअर बाजारात गुंतवणूक करणं किती फायद्याचं वा धोक्याचं? 04.11.2021

शेअर बाजारातल्या चढउतारांबद्दल नेहमी चर्चा होत असते. जगभरातल्या घडामोडींचे परिणाम शेअर बाजारावर होत असतात. स्टॉक मार्केटमध्ये नेमकी किती गुंतवणूक करावी? त्यासाठी काय करावं लागतं? आणि यात पैसे बुडायचा किती धोका असतो? समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट संशोधन, निवेदन : ऋजुता लुकतुके व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे

सोपी गोष्ट पॉडकास्ट : पेट्रोल,डिझेलच्या किमती कधी कमी होतील? 04.11.2021

2021च्या संपूर्ण वर्षात पेट्रोल - डिझेलच्या दरांत सतत वाढ झालेली आहे. गेल्या काही दिवसांत या दोन्हींच्या दरांनी 100 रुपयांचा पल्ला ओलांडलेला आहे. नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम इंधनाच्या दरांवर होतो? आंतरराष्ट्रीय घडामोडी याला कारणीभूत असतात का? आणि देशातलं सरकार इंधनाच्या किंमती कमी करू शकतं का, जाणून घेण्यासाठी पहा सोपी गोष्ट संशोधन : अमृता दुर्वे लेखन,निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग...

सोपी गोष्ट पॉडकास्ट - पर्यावरणविषयक जाहीर केलेली उद्दिष्टं भारत गाठू शकेल का? 02.11.2021

2070 पर्यंत भारतातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यवर आणले जाईल, असं मोदी यांनी ग्लासगो येथे झालेल्या परिषदेत म्हटलंय. या परिषदेचं उद्दिष्ट 2050 पर्यंत कार्बन उत्सर्जन नेट झिरोवर आणण्याचं आहे. पण भारताने यासाठी आणखी 20 वर्षं लागणार असल्याचं म्हटलंय. कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. चीन आणि अमेरिका पहिल्या दोनमध्ये आहेत. भारताने आणखी काय जाहीर केलंय आणि ही उद्दिष...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: अतिभयंकर नैसर्गिक आपत्ती आता ‘न्यू नॉर्मल’ ठरणार 01.11.2021

तीव्र अशा उष्णतेच्या लाटा (हीटवेव्हज), विध्वंसकारी पूर आता आपल्यासाठी न्यू नॉर्मल ठरणार आहेत, आपल्या जगण्याचाच एक भाग होणार आहेत असं जागतिक हवामान संघटनेने म्हटलं आहे. 2021 मधली हवामान बदलाची स्थिती यासंबंधी जो एक रिपोर्ट प्रकाशित झालाय त्यात एका शब्दाला अधोरेखित केलंय – ‘आपल्या डोळ्यादेखत बदलणारी परिस्थिती.’ ’द स्टेट ऑफ क्लायमेट’ असं नाव असणारा हा रिपोर्ट भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे य...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: चीनचा नवा सीमा सुरक्षा कायदा काय आहे? 29.10.2021

मागचे सतरा महिने भारत आणि चीन दरम्यानच्या सीमेवर तणाव आहे. जून 2020मध्ये गलवान इथं दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेला रक्तरंजित संघर्ष कुणी विसरू शकणार नाही. त्यातच आता चीनच्या कम्युनिस्ट सरकारने देशात नवीन सीमा सुरक्षा कायदा आणलाय. चीनसाठी तो सीमेचं सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी केलेला कायदा आहे. पण, या कायद्यामुळे तिथलं सैन्य दळ आणि सीमेवरच्या राज्यांनाही वेळ प्रसंगी पोलिसी कारवाई करण्याचं स्...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: आर्यन खानला जामीन मिळणं कठीण का झालं? ड्रग्जबद्दलचा NDPS कायदा काय आहे? 27.10.2021

आर्यन खान आणि इतर आरोपींवर NDPS कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा कायदा नेमका काय आहे? इतर कायद्यांच्या तुलनेत हा कायदा कठोर आणि वेगळा आहे का? आर्यन खानकडे ड्रग्ज मिळाली नाहीत, त्याने अंमली पदार्थांचं सेवनही केलेलं नव्हतं. मग त्याला जामीन मिळणं कठीण का झालं? जाणून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट. संशोधन : टीम बीबीसी लेखन,निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट: 43 कोटींचं इनाम असलेल्या ड्रग माफियाला अशी झाली अटक 27.10.2021

73 हजार किलो कोकेनचं स्मगलिंग केलेल्या एका ड्रग माफियाची ही गोष्ट आहे. दाइरो आंतोनियो उसुगा उर्फ ओतोनिएल या ड्रग तस्कराला कोलंबियात अटक झाली. अमेरिकेत त्याच्यावर खटला भरला गेलाय. कोण आहे हा ओतोनिएल? ऐका सोपी गोष्ट. लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट: पेट्रोल महागाईच्या फटक्यातून फ्लेक्स फ्युएल इंजिन सोडवतील का? 26.10.2021

‘पुढची गाडी फ्लेक्स इंजिन असलेली घ्या, म्हणजे खर्चही कमी होईल आणि प्रदूषणही’ असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. पेट्रोल आणि इथेनॉलवर चालू शकेल असं इंजिन लवकरच सगळ्या नव्या गाड्यांमध्ये बसवणं आपण बंधनकारक करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. फ्लेक्स फ्युएल इंजिन काय असतात, ती कसं काम करतात आणि त्यांचे फायदे-तोटे काय हे सांगणारी ही सोपी गोष्ट. संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भ...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: फेसबुकचं मेटाव्हर्स म्हणजे नेमकं काय? सोपी गोष्ट 452 22.10.2021

मेटाव्हर्स या तंत्रज्ञानाविषयी सध्या सगळ्यांना कुतुहल आहे. फेसबुक कंपनीने तर हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पन्नास लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केलीय. इंटरनेटचा भविष्यकाळ म्हणून या तंत्रज्ञानाकडे पाहिलं जातंय. पण, मेटाव्हर्स म्हणजे नेमकं काय? आणि फेसबुकचा त्याच्याशी काय संबंध आहे, पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट: व्हॉट्सॲप चॅट पुरावा म्हणून कोर्टात ग्राह्य ठरतात का? सोपी गोष्ट 453 22.10.2021

आर्यन खान प्रकरण असेल किंवा रिया चक्रवर्तीची चौकशी किंवा अर्णब गोस्वामी – पार्थो दासगुप्ता यांचा कथित TRP घोटाळा, तपास यंत्रणा आपल्या आरोपांना आधार देण्यासाठी व्हॉट्सॲप चॅट्सचा हवाला देत असतात. पण कोर्टा व्हॉट्सॲप चॅट्सना पुरावा म्हणून मान्यता देतं? नेमकं काय आहे लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट: महागाई अशीच कायम राहणार का? | सोपी गोष्ट 451 20.10.2021

भारतात सध्या सामान्य माणूस महागाईच्या ओझ्याखाली दबून जातो आहे. रोजच्या जेवणातल्या भाजीपाल्यापासून ते कपडे आणि कंप्युटर्सपर्यंत अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामागची कारणं काय आहेत आणि महागाई कमी होण्याची काही शक्यता आहे का? लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट : काश्मिरमध्ये स्थलांतरित मजुरांवर हल्ले का होत आहेत? 19.10.2021

काश्मीरच्या कुलमागमध्ये रविवारी 17 ऑक्टोबरला दोन बिगर काश्मिरी नागरिकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गेल्या दीड महिन्यात याठिकाणी काश्मीरचे नसलेल्या पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. परप्रांतिय मजुरांनी जिवाच्या भीतीने काश्मीरखोऱ्यातून पलायन सुरू केलंय. जे मजूर थांबले आहेत, त्यांच्या मनात भीती आहे. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या काश्मिरी पंडित आणि शीख समुदायातल्या व्यक्तींच्या हत्यांमुळे काश्मिर...

सोपी गोष्ट पॉडकास्ट: बांगलादेश हिंदूंवर हल्ल्यांनंतर मोदी सरकारला शेख हसीना यांनी काय सांगितलं? 19.10.2021

नवरात्रात पूजा मंडपांमध्ये, हिंदू मंदिरांवर हल्ले झाले. काही ठिकाणी हिंदूंच्या घरांना आगी लावल्या गेल्या. पण बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणतात की भारताने खबरदारी घ्यावी की तिथे असा घटना घडणार नाहीत ज्यामुळे बांगलादेशच्या हिंदूंवर हल्ले होतील. पण शेख हसीना त्यांच्या देशातल्या हिंदूंच्या रक्षणासाठी भारताला इशारा का देतायत?

Ouça o podcast सोपी गोष्ट no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos