BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: www.bbc.co.uk
Autor
BBC Marathi Audio
Categoria
Site do podcast
Último episódio
25 de mar de 2026
Onde ouvir?
Podcasts no app Replaio Radio Em breveOs podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts
Episódios
सोपी गोष्ट पॉडकास्ट: नितेश राणे कुठे आहेत? संतोष परब प्रकरण काय आहे? | सोपी गोष्ट 500 28.12.2021 5:06
नारायण राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यातला वाद तसा जुना आहे. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यापासूनच ही आग भडकली होती. पण नव्यानं ठिणगी पडली आहे ती संतोष परब हल्ला प्रकरणानं. हे प्रकरण काय आहे आणि त्याचा राणे-ठाकरे वादाशी काय संबंध आहे? लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: धर्म संसद म्हणजे काय? | सोपी गोष्ट 499 27.12.2021 5:12
उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये आणि छत्तीसगडच्या रायपूरमध्ये भरलेल्या धर्म संसदेत साधू-महंतांच्या वादग्रस्त विधानांची सध्या सगळीकडे चर्चा आहे. पण धर्म संसद म्हणजे नेमकं काय असतं? लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
डेबिट-क्रेडिट कार्डने ऑनलाईन शॉपिंग करताय? आता बदलणार हे नियम - सोपी गोष्ट पॉडकास्ट 24.12.2021 4:53
ऑनलाईन खरेदी किंवा कोणत्याही प्रकारच्या देवाण-घेवाणीसाठी तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता का? एक क्लिक केलं आणि आवडता ड्रेस, आवडते शूज ऑर्डर झाले, ओटीटीचं सबस्क्रिप्शन झालं, इतकंच काय मोबाईलचं, लाईटचं बिलही भरलं गेलं अशी तुम्हाला सवय आहे का? मग आता तुम्हाला आपल्या सवयी बदल्याव्या लागतील. तुमच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरण्याबदद्ल नवे नियम 1 जानेवारी पासून लागू होणार आहेत. कोणते आहेत न...
ओमिक्रॉनला हलक्यात घेणं महागात पडू शकतं कारण... सोपी गोष्ट पॉडाकास्ट 23.12.2021 5:11
ओमिक्रॉन हा कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट आलाय हे तर एव्हाना तुमच्या कानावर आलं असेल. पण हा सौम्य व्हेरियंट आहे म्हणून अनेक जण त्याला हलक्यात घेत आहेत. पण पण ओमिक्रॉन खरंच सौम्य आहे का? जर तो सौम्य आहे, तर मग अनेक देशांतल लॉकडाऊन का लागत आहे? जाणून घेणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये.
हवाला म्हणजे काय? कसा चालतो कारभार? यात किती उलाढाल असते? सोपी गोष्ट 496 23.12.2021 5:39
अनेकदा सेलेब्सवर, किंवा आपल्या नेत्यांवरही पैसा लपवल्याचे, करचोरीचे आरोप लागतात. असा बेकायदेशीर पैसा लपवण्याचे अनेक मार्ग असतात. त्यातलाच एक म्हणजे हवाला. हाही शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेलच. पण हा हवाला नक्की काय असतो? त्याचं रॅकेट कसं चालतं? आणि ही सिस्टिम नेमकी आली कुठून? जाणून घेऊया आजच्या बीबीसी मराठीच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन आणि निवेदन - अनघा पाठक एडिटिंग - निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट - पनामा पेपर्स नक्की काय प्रकरण आहे? 21.12.2021 4:50
समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन संसदेत भडकल्याची ही काही पहिली वेळ नव्हती. पण यावेळी त्या कशामुळे चिडल्या, ते नेमकं कळू शकलं नाही. त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सत्ताधारी बाकांमधून कुणी कमेंट केली, त्यामुळे त्यांना राग आला एवढंच कळलं. पण कुणी काय म्हटलं हे गदारोळात ऐकू आलं नाही. पण त्या चिडल्या त्याच सुमारास त्यांच्या सूनबाई आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची पनामा पेपर्स प्रकरणी एडीने चा...
सोपी गोष्ट पॉडकास्ट - मुलीचं लग्नाचं वय किती असावं? 20.12.2021 4:37
लग्न करण्यासाठी मुलींचं कायदेशीर वय आता 18 वरून 21 करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आणि आता हे बिल संसदेत मांडलं जातंय. पण या निर्णयाला देशातले अनेक राजकीय पक्ष विरोध करत आहेत. मुलीचं लग्नाचं वय नक्की का वाढवलं, मोदी सरकारच्या या निर्णयाचा राजकीय पक्ष का विरोध करत आहेत? आणि मुख्य म्हणजे याने खरंच स्त्री पुरुष समानता येईल का? जाणून घेऊया आजच्य...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: चीनची आर्थिक प्रगती जगाला का खुपतेय? 18.12.2021 6:36
पुढच्या दोन दशकांमध्ये चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेला मागे टाकून जगात क्रमांक एकची अर्थव्यवस्था होईल असा तज्ज्ञांचा होरा आहे. चीनने मिळवलेलं हे यश मागच्या वीस वर्षांत मिळवलेलं आहे. पण, सध्या अमेरिका आणि इतर युरोपीयन देश तसंच गरीब देशांनाही ते सलतंय. असं नेमकं का? चीनच्या या घोडदौडीत जगाला नेमका काय धोका आहे? जाणून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये… संशोधन - फैसल इस्लाम, ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुक...
विंटर ऑलिम्पिक आणि विगर मुसलमानांच्या मुद्द्याचा काय संबंध आहे? सोपी गोष्ट 17.12.2021 6:40
फेब्रुवारी 2022मध्ये चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. पण चीनमधल्या शिनजियांग प्रांतामध्ये वीगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आपण या स्पर्धांवर डिप्लोमॅटिक बहिष्कार टाकत असल्याचं अमेरिका, युके, कॅनडाने म्हटलंय. धोरणात्मक किंवा राजनैतिक बहिष्कार म्हणजे नेमकं काय? त्यातून काय साध्य होईल? आणि या सगळ्यावर चीनचं म्हणणं काय आहे? समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट संशोधन : टीम...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांवर हल्ले का होतायत? 15.12.2021 5:59
काश्मीर खोऱ्यात श्रीनगर शहराच्या बाहेर झेवनमध्ये एका पोलीस व्हॅनवर झालेल्या कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला तर अकरा जण जखमी झाले. काश्मीरमध्ये मागच्या काही महिन्यात सामान्य नागरिक आणि पोलिसांवरील हल्ल्याचं प्रमाण वाढलं आहे. काश्मीर पोलिसांच्या मते आंतरराष्ट्रीय आतिरेकी संघटनांचे छोटे छोटे गट हे संघटित हल्ले घडवून आणत आहे. ही झाली पोलिसांची बाजू. पण, काश्मीरमध्ये नेमक...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओमिक्रॉन व्हेरियंटवर बुस्टर डोस उत्तर आहे का? 13.12.2021 5:59
जगभरात सगळीकडे ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार होत असतानाच आता युकेमध्ये या व्हेरियंटमुळे पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना मग सांगावं लागलं की, ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका. त्यांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली. युकेमध्ये पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत सगळ्यांना बुस्टर डोस देणार अशी घोषणा करून टाकली. युकेच नाही तर जगभरात नवीन व्हेरियंट्सशी लढण्यासाठी बुस्टर डोसकडे आशेनं बघ...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिड -19 विरोधातल्या लशींचा दुसरा डोस घेणं महत्त्वाचं का आहे? 10.12.2021 7:05
महाराष्ट्रातल्या 83 लाखांपेक्षा जास्त लोकांनी कोव्हिड 19 विरोधातल्या लशीचा दुसरा डोस घेतलाच नसल्याचं समोर आलंय. कोरोना व्हायरसच्या विरोधात परिणामकारक ठरण्यासाठी लशीचे दोन्ही डोस घेणं महत्वाचं आणि गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे. मग असं असताना केवळ एक डोस घेऊन पुरेसं संरक्षण मिळेल का? दुसरा डोस घेतलाच नाही तर काय होईल? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन : टीम बीबीसी...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : रशिया आणि युक्रेनमध्ये काय बिनसलंय #सोपीगोष्ट 487 10.12.2021 7:21
रशियाने युक्रेनलगतच्या त्यांच्या सीमेजवळ सैन्य तैनात केल्याने सध्या या भागावर युद्धाचे ढग जम होताना दिसत आहेत. आपला असा कोणताही इरादा नसल्याचं रशियाने म्हटलं असलं तरी युक्रेनच्या नेत्यांनी मात्र 2022च्या सुरुवातीला हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये नेमकं काय बिनसलं आहे? जगातल्या कोणत्या देशांचा युक्रेनला पाठिंबा आहे? आणि जगातले देश रशियावर कशी कारवाई करू शकतात? समजून घेऊय...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : OBC आरक्षणाचा जन्म कसा झाला? #सोपीगोष्ट 486 08.12.2021 5:21
6 डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले.त्यामुळे राज्यातल्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येतेय. ओबीसी आरक्षणाचा उल्लेख केल्यावर ज्या मंडल आयोगाचा संदर्भ य...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: लष्करासाठीचा AFSPA कायदा रद्द करण्याची मागणी का होते आहे? 07.12.2021 8:25
नागालँडमध्ये लष्कराच्या हातून 14 नागरिकांचा मृत्यू झाला. देशातल्या अशांत क्षेत्रात काम करताना सशस्त्र दलांना विशेषाधिकार देणारा AFSPA कायदा रद्द करण्याची मागणी केली जाते आहे. नागालँड तसंच मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली आहे. हा कायदा काय आहे? तो लष्कराला कोणते अधिकार देतो? या कायद्याविरोधात कोणते आक्षेप आहेत? जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागातून. संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिट...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? 06.12.2021 6:05
अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा Freedom of Expression हे शब्द सहसा कोणत्यातरी वादाच्या संदर्भानेच येतात. त्यामुळेच बहुतेक वेळा त्यांचा विचारही एकाच बाजूने केला जातो. आपण या बाजूंमध्ये अडकून न पडता या प्रकरणाच्या मुळात शिरू या. त्याची व्याख्या, त्याच्यावरचे निर्बंध हे सगळं पाहू या. संशोधन – सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिशिल्ड लशीमुळे काही लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या का तयार होत होत्या? 04.12.2021 4:08
सुरुवातीच्या काळात ऑक्सफर्डमध्ये संशोधन झालेल्या (भारतात आपण तिला कोव्हिशिल्ड म्हणून ओळखतो) कोरोना लशीमुळे काही लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. हे प्रमाण अत्यल्प असलं तरी लोकांमध्ये त्यामुळे लशीबद्दल संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर संशोधकांनी याचा अभ्यास करून गुठळ्या तयार होण्याचं कारण शोधून काढलं आहे. लशीच्या सुधारित आवृत्तीसाठी याचा खूप मोठा उपयोग होणार आहे. हे संश...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: सोयापेंड आयात वादात का सापडली? 02.12.2021 5:57
सोयापेंड आयातीवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी हा मुद्दा लोकसभेतही मांडला होता. सोयापेंड आयातीवरून नेमका काय वाद निर्माण झालाय? या आयतीचे शेतकरी आणि बाजारपेठेवर काय परिणाम होऊ शकतात? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन : अमृता दुर्वे, श्रीकांत बंगाळे लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे
सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओमिक्रॉन व्हेरियंटचा शोध कसा घेतला जातोय? 01.12.2021 5:22
दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोना ओमिक्रॉन हा नवा व्हेरियंट आतापर्यंत जगभरातल्या 12 देशांमध्ये सापडलेला आहे. या व्हेरियंटमध्ये आधीच्या डेल्टा, डेल्टा प्लस वा इतर व्हेरियंटपेक्षा वेगळं काय आहे? आणि या व्हेरियंटचं निदान कसं केलं जातंय? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन : टीम बीबीसी लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे
सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारत ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका कसा परतवणार? | सोपी गोष्ट 480 30.11.2021 5:34
ओमिक्रॉनवर सध्याच्या लशी कितपत प्रभावी ठरतील, हे अजून स्पष्ट नसलं, तरी लशीमुळे गंभीर आजाराचा धोका किमान काही प्रमाणात कमी होऊ शकतो, याविषयी जगभरातल्या तज्ज्ञांचं एकमत असल्याचं दिसतं. पण भारतात अजूनही कोव्हिड लसीकरणाचं प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत अजूनही कमीच आहे. अशा परिस्थितीत भारत ओमिक्रॉनचा सामना करण्यासाठी सज्ज आहे का? संशोधन - जान्हवी मुळे, मयांक भागवत लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – शरद...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओमिक्रॉन, लॉकडाऊन आणि लशींबद्दल पाच प्रश्न, पाच उत्तरं 30.11.2021 7:09
ओमिक्रॉन या कोरोनाच्या सर्वांत नवीन व्हेरियंटमुळे जगात अनेक ठिकाणी चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आतापर्यंत सर्वांत गंभीर मानल्या गेलेल्या डेल्टा व्हेरियंटपेक्षाही हा व्हेरियंट जास्त वेगाने पसरू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा व्हेरियंट किती घातक आहे? याच्यावर लशी काम करतील का? लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची ही उत्तरं. संशोधन, लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग-...
सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाला बाहेरच्या बाहेर पळवून लावणारी ही लस कुठली? 26.11.2021 4:12
आतापर्यंत जगात 26 कोटी लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला आहे. पण, काही लोक असेही आहेत, खासकरून आरोग्यसेवक जे सतत कोव्हिड रुग्णांच्या संपर्कात आहेत. पण, विषाणूशी इतका जवळचा संबंध येऊनही त्यांना कोव्हिड झाला नाही. जगातील असे काही लोक संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत नवीन कोरोना लशीच्या संशोधनासाठी. कोरोनाच्या संपर्कात येऊनही कोव्हिड न झालेल्या लोकांचा अभ्यास करून संशोधकांनी नव्या कोरोना लशीचा...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : टोमॅटोचे दर वाढण्यामागचं 'हे' आहे खरं कारण 25.11.2021 6:00
भारतात थंडीच्या काळात सहसा टोमॅटो स्वस्त होतात. पण सध्या देशभरात टोमॅटोच्या किंमती 70 ते 110 रुपये किलोदरम्यान आहेत. कशामुळे हे भाव इतके वाढले? हवामान बदलाचा पिकांवर कसा परिणाम होतोय? आणि या पुढच्या काळातही असंच होत राहणार का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन, लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे
सोपी गोष्ट पॉडकास्ट: बिटकॉईन क्रिप्टोकरन्सीवर भारतात बंदी येण्याची शक्यता का आहे? | सोपी गोष्ट 476 24.11.2021 5:57
23 नोव्हेंबरला केंद्र सरकारनं जाहीर केलं की भारतात बिटकॉईनसारख्या डिजिटल करंसीविषयी कायदा बनवण्याच्या दिशेनं काम सुरू झालं आहे. यंदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यासंदर्भातलं विधेयक मांडलं जाणार आहे. क्रिप्टो करंसीवर कायद्याची गरज का आहे आणि मुळात क्रिप्टो करन्सी काय असते? संशोधन – अमृता दुर्वे, मोहम्मद शाहीद लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत देशात अव्वल का नाही? | सोपी गोष्ट 475 24.11.2021 4:52
भारतात गावं-शहरं स्वच्छ ठेवण्याची मोहीम रुजावी यासाठी केंद्र सरकारनं 2016 साली स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार सुरु केले. त्यात गेली सलग पाच वर्ष इंदूरनं बाजी मारली आहे. पण या सर्वेक्षणात महाराष्ट्र नेमका कुठे आहे? गाडगे महाराजांचं राज्य स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या स्थानावर का नाही? महाराष्ट्रातली शहरं स्वच्छ राखण्यात कोणत्या अडचणी आहेत? लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- निलेश भोसले
Podcasts parecidos
O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos