आरोग्यम्

आरोग्यम् (Aarogyam- Marathi podcasts on Health & Wellness)

Health MR ↓ 32 episódios

आरोग्यम् धनसंपदा असं म्हणतात. प्रत्येकाने आपले आरोग्य कसे सांभाळले पाहिजे, काही विकार झालाच तर त्यावर कशी मात करता येऊ शकते, विविध रोगांवरच्या उपचारपद्धती नेमक्या कशा आहेत, कोणता विकार झाल्यास काय उपचार घेता येतात, फीट् आणि हेल्दी राहण्यासाठी उत्तम जीवनशैली कोणती …आपल्या मनातील अशा कितीतरी प्रश्नांची उलगड आरोग्यम् या आपल्या पॉडकास्टवर मान्यवर डॉक्टर्स, विषयतज्ज्ञांकडून केली जाणार आहे. उत्तम आरोग्यासाठी हे एक उत्तम श्रवण…त्याचा जरुर आस्वाद घ्या आणि निरोगी राहा….आनंदी राहा!प्रस्तुतकर्ता:  संतोष देशपांडे (Mediacura Infoline)

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: audioboom.com

Autor

आरोग्यम्

Categoria

Health

Site do podcast

audioboom.com

Último episódio

7 de mai de 2024

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

`कोव्हिशिल्ड` लस सुरक्षित आहे का? 07.05.2024

कोरोनाच्या काळात वेळेत लसीकरण झाल्याने आपल्याकडील मोठी प्राणहानी टळली. मात्र, अलीकडे कोव्हिशिल्ड लस घेतल्याने दुष्परिणाम होत असल्याच्या काही बातम्यांनी लोकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण तयार होऊ लागले. या पार्श्वभूमीवर, या लसीकरणामुळे खरेच असे काही दुष्परिणाम दिसून आले आहेत का, असतील तर त्याची काय कारणे आहेत, सर्वसामान्य लोकांनी अशा बातम्यांमुळे चिंतित व्हावे या विषयावर संतोष देशपांडे यांनी बोलते...

स्ट्रोक (लकवा), ४.५ तास आणि स्ट्रोक-रेडी हॉस्पिटल 26.10.2023

पक्षाघात म्हणजेच स्ट्रोक (ज्याला लकवा असंही संबोधलं जातं) हा एक प्राणघातक आजार, जो कधीही उद्भवू शकतो. ब्रेन स्ट्रोक गंभीर असला तरी त्याची लक्षणे जाणवताच, पहिल्या साडेचार तासांत उपचार मिळाले तर रुग्ण पूर्णतः बरा होण्याची शक्यता असते. हे कसे घडू शकते, या विषयावर संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे, पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथील न्यूरो ट्रॉमा विभागाचे संचालक डॉ. कपिल झिरपे यांना. यानिमित्ताने, एकू...

वेदनामुक्तीचं शास्त्र 31.08.2023

वेदना व्यवस्थापन म्हणजेच पेन मॅनेजमेंट ही महत्त्वपूर्ण वैद्यकशाखा. मात्र, आपल्याकडे अजूनही त्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. रुग्णाला वेदनामुक्त होता येतं का, अन्य आजार, त्यांवर उपचार सुरु असताना पेन मॅनेजमेंट हे उपचारतंत्र कसं काम करतं, साध्या सांधेदुखीपासून ते कर्करोगासारख्या दुर्धर आजारापर्यंत वेदनांवर स्वतंत्र उपचार घेता येतात का, असे उपचार नेमके काय असतात ? या व अशा अनेक प्रश्नांची उलगड पुण...

29: बाळासाठी आईचं दूध अतिमहत्त्वाचं! 02.08.2023

नवजात बालकासाठी आईचं दूध हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्याकडे आईचं दूध बाळासाठी महत्त्वाचं आहे, हे मान्य होत असले तरी त्यासाठी परिस्थिती आणखी अनुकूल बनणं गरजेचं आहे. घर असो वा कार्यालय, तेथे कार्यरत प्रत्येक घटकाने ही गोष्ट कशी समजून घ्यायला हवी, या विषयावर पुण्यातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना पडळकर यांनी साधलेला हा संवाद. जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने, या सहसा फारशी चर्चा न होणा...

28: हृदयरोग उपचारातील आधुनिक तंत्र 06.04.2023

हृदयरोग उपचार प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाने मोलाची भर घातली आहे. या तंत्रांचा नेमका कोणता फायदा आता रुग्णांना निदान व उपचारांत होतो आहे, त्यामुळे शस्त्रक्रियांचा सक्सेस रेट किती वाढला आहे, गंभीर व्याधी असणाऱ्या रुग्णांवर हृदयउपचार घेताना या तंत्रज्ञानाचा कोणता लाभ होणार आहे, हृदविकाराचे निदान करणाऱ्या तपासण्यांचा उद्देश काय असतो आणि त्यानंतर उपचाराची दिशा कशी ठरते या व अशा तुमच्या मनातील अनेक प्...

27: होमिओपॅथी समजून घेताना.... 16.02.2023

होमिओपॅथी उपचारपद्धती अनेकांनी अनुभवली आहे. तरीही त्याविषयी कित्येकांच्या मनात काहीसं कुतुहल तर बऱ्याच प्रमाणात शंकाही आहेत. पुण्यातील प्रसिद्ध डॉ. ठाकूर्स होमिओपॅथीचे प्रमुख डॉ. सचिन ठाकूर आणि डॉ. मेघा ठाकूर यांनी आरोग्यम् पॉडकास्टच्या या माध्यमातून संतोष देशपांडे यांच्यासमवेतच्या संवादातून होमिओपॅथी उपचारपद्धती सोप्या शब्दांत उलगडून दाखवतानाच, त्याविषयीच्या शंकांचेही निरसन केले आहे. होमिओपॅथी जा...

26: कोविडची नवी लाट...आपल्यासाठी घातक?? 23.12.2022

कोविडचा नवा व्हॅरिएन्ट BF.7 ने चीनमध्ये खळबळ माजवली आहे. जगातील अनेक देशांसह भारतातही त्याचा प्रसार होत असल्याच्या बातम्यांमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. अशा वेळी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ या परिस्थितीकडे कसे पाहतात, हे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच, आरोग्यम् च्या या विशेष भागामध्ये प्रसिद्ध अतिदक्षतातज्ज्ञ डॉ. कपिल झिरपे यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. यातून पुढे...

25: महाराष्ट्राचे आरोग्य अन् आरोग्यमंत्र्यांचे उपचार 14.12.2022

देशातील अत्यंत महत्त्वाच्या म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य खात्याची धुरा वाहणारे डॉ. तानाजी सावंत प्रथमच `आरोग्यम्` या आपल्या लोकप्रिय मराठी पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर खास आले अन् मनमोकळे बोलतेही झाले. राज्याच्या आरोग्याची धुरा वाहताना, त्यांना जाणवलेल्या गोष्टी, आव्हाने, त्यावर त्यांनी शोधलेली उत्तरे, अल्पकाळातच राबवलेल्या विविध संकल्पना आणि एकूणच, राज्याच्या आरोग्याविषयक त्यांचा दृष्टिकोन यांची...

24: कॅन्सरची चाहूल....काय असावे पहिलं पाऊल? 09.06.2022

कर्करोग म्हणजेच कॅन्सर हा शब्द ऐकला तरी घाबरायला होतं, इतकी त्याची धास्ती सर्वांना असते. अशा स्थितीत, कॅन्सर नेमका कसा होतो, त्याची प्राथमिक लक्षणं काय असतात, त्याचे निदान कसे होते, निदान झाल्यानंतर उपचाराची दिशा कशी ठरते हे सारं आपणास ठाऊक असणं गरजेचं आहे. पुण्यातील प्रसिद्ध कॅन्सरतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांनी अत्यंत साध्या-सोप्या शब्दांत आरोग्यम् पॉडकास्टमध्ये हे सारं उलगडून दाखवलं आहे संत...

23: कोविडपश्चात आरोग्याची निगा! 28.04.2022

कोविडच्या तीन लाटांमध्ये सर्वांनाच कोविडसह विविध आजारांना तोंड द्यावं लागलं. कोविडचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी, इतर आजार बळवण्याची शक्यता आता वाढली आहे, त्यामुळे कोविडपश्चात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आपली जीवनशैली कशी असावी, मधुमेह असलेल्या रूग्णांनी काय विशेष काळजी घेतली पाहिजे आणि आपलं आरोग्य उत्तम कसं ठेवावं, यासारख्या तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, पुण्यातील प्रसिद्ध अत...

22: लिव्हर फिट, तो जिंदगी हिट! 26.03.2022

काळीज... म्हणजेच यकृत किंवा लिव्हर... लिव्हर निरोगी असेल तर ते शरीरातील इतर अवयवांनाही फिट ठेवतं. त्यामुळे लिव्हरचं शारीरिकदृष्ट्या महत्त्व काय आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट केव्ह  केल  जातं? त्यासाठी डोनरचे निकष काय, लिव्हर हेल्दी ठेवायच  म्हणजे नक्की काय करायचे...अशा तुमच्या मनातील अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, जागतिक कीर्तीचे यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ आणि पुण्यातील सह्याद्रि हॉस्पिट...

21: 'ओमायक्रॉन'चं संकट कसं हाताळावं? 13.01.2022

कोरोनाची तिसरी लाट आता सर्वत्र पसरलेली आहे. अनेकांना त्याचे परिणाम दिसून येत आहेत. कोरोनाचाच नवा व्हेरियंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओमिक्रॉन किंवा ओमायक्रॉन इतरांना झपाट्याने बाधित करतो आहे. या पार्श्वभूमीवर, ओमायक्रॉन कितपत धोकादायक आहे, तो नेमके काय करतो, बाधित रुग्णांनी नेमके काय करावे, या संसर्गापासून दूर राहण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, लसीकरण झाले तरीही हा संसर्ग होऊ शकतो का...या व अशा अनेक...

20: हृदयसंकल्प! 30.12.2021

नवे वर्ष म्हटले की संकल्पही आलेच. संकल्प हे अनेक प्रकारचे असतात, पण आरोग्य उत्तम राखण्याचा संकल्प हा अतिशय महत्त्वाचा, सर्वोच्च प्राधान्याचा असायला हवा. सन २०२२ मध्ये प्रवेश करताना, 'आरोग्यम्'च्या या विशेष भागामध्ये प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी 'हृदयसंकल्प' ही संकल्पना मांडली आहे. हा हृदयसंकल्प म्हणजे नेमके काय, तो का आणि कसा करावा? हृदयविकारासारख्या आजारांपासून स्वतःला दूर ठेवण्य...

19: गुपित 'सेक्स लाइफ'चं! 28.10.2021

प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात सेक्स लाइफ सुरळीत असणं किती महत्त्वाचं आहे, आरोग्याच्या दृष्टीकोनातून सेक्स लाइफ कसं असावं, त्याबाबतचे समज-गैरसमज काय आहेत, कोरोनानंतर सेक्स लाइफ कशी बदललीय, तरूणाई सेक्स लाइफकडे कोणत्या नजरेतून बघते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लैंगिक समस्यांवर तज्ञ्जांचं मार्गदर्शन घेणं किती महत्त्वाचं आहे या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत अँड्रोलॉजिस्ट डॉ. राजीव चौधरी यांनी...

18: भूलशास्त्राच्या नजरेतून... 14.10.2021

भूल म्हणजेच ज्याला वैद्यकीय भाषेत अॅनेस्थेशिया असं संबोधलं जातं. बहुतांश शस्त्रक्रियांमध्ये रुग्णाला भूल देऊनच ती शस्त्रक्रिया केली जाते. अशावेळी अत्यंत महत्त्वाची भूमिका असते, ती भूलतज्ज्ञाची. आपण कोणतेही उपचार घेणार असू, अथवा कोणतीही लहानमोठी शस्त्रक्रिया आपल्यावर होणार असेल तर भूलतज्ज्ञ नेमके काय करतात, त्यांचे कार्य किती महत्त्वाचे असते, हे जाणून घेणे आवश्यक ठरते. एरव्ही भूल देणाऱ्या तज्ज्ञाच्...

17: कोविडनंतरच्या विविध साथी आणि डेंग्यू 02.09.2021

कोविडची दुसरी लाट नियंत्रणात येते आहे, असं चित्र असतानाच अनेकांना डेंग्यूसदृश्य अन्य आजारांनाही सामोरे जावे लागते आहे. आपल्याला होणारा कोणताही त्रास म्हणजे कोविड तर नव्हे ना, अशी शंका अनेकांच्या मनात येते. याच विषयावर मार्गदर्शन केले आहे, पुण्यातील प्रसिद्ध सह्याद्रि रुग्णालयाचे नामवंत फिजिशियन डॉ. अतुल जोशी यांनी.

16: 'आयव्हीएफ'चे वरदान! 24.07.2021

ज्यांना बाळ होण्यात काही अडचण असेल, अशा जोडप्यांसाठी आयव्हीएफ उपचारतंत्र म्हणजे एक वरदानच ठरले आहे. मातृत्वाचा आनंद देणारे हे उपचारतंत्र नेमके कसे असते, कोणासाठी असते, ते कितपत सुरक्षित असते, त्यासाठी योग्य वेळ कोणती असावी या व यांसारख्या अनेक प्रश्नांची उलगड करणारा हा विशेष पॉडकास्ट. जागतिक कीर्तीच्या आयव्हीएफ स्पेशालिस्ट डॉ. सुप्रिया पुराणिक यांसोबत आयव्हीएफ उपचारतंत्राबाबत रंगलेला हा संवाद केवळ...

15: कोविडनंतर फुफ्फुसांची काळजी कशी घ्यावी? 10.07.2021

आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये फुफ्फुसांचं कार्य अत्यंत महत्त्वाचं असतं. फुफ्फुसे आणि एकूणच श्वसनयंत्रणा चांगली राखणे किती गरजेचं आहे, हे कोविडच्या संक्रमणाने दाखवून दिले आहे. म्हणूनच, फुफ्फुसांचे आरोग्य कसे सांभाळावे, श्वसनयंत्रणा धोक्यात आणणारे आजार कोणते आहेत, त्यांपासून दूर कसे राहता येईल, कोविड होऊन गेल्यानंतर त्याचा श्वसनयंत्रणेवर नेमका काय परिणाम होऊ शकतो इथपासून ते लसीकरणामुळे खरंच आपण सुरक्...

14: कोरोना, मधुमेह आणि दीक्षित डाएट... 30.06.2021

जगभरातील कोट्यवधी लोकांना 'दीक्षित डाएट'च्या माध्यमातून डायबेटिसशी यशस्वी लढा देता आला आहे. मात्र, कोरोनाच्या काळात डायबेटिस रूग्ण किंवा मधुमेहींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. आता अनेकांना यावर मात करता येईल की नाही हा प्रश्न भेडसावतो आहे, त्याचं उत्तर दिलं आहे थेट डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी 'आरोग्यम्'च्या या विशेष पॉडकास्टमध्ये. तुम्हीही ऐका आणि इतरांनाही ऐकवा.  ‘आरोग्यम्’चे इतर पॉडकास्ट...

13: आरोग्याची सायकल सफर... 03.06.2021

सायकलिंग हा केवळ छंद नसून तो ध्यास कसा बनू शकतो हे दाखवून दिलंय एका सायकलवीर अवलियाने... जागतिक सायकल दिनाचं औचित्य साधून 'आरोग्यम्' सिरीजमधल्या या पॉडकास्टमध्ये आपण बोलतं केलं आहे डॉ. रामदास महाजन यांना! सायकलिंगचे विविध अनुभव, सायकल आणि आरोग्य अशा अनेक विषयांवर महाजन यांनी दिलखुलास संवाद साधला आहे... तेव्हा हा पॉडकास्ट नक्की ऐका आणि इतरांनाही आवर्जून ऐकवा!  ‘आरोग्यम्’चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क...

12: म्युकोरमायकोसिस: धोका, निदान, उपचार आणि प्रतिबंध! 19.05.2021

कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यानंतर अनेकांना त्याच्या उर्वरित आणि भयंकर परिणामांना सामोरं जावं लागतंय. यापैकी एक आणि विचित्र परिणाम म्हणजे म्युकोरमायकोसिस. हा आजार नक्की कशामुळे होतो, त्यावर उपचार काय असतात, हा आजार ओळखावा कसा यावर मार्गदर्शन केलं आहे अतिदक्षतातज्ज्ञ डॉ. कपिल झिरपे यांनी. त्यांच्याशी संवाद साधला आहे संतोष देशपांडे यांनी. तेव्हा हा पॉडकास्ट आवश्य ऐका आणि तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्...

11: कोरोना आणि लहान मुलांचे आरोग्य! 12.05.2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका मोठ्यांसह लहानांनाही होताना दिसतोय. कोरोना संसर्गामुळे लहान मुलंही बाधित होत आहेत. हे प्रमाणे यावेळी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, त्यांची टेस्ट करता येते का, कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काय अधिकची काळजी घ्यावी आणि  दुर्दैवाने लहान मुलांना कोरोना झालाच तर त्यावर मात करण्यासाठी पालकांसह मुलांनी काय करावं अशा आपल्या मन...

10: कोरोना- भिऊ नका, लस पाठीशी आहे! 04.03.2021

कोरोनाची पुन्हा एकदा लाट येऊ घातल्याच्या शक्यतेनं सर्वसामान्यांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण आहे. त्याचवेळी या नवीन स्ट्रेनची लक्षणं कुठली आहेत, लसीकरण सुरु होत आहे तर आपण लस घ्यावी की न घ्यावी, लस घेतल्यानंतरही आजारी पडण्याची शक्यता असते का, अन्य औषधे सुरु असताना लस घेता येते का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या नव्या संकटाला आपण सारेजण आत्मविश्वासानं कसं सामोरे जाऊ शकू यावर पुण्यातील प्रसिद्ध फिजि...

9: कोरोना - आयसीयू, रूग्ण अन् उपचार 01.09.2020

कोरोनाचा उद्रेक सर्वत्र झालेला असताना रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर होत असलेले उपचार नेमके कसे होतात, टेस्ट प्रत्येकाने करायला हवी का? टेस्ट पॉझिटिव्ह आली तर रुग्णाला थेट आयसीयू मध्ये दाखल केले जाते का? आयसीयू मध्ये उपचार नेमके कसे केले जातात? गंभीर रुग्णावर कोणती औषधं प्रभावी ठरताना दिसतात? अनलॉक प्रक्रिया सुरु असल्याने सद्यस्थितीत संसर्गापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी नेमकं काय करायला हवं....

8: कहाणी... एका नेत्रोपचार चळवळीची! 08.08.2020

सर्वसामान्य लोकांना उत्तम दर्जाचे आणि माफक दरात नेत्रोपचार मिळावेत, हे मिशन घेऊन पुणे अंधजन मंडळाने एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल उभारले. आजवर लक्षावधी लोकांना दृष्टीदान देणारे हे मिशन उलगडून सांगताहेत, या हॉस्पिटलचे एक प्रवर्तक, मुख्य वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. मदन देशपांडे.   ‘आरोग्यम्’चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा – https://audioboom.com/channels/5020896

Ouça o podcast आरोग्यम् (Aarogyam- Marathi podcasts on Health & Wellness) no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos