BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
इस्रायली सैन्य जेनिनमध्ये का घुसलं? BBC News Marathi 10.07.2023 4:48
3 जुलै 2023 रोजी शेकडो इस्रायली सैनिक, ड्रोन्स आणि बुलडोझर्सच्या सोबत जेनिनमध्ये घुसले. दोन दिवस ही कारवाई चालली आणि यादरम्यान चकमकी उडाल्या. त्यात 12 पॅलेस्टिनी मारले गेले आणि एका इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाला. पण जेनिनमध्ये भडका का उडाला? हा रेफ्युजी कँप नेमका कुठे आहे आणि तिथल्या घडामोडींचे काय पडसाद उमटू शकतात, जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
चंद्रयान-3 मोहीम कशी असेल? BBC News Marathi 06.07.2023 5:10
जुलै महिन्याच्या मध्यावर चंद्रयान-3 अवकाशात झेपावेल असं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोनं जाहीर केलं आहे. चंद्रयान-3 हे भारताच्या चांद्र अभियानातलं तिसरं यान आहे. या मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा म्हणजे अलगदपणे यान उतरवण्याचा प्रयत्न केला जाईल. ही मोहीम कशी असेल आणि ती का महत्त्वाची आहे? लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
SCO परिषद भारतासाठी का महत्त्वाची? BBC News Marathi 06.07.2023 5:10
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं अध्यक्षपद यंदा भारताकडे असून दिल्लीत 4 जुलै 2023 रोजी या संघटनेच्या व्हर्च्युअल परिषदेत सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले होते. पण ही संघटना कशी स्थापन झाली आणि ती नेमकं काय काम करते? भारत त्यात का सहभागी झाला आहे? जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
समान नागरी कायदा आला तर हिंदूंचंही नुकसान होऊ शकतं का? BBC News Marathi 01.07.2023 6:22
Uniform Civil Code अर्थात समान नागरी संहिता देशात लागू करण्यावरून सध्या राजकारण तापलंय. भाजप आणि उजव्या विचाराच्या संघटना आक्रमक झालेल्या दिसतायत तर दुसरीकडे याला विरोध करणारेही जोरात आहेत. UCC आला तर इतर धर्मांचे पर्सनल लॉ हद्दपार होतील हा एक भाग. पण यामुळे हिंदू समाजाचंही नुकसान होऊ शकतं का? यावरून काय राजकारण चाललंय? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – शौतिक बिस्वास, प्रियंका झा ले...
एका तरुणाच्या मृत्यूनंतर का पेटलाय फ्रान्स? BBC News Marathi 01.07.2023 4:53
17 वर्षांचा नाहेल M नावाचा एक तरुण पॅरिसजवळच्या नॉनटेअर उपनगरात गाडी चालवत असताना पोलिसांनी त्याची गाडी अडवली. पोलिसांनी त्याच्यावर बंदूक रोखली, पण त्या तरुणाने गाडी पळवली, त्यामुळे त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. ती गाडी पुढे जाऊन धडकली, पण तोवर नाहेलच्या छातीत गोळी घुसली होती. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सध्या पॅरिसभोवतीचा भाग पेटला आहे. एका किशोरवयीन मु...
नवऱ्याच्या संपत्तीत गृहिणींचा समान वाटा असतो का? BBC News Marathi 29.06.2023 5:13
पत्नीचाही पतीच्या संपत्तीत समान वाटा असू शकतो का? याच एका प्रश्नाचं उत्तर हायकोर्टाच्या ताज्या एका आदेशातून मिळताना दिसतंय. तज्ज्ञांनुसार हा एक मोठा निर्णय आहे, यामुळे पहिल्यांदाच एखाद्या न्यायालयाने पतीच्या कमाईत पत्नीच्या योगदानाला मान्यता दिली आहे, तसंच गृहिणींच्या संपत्तीच्या अधिकाराची व्याप्ती वाढवली आहे. काय आहे हे प्रकरण? आता यामुळे काय बदलणार? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन...
पुरात स्वतःचा जीव कसा वाचवाल? मृत्यू कसा टाळाल? BBC News Marathi 28.06.2023 5:53
गेल्या काही वर्षांमध्ये भारताने, महाराष्ट्राने सातत्याने पूर आणि पुरामुळे होणारं नुकसान पाहिलंय. सरकारी आकडेवारीनुसार देशाच्या एकूण 329 दशलक्ष हेक्टर क्षेत्रफळापैकी 40 दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र पूरप्रवण आहे. आणि दरवर्षी हे क्षेत्र वाढत चाललंय. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA)नुसार दरवर्षी सरासरी 75 लाख हेक्टर भागात पूर येतो, त्यात सुमारे 1600 जीव गमावले जातात, आणि पिकं, घरं आणि...
बंड फसलं, आता पुतिन पुढे काय करतील? BBC News Marathi 26.06.2023 4:37
वागनर ग्रुपचं बंड अवघ्या 24 तासांत मोडलं. पण या घडामोडी म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना बसलेला मोठा धक्का आहे, असं अनेक तज्ज्ञांना वाटतं. पुतिन यापुढे काय पावलं उचलतील? वागनर ग्रुपचं काय होईल? युक्रेन युद्धावर आणि पर्यायानं जगावर याचा काय परिणाम होईल? जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
मान्सून आणि अर्थव्यवस्था यांचं काय कनेक्शन? BBC News Marathi 24.06.2023 5:44
साधारणपणे 1 जूनला मान्सून येणार, असं सांगितलं जातं. पण यंदा तर जूनचे तीन आठवडे उलटून गेल्यावरही मान्सूनचा काही थांगपत्ता नाही. मान्सून यावा आणि त्याने पुरेसं बरसावं, अशी अपेक्षा फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेतल्या सर्वच घटकांना असते. पण का? भारतीय अर्थव्यवस्थेचं आणि मान्सूनचं हे नातं काय आहे? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – मानसी देशपांडे, बीबीसी मराठीसाठी लेखन, निव...
‘वर्क फ्रॉम होम’ बंद झाल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे का? BBC News Marathi 23.06.2023 4:15
लॉकडाऊनमध्ये आपल्यापैकी अनेकांनी पायजामे किंवा बॉक्सर्समध्येच घरून कामं केली, मीटिंग्स, प्रेझेंटेशन्स अटेंड केले. पण आता कोरोना मागे पडलाय, ऑफिसेस पूर्णपणे उघडलीयेत आणि म्हणून वर्क फ्रॉम होमचा पर्याय कंपन्या काढून घेतायत. त्यामुळेच की काय अनेक जण, प्रामुख्याने महिला ऑफिसला दररोज जाण्यापेक्षा नोकरी सोडणं पसंत करताना दिसतायत. असं का होतंय? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – सुशील सिंह,...
सेन्सॉर बोर्ड कसं काम करतं? आदिपुरुषवर रिलीजनंतर बंदी येऊ शकते? BBC News Marathi 22.06.2023 5:18
‘आदिपुरुष’ या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत 200 कोटींची कमाई तर केलीय, पण अनेकांनी यातले संवाद आणि पात्रं पाहून या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केलीय. खरंतर हा विषय फक्त आदिपुरुषपुरता मर्यादित नाहीय; ‘द केरला स्टोरी’, ‘द काश्मीर फाईल्स’, ‘पद्मावत’ पासून ते अगदी ‘आंधी’ आणि ‘बँडिट क्वीन’पर्यंत, आजवर अनेक सिनेमे बॅन झालेत किंवा त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी रिलीजच्या आधी आणि नंतरही झाली आहे. पण ज्...
ITR कसा फाईल करायचा? जाणून घ्या सोप्या शब्दांत | BBC News Marathi 22.06.2023 6:06
दरवर्षी 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयकर परतावा दाखल करणं अपेक्षित असतं. पण इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय, ते का भरायला हवं आणि त्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया काय आहे, जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग - अरविंद पारेकर
सोपी गोष्ट : पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात 'या' गोष्टींवर चर्चा होणार नाहीच 21.06.2023 5:17
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
तुम्हालाही एका झटक्यात कॅब मिळत नाही? 20.06.2023 4:52
अगदी ऐनवेळी ड्रायव्हरने कॅब रद्द केल्याने अनेकांना समस्येचा सामना करावा लागलेला असू शकतो. कधीकधी हे ड्रायव्हर तुम्हाला स्वतःहून कॅब रद्द करायलाही भाग पाडतात. पण मुळात कोठेही जाण्यासाठी आपण कॅब बुक केली तर ड्रायव्हर ऐनवेळी ती रद्द करू शकतात का? हे ग्राहक हक्कांचं उल्लंघन आहे का? असं घडलं तर काय ग्राहक म्हणून काय करावं? वार्तांकन - पेडागडी राजेश, बीबीसी तेलुगू लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग...
परदेशात शिक्षणाला जायचंय? मग हे ऐकाच 17.06.2023 5:15
परदेशात शिकायची इच्छा कुणाची नसते? परदेशी डिग्री, मोठ्या पगाराची नोकरी करायची, आणि जमलंच तर तिथलंच नागरिकत्व असं स्वप्न अनेकांचं असतं. पण ज्या भरवशावर तुम्ही तिथे शिक्षणासाठी गेलात, ती कागदपत्रंच खोटी निघाली तर? अलिकडेच अशी 700 प्रकरणं समोर आली आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? आपल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून काय करायला हवं? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – न...
परदेशात शिक्षणाला जायचंय? मग याकडे लक्ष द्या 16.06.2023 5:15
परदेशात शिकायची इच्छा कुणाची नसते? परदेशी डिग्री, मोठ्या पगाराची नोकरी करायची, आणि जमलंच तर तिथलंच नागरिकत्व असं स्वप्न अनेकांचं असतं. पण ज्या भरवशावर तुम्ही तिथे शिक्षणासाठी गेलात, ती कागदपत्रंच खोटी निघाली तर? अलिकडेच अशी 700 प्रकरणं समोर आली आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? आपल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून काय करायला हवं? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – न...
रक्तदान कुणी करावं? कुणी करू नये? 6 प्रश्न, 6 उत्तरं | BBC News Marathi 14.06.2023 4:47
जगभरात 14 जून हा दिवस 'जागतिक रक्तदान दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रक्तदानाची गरज, त्याचं महत्त्व आणि फायदे याबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. रक्तदान करण्यासाठी काही विशिष्ट बाबींची पूर्तता करणं आवश्यक असतं. जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेनं (NACO) यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रक्तदानाविषयी 6 मुद्द्यांमध्ये समजून घेऊया. लेखन - ट...
प्रेमात क्रूर गुन्हे कसे घडतात? अशा गुन्हेगारांचा शोध कसा लागतो? BBC News Marathi 13.06.2023 5:44
मुंबईजवळच्या मीरा रोड परिसरात एका 56 वर्षीय पुरुषाने त्याच्यासोबत राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेची हत्या केली, तिच्या शरीराचे तुकडे केले आणि काही विचित्र प्रक्रिया करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे सर्वांनाच काही महिन्यांपूर्वीच्या श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण झाली. खरंतर अशा प्रकारची ही काही घटना पहिली नव्हती. पण खरंच इतका क्रूर प्रकार कुणी कसं करू शकतं? आणि असं करून ही या...
मुलांना ऑनलाईन सुरक्षित कसं ठेवायचं? त्यांचा खासगीपणा कसा जपायचा? BBC News Marathi 13.06.2023 4:38
मुलांनी फोन्स - टॅब्स वापरण्याचं प्रमाण आता वाढलंय. कधी गेमिंग, कधी व्हीडिओज - सोशल मीडियाचा टाईमपास किंवा मग ऑनलाईन शाळा - क्लास - अभ्यास यासाठीसुद्धा. मग ती नेमकं काय पाहतायत, ऑनलाईन काय करतायत यावर बारीक लक्ष देणं पालकांसाठी अशक्य. मग तुमच्या मुलांची ऑनलाईन प्रायव्हसी जपण्यासाठी, ऑनलाईन जगातल्या धोक्यांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन - न...
चक्रीवादळांचा कालावधी वाढतो आहे का? BBC News Marathi 12.06.2023 5:12
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
ओडिशा रेल्वे अपघाताची चौकशी CBI का करणार आहे? BBC News Marathi 08.06.2023 5:34
ओडिशाच्या बालासोर रेल्वे अपघाताची चौकशी CBIला सोपवण्यात आलीय. तीच CBI जिला सुप्रीम कोर्टाने ‘पिंजऱ्यात बंद पोपट’ म्हटलं होतं, जिचा गैरवापर सत्ताधारी करत असल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्ष करतात. खरंतर अशा रेल्वे अपघातांचा तपास स्वतः भारतीय रेल्वे करतं. मग ओडिशा अपघाताची चौकशी CBIकडे का? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन - चंदन कुमार जजवाडे लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरव...
चक्रीवादळं कुठून कशी येतात? त्यांची नावं कोण ठेवतं? 5 प्रश्न, 5 उत्तरं | BBC News Marathi 08.06.2023 5:35
आतापर्यंत मान्सून मुंबई किंवा कोकणातच काय तर केरळमध्येही पोहोचलेला नाही. दुसरीकडे अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ घोंघावतंय. या वादळामुळे मान्सून लांबलाय का? मुळात चक्रीवादळ काय असतं? त्याचं नाव कोण ठेवतं? जाणून घेऊ 5 बेसिक प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्ट मध्ये. संशोधन - टीम बीबीसी मराठी लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
रायगड अजूनही UNESCO जागतिक वारसा स्थळांच्या यादीत का नाहीय? BBC News Marathi 05.06.2023 6:48
रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी. इथेच हिंदवी स्वराज्याची स्थापनी झाली, महाराजांचा राज्याभिषेक झाला. खरंतर 800 वर्षं जुन्या या किल्ल्याने त्याच्या आधी आणि त्याच्या नंतरही बरंच काही पाहिलंय. मग असा समृद्ध इतिहास असलेल्या हा किल्ला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान का नाही? या यादीत कुणाला स्थान मिळतं? आणि त्याने खरंच काय बदलतं? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवे...
अहमदनगर ते अहिल्यानगर: नामांतर खरंच कसं होतं? BBC News Marathi 01.06.2023 5:33
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
धूम्रपान सोडायची इच्छा असेल तरीही सोडता का येत नाही? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट 31.05.2023 5:25
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.