BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

Health MR ↓ 963 episodes

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Author

BBC Marathi Audio

Category

Health

Podcast website

www.bbc.co.uk

Latest episode

Mar 25, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

अक्षय कुमारने भारताचं नागरिकत्व कसं मिळवलं? | BBC News Marathi 16.08.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

केंद्र सरकारच्या या निर्णयाने पेन्शनधारकांना आलंय टेन्शन? | BBC News 15.08.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

हवाईत वादळानं आग कळशी पेटवली? BBC News Marathi 15.08.2023

हवाईच्या माऊई बेटावरचं लहायना हे अख्खं शहर या वणव्यात बेचिराख झालं आहे. ही विनाशकारी आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास अजून सुरू आहे. पण हा वणवा कोरडं, उष्ण वातावरण आणि वादळी वारे यांमुळ जास्त पसरला आहे, यावर बहुतांश तज्ज्ञांचं एकमत झालंय. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

चंद्रयान 40 दिवसांत चंद्रावर, मग रशिया 10 दिवसांत चंद्र कसा गाठणार? BBC News Marathi 12.08.2023

तब्बल 47 वर्षांनंतर रशियाचं एक रॉकेट चंद्राच्या दिशेने झेपावलंय. पण रशियाचं हे लुना 25 रॉकेट भारताशी अक्षरशः स्पर्धा करतंय. आणि त्याला इस्रोच्या चंद्रयानच्या आधी चंद्रावर पोहोचायचंय. असं खरंच शक्य आहे का? आणि रशियाला भारताच्या आधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड का करायचंय? समजून घेऊ या.. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर

कर्ज वसुलीची प्रक्रिया काय असते? बँकेचे एजंट धाक दाखवत असतील तर काय? BBC News Marathi 11.08.2023

प्रत्येकाला पैशांची गरज असते, पण कर्ज नकोय. फेडणार कोण? एखादा कर्जाचा हफ्ता चुकला तर काय - आपली गाडी, घर जप्त होईल का? असे कॉल्स आणि असलं टेन्शन तुम्हालाही येत असेल. आपण एखादं कर्ज फेडताना एखादा हफ्ता चुकला की काय होईल? बँक कधी तुमच्या घरी एजंट पाठवून जप्ती करू शकतं? आणि कर्ज घेताना तुमचे काय अधिकार आहेत? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर

मोदी सरकार 'हा' कायदा आणून तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकेल का? BBC News Marathi 09.08.2023

3 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय संपर्क, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत The Digital Personal Data Protection Bill, 2023 मांडलं. मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की या विधेयकाद्वारे भारतीय नागरिकांची डिजिटल प्रायव्हसी सुरक्षित ठेवणारा देशातला पहिला कायदा बनेल. नागरिकांच्या डेटाचा गैरवापर रोखण्यासाठी दोषींना शिक्षेची तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे. लेखन, निवेदन...

शाळा, कॉलेजमध्ये मुलांची रॅगिंग झाली तर काय करावं? BBC News Marathi 09.08.2023

कॉलेजचे दिवस आयुष्यातले बेस्ट दिवस असे म्हणतात. पण अशात काही जणांसाठी कॉलेज हा एक धक्कादायक अनुभव असतो... तो रॅगिंगमुळे. आता काळ बदललाय तसं रॅगिंगचं स्वरूप आणि व्याख्याही. आज रॅगिंग म्हणजे नेमकं काय? ते फक्त कॉलेजमध्येच होतं का, की शाळेतही होऊ शकतं? आणि तुमच्यासोबत किंवा तुमच्या मुलांसोबत रॅगिंग झाली तर काय करावं? पाहू या सोपी गोष्टमध्ये... वार्तांकन - रवी प्रकाश, बीबीसी हिंदीसाठी लेखन, निवेदन - ग...

इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपली आहे का? BBC News Marathi 08.08.2023

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनाम तोशाखाना प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झाली असून त्यांना तीन वर्षांसाठी कारावासाची शिक्षा सुनाण्यात आली आहे. या शिक्षेमुळे ते येत्या निवडणुकीत लढण्यासाठी अपात्र ठरतील. मग ही इम्रान यांच्या राजकीय कारकीर्दीची अखेर मानायची का? जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

चित्त्यांचे मृत्यू थांबत का नाहीयेत? खरंच रेडिओ कॉलरमुळे चित्ते दगावतायत का? | BBC News Marathi 04.08.2023

नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आलेल्या एकूण 20 चित्त्यांपैकी एकापाठोपाठ एक 9 चित्त्यांचे मृत्यू झालेत. इथे चार बछड्यांना जन्मही दिला, पण त्यापैकीही तीन दगावले. यासाठी कुणी या चित्त्यांच्या मानेभोवती लावलेल्या रेडिओ कॉलरला दोष देतंय तर कुणी वातावरणाला. खरंच या चित्त्यांचे मृत्यू का होतायत? आणि ते रोखायला भारताने काय करायला हवं? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये....

डेंग्यू कसा होतो? लक्षणं, उपचार, निदान काय? | BBC News Marathi 02.08.2023

पावसाळा येताच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यात डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश असतो. महाराष्ट्रातही दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असतात. यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे. अशात हा आजार नेमका काय आहे? तो कसा होतो आणि त्यापासून बचाव कसा करायचा? समजून घेऊयात. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले

ITR Filing: आयकर परतावा अजूनही भरला नाही? आता काय कराल? | BBC News Marathi 01.08.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली तर तुम्हीही श्रीमंत व्हाल का? BBC News Marathi 31.07.2023

पंतप्रधानांनी दावा केलाय - जगातल्या पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारत असेल. ही आकडेवारी कशी ठरते? तर जीडीपीच्या वाढीच्या दरावर. गेल्या 9 वर्षांत भारताचा जीडीपी 83 टक्क्याने वाढला असला तरी तुमच्यातले काही लोक म्हणतील की आमचा पगार आणि खर्च याची सांगड पूर्वी होती तशीच आहे किंवा त्यापेक्षा वाईट आहे. आमची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. हे कसं? देशाची अर्थव्यवस्था वाढणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्या वा...

डोळे येणं म्हणजे काय? त्यापासून वाचायचं कसं? | BBC News Marathi 28.07.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

भारताच्या ‘या’ एका निर्णयामुळे अमेरिकेत तांदूळ महागला | BBC News Marathi 27.07.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

इर्शाळवाडीत दरड का कोसळली? भूस्खलन का होतं? BBC News Marathi 26.07.2023

रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी गावावर 19 जुलैच्या रात्री दरड कोसळली. किमान 100 लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जातेय, मृतांचा आकडा वाढतोच आहे. दरवर्षी पावसाळा आला की हिमालयापासून सह्याद्रीपर्यंत, सगळीकडून अशा दरडी कोसळण्याच्या, भूस्खनलनाच्या बातम्या येतात, व्हीडिओही येतात. पण मुळात भूस्खलन म्हणजे काय? ते का होतं? आणि ते टाळता येतं का? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन - नि...

मणिपूरमधला हिंसाचार थांबेल का? 3 महिन्यानंतरही हे राज्य का धगधगतंय? | BBC News Marathi 26.07.2023

मणिपूर - गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून आपण सातत्याने हे एक नाव बातम्यांमध्ये ऐकतोय, पाहतोय. पण आजही मणिपूर अशांत आहे. आता एक धक्कादायक व्हीडिओ समोर आलाय, ज्यात दोन महिलांना एक जमाव नग्न करून घेऊन जाताना दिसतोय. कुकी आणि मैतेई या दोन प्रमुख जमातींमधला संघर्ष इतका का चिघळलाय? इथल्या या दोन समुदायांचा लोकांना एकमेकांवर, सरकारवर आणि लष्करावरही भरवसा का नाही? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्ता...

खारफुटी, कांदळवनं महत्त्वाची आहेत, कारण... | BBC News Marathi 26.07.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

तापमानानं मोडले ‘हे’ चार विक्रम | BBC News Marathi 25.07.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

2024 लोकसभेसाठी भाजप NDAमध्ये लहान प्रादेशिक पक्षांना का जोडतोय? | BBC News Marathi 19.07.2023

DES - भाजपप्रणित National Democratic Alliance NDAने आधीच स्पष्ट केलं आहे की 2024च्या निवडणुका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच लढणार. आणि त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्ष एकवटलेत. त्यांच्या आघाडीचं नाव INDIA अर्थात India National Developmental Inclusive Alliance असं जाहीर करण्यात आलंय. 23 जूनला बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या निमंत्रणावरून काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेस, समाजवादी प...

नरेंद्र मोदींविरुद्ध कोण? NDA विरोधात INDIA आघाडीत 4 अडथळे | BBC News Marathi 18.07.2023

भाजपप्रणित National Democratic Alliance NDAने आधीच स्पष्ट केलं आहे की 2024च्या निवडणुका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच लढणार. आणि त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्ष एकवटलेत. त्यांच्या आघाडीचं नाव INDIA अर्थात India National Developmental Inclusive Alliance असं जाहीर करण्यात आलंय. वार्तांकन – प्रियंका, बीबीसी हिंदी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

वंदे भारत ट्रेनकडे प्रवासी पाठ फिरवतायत? BBC News Marathi 18.07.2023

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त 15 ऑगस्ट 2023 पर्यंत देशात 75 वंदे भारत ट्रेन्स सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती. चकचकीत दिसणाऱ्या या आधुनिक ट्रेन्स भारतात सोशल मीडियावर तर लोकप्रिय झाल्या आहेत. पण प्रत्यक्षात अनेक मार्गांवर या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचं आकडेवारीवरून दिसून आलं आहे. लेखन – चंदन जजवाडे निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

ऑनलाईन फँटसी गेम्सवर 28 टक्के GST, कुणाला फटका बसणार? BBC News Marathi 14.07.2023

तुम्ही कधी ऑनलाईन गेम्स खेळले आहेत का? म्हणजे असे ऑनलाईन फँटसी गेम्स, जे Dream 11, MPL, Rummy Circle, A23, PokerBaazi सारख्या ॲप्सवर खेळले जातात. जर हो, तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. सरकारने आता यावर 28 टक्के GST लावला आहे. 10 जुलैला GST काउंसिलच्या 50व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचा फटका नेमका कुणाला आणि कसा बसेल? समजून घेऊ या वार्तांकन - निखिल इनामदार आणि हिमांशु भयाणी लेखन, निवेदन –...

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाला धक्का, आता काय होणार? BBC News Marathi 11.07.2023

वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला पळवला, असे आरोप गेल्या वर्षी आपण ऐकले होते. पण आता या महत्त्वाकांक्षी सेमीकंडक्टर प्रकल्पातून फॉक्सकॉनने माघार घेतली आहे. त्यावरूनही राजकारण सुरू झालंय. काय होता हा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प, ज्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं होतं? आणि तो आता रद्द झाल्यानंतरही मोदी सरकार आशावादी का आहे? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन-नि...

जीवघेणे क्लस्टर बाँब अमेरिका युक्रेनला का देतेय? BBC News Marathi 11.07.2023

क्लस्टर बाँब किंवा क्लस्टर म्युनिशनचा हवेतून जमिनीवर मारा केला जातो. हा बाँब म्हणजे अनेक लहान लहान बाँब्सचा संच असतो. तो जेव्हा टाकला जातो तेव्हा त्यातून असे अनेक लहान लहान बाँब्स जमिनीवर कोसळतात. यातले काहींचा लगेच स्फोट होतो पण काही मात्र तसेच राहतात. जगातील 100 पेक्षा अधिक देशांनी याचा वापर न करण्याचा करार केला आहे. लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

थ्रेड्स ॲप ट्विटरशी स्पर्धा करणार की त्याला मागे टाकणार? BBC News Marathi 10.07.2023

काही फरक सोडले तर थ्रेड्स ॲप ट्विटरसारखंच आहे हे आपण पाहतोय. थ्रेड्स ट्विटरशी मैत्रीपूर्ण स्पर्धा करेल असंही मेटाच्या टॉप मॅनेजमेंटने म्हटलंय. पण ट्विटरला ही गोष्ट रुचलेली नाही. मेटाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचारही ट्विटरच्या मॅनेजमेंटने बोलून दाखवलाय. इलॉन मस्कने म्हटलं की “स्पर्धा ठीक आहे पण फसवणूक नाही.” लेखन - निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Listen to the सोपी गोष्ट podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.