Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Kids MR ↓ 2071 episodes

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Author

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Category

Kids

Latest episode

Jul 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

# 1221: ढगांची गोष्ट भाग १. लेखक : मृणालिनी वनारसे. कथन - (सौ. नीता दिनेश प्रभू.) 15.08.2023

Send us Fan Mail आकाशाकडे बघत तुम्ही कधी ढगांचे निरीक्षण केले आहे का? वेगवेगळ्या आकारांचे ढग , गडगडणारे ढग आणि त्यांच्या विविध कथा जाणून घेऊ या. प्राचीन काळी असे ढग बघून माणसांना काय वाटते असेल आणि जसा काळ पुढे सरकत गेला आणि अनेक शोध लागल्या नंतर ढगांचे वर्गीकरण कसे झाले हे सगळे ऐकुया ढगांच्या गोष्टीत, तीन भागांमध्ये

# 1219: त्रिशंकूची कथा. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 14.08.2023

Send us Fan Mail विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाला सोबत घेऊन मिथिलेला पोहोचले. तिथे त्यांची भेट गौतम ऋषींचा पुत्र शतानंद मुनींशी झाली. जनक राजाचा पुरोहित असलेल्या शतानंदांनी राम आणि लक्ष्मणाला त्यांच्या पूर्वजाची कथा सांगितली.

# 1220: ‘हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम् ।‘ लेखक संभाजी बबन गायके . कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 14.08.2023

Send us Fan Mail रात्रभर चाललेल्या घनघोर लढाईनंतर,  २ राजपुताना रायफल्स  'टोलोलिंग' शिखरावर पुन्हा ताबा मिळवण्यात  यशस्वी ठरली. ह्या विजयामुळे कारगिल युद्धाला कलाटणी मिळाली.  मात्र मेजर आचार्य यांना  वीरगती प्राप्त झाली!  मेजर पद्मपाणी आचार्य यांना त्यांच्या अतुलनीय शौर्य,अविचल  नेतृत्व आणि सर्वोच्च बलिदाना साठी देशाचा दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार "महावीर चक्र" मरणोपरान्त प्रद...

# 1218: टी. एन. शेषन आणि चिमणीचं घरटं. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 13.08.2023

Send us Fan Mail "जर मी ती घरटी तुम्हाला दिली तर संध्याकाळी या पिल्लासाठी चारा घेऊन त्यांची आई चिमणी परतेल आणि आपली पिल्लं तिथे सापडली नाहीत तर ती रडेल. वेड्यासारखं त्या बाळांना शोधेल. तिचा तो आकांत  पाहण्याचं धैर्य माझ्याकडे नाही.”

# 1217: संत तुकाराम महाराजांच्या आवली ची गोष्ट. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 12.08.2023

Send us Fan Mail आवली म्हणली,  “मला रोज पाणी भरायला विहिरीवर जावे लागत . विहिर खोल आहे आणि तिचे  काठ निसरडे आहेत.  मी पाय घसरुन आत  पडले तर ही दोन पानेच मला तारतील.  अहो, सगळी गाथा जर इंद्रायणीच्या पाण्यात तरली,  तर या दोन पानांमुळे मी तरणार नाही का?”

# 1216: मला भेटलेली एक सुंदर स्त्री. लेखक : डॉ. अभिजीत सोनवणे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 11.08.2023

Send us Fan Mail " आवो सगळं बगुन मनात साटवलंय ....  वासराला दुध पाजताना गाईचं डोळं म्या पाहिलेत,  सगळा भात माज्या ताटात टाकुन उपाशी हासत झोपणारी आई म्या पाह्यलीय,   पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बगीतली,  कुत्र्याच्या पिल्लाला दुध पाजणारी शेळी म्या बगीतली,  फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बगीतलंय,  मातीतनं उगवणारा कोंब म्या पाह्यलाय ....  तुमी काय बगीतलं ह्यातलं ...? ".....

# 1215: मैत्री शनी आणि मारुतीची. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 10.08.2023

Send us Fan Mail शनि आणि मारुतीची मंदिरे नेहमी जवळ जवळ असतात. किंबहुना, काही ठिकाणी एकाच मंदिरात या दोन्ही देवांच्या मूर्ती शेजारी असतात. दोघांचेही स्वरूप उग्र आहे. वायू हे त्यांचे तत्त्व आहे. दोघांचेही जन्म उष्ण वायूपासून झाले आहेत.

# 1214: आणि मला वडील सापडले. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 10.08.2023

Send us Fan Mail आपण एका बापासाठी जन्मलो आहोत. पण आपण अनेक वडिलांचे पुत्र होऊ शकतो.

# 1213: असमाधानी असण्याची गोष्ट . (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 08.08.2023

Send us Fan Mail माणसाची सवयच असते आहे त्यात सतत उणिवा काढायची !  थोडे दिवस बाहेरची हवा चाखली की किंमत कळते आपल्याला मिळालेल्या सुविधांची ! त्यातून मार्ग काढावाच लागतो....!

#1212: जिना. लेखक : डॉ. अमित बिडवे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 07.08.2023

Send us Fan Mail माणसाची सवयच असते सतत दुसऱ्या च्या उणिवा काढायची !  थोडे दिवस बाहेरची हवा चाखली की किंमत कळते आपल्याला मिळालेल्या सुविधांची !

# 1211: श्रद्धेचं फळ. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 06.08.2023

Send us Fan Mail 'अरे, पण प्रसाद तर सर्वांनाच मिळणार होता ना?'- स्वामीजी उत्तरले. 'काय सांगावं? भली मोठी रांग संपेपर्यंत प्रसादही संपला असता तर? मी आणि माझी मुले उपाशी राहिलो असतो. म्हणून मी घुसखोरी केली. मला प्रसाद द्या स्वामी....'

# 1210: बीजांड ते ब्रम्हांड. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 06.08.2023

Send us Fan Mail कुठल्याही कळा न सोसता मला तिचं ‘आईपण‘ मिळालं हे माझं किती मोठं भाग्य होतं...! काही महिन्यांची सेवा, आणि एका प्रसन्न सकाळी माझ्या हिरकणीने गड सोडला...

# 1209: नामसाधना. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 05.08.2023

Send us Fan Mail अरे, भगवंताने त्यांचे दुःख निवारण एकाच हाकेत केले असते.  तीन हाका  देऊन हरीला तीनदा त्रास का दिलास ?नामस्मरणाविषयी तू जगाला शंकित करून टाकलेस म्हणून मी तुला शाप देतो......

# 1208: हनुमान चालीसा. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 05.08.2023

Send us Fan Mail अकबराने तुलसीदासजींना अपराधाशिवाय शिक्षा केली .  अंधारकोठडीत टाकले. ते  तिथे दुःखाने शोकाकुल झाले  होते . श्रीरामजी व हनुमानजींच्या स्मरणात होते .   त्या भावास्थेत असताना त्यांचे  हात स्वतःहून काहीतरी लिहीत होते.  हेच  ते गोस्वामी तुलसीदासांनी हनुमानजीं च्या  प्रेरणेने लिहिलेले संकट मोचन स्तोत्र  'हनुमान चालिसा'! 

# 1207: देवदूत. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 02.08.2023

Send us Fan Mail भर पावसात, गुढघाभर पाण्यात तो उभा होता. जवळून जाणाऱ्यांना सांगत होता, "नही साब, इधरसे नही"  "इधर निचे बडा पाईपलाईन है. ढक्कन निकल गयेला है" तो त्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये, म्हणून तिथे ऊभा होता! कोणासाठी करत होता तो हे? असे अनामिक देवदूत आजही या जगात आहेत म्हणून जग सुंदर आहे.

#1206: महाभारतातील एक सूड पर्व. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 01.08.2023

Send us Fan Mail भीष्माने जेव्हा गांधार देशावर आक्रमण केले होते, तेव्हाच त्याचा आणि त्याच्या कुरु वंशाचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा शकुनीने कली होती. महाभारताच्या युद्धाने त्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली आणि कुरुवंश फक्त पाच पांडवांपुरता उरला..

# 1205: त्रिविक्रम कथा. लेखक : दिपाली पाटवादकर. कथन - (सौ. नीता दिनेश प्रभू.) 31.07.2023

Send us Fan Mail भागवत पुराणातील वामनाची कथा ही ऋग्वेदातील सूर्याच्या वर्णनाचे विस्तारित रूप मानले जाते. ऋग्वेदात सूर्याचे वर्णन करताना अस म्हटले आहे ही सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त ही सूर्याची तीन पावले आहेत. आणि तीन पावलात तो सगळी भूमी व्यापतो म्हणून त्याला त्रिविक्रम अस नाव मिळाले.

#1204: परीवर्तन गुरूंमुळे. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 30.07.2023

Send us Fan Mail गुरूंनी विचारले, ‘काय..तू किती रुपये दान केले‘? त्यावर तो चोर म्हणाला: ‘मी काहीही दिलं नाही‘. ‘मग माझ्या बोलण्याचा काय बरं उपयोग झाला?‘ गुरूने विचारले. चोर म्हणाला: ‘लोक देणगी देत होते त्या वेळी नेमकी वीज गेली तेव्हा लोक पैसे ज्या हुंडीत टाकत होते ती हुंडी माझ्या हातात होती. त्यातले थोडे पैसे काढून खिश्यात घालावेत असा  विचार लगेचच माझ्या मनात आला होता. पण मी तसं केलं नाही...

#1203: चमत्कार घडवावे लागतात. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 30.07.2023

Send us Fan Mail त्याने एकामागून एक अनेक कागद बाहेर काढले. त्यावरील हस्ताक्षर जरी वेगवेगळे असले तरी सर्वांची नावे सारखीच होती, त्या सर्वांनी सफाई करणार्‍या महिलेच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकलेल्या होत्या. सर्वांनी त्याच्यासारखाच विचार केला होता हे पाहून त्याचे डोळे भरून आले ...

#1202: अधिक मास महात्म्य. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 28.07.2023

Send us Fan Mail हे भगवन हा अधिकमास आहे. या मासात रवि एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत नसल्याने रविसंक्रमण होत नाही. त्यामुळे सूर्य संक्रांत येत नाही. म्हणून याला सर्वजण तुच्छ समजतात. या मासात कोणतीही पुण्यकर्म किंवा शुभकार्य केली जात नाहीत. म्हणून हा दु:खूप आहे. हे ऐकल्यावर श्रीकृष्ण अधिकमासाला म्हणाले की "एवढेच ना? आता कधीही तू दु:खी राहणार नाहीस कारण आजपासून मी तुला माझे पुरुषोत्तम हे...

# 1201: सर्व फ्युज उडालेले बल्ब सारखेच असतात. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 27.07.2023

Send us Fan Mail बुद्धिबळाचा जेव्हा खेळ संपतो, तेव्हा राजा आणि प्यादे एकाच डब्यात बंदिस्त होतात.  सेवा निवृत्त झाल्यावर, आपण सगळे फ्यूज वुडलेल्या बल्ब सारखे असतो.  जसे बल्ब एलईडी, सीएफएल, हॅलोजन, फ्लोरोसेंट, किंवा सजावटीचा होता  ह्याने आताच्या परिस्थितीत काही फरक पडत नाही.

# 1200: "मी फक्त बिया विकतो. फळे नाही." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 26.07.2023

Send us Fan Mail देवाने उत्तर दिले, "मी इथे सर्जनशीलता, कौशल्य, प्रेमळपणा , यांच्या बिया वाटतो.  यश आणि आनंद मिळविण्यासाठी  तुम्हाला संधी उपलब्ध करून देतो..  हे बियाणे पेरणे, कठोर परिश्रम आणि चिकाटीने त्यांची रोपे होतील हे पाहणे, त्यांचे पालनपोषण करणे हे काम तुमचे. "

# 1199: वीर सावरकरांची दहशत. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 25.07.2023

Send us Fan Mail वीर सावरकर तेव्हा दररोज संध्याकाळी आजूबाजूच्या मुलांना गोष्टी सांगत असत. त्यावेळी त्यांच्या  गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही सावरकरांच्याकडे  जात असत. म्हणून लेखी परीक्षेत अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही  बिटिशांनी  तुम्हाला नागरी सेवा परीक्षेसाठी अनुत्तीर्ण घोषित करून  तुम्हाला भारतीय टपाल सेवेत प्रवेश दिला .   

# 1198: "एक तरी घास अडावा ओठी". लेखक संभाजी बबन गायके : कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 24.07.2023

Send us Fan Mail वय केवळ चोवीस वर्षे.   फक्त  दोनच वर्ष लष्करी सेवा झालेले कॅप्टन अनूज नय्यर...  ह्यांना  1999 मध्ये कारगिल युद्धातील ऑपरेशन्स दरम्यान लढाईतील अनुपमेय  शौर्याबद्दल  मरणोत्तर 'महावीर चक्र' प्रदान करण्यात आले .

# 1197: कायमचा पत्ता. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 23.07.2023

Send us Fan Mail कायमचा पत्ता.  ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) एके दिवशी आपण अत्यंत प्रेमानं बांधलेलं आणि आयुष्यभर EMI भरलेलं ते घर, एकतर पाडलं जाईल, भांडणांना कारण होईल, विकलं जाईल किंवा भग्न आणि उद्ध्वस्त होईल. प्रत्येक वेळी मी ‘कायमचा पत्ता’ विचारणारा फॉर्म भरतो तेव्हा मला मानवी मूर्खपणाचे हसू येते.

Listen to the Life of Stories podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.