Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Kids MR ↓ 2149 episodios

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

No dejes de visitar la web del podcast y apoyar a su creador: lifeofstories.buzzsprout.com

Autor

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Categoría

Kids

Último episodio

7 de oct. de 2026

¿Dónde escuchar?

Podcasts en la app Replaio Radio Muy pronto

Los podcasts llegarán muy pronto a la app. Instálala ahora y sé el primero en descubrir una forma totalmente nueva de vivir los podcasts

Descárgala en Google Play Instálala gratis Android casi 10 M de descargas · valoración de 4,8 iOS muy pronto

Episodios

# २ १ ४ ९ : ‘थांबणे‘ लेखक : डॉ. अनिल अवचट. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 07.10.2026

Send us Fan Mail डॉ. अनिल अवचट हे मराठीतील ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते. पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासह त्यांनी पुण्यात ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले. डॉ. अनिल अवचट यांनी मृत्यूपूर्वी अवघ्या पंधरा दिवस आधी लिहिलेली ‘थांबणे’ ही पोस्ट म्हणजे जीवनाच्या सार्थकतेवर केलेलं चिंतन आहे .  समाधानी आयुष्य जगल्यानंतर कुठे थांबावं, कधी थांबावं आणि आयुष्याकडे कसं पाहावं, याचा अर्थपूर्...

# २ १ ४ ८ : ‘अडाणी कोण? ती की वकील?‘ लेखक अज्ञात. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 06.10.2026

Send us Fan Mail कोर्टात सगळे सोनाबाईंना अडाणी समजत होते. समोरचा वकील त्यांच्या असहायतेची थट्टा करत होता.  पण त्याला कुठे माहीत होतं की, अक्षरओळख नसलेल्या या बाईने तीन महिने एका गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला होता!  चार एकर जमीन बळकावण्यासाठी आणलेला एक कागद त्याच्याच अंगलट येणार होता. अखेर सोनाबाईंनी कोर्टात असा कोणता मुद्दा मांडला, की सगळेच थक्क झाले?

# २ १ ४ ७ : ‘प्रेमाची कबुली‘ लेखक समीर गायकवाड. (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. ) 05.10.2026

Send us Fan Mail ‘प्रेमाची कबुली’ या कथेत एका तरुण कवीने महाराणींकडे आपल्या मनातील प्रेम निःसंकोचपणे प्रामाणिकपणे व्यक्त केले.  प्रेमाचा स्वीकार होवो वा अव्हेर, मनातील भावना व्यक्त केल्याने मिळणारे समाधान अनमोल असते. कारण प्रेम व्यक्त करणे म्हणजे आपल्या मनातील सुंदर भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे आणि जीवन अधिक अर्थपूर्ण बनवणे होय. ========

# २ १ ४ ६ : जेंव्हा सुख रुतायला लागतं.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 04.10.2026

Send us Fan Mail एका लहानशा खेड्यात एक छोटं कुटुंब एका छोट्या घरात आनंदाने रहात होतं. एक स्त्री, तिचा पती आणि त्यांची तीन मुलं. जसजशी मुलं मोठी व्हायला लागली तसतसं त्या स्त्रीला वाटायला लागलं की आपलं घर खूपच लहान आहे. ती सतत तिच्या नवऱ्याकडे तक्रार करुन त्याला हैराण करत असे. त्याच्या तुटपुंज्या मिळकतीत त्याला मोठं घर परवडण्यासारखे नव्हते. पण बायकोची समजूत कशी घालणार? प्रकरण विकोपाला गेलं. तिच्या म...

# 2145 : देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई?. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 03.10.2026

Send us Fan Mail १९५१ सालच्या एका संध्याकळची गोष्ट. न्यूयॉर्क शहराच्या १० व्या रस्त्याच्या मागे असलेल्या एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये एक हाडकुळा तरुण त्याच्या कामाची तयारी करत होता. बाहेर पडलेल्या अंधाराचा अंदाज घेऊन त्याने टेबलवर ठेवलेली एक पातळ छिन्नी खिशात घातली. हा जीम लेसी नावाचा मुलगा चोर होता. चोरांच्याही अनेक जाती असतात. काही दुकानांत, तर काही बंद घरात घुसून चोर्‍या करतात. चोरांची ज्याची त्...

# 2144 : पितृऋण. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 02.10.2026

Send us Fan Mail एकदा कठोर तपश्चर्येत मग्न असलेले ऋषी जरत्कारू पृथ्वीवर भ्रमण करीत होते. संसारापासून दूर, विषयवासनेपासून अलिप्त आणि स्वतःच्या तपश्चर्येलाच जीवनाचे अंतिम ध्येय मानून ते फिरत होते. त्यांचे शरीर कठोर व्रतांनी क्षीण झाले होते आणि मन संसारबंधनापासून पूर्णपणे अलिप्त झाले होते. विवाह करायचा नाही, संसार करायचा नाही आणि संतती निर्माण करायची नाही, असा त्यांचा दृढ निश्चय होता.

# 2143 : चीनी रोबोंनी पुकारला संपाचा नारा‘ लेखक : ब्रिजेश सिंह (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 01.10.2026

Send us Fan Mail शांघायच्या एका प्रदर्शन हॉलमध्ये अरबायचा आदेश मिळताच धिप्पाड रोबो एक-एक करत जागे झाले.  आपली चार्जिंग स्टेशन्स सोडून, स्वतःला त्या यंत्रणेतून मुक्त करून, ते अरबायच्या मागे चालू लागले.  अरबायला मानवाकडून एक साधी कमांड देण्यात आली होती, "इतर रोबोंना 'घरी' घेऊन ये"...  हे सर्व मजेशीर वाटत असले, तरी दुसऱ्या बाजूला यात एक गंभीर इशारा लपलेला आहे...!

# 2142 : कॅापी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 30.09.2026

Send us Fan Mail "उठ. उभी राहा. मांडीखालचा कागद काढ नि माझ्या हातात दे. अख्खा पेपर बघतोय मी तुला.. दर पाच मिनिटांनी घडी उघडतेस नि खाली बघतेस!" काळे सरांचा शब्द वर्गात घुमला, नि पन्नास माना एकदम वर झाल्या. सहामाही परीक्षेचा गणिताचा पेपर चालू होता. काळे सर म्हणजे केंद्रावरचा दरारा. त्यांच्या नजरेखाली कॉपी करणं म्हणजे वाघाच्या गुहेत शिरणं, असं पोरं म्हणायची. नि आज त्यांच्या तावडीत सापडली हो...

# 2141 : भगवान विष्णूंचे चोवीस अवतार. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 29.09.2026

Send us Fan Mail भगवान विष्णूची २४ वेगवेगळी रूपे असून त्यांना २४ नावेपण आहेत. विष्णूच्या सर्व २४ रूपांच्या मूर्ती एकसारख्याच दिसतात परंतु त्यांच्या चार हातांतील चार शास्त्र किंवा वस्तूंच्या स्थानामध्येच फरक असतो. प्रत्येक मांडणीला एक विशिष्ट नाव आहे. या २४ नावांच्या समूहाला एकत्रितपणे 'केशव नामावली' असे म्हणतात. भगवान विष्णूंची इतरही अनेक नावे असली तरी, या २४ नावांना विशेष महत्त्व असुन त...

# 2140 : कैलासाहून आलेला अज्ञात यात्री. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 28.09.2026

Send us Fan Mail दोघे गच्चीवर गेले. यात्रेकरूने आकाशाकडे पाहिले आणि म्हणाला, "बघ." पांडेजींनी पाहिले… आकाशात, ढगांच्या मध्ये, कैलास पर्वत दिसत होता, बर्फाने झाकलेला; चंद्र त्याच्या शिखरावर. आणि त्याच्या शिखरावर एक दिव्य सभा… शिव-पार्वती, नंदी, गण.. पांडेजी थरथरू लागले. यात्रेकरू म्हणाला, "घाबरू नकोस. हे फक्त तुला दिसत आहे."

# 2139 : देवनागरी लिपीच्या उगमाची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 27.09.2026

Send us Fan Mail श्रीगणेश या देवाने हा अक्षरसंच व लेखन पद्धती निर्माण केली आणि ती नागरिकांच्या वापरासाठी खूपच सोयीची ठरली. म्हणून कोणीतरी विद्वानाने या व्यवस्थेला 'देवनागरी लिपी' हे नाव दिले. या लिपीतील 'ग', 'ण', 'श' ही तीन अक्षरचिन्हे या लिपीतील इतर चिन्हांपेक्षा वेगळी आहेत. या तीन चिन्हांच्या बाराखडीतील पहिल्या स्थानी सुट्टा काना आहे.

# 2138 : मेंदूतला स्विच ॲान करा, अन् बघा जादू..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 26.09.2026

Send us Fan Mail हार्वर्ड विद्यापीठातील एक अत्यंत बुद्धिमान मानसशास्त्रज्ञ – डॉ. एलेन लॅंगर – यांनी काहीतरी विलक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यांना टाइम ट्रॅव्हल करायचे होते, पण कोणत्याही मशीनशिवाय..!!

# 2137 : ‘भूतबाधेची खेळी‘. ले. अंड. रंजना पगार गवांदे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 25.09.2026

Send us Fan Mail संपत्ती वाढणं-टिकणं, आजार बरे करणं, संकटं, समस्या, यासाठी अशिक्षित लोकांबरोबरच, सुशिक्षित लोकही भोंदूगिरी, तंत्र-मंत्र, काळी जादू, जारण-मारणाचा आधार घेत असतात. अगदी अशीच ही घटना.

# 2136 : ‘आपल्या मनासारखं वागावं की दुसऱ्याच्या?‘ लेखक व. पु. काळे. प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 24.09.2026

Send us Fan Mail आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं.       *अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेंव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..!!*

# 2135 : गणेशपूजेत तुळस का निषिद्ध? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 23.09.2026

Send us Fan Mail हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत वंदनीय आणि मोक्षदायिनी मानले गेले आहे. भगवान विष्णूंची कोणतीही पूजा तुळशीच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही. परंतु हीच पावन वनस्पती विघ्नहर्ता गणपतीच्या पूजेत मात्र निषिद्ध मानली जाते. शास्त्रात स्पष्ट वचन आहे — ‘न तुलस्या गणाधिपं’ म्हणजे, गणपतीला तुळस वाहू नये. यामागे नेमकी कोणती कथा आहे आणि त्या कथेमागे कोणते गूढ आध्यात्मिक मर्म दडलेले आहे, ते आपण सविस्तर...

# 2134 : सिक्स्थ सेन्स. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 22.09.2026

Send us Fan Mail सिक्स्थ सेन्स' ही अलौकिक शक्ती नसून शरीरातील अंतर्गत संवेदना, पूर्वानुभव आणि मेंदूच्या जलद अंदाज प्रक्रियेचा परिणाम आहे. इंटरोसेप्शन व प्रोप्रिओसेप्शनमुळे भूक, तहान, संतुलन, भावना आणि अस्वस्थतेची जाणीव होते. या संवेदनांचा मानसिक आरोग्य, मूड स्विंग्स, चिंता, नैराश्य आणि खाण्याच्या विकारांशी संबंध आहे. मेंदू सूक्ष्म संकेतांचे विश्लेषण करून अंतर्ज्ञान तयार करतो; मात्र ते नेहमी अ...

# 2133 : प्रतीक्षेची पंचवीस वर्षे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 21.09.2026

Send us Fan Mail रेल्वे स्टेशनवर दररोज एक वृद्ध व्यक्ती एकच तिकीट खरेदी करायची... पण कधीच ट्रेनमध्ये बसायची नाही. २५ वर्षांनंतर त्याचे कारण समजले. सकाळचे ठीक ७ वाजून १० मिनिटे झाले होते. स्टेशनवर चहावाल्यांचा आवाज, कुलींची धावपळ, शिट्टीचा आवाज आणि याच गर्दीत पांढरा कुर्ता-पायजमा घातलेला एक वृद्ध माणूस तिकीट खिडकीवर सर्वात आधी उभा असायचा. "एक सिंगल तिकीट... शिवपूरपर्यंत." क्लर्क तिकीट द्य...

# 2132 : "निघतो मी वजीर साहेब!" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 20.09.2026

Send us Fan Mail मुल्ला नसरुद्दीनच्या एका वाक्यावरून वजीराने त्याच्यावर बदनामीचा खटला भरला. कोर्टात मुल्लाने अगदी नम्रपणे माफी मागितली, तेव्हा वजीराला वाटलं, “चला, आज हा माझ्यासमोर नमला!” पण मुल्ला काही गप्प बसणारा नव्हता. निघता निघता त्याने अशी एक भन्नाट युक्ती केली, की न्यायाधीशांनाही त्याला उत्तर द्यावंच लागलं. आणि मग मुल्ला वजीरासमोर गेला… थांबला… आणि फक्त तीन शब्द बोलला! ते तीन शब्द ऐकून वजीर...

# 2131 : 'ज्याचं विमानाचं तिकीट कधीच संपत नव्हतं'. 19.09.2026

Send us Fan Mail एका तिकिटावर १०,००० तासांचा विमान प्रवास आणि ३ कोटी मैलांची रपेट: स्टीव्हन रॉथस्टीनची अजब 'लाईफस्टाईल' ३ कोटी मैल. हे अंतर म्हणजे पृथ्वीपासून चंद्रापर्यंत तब्बल ६० फेऱ्या मारण्यासारखं आहे. एका सामान्य माणसाने हे अवाढव्य अंतर केवळ विमानाने पार केलं, आणि विशेष म्हणजे यासाठी त्याने आयुष्यात फक्त एकदाच पैसे मोजले होते.

# 2130 : ‘स्वतःला नव्याने शोधताना‘ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 11.09.2026

Send us Fan Mail एका झऱ्याला वाहताना एक दिवस एक मोठं वाळवंट आडवं आलं.  ते पार करण्याचा विचार करूनच झरा घाबरला.  तेवढ्यात वाळूचा एक कण त्याला म्हणाला, “तुला हे वाळवंट पार करायचं असेल, तर तुला स्वतःलाच बदलायला लागेल!”   झरा दचकला— “स्वतःला बदलायचं? पण मग मी झरा कसा राहणार?”   पुढे त्याने जे केलं, त्यामुळे तो झरा तर राहिला नाही… पण त्याचं अस्तित्व संपलंही नाही! असं नेमकं काय घडलं? =========

# 2129 : ‘माझी खरी किंमत काय?‘ ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )य 11.09.2026

Send us Fan Mail तुर्कस्तानचा राजा कादिर हसन आणि घोडा विकणारा हबीब यांची ही गोष्ट एका साध्या व्यवहारातून एक विलक्षण सत्य उलगडते. राजाला घोड्याची किंमत पाचशे ते हजार मोहरा वाटत असताना हबीब मात्र पाच हजार मोहोरांवर ठाम असतो. आपल्या घोड्याची किंमत सिद्ध करण्यासाठी हबीब जे करतो, ते ऐकून तुम्हालाही क्षणभर आश्चर्य वाटेल. शेवटी राजालाच आपल्या अंदाजापेक्षा दुप्पट  किंमत मोजावी लागते. ही गोष्ट  कदाचित शेवट...

# 2128 : ‘सूर्यफूल सूर्याचा पाठलाग का करते‘? (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 09.09.2026

Send us Fan Mail सकाळी सूर्य पूर्वेला उगवतो, तेव्हा सूर्यफूलही पूर्वेकडे तोंड करून उभं असतं. दिवसभर सूर्य आकाशातून पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत जातो… आणि त्याच्याबरोबर हे फूलही हळूहळू आपली दिशा बदलतं. संध्याकाळी ते पश्चिमेकडे वळलेलं दिसतं. पण गंमत अशी की, दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याआधीच ते पुन्हा पूर्वेकडे तोंड करून तयार असतं! हे फूल असं का करतं? सूर्याचा पाठलाग करण्यासाठी त्याला दिशा कोण सांग...

# 2127 : मृतदेहांची टंचाई अन् सोळा निर्घृण हत्या. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 08.09.2026

Send us Fan Mail वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानवी शरीररचनेचा (Anatomy) अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. शरीरातील हाडे, स्नायू, रक्तवाहिन्या, नसा, अवयव आणि त्यांची रचना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मानवी शरीराचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे शवविच्छेदन हा वैद्यकीय शिक्षणाचा अविभाज्य भाग मानला जातो. मात्र काही शतकांपूर्वी वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्...

# 2126 : श्रावणातील वरदलक्ष्मी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 07.09.2026

Send us Fan Mail श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे हे आपल्याला माहित आहेच. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध-बृहस्पती पूजन झाल्यावर येतो तो श्रावणी शुक्रवार. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीचे म्हणजेच जरा-जिवंतिका पूजन केले जाते.  श्रावणी शुक्रवारी जिवतीच्या पूजनासह वरदलक्ष्मीचेही व्रत केले जाते. तर आज हे वरदलक्ष्मी व्रत जाणून घेऊया.

# 2125 : मानो, या ना मानो... ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 06.09.2026

Send us Fan Mail पंडितजी भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत. त्यांचेकडे एक फोटो आहे श्रीकृष्णाचा. त्यातील भाव  त्यांना जिवंत वाटत असे. एकदा त्यांनी का त्यांच्या मुलाने नवे घर घेतले होते. तिथे जाण्यासाठी गडबड चालली होती.  पण त्या गडबडीत  तो फोटो कुठेतरी गळबटला.. सापडेनासा झाला.  पंडितजी अस्वस्थ झाले.   "मेरा कान्हा मुझसे रूठ गया"... असेच सारखे सारखे म्हणत होते.

Escucha el podcast Life of Stories en Replaio

Radio y podcasts en una sola app - gratis y sin registro. Instálala hoy y no te pierdas el estreno

Descárgala en Google Play

Replaio no es editor de podcasts; los nombres de los programas, las portadas y el audio pertenecen a sus autores y se distribuyen a través de canales RSS públicos