Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Author
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Category
Podcast website
Latest episode
Jul 7, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
# 1296: नवरात्र: पाचवी माळ स्कंदमाता देवीची. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 30.10.2023 3:17
Send us Fan Mail स्कंदमाता ही कुमार कार्तिकेयाची माता असल्याचं मानलं जातं. कुमार कार्तिकेयांना स्कंद असंही संबोधलं जातं. म्हणूनच देवीच्या या स्वरुपाला स्कंदमाता म्हटले जातं
# 1295: नवरात्र: चौथी माळ देवी कुष्मांडाची. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 29.10.2023 7:18
Send us Fan Mail सूर्यदेवांना जिवंत करण्यासाठी ऋषी कश्यप देवी आदितीसोबत देवी पार्वतींकडे गेले. देवी पार्वती स्वयंपाकघरात गेली आणि २ भांडी आणली. देवी पार्वतीने त्या दोघांना त्यांच्या रक्ताने एक भांडे भरण्यास सांगितले. ऋषी कश्यपाने आपल्या सामर्थ्याने दोन्हीच्या शरीरातील रक्ताने भांडे भरले. मग दुसरे भांडे आपोआप अमृताने भरले.
# 1294: नवरात्र - दसरा. लेखक : माधुरी भिडे. कथन - (सौ. नीता दिनेश प्रभू.) 28.10.2023 5:15
Send us Fan Mail " भारतात नवरात्र , दसरा साजरा करण्यात येतो, त्याच्या विविध पद्धती आहेत आणि तितक्याच त्याच्याशी जोडलेल्या लोक कथा आहेत. जाणून घेऊ या सगळ्या वदंता ."
# 1293: शांती रूपेण संस्थिता. लेखक : प्राची मोकाशी. कथन - (सौ. नीता दिनेश प्रभू.) 27.10.2023 6:00
Send us Fan Mail " देवाची अर्चना करायची पद्धत वेगवेगळी असली तरी देव एकच आहे न! प्रत्येक धर्मात स्त्री शक्ती आणि माणुसकी जपण्याला महत्व दिले आहे. पण काही दुष्ट प्रवृत्ती मुळे चांगल्या माणसांमध्ये भांडणे होतात, गैरसमज निर्माण होतात आणि हकनाक गरीब लोक व स्त्रिया बळी पडतात. सगळे सणवार माणसांना एकरूप होण्यासाठी च आहेत त्यामुळे उत्सव आनंदाने साजरे करावेत जेणेकरून माणसे एकमेकांशी जोडलेले राहतील व रा...
# 1288: रामरावण युद्ध प्रसंगी रावणाचे पौरहित्य. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 22.10.2023 6:28
Send us Fan Mail हे श्री रामा तू कोण आहेस हे मला पूर्णपणे ठाऊक आहे. दक्षिणा म्हणून एकच दे. माझ्या अंतिम क्षणी तू माझ्या सन्निध रहा . भगवंताच्या सान्निध्यात मृत्यू येणे ह्या सारखे दुसरे पुण्य नाही. रावणाला हे माहित होते. किती सहजतेने त्याने आपला मोक्ष साधून घेतला होता!
#1289: भगवंतावरचा विश्वास. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 22.10.2023 5:30
Send us Fan Mail राकेश च्या दुकानातून तो लहान मुलगा औषधाची बाटली ऐवजी, उंदीर मारण्याचे औषध घेऊन गेला होता, आणि त्या मुलाला लिहिता वाचता ही येत नव्हते! "दादा, चिखल असल्यामुळे मी घसरलो आणि औषधाची बाटली पण फुटून गेली! राकेशच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या!!! त्या दिवशी त्याच्या मनात विश्वास उत्पन्न झाला, की कोणीतरी आहे, जो ही सृष्टी चालवत आहे.
# 1290: न्याय्य निवाडा. लेखक स्वामी विज्ञानानंद. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 22.10.2023 1:34
Send us Fan Mail तू मोठा भाऊ आहेस. तेव्हा तू आपल्या सगळ्या इस्टेटीची वाटणी तूझ्या मनाप्रमाणे कर. मग टाॅलस्टाॅय धाकट्या भावाकडे वळून म्हणाले हे जे दोन वाटे मोठ्या भावाने केले असतील, त्यापैकी तुला कोणता पाहिजे , हे निवडण्याचा पहिला हक्क तुला आहे.
#1291 : नवरात्र: दुसरी माळ ब्रम्हचारीणी मातेची. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 22.10.2023 3:20
Send us Fan Mail धर्मग्रंथानुसार, माता दुर्गा हिचा जन्म पर्वतराजापासून देवी पार्वती म्हणून झाला होता. महर्षी नारदजींच्या सांगण्यावरून तिने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी जंगलात कठोर तपश्चर्या केली आणि वर्षानुवर्षे उपवासही केला. तिच्या हजारो वर्षांच्या कठोर तपश्चर्येमुळे तिला ब्रह्मचारिणी असे नाव पडले आणि ती जप, तप, त्याग आणि ज्ञानाची देवी मानली गेली.
#1292 : नवरात्र: तिसरी माळ देवी चंद्रघंटेची. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 22.10.2023 5:02
Send us Fan Mail "या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता। नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नम:।।"
# 1287: वकिलांची बुधिमत्ता (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 17.10.2023 3:22
Send us Fan Mail वकिल म्हणाले, "समजा दोन माणसं माझ्याकडे आली. एक अतिशय स्वच्छ आणि दुसरा अतिशय घाणेरडा. मी दोघांना आंघोळ करून स्वच्छ होऊन यायला सांगितलं. आता तुम्हीच सांगा, त्यांच्यापैकी कोण आंघोळ करेल?"
# 1286: मग रायबाचं काय झालं? (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 16.10.2023 7:30
Send us Fan Mail 'आधी लगीन कोंढाण्याचं, अन् मग माझ्या रायबाचं!' सुभेदार तानाजी मालुसरेंनी दिलेली ही साद आजही स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात घुमतीय. ‘लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे’ या एकाच ध्येयाने आणि कोंढाण्यावर भगवा फडकवणं या एकाच ध्यासाने पेटून उठलेल्या तानाजींना इतर कशाचीही फिकीर नव्हती. आपली प्रतिज्ञा खरी करताना त्यांना वीरमरण आलं. 'गड आला पण सिंह गेला' असं तानाजींचं कर्तृत्व...
# 1285: द हंच बॅक ऑफ स्टीनमेट्झ. लेखन : #समझसकोतोसमझो ६९. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 15.10.2023 5:30
Send us Fan Mail त्याची उंची फक्त चार फूट, पाठीत कुबड ; पण अल्बर्ट आइनस्टाईन, निकोला टेस्ला आणि थॉमस एडिसन हे त्याला आपले मित्र मानत होते. जगात दिसण्यापेक्षा असण्याला जास्त महत्त्व आहे. माणूस दिसायला कितीही कुरूप किवा विचित्र असला पण तो जर जीनियस किंवा प्रज्ञावंत असेल तरी त्याची कदर होते हे ही स्टीनमेट्झच्या आयुष्यावरून शिकता येते. ==================
# 1284: नवरात्र: पहिली माळ शैलपुत्रीची. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 14.10.2023 6:37
Send us Fan Mail देवीच्या उत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीत स्त्रीशक्तीची उपासना केली जाते . ह्या नऊ दीवसांत पहीले तीन दिवस आदीशक्ती रुपाची पुजा करतात ,नंतरच्या तीन दिवस आदीशक्तीची संरक्षक म्हणून महालक्ष्मीची पुजा करतात तर शेवटचे तीन दिवस ज्ञानदायीनी सरस्वतीची पुजा केल्या जाते. ह्या देवीची नऊ रुपे अशी आहेत . शैलपुत्री, ब्रम्हचारीणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिन...
# 1283: फक्त मदतीची इच्छा हवी. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 13.10.2023 3:24
Send us Fan Mail मी तिला म्हटलं, "आज्जी, तुमची हरवलेली ५० रुपयाची नोट मला मिळाली, ती द्यायला मी आलोय. घ्या तुमची ही नोट." हे ऐकून म्हातारीला रडू कोसळलं. ती म्हणाली, "बाळा, आता पर्यंत जवळ जवळ ५०-६० जण मला ५० रुपयाची नोट देऊन गेलेत."
# 1282: नीज न ये तर.. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 12.10.2023 7:43
Send us Fan Mail झोप ही नुसती आळसाची वेळ नसते. त्या वेळी शिथिल झालेल्या स्नायूंना आराम मिळतो; पण मेंदूची ऊर्जेची गरज गाढ झोपेतही फक्त १५ टक्क्यांनीच घटते. दिवसभरात गोळा केलेल्या अनुभवांच्या नोंदींतून नको त्या नोंदी काढून टाकणं; महत्त्वाच्या नोंदींच्या आठवणी बनवून त्या योग्य जागी जपून ठेवणं; जुन्या आठवणींतल्या टाकाऊ भागाची अडगळ कचऱ्यात टाकणं ही महत्त्वाची कामं त्या वेळीच होतात.
# 1281: परहिताचे चिंतन. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 11.10.2023 5:25
Send us Fan Mail "महाराजा! या मूर्तीजरी दगडातून कोरुन काढल्यात तरी त्या अत्यंत नाजूक आहेत. त्या काही अमरत्वाचे वरदान घेऊन आलेल्या नाहीत. कुणा एखाद्या नोकरांच्या हातून मूर्ती तुटणे झाले तर त्याला विनाकारण फाशीची शिक्षा भोगावी लागेल . मला आधीच फाशीची शिक्षा झाली आहे, म्हणून मी इतर दोन मुर्ती तोडून त्या दोन लोकांचे प्राण वाचवले".
# 1280: कुऱ्हाडीला शेवटची धार कधी केली? (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 10.10.2023 4:54
Send us Fan Mail अब्राहम लिंकन म्हणत, "मला झाड तोडण्यासाठी सहा तास द्या आणि मी पहिले चार कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी घालवीन." तुमची कुऱ्हाड धारदार करण्यासाठी तुमच्या कॅलेंडरवर वेळ नक्की द्या.
# 1279: देवाशी नाते (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 09.10.2023 5:24
Send us Fan Mail जेव्हा केवळ राजाशी संबंध ठेवून आपले संकट दूर होते, तेव्हा आपण या जगाच्या राजाशी म्हणजेच देवाशी आपलं नातं प्रस्थापित केलं तर आपल्यावर कोणतंच संकट किंवा कोणतीही अडचण येणार नाही. हे जेव्हा माणसाला उमगेल तेंव्हा दु:खाचे कारणच रहाणार नाही.
# 1278: फोबो . F O B O (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 08.10.2023 7:04
Send us Fan Mail उन्हाळ्याच्या सुटीत बच्चेकंपनी जमली, म्हणून उत्साहानं आइस्क्रीमचा एक लिटरचा फॅमिली पॅक आणला. मुलं आडवी-तिडवी पडून टी. व्ही. बघत होती. मी आपला बावळटासारखा, जोरात ओरडलो, ‘आइस्क्रीम..’ ‘‘ये…’’ मुलं ओरडली आणि भर उन्हात जाऊन आइस्क्रीम आणण्याचं सार्थक झालं, असं वाटलं मला. पण ते तसं नव्हतं हे मला लगेचच कळलं...
# 1277: संत कबीर. लेखिका एवं कथन: ( डॅा. श्रीमती शशि परोदा. ) 07.10.2023 6:25
Send us Fan Mail मध्यकालीन सन्तों में सन्त कबीर का नाम शीर्ष पर है। बचपन से ही उनकी रुचि अध्यात्म में थी। उन्होंने गुरू रामानन्द से दीक्षा प्राप्त की। वे शब्दमार्गी थे व सब को अंतर्मुखी होने का उपदेश देते थे।
# 1276: ताना रीरीची कथा (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 06.10.2023 6:53
Send us Fan Mail ताना रीरी देवीसमोर मल्हार गाऊ लागल्या .. पहिला सूर कानी पडताच तानसेनाच्या कानात अमृताचे थेंबच पडले ... डोळ्यातून अश्रू वाहू लागले .. हा स्वर्गीय सूर ..आणि हे सुरांचे पावित्र्य .. वातावरण बदलू लागले .. कुंद झाले ... ढग भरून येऊ लागले .. आणि काही वेळाने आवेगाने बरसू लागले ...
# 1275: आधार (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 05.10.2023 5:10
Send us Fan Mail एवढ्याश्या पैशात ती काय त्या मुलीचा इलाज करणार होती कोण जाणे! तिला withdrawal slip भरून दिली, पण डोक्यात त्या मुलीचेच विचार चालले होते. आणि, मला एकदम ती दिवाळीतील HP प्रिंटरची जाहिरात आठवली...
# 1274: तिच्यातली डोंबारीण (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 04.10.2023 5:46
Send us Fan Mail रस्त्याच्या कडेला एक डोंबारीण तिची कौशल्ये दाखवत होती. तिला तारेवरची कसरत करताना बघून रचनाला तिच्या जागी ती स्वतःच दिसायला लागली. रचना गढून गेली तिची चपळाई बघताना. झरझर हलत होती, समोरच्या प्रेक्षकांना नमस्कार करत होती...
# 1273: सत्तेचं आवतण. ओशो. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 04.10.2023 5:07
Send us Fan Mail "सम्राट।ने तुम्हाला त्यांचे सल्लागार म्हणून नियुक्त करू इच्छितात . हे ऐकल्यावर त्याने लगेच विहिरीच्या पाण्याने आपले कान धुतले. लाओ त्झू म्हणाला, "सत्तेचं आवतण ही माणसाचा मेंदू भ्रष्ट करणारी गोष्ट आहे. ते कानावरूनच धुवून काढले." लोक म्हणाले, "तुझं ठीक आहे, गाढवाचे कान का धुतलेस?" लाओ त्झू म्हणाला, "सत्ता माझ्यासारख्या विरक्त माणसाला विचलित करू शक...
# 1272: कोसळणारा पाऊस - एक चिंब अनुभव. लेखक : मंगेश मधुकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 03.10.2023 6:38
Send us Fan Mail काळासोबत आम्हां बापलेकाच्या आयुष्यातल्या जागा, भूमिका आणि जबाबदाऱ्या सगळं सगळं बदललं फक्त एक गोष्ट कायम होती ती म्हणजे *कोसळणारा पाऊस.* आमच्या बदलत्या नात्याचा साक्षीदार....
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.