Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Author
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Category
Podcast website
Latest episode
Jul 7, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
# 1321: देवाचे दुकान. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 22.11.2023 3:27
Send us Fan Mail देवदूत म्हणाला, "माझ्या बाळा, इथली बिल भरण्याची पद्धतही दैवी आहे. आता तू जिथे कुठे जाशील, तिथे या गोष्टींची उधळपट्टी कर, सर्वांना मुक्तपणे वाट. या गोष्टींचे बिल असेच भरले जाते..." या दुकानात क्वचितच कोणी प्रवेश करतो, जो आत जातो तो श्रीमंत होतो, तो या गुणांचा भरपूर उपभोग घेतो आणि लुटतो...
# 1320: वेडा. लेखक डॉ. अभिजीत सोनावणे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 17.11.2023 6:26
Send us Fan Mail "बाबा, तुमच्या आईला मी डायबेटीस आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या कायम स्वरुपी दिल्या माझ्याकडुन तर तुम्हाला इथं हे असं मागावं लागणार नाही बरोबर ? म्हणाले, नको डॉक्टर , तुम्ही भिका-यांसाठी काम करता, तीला तुम्ही गोळ्या देणार म्हणजे एका अर्थी ती भिकारीच झाली ना ? मी आहे अजुन समर्थ, तीचा मुलगा म्हणुन... मला कुणी भिकारी म्हणालं तरी चालेल पण तीला नाही...."
# 1319: सर्जिकल फायरक्रॅकर्स. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 16.11.2023 7:40
Send us Fan Mail आमच्या वेदना तज्ञांनी आता शेवटचा प्रयत्न म्हणून आम्हाला शस्त्रक्रिया करून पाहण्यासाठी तुमच्याकडे पाठवले आहे, कारण त्यांच्याकडे पर्याय संपले आहेत," ती माझ्याकडे एमआरआय फिल्म्स सोपवताना म्हणाली. माझ्या नैदानिक मूल्यांकनातून माझ्या अपेक्षेप्रमाणे, त्यात मेंदूच्या मागच्या बाजूला एक धमनी घशाच्या मज्जातंतूवर दाब आणत असलेली दिसून आली. "ग्लोसोफॅरिंजियल न्युराल्जिया..!"...
# 1317: दीपावलीच्या काही गोष्टी. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 15.11.2023 5:04
Send us Fan Mail श्री गणपती तर महा बुद्धिमान! तो म्हणाला, "देवी, मी ज्याचं नाव तुला सांगेन त्याच्यावर तू कृपा कर! त्यासाठी तू मला विरोध करायचा नाहीस!" लक्ष्मीनं गणपतीची ही मागणी मान्य केली! तेव्हापासून श्री गणेश लोकांच्या भाग्यातील विघ्न / अडचणी यांचं निवारण करण्यासाठी त्यांच्यासाठी धनभंडाराचे दार उघडू लागले!
# 1318: ‘एक होती चिमणी‘ चा उत्तरार्ध. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 15.11.2023 8:16
Send us Fan Mail कुणीतरी आपलं माणूस आपल्याला साद घालतंय हे आपल्या ध्यानीच नसतं. ह्यामध्ये आपला भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात... …. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो *…'थांब मला जरा करिअर करु दे.... थांब जरा मला आता घर घ्यायचय... थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब मला काम आहे ... थांब मला विश्रांती घ्यायची आहे ... थांब जरा मला आता ….&apos...
# 1316: तीन कुत्रे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 15.11.2023 3:50
Send us Fan Mail
# 1315: हयातीचा दाखला. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 15.11.2023 5:14
Send us Fan Mail ठण्णकन् आवाज झाला. पहिल्या मजल्यावरच्या एका बाल्कनीच्या दारावर, एक दगड जोरात आदळला. तसा फार काही मोठा दगड नव्हता. असेल लिंबाएवढा. अरे पण काय हे ? आवाजानं बाल्कनीचा दरवाजा उघडला गेला. तणतणत एक म्हातारा बाहेर आला. खाली वाकून ओरडू लागला. एक दहा बारा वर्षाचा पोरगा असेल. सायकलवर टांग टाकून रफू चक्कर झाला.
# 1314: मायटोकॅान्ड्रीया आणि दीर्घायुष्याचं रहस्य! (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 14.11.2023 8:05
Send us Fan Mail सजीवांनी जगण्यासाठी वेगवेगळ्या कला शोधल्या किंवा आत्मसात केल्या ज्या पैकीच एक म्हणजे ऑक्सिजनच्या सानिध्यात शर्करेचं मंद ज्वलन करणं आणि त्याद्वारे ऊर्जा निर्मिती करणे. अशी कला ज्यांच्याकडे आहे अश्या एकपेशीय सजीवांना गिळंकृत करून दुसऱ्या मोठ्या सजीवांनी त्यांना स्वतःच्या शरीरात ठेवून घेतलं आणि त्यांच्याकडून स्वतः साठी उर्जा निर्मितीची कामं करून घेतली.
# 1313: पडसाद पसाऱ्याचे! (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 12.11.2023 4:15
Send us Fan Mail जेव्हा आपल्या आसपास लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी असतात तेव्हा त्यातली प्रत्येक गोष्ट आपल्या मेंदूचं लक्ष वेधून घेण्यासाठी धडपड करत असते. मात्र सुव्यवस्था आणि टापटीपिला प्राधान्य देणारा मेंदू एकावेळी अनेक कामं करण्याऐवजी एकाच कामावर लक्ष केंद्रित करण्यावर भर देतो.
# 1311: भये व्यापिले सर्व ब्रम्हांड आहे. लेखन आणि कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 11.11.2023 8:37
Send us Fan Mail तरुण योद्धा त्या दिवशी एक मौल्यवान धडा शिकला: भीतीला पराभूत करण्याची शक्ती तिच्याशी लढण्यात नसून तिचा आपल्यावर पडणाऱ्या प्रभावाचा प्रतिकार करण्यामध्ये आहे.
# 1312: संत पुंडरीक और विट्ठल भगवान: लेखिका एवं कथन: ( डॅा. श्रीमती शशि परोदा. ) 11.11.2023 5:10
Send us Fan Mail श्री विट्ठल भगवान वैष्णव देवता हैं , जिन्हे श्री हरि विष्णु एवं श्री कृष्ण का रूप माना जाता है।पुंडरीक जी को श्री विठ्ठल भगवान को पंढरपुर लाने का श्रेय दिया जाता है, जहां श्री विठ्ठल भगवान का प्रमुख मन्दिर है।
# 1310: श्यामची आई : लंडन मधली. लेखक प्राचार्य प्रकाश बोकील. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 10.11.2023 3:44
Send us Fan Mail त्या मुलांनी आईस्क्रीम खाल्लं आणि आजीकडे जाऊन 75 पेन्स काढून काउंटरवर ठेवले . तिच्या लक्षात आलं की याने पंधरा पेन्स जास्त दिलेत. ती म्हणली , "अरे बाळा, त्या आईस्क्रीम ची किंमत 60 पेन्स होते". तो मुलगा म्हणाला "आजी आईस्क्रीमचे साठ आणि पंधरा पेन्स टीप म्हणून दिलेत"!
# 1309: हनुमंताच्या अष्टमहासिद्धी . (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 09.11.2023 8:51
Send us Fan Mail मार्कंडेय पुराणात आठ सिद्धींचे वर्णन आहे. कठोर उपासनेमुळे व विशिष्ट प्रकारच्या आचरणाने त्या प्राप्त होतात असा विश्वास आहे. सिद्धी या शब्दाचा अर्थ आहे- पूर्णता, प्राप्ति,सफलता इ. अष्टसिद्धी प्राप्त असलेला हनुमान आपल्या भक्तांना या सिद्धींचे वरदान देऊ शकतात. असे आशीर्वाद त्याला जानकी मातेने दिले होते. "अष्ट सिद्धी नवनिधी के दाता, असबर दीन जानकी माता", ..गोस्वामी तुलसीदास...
# 1308: घोडा हवेत उडेल सुद्धा लेखक प्रा प्रकाश बोकील. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 08.11.2023 5:35
Send us Fan Mail "अगं, मला घोड्याला उडायला शिकवायची कला येत नाही हे काय मला ठाऊक नाही? पण एक वर्षात काय काय होईल हे कोणी पाहिले आहे? कदाचित राजा मरेल ,कदाचित मी मरण पावेन आणि कोणी सांगावं एखाद्या चमत्कार होऊन घोडा शिकेल सुद्धा हवेत उडायला . तोपर्यंत फाशी तर दूर गेली आहे हे काय कमी आहे?"
# 1306: चौदा लांडग्यांनी केली नदी जीवंत! (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 07.11.2023 8:17
Send us Fan Mail या जंगलातील लांडगे तेथील स्थानिक लोकांनी शिकार करून संपवले होते. लांडग्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तूंना अमेरिका व युरोपमध्ये खूप मागणी असल्याने त्यांची बेसुमार शिकार होत होती. त्यातून या लांडग्यांचे अस्तित्त्वच माणसाने पूर्ण संपवले होते. त्यामुळे चक्क नदी आटली होती. पण तुम्ही म्हणाल 'हे कसं शक्य आहे?'
# 1307: खरा न्याय. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 07.11.2023 3:27
Send us Fan Mail राजा तुला न्याय निवाडा करायचा असतो अशावेळी एखाद्या निरपराध व्यक्तीला तुझ्या हातून शिक्षा झाली तर त्या व्यक्तीला किती प्रचंड वेदना चिरकाल होत राहतील याची तुला जाणीव करून देण्यासाठी मी तुला शिक्षा केली होती.
# 1305: असली - नकली. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 06.11.2023 4:38
Send us Fan Mail इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणूस उठला आणि म्हणाला, "हे राजन, तसेही आपण आव्हान हरलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हरलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केलीय" राजानं क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला हिरा पारखण्याची परवानगी दिली.
# 1303: मानव जात त्याची ऋणी आहे. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 05.11.2023 7:10
Send us Fan Mail निकोलला कुत्र्यानं चावा घेतला अन् गर्दी जमा झाली.. निकोल किंचाळतांना कुत्र्यासारखंच दात विचकून गुरगुरायला लागला. त्याचं शरीर आखडलं. त्याला पाण्याची भिती वाटायला लागली. हळूहळू तो इतरांनाही चावण्याचा प्रयत्न करायला लागला... महिन्याभरात निकोल देवाघरी गेला आणि त्याचं किंचाळणं चाळीस वर्षे ऐकू येणारा त्याचा मित्र पुढं जाऊन जगातला एक महान शास्त्रज्ञ बनला..
# 1304: We are one . Author : Chimaya mission.Narrator : ( अनामिका शर्मा. ) 05.11.2023 4:26
Send us Fan Mail Swami Sivoham, a teacher who teaches important life lessons to his disciples in a practical way is upto teach the concept of 'We are all dependent on each other'. Let us see how does he teach his disciple the lesson for life.
# 1302: राग बायकोचा, फायदा जगाचा. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 04.11.2023 6:59
Send us Fan Mail घरी पोचल्यावर पत्नीने त्यांना जाम फैलावर घेतलं. पार उलटी सुलटी हजामत तीही जणू बिनपाण्याने ! "तुमच्या अशा लेट येण्याने चार लोकात माझी किती फजिती झालीय याची कल्पना नाहीय तुम्हाला" असा तोंडाचा पट्टा सुरु होता. वातावरण खूपच तापलेलं होतं..
# 1301: पांढऱ्या कपड्यातले चोर लुटारू आणि भिकारी. लेखक : रश्मी साठे. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 04.11.2023 5:24
Send us Fan Mail
# 1300: नवरात्र: नववी माळ सिध्दीदात्रीची. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 03.11.2023 3:17
Send us Fan Mail
# 1299: नवरात्र: आठवी माळ महागौरीची. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 02.11.2023 3:23
Send us Fan Mail महागौरी या पांढरे कपडे आणि दागिने परिधान करतात आणि त्या पांढऱ्या बैलावर स्वार असतात. त्यांच्या चार भुजा आहेत, ज्यामध्ये त्यांचा उजवा हात वरद मुद्रामध्ये आहे. त्याच्या खालच्या हातात त्रिशूल आहे, डावा बाहूच्या वरच्या हातात त्यांनी डमरु घेतला आहे, आणि खालचा हात अभय मुद्रा म्हणजे आशीर्वादांच्या स्वरूपात आहे.
# 1298: नवरात्र: सातवी माळ कालरात्रिची. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 01.11.2023 4:02
Send us Fan Mail
# 1297: नवरात्र: सहावी माळ कात्यायनीची. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 31.10.2023 3:05
Send us Fan Mail कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवती देवीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.