Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Author
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Category
Podcast website
Latest episode
Jul 7, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
आकाशफुलं. लेखिका :नीता कुलकर्णी. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 20.12.2023 4:50
Send us Fan Mail चार फुलं हातात घेतली की किती आनंद होतो याचा अनुभव घ्यायचा..... आज या फुलांनी अलगदपणे बरोबर घेऊन मला शाळेच्या वर्गात नेलं......... आणि आभाळभर आनंद दिला.
# 1344: निरूपयोगी कोण? (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 19.12.2023 3:38
Send us Fan Mail गुहेत लपलेल्या राजाच्या डोक्यात प्रकाश पडला कि, 'गांधील माशी चावली नसती तर जंगलात सैनिकांच्या हाती तो सहज सापडला असता,आणि कोळ्याने जाळे विणले नसते तर, गुहेत येवून सैनिकांनी त्याला मारून टाकले असते, म्हणजेच या जगात कोणताही जीवजंतू असा नाही कि ज्याचा उपयोग नाही. प्रत्येकाचे कार्य निराळे आहे.'
# 1343: महामहीम डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि फील्ड मार्शल सॅम माणेकशॅा (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 19.12.2023 3:18
Send us Fan Mail राष्ट्रपती दिल्लीला गेले आणि त्यांनी मानेकशाॅ यांची पेन्शन थकबाकीसह एका आठवड्यात मंजूर केली . १.२५ कोटींचा चेक विशेष विमानाने वेलिंग्टन, उटी, जेथे सॅम आजारी होते तिथे पोचवला कलाम तर महान होतेच . पण जेव्हा हा चेक सॅम यांना मिळाला तेव्हा त्यांनी त्वरित ते पैसे आर्मी रिलीफ फंडला दान दिले.
# 1339: आतला आवाज. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 19.12.2023 7:18
Send us Fan Mail हा हेलिअम फुग्यालाच नाही पण मलाही वर वर नेतो आहे. लहान थोर मी भेटल्यावर धावत भेटायला येतात. प्रेमाने मिठी मारतात. पत्र, मेसेजेस पाठवतात. आशीर्वाद देतात. म्हणून त्या आतल्या आवाजाकडे कुणीही दुर्लक्ष करू नका. तो आवाजच तुम्हाला खरी वाट दाखवेल.
# 1340: सातवा हंडा. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 19.12.2023 4:43
Send us Fan Mail याला काही रोग, व्यथा तर नसेल ना या विचाराने राजवैद्याला पाचारण करीत राजा म्हणाला, ‘अहो वैद्यराज जरा आमच्या त्या सेवकाची प्रकृती पहा, काही रोगनिदान झालं तर उपचार खर्च आम्ही करू. पण त्याला बरं वाटलं पाहिजे.‘ राजवैद्याने त्या सेवकाची नाडीपरीक्षा केली आणि म्हटलं, ‘महाराज या सेवकाची तब्येत अगदी उत्तम आहे, केवळ काळजीने हा कृश होतो आहे . पण काळजी कसली ते वैद्य कसे सांगणार?‘
# 1341: यात श्रीकृष्ण आहे. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 19.12.2023 2:57
Send us Fan Mail बुवांनी शेवटच्या डब्याकडे बोट करून विचारले आणि यात काय आहे? दुकानदार म्हणाला यात श्रीकृष्ण आहे. संन्यासी अचंबित झाला आणि म्हणाला अरे या नावाची कोणती वस्तू आहे मी तर कधी ऐकली नाही हे तर देवाचे नाव आहे. दुकानदार संन्यासीबुवांच्या अज्ञानाला हसून म्हणाला "महाराज तो रिकामा डबा आहे, पण आम्ही व्यापारी रिकाम्या डब्याला रिकामा नाही म्हणत त्यात श्रीकृष्ण आहे असे म्हणतो."
# 1342: अल्झायमर: भाग १. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 19.12.2023 4:31
Send us Fan Mail अल्झायमर हा 'विसरण्याचा आजार'आहे. याचे नाव अलॅाईस अल्झायमर या शास्त्रज्ञाच्या नावावरून ठेवले आहे. त्यानेच सर्वात आधी या रोगाचे विवरण केले. या आजाराच्या लक्षणात स्मरणशक्ती नष्ट होते. शिवाय, निर्णय घेण्यात असमर्थ असणे, बोलण्यास अडचण येणे आणि यामुळे सामाजिक आणि पारिवारिक समस्यांची गंभीर स्थिति होणे इत्यादी होते.
अल्झायमर: भाग २. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 19.12.2023 5:04
Send us Fan Mail या आजाराने ग्रस्त लोकांच्या मेंदू पेशींमध्ये डोकाउन पाहिलं तर अमायलोइड आणि टाऊ या नावाची दोन असामान्य प्रथिने पेशींच्या आजुबाजुला मोठ्या प्रमाणात तयार झालेली दिसतात. या पेशींना या प्रथिनांचा वेढाच पडतो. यापैकी अमायलॅाइड या प्रथिनांचे मेंदू पेशी भोवती डोंगर साठतात. आणि टाऊ या प्रथिनाची पेशी भोवती जळमटं किंवा जाळी तयार होतात. ही प्रथिने या रोगाच्या प्रमुख वैशिष्ट्य मानली जातात. कल्...
# 1338: शास्त्र भांडणाचे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 18.12.2023 7:14
Send us Fan Mail भांडणशास्त्राचा पहिला नियम: मूळ मुद्दा,विषय सोडायचा नाही.आज आत्ता समोर असणाऱ्या समस्येपुरतंच बोलायचं. भूतकाळात काय झाले होते, भविष्यकाळी .... हे काही नकोच यायला , काही विधाने बिलकुल करायची नाहीत, जसे की, "तू नेहमी " ..., म्हणजे " तू "... ने सुरु होणारी वाक्ये टाळायची. नातेवाईक, मित्रमंडळी यांचे उल्लेख ,वेळ वाया आणि प्रकरण हाताबाहेर घालवायचेच असेल तरच करा...
# 1337: श्रीमंत आणि पैसेवाला (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 16.12.2023 5:35
Send us Fan Mail खरोखरंच पैसेवाला आणि श्रीमंत या दोन अत्यंत निरनिराळ्या कन्सेप्ट्स आहेत... गंमत म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होताच पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नव्हता...
# 1336: फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ व जनरल याह्याखान. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 16.12.2023 6:17
Send us Fan Mail याह्या खानने फाळणीनंतर पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा माणेकशॉ यांनी आपली बाइक एक हजार रुपयांमध्ये त्यांना विकली. - याह्या खान बाइक घेऊन गेले आणि पैसे लवकरच पाठवीन असे म्हणाले. वर्षामागून वर्षे गेली, परंतु त्यांनी पैसे पाठवले नाहीत. बांगला देश मुक्तीची लढाई जिंकल्यानंतर ते म्हणाले, "मी याह्या खानच्या चेकची 24 वर्षे प्रतीक्षा केली, परंतु तो कधी आलाच नाही. शेवटी त्...
# 1335: मोरगाव चा मोरेश्वर आणि ऋषी भृशुंडी. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 14.12.2023 3:56
Send us Fan Mail मुद्गल ऋषीनी नामाकोळ्याला कडकडून मिठीत घेतले आणि म्हटले, ‘‘आजपासून लोक तुला ‘भृशुंडी ऋषी’ या नावाने ओळखतील. कारण तुझ्या नामभक्तीला प्रसन्न होऊन श्री गणेशाने तुला आपले रूप दिले. ‘ब्रह्मांडात तू अजरामर होशील’’, असा आशीर्वाद देऊन ऋषी अंतर्धान पावले."
# 1334: नॅनो टेक्नॉलॉजी. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 14.12.2023 7:55
Send us Fan Mail आपण जे पेन लिहायला वापरतो ते एकदा कागदावर टेकवून उचललं तर उमटलेला ठिपका अर्ध्या मिलीमीटर एवढ्या आकाराचा असेल. आता त्या ठिपक्याचे जर आपण झूम करून एक हजार भाग केले तर त्यातला एक भाग असेल आपल्या एका लाल रक्त पेशी एवढा. त्या एका भागाचे पुन्हा १० भाग केले तर तो एक भाग होइल एका व्हयरस एवढा. आपल्याला अधे मधे ताप येतो ना, तो त्याच्याचमुळे. तर त्या एका व्हायरसच्या भागाचे जर आपण पुन्हा १००...
# 1333: असे तयार झाले पर्वत. लेखक : वर्षा गजेंद्रगडकर. कथन - (सौ. नीता दिनेश प्रभू.) 06.12.2023 4:16
Send us Fan Mail "नद्या , झरे, जंगले , पर्वत इत्यादी भौगोलिक वैशिष्ट्यांनी नटलेली पृथ्वी कशी तयार झाली हे सांगणारी लोककथा, ज्यावेळी विज्ञान विकसित झाले नव्हते त्या काळात अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी रचलेली ही लोककथा माणूस आणि निसर्ग यांच्यातलं सौहार्द दाखवणरी आहे "
# 1332: आतमधे बहरणार झाड. लेखक : प्रियांका पाटील. कथन - (सौ. नीता दिनेश प्रभू.) 05.12.2023 6:19
Send us Fan Mail " आजूबाजूला अनेक त्रासदायक प्रसंग घडतात , माणसे भेटतात ती त्या वेळेपुरती त्रासदायक वाटतात पण तुमच्या आतमध्ये असलेल्या संस्कारांच्या झाडाची पाळेमुळे घट्ट रोवलेली असली की मग बाहेरचे कुणी काहीही म्हणो ते झाड तुमच्या आत मधे सतत बहरत राहते आणि सभोवताली असणाऱ्यांना तुमच्या मनस्वी सावलीत सामावून घेत"
# 1331: कृष्णार्पण. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 04.12.2023 7:03
Send us Fan Mail "जे करतो त्याचं श्रेय मला हवं… मला हवं… कशाला ग बाई?.. म्हण कृष्णार्पण आणि हो मोकळी…अंतर्बाह्य रिकामी… तुला ठाऊक आहे, श्रेय साचेल तीळातीळानं… आणि अहंभाव वाढेल मणामणानं… देव आहे की नाही … हा भाग सोड.. पण तू तर आहेस ना? … मग करत रहा… आणि अवकाशात रिती होत रहा… कृष्णार्पण … कृष्णार्पण … कृष्णार्पण …!
# 1230: श्रीक्षेत्र भीमाशंकराची कथा. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 03.12.2023 5:08
Send us Fan Mail त्रेतायुगा मध्ये त्रिपुरासुर नावाचा दैत्य होता. भगवान शंकराची आराधना करून त्याने त्याच्या अमरात्वाचे वरदान शंकराला मागितले . भगवान शंकरांने त्याला वर दिला कि तुझा कोणताही नर अथवा नारी वध करू शकणार नाही. शंकराच्या वरदाना मुळे तो पृथ्वी , स्वर्ग ,पाताळ या तिन्ही लोकात उन्मत्त होऊन देव आणि मानव जातीला त्रास द्यायला लागला.
# 1229: आईची तिजोरी. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 02.12.2023 6:29
Send us Fan Mail कुणाचा हात पोहोचू शकणार नाही किंवा कुणाचं सहज लक्ष जाऊ नये म्हणून घरातल्या घरात पैसे साचवून ठेवायची ती वेगवेगळ्या क्लुप्त्या करून...! आणि पैशांकडे हात आपोआप आकर्षित होत असणारा मी...नकळत मलाच डबोलं मिळायचं तिचं....
# 1328: मधमाशा आणि पिंपळ. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 01.12.2023 5:31
Send us Fan Mail पिंपळ त्याच्या देखणेपणाच्या गुर्मित होता. उद्धटपणे ,तो राणी मधमाशीला रागाने म्हणाला, "जा इथून जा आणि तुझे पोळे दुसरीकडे कर. केवढा तो तुमचा गू sss गु आवाज! जा इथून कशी." लाकूडतोड्यानी पिंपळाच्या झाडावर कुऱ्हाडीने घाव घालण्यास सुरुवात केली. पिंपळाचे झाड वेदनेने जोरजोरात ओरडू लागले. मधमाशांनी लाकूडतोड्यावर हल्ला केला. तो पळून गेला. आता पिंपळाला आपल्या पूर्वीच्या कृत...
# 1327: शीर्षदानी बर्बरीक. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 01.12.2023 7:45
Send us Fan Mail देवीने त्याला वरदान म्हणून तीन अमोघ बाण दिले. या बाणांचं वैशिष्ट्य असं होतं, की यातील पहिला बाण सोडून ज्यांचा वेध घ्यायचा आहे असे लक्ष्य, संख्येने कितीही असले, तरी ते चिन्हांकित केले जात असत, दुसऱ्या बाणाद्वारे ते बांधले जात आणि तिसऱ्या बाणाद्वारे ते पूर्णपणे नष्ट होत असत. या बाणांचा पुनःप्रयोगही करता येत असे. तीन अमोघ बाणांचे वरदान मिळवून बर्बरीकाने युद्धामध्ये जो पक्ष दुर्बळ असे...
# 1326: वीरांगना अंजली कुलथे. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 29.11.2023 5:47
Send us Fan Mail समुद्रमार्गे आलेल्या दहशवाद्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक, नरिमन हाऊस, कामा हॉस्पिटल, लिओपोल्ड कॅफे, ओबेरॉय-ट्रायडंट हॉटेल आणि ताज हॉटेलला लक्ष्य करून बंदूक आणि बॉम्बने हल्ला केला. या हल्ल्यात 166 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता तर 300 हून अधिक जण जखमी व अनेक पोलीस शहीद झाले. अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावलं तर त्याच वेळी काहींनी जीवाची बाजी लावून अनेकांचे...
# 1325: मधुमेहावरील विजयाची कथा. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 29.11.2023 8:21
Send us Fan Mail सन १९२२ ते १९७२ या ५० वर्षांत इन्शुलिन हे गुरेढोरे, डुकरे यांच्या स्वादुपिंड ग्रंथींपासून शुद्ध स्वरूपात मिळवले जायचे आणि औषध म्हणून वापरले जायचे. मधुमेहावरील रामबाण औषध इन्शुलिन हल्ली, ज्या तंत्रज्ञानाने बनवले जाते ते म्हणजे रिकॉम्बिनन्ट डीएनए टेक्नॅालॅाजी.
# 1324: संघर्ष आवश्यकच. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 27.11.2023 4:58
Send us Fan Mail काळ निघून गेला आणि त्याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्हे इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्या मनात विचार केला की ‘आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो‘.
# 1323: समुद्रमंथनाची कथा. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 24.11.2023 7:08
Send us Fan Mail विष्णु पुराणानुसार, महर्षी दुर्वासांच्या शापामुळे एकदा स्वर्गातील ऐश्वर्य, धन, वैभव संपुष्टात आलं. मग यावर विष्णूंनी त्यांना दानवांसह समुद्र मंथन करण्याचा उपाय सांगितला. त्यातून अमृत निघेल, ते घेतल्याने तुम्ही सर्वजण अमर व्हाल, असे विष्णूंनी देवांना सांगितलं. देवतांनी अमृत कलशाविषयी माहिती दानवांचा राजा बळीलादेखील सांगितली. त्यानंतरच दानव समुद्रमंथनासाठी तयार झाले.
# 1322: गुरू. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 23.11.2023 5:24
Send us Fan Mail त्या जगन्नियंत्यानं गर्भाशयाची भिंत इतकी मजबूत बनवलेली असते की ती सहज उघडता येत नाही आणि ती उघडली तरी सात महिन्यांच्या गर्भधारणेपासून मूल जन्माला येण्याची आणि जगण्याची शक्यता होती, तर आईला शुद्धीवर येणे कठीण होते. त्यामुळे माझ्या मनात शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नव्हता. एवढ्यात शांतपणे बघत असलेला मदतनीस अचानक माझ्याकडे आला आणि माझ्या कानात कुजबुजला...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.