Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Author
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Category
Podcast website
Latest episode
Jul 7, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
# 1370: झोप आणि प्राणीजगत (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 19.01.2024 6:32
Send us Fan Mail कोणताही जीव फार काळपर्यंत झोपेशिवाय शहाणीवेत/समजूतदार राहू शकत नाही. झोप ही मूळ जीवशास्त्रीय क्रियांसाठी गरजेची असते. संशोधकांच्या अभ्यासानुसार, झोपेमुळे पेशीप्रसार आणि वाढ यासाठी प्रोत्साहन मिळते. म्हणूनच बाळ दिवसाचे १८ ते २० तास झोप काढते.
# 1368: मकरसंक्रांत (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 18.01.2024 7:43
Send us Fan Mail संक्रातीच्या दिवसापासून सुर्य उत्तरेकडे जाऊ लागतो. सुर्याच्या या गमनास उत्तरायण असे म्हणतात. दिवस मोठा होतो रात्र लहान होते. सुर्यप्रकाश अधिक मिळु लागतो या घटनेचा मानवी जीवनावर परीणाम होतो. दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सुर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.
# 1366: शुक्राचार्य दैत्यगुरू कसे झाले.. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 18.01.2024 4:39
Send us Fan Mail एकदा भृगुऋषी समाधिस्थ असता शुक्राची नजर आकाशमार्गे चाललेल्या एका अप्सरेकडे गेली. शुक्र देहाने जरी तिच्या मागून गेला नाही, तरी तो मनाने तिच्यात गुंतला. डोळे मिटून तो मनोराज्यात गढून गेला. तिच्या मागून तो स्वर्गात पोचला, नंदनवनात हिंडला, कल्पवृक्षाखाली बसला, एवढेच काय त्याने इंद्राला जवळून वंदन केले.
# 1367: त्यांचे दात का नाही किडत.. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 18.01.2024 6:29
Send us Fan Mail कधी कुठल्या कुत्र्याला सिगरेट ओढताना पाहिलंत का? किंवा मांजर दारात बसुन तंबाखू चोळतेय असं दिसलं का? व्यसनाचे अतिशय वाईट परिणाम तोंडातील हिरड्यावर आणि दातांवर दिसतात. प्राणी हे माणसांप्रमाणे रिकाम्या वेळेत सिगारेटच्या धुराने नाकातोंडातुन वलयं काढत बसत नाहीत. म्हशीने दूध देऊन लगेच लावारसा सारखा कडक उकळता चहा घशात टाकताना दिसलंय का कधी?? सगळ्या वाईट सवयी माणसाला आणि प्राण्यांचे दात क...
# 1365: वामन आणि बळी. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 17.01.2024 7:27
Send us Fan Mail सर्वांनी वामनाचे स्वागत केले. त्याचे पादप्रक्षालन करून बळीने विचारले, ‘तुम्हाला जे हवे असेल, ते नि:संकोचपणे माझ्याकडून मागा. मी तुमची इच्छा पूर्ण करीन.’ त्यावर वामन म्हणाला, ‘राजन्! तू प्रल्हादाचा नातू, हिरण्यकश्यपूचा पणतू आहेस; त्यामुळे तू माझी इच्छा पूर्ण करशील, याची खात्री वाटते. मला तीन पावले भूमी हवी आहे.’
# 1364: शुक्राचार्य आणि कच देवयानी (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 16.01.2024 5:15
Send us Fan Mail देवयानीची शापवाणी ऐकून, आपण एवढे समजावून सांगत असताना देखील देवयानी ऐकत नाही आणि विवाहाचा हट्ट धरते आहे, यावर क्रोधीत होऊन कचदेवांनीही देवयानीला शाप दिला की तुलाही या विद्येचा काहीही उपयोग होणार नाही आणि तू ब्राह्मण कन्या असूनही तुझा विवाह ब्राह्मणेतर व्यक्तिबरोबर होईल.
# 1363: शुक्राचार्य आणि मंदिर . (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 16.01.2024 7:44
Send us Fan Mail गुरुची सेवा करण्यासाठी सर्व शिष्य, कचासह रोज पैल तीरावरुन ऐलतिरावर नित्यनियमाने येत असत. या शिष्यांना नदीच्या विशाल पात्रातून येण्या -जाण्याचा त्रास होऊ नये म्हणून शुक्राचार्यांनी आपल्या हाताचा कोपर मारुन नदीचा प्रवाह बदलला. आज जो गोदावरी नदीचा प्रवाह आपणांस दिसत आहे तो बदलेला प्रवाह आहे. हाताच्या कोपराने नदीचा प्रवाह बदलल्यामुळे या भागास कोपरगांव असे नाव पडल्याची आख्...
# 1362: स्वामी विवेकानंद आणि हटयोगी पवहारीबाबा. लेखक श्री. सुनील चिंचोळकर : कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 14.01.2024 7:02
Send us Fan Mail पवहारी बाबांकडून हटयोगाची साधना घेणे स्वामी विवेकानंदांच्या पुढच्या कार्याच्या दृष्टीने अजिबात पूरक ठरले नसते. पवहारी बाबांच्या जीवनामध्ये कर्माचा अभाव दिसून येतो. आणि स्वामीजींना तर 'शिवभावे जीवसेवा ' करण्याचे कार्य करायचे ठाकूरांनी निश्चित केले होते. म्हणून ठाकूरांनी देहात नसतानाही येऊन त्यांना सावधानतेचा इशारा दिला. एका पत्रात स्वामी विवेकानंद म्हणतात "या जन्म...
# 1361: मजेदार मांजरे. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 13.01.2024 4:23
Send us Fan Mail भटकणारा मानव शेतीमुळे स्थिर झाला. धान्याचे नुकसान करणारे उंदीरवजा प्राणी नियंत्रणाखाली ठेवण्याचे काम मांजरे करू लागली. गेल्या नऊ ते १० हजार वर्षांत मांजर हे मानवाच्या पसंतीस उतरू लागले. मानवासारखीच पाच ज्ञानेंद्रिये मांजरातही असतात. पण यांचा वापर मार्जार अधिक क्षमतेने करते.
# 1360: विनता आणि कद्रूची गोष्ट. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 13.01.2024 8:42
Send us Fan Mail पुढे एक दिवस कद्रूने विनताला विचारले, ‘समुद्र मंथनातून आलेल्या उच्चै:श्रवा घोड्याचा रंग कोणता आहे चटकन सांग पाहू?’ विनता म्हणाली, ‘अगं, तो चंद्रासारखी सतेज कांती असलेला घोडा पांढऱ्या शुभ्र वर्णाचा आहे.’ त्यावर कद्रू म्हणाली, ‘छे छे, त्याचा रंग पांढरा असला, तरी शेपूट काळी आहे.’ दोघींमध्ये यावर पैज लागली. जी हरेल ती दुसरीची दासी होणार, असे ठरले.
# 1359: पेशीमृत्युचा रहस्यभेद. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 10.01.2024 3:52
Send us Fan Mail जखमी पेशी किंवा जिवाणू आणि विषाणूग्रस्त पेशी आत्महत्या करतात त्यामुळे जिवाणू किंवा विषाणूंचा शरीरा अंतर्गत प्रसार थांबू शकतो त्यासाठी हे स्वतःचे बलिदान देणे आहे पेशींमध्ये अनेक एंझाइम्सने भरलेली एक पिशवी असते. या एंझाइम्सच्या मदतीने पेशीतील अंगके आणि इतर अवशेषांच्या ढिगाऱ्याचे विघटन केले जाते. हा मेलेल्या पेशींचा जणू अंत्यविधीच असतो.
# 1358: सत्यनिष्ठ राजा हरिश्चंद्र. लेखक : स्वामी गोविंददेव गिरी. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 09.01.2024 10:07
Send us Fan Mail श्रीरामांचा पूर्वज राजा हरिश्चंद्राने स्वप्नात आपले आयोध्येचे राज्य महर्षी विश्वामित्रांना दान दिले. दानाची पूर्तता करण्यासाठी दक्षिण| द्यावी लागते. त्यासाठी राजा काशीत डोंबाकडे स्मशानात काम करू लागला. राणी तारामतीला मोलकरीण म्हणून कोणाकडे काम करावे लागे. त्यांचा मुलगा रोहित सर्पदंशाने मृत्यू पावला. स्मशानात त्याच्या कलेवरला अग्नी देते वेळी अग्नी, यम आणि इंद्र देवता प्रगट झाले....
# 1357: वाल्मिकींनी रचला पहिला संस्कृत श्लोक. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 08.01.2024 5:21
Send us Fan Mail एके दिवशी वाल्मिकी गंगा नदीत स्नान करण्यासाठी जात होते. पण वाटेत त्यांना तामसा नदी दिसली तिचे पाणी पण अतिशय स्वच्छ होते. त्यांना वाटले इथेच आंघोळ का करू नये. यावेळी त्यांना प्रेमलीलांमधे मग्न असलेल्या क्रौंच पक्ष्यांची जोडी दिसली. महर्षी वाल्मिकी यांना त्या प्रेमी युगुलाकडे पाहून खूप आनंद झाला. पण अचानक सूंऽऽसूंऽऽ करत एक बाण आला आणि नर पक्ष्याला लागला. तो वेदनेने झाडावरून पडला आणि...
# 1356: मास्तरांची स्कूटर . (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 07.01.2024 6:00
Send us Fan Mail मास्टर चोरला म्हणाले, “तू कधीही कोणाला सांगू नकोस की ही स्कूटर तू कशी चोरलीस." “हा रस्ता खूप उबड-खाबड आणि निर्जन आहे. इथे क्वचितच वाहन मिळते. त्यात या रस्त्यावर जर अशा वाहन चोरीच्या घटना घडल्या तर जे थोडेथोडके लोक लिफ्ट देतात, ते सुद्धा दुसऱ्यांना मदत देणे बंद करतील*”
# 1355: समर्थ संकल्प. लेखक : प्रवीण मुकुंद कुलकर्णी. सज्जनगड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 07.01.2024 9:37
Send us Fan Mail समर्थांना बालपणी आईने वर्णिलेली रामारायाची अयोध्या आणि समोरची अयोध्या वेगळी होती. भोवतीच्या प्रसादाला खिडक्यांना हिरवे पडदे होते. सूर्यवंशी ध्वजाची ओळख कुठेच दिसत नव्हती . शेंदुराचे त्रिपुंड्र लाऊन समर्थ त्या पावन प्रांगणात पोहचले..! रामलल्ला एका जीर्ण देवळात...! विश्वाचा विश्राम एका छोट्याश्या कनाती वजा देवळात..! हे पाहून समर्थ रुद्रावतार ध|रण करू लागले..! अकरा महिने समर्थ अय...
# 1354: मका, मिरची आणि कोलंबस. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 06.01.2024 8:17
Send us Fan Mail आपल्या खाद्य पदार्थांपैकी बटाटे, रताळी, मका, मिरची, टोमॅटो अशा अनेक वनस्पती मूळच्या अमेरिका खंडातल्या. युरोपीय वसाहतवाद्यांबरोबर त्या भारतात आल्या असं मानलं जातं. कृषी तज्ञ आणि इतिहास तज्ञ हेच सांगतात. पण या समजला छेद देण्याऱ्याही अनेक गोष्टी आहेत. अकराव्या ते तेराव्या शतकातल्या अनेक मंदिरांवर मक्याचं कणीस कोरलेलं दिसतं. देवादिकांच्या, अप्सरांच्या मूर्तींच्या एका हातात हे कणीस मौल...
# 1353: विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेता शोध. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 05.01.2024 6:23
Send us Fan Mail सामान्यपणे लस निर्माण करताना मृत किंवा दुबळा केलेला विषाणू किंवा जीवाणू मानवाच्या शरीरात टोचण्याऐवजी, विषाणू किंवा जीवाणूचे महत्त्वाचे किंवा विशिष्ट भाग शरीरात जाऊ द्यायचे; ज्यांच्यामुळे प्रतिकार यंत्रणा जागृत होऊन या जीवाणू / विषाणूविरुद्ध लढा उभारेल. विषाणूंच्या बाबतीत हे भाग म्हणजे, त्यांच्या शरीरातील जनुकीय भाषेत लिहिलेले पदार्थ.
# 1352: अन्न सोहळा. लेखक : श्री.सतीश बर्वे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 03.01.2024 6:16
Send us Fan Mail
# 1351: शबरीची भक्ती. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 03.01.2024 9:53
Send us Fan Mail अखेरिस न राहून तिने मुनींना प्रश्न केला, की उद्धार म्हणजे काय? माझा उद्धार व्हावा यासाठी मी काय करु? गुरुजींनी तिच्या मस्तकावर आपला हात ठेवला आणि मोठ्या प्रेमाने म्हणाले, “काळजी करू नकोस, तुझा उद्धार आपोआपच होणार आहे.” "मुली, श्रीराम या आश्रमात येईल तुला भेटायला, तू इथेच थांब." अबोध शबरीला इतके माहीत होते की गुरूची वाणी सत्यच असेल..
# 1350: डोळे हे जुल्मी गडे. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 02.01.2024 6:05
Send us Fan Mail निळे डोळे हे निळ्या रंगद्रव्यांच्या उपस्थिती मुळे नीळे होतं नसून ते बुबुळातील प्रकाशाच्या विखुरण्यामुळे तसे होतात. ही तिच वैज्ञानिक घटना आहे ज्यामुळे आकाश निळं दिसतं. प्रकाशाचे विखुरणे तेव्हा होते जेव्हा बुबुळाच्या पुढच्या भागात थोडसंच किंवा अजिबात मेलेनिन नसते, ज्यामुळे प्रकाश शोषण्याऐवजी विखुरला जातो.
# 1349: QR कोड आणि लग्न . लेखक : किरण कृष्णा बोरकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 01.01.2024 7:42
Send us Fan Mail पत्रिकेवरचा QR कोड स्कॅन केला . ताबडतोब त्याच्या मोबाईलवर लग्न पत्रिका आणि एक गूगल फॉर्म आला . त्यात काय जेवणार ते सिलेक्ट केले. हॉल मधे नवऱ्याच्या बाजूच्या क्यूआर कोडवर हजार रु स्कॅन केले .पैसे पोचल्याची रिसीट मिळाली . तिथे पाच सहा ठिकाणी वेगवेगळे सेल्फी पॉईंट ठेवले होते . त्यावर एक व्हाट्स अप नंबर दिला होता. "भाऊ इथे फोटो काढून व्हाट्सअप वर पाठवले की त्यात नवरा नवरीचे फोट...
# 1348 : डायरी, माझी सखी. लेखिका : नीता कुलकर्णी. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 30.12.2023 7:42
Send us Fan Mail दरवर्षी कोणीतरी मला डायरी देतं. त्या डायरीत मी सटर फटर काहीतरी लिहायची. वर्ष संपत आलं की थोडीशी पानं भरलेली असायची.....पण आता ती माझं विसाव्याचं विरंगुळ्याचं ठिकाण झालंय...
# 1347: सिंधू. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 24.12.2023 8:37
Send us Fan Mail एकाद्या भूप्रदेशाच्या, राष्ट्राच्या फाळणीत पहिला बळी पडतो तो माणूस व माणूसकीचा. नंतर स्थावर जंगम इस्टेटीचा. परंतु भारताच्या फाळणीत मात्र सिंधू नदीचाही बळी गेला. ‘INDUS‘ INDIA पासून पळवली गेली. ती आक्रोश करत राहिली. पण अखेर वास्तव स्वीकारून निमूटपणे वाहत राहिली.. लडाखमध्ये सिंधू फेस्टिवल साजरा होत असतो. तिचं जल ओंजळीत घेऊन, सिंधू नदीला अखंड हिंदुस्थानात परत आणण्याची प्रतिज्ञा घेतली...
# 1346: अंतराळात हरवला टोमॅटो. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 22.12.2023 5:02
Send us Fan Mail काही महिन्यांपूर्वी अंतराळवीर फ्रँक रुबियो यांनी अंतराळात टोमॅटो लावले होते. या टोमॅटोच्या गुच्छातून एक टोमॅटो गायब झाला होता. यावरून तो टोमॅटो एलियन्सनी खाल्ला काय? अशी विनोदी चर्चा देखील सुरू झाली होती. आता बरेच महिने उलटून गेल्यानंतर त्या टोमॅटोचं नेमकं झालं काय या मागचं रहस्य समोर आलं आहे.
# 1345: समर्थे हनुमान सामर्थ्य किंचित दाखविले. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 20.12.2023 3:25
Send us Fan Mail समर्थ रामदास स्वामींनी काही चमत्कार देखील केले. त्याविषयी...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.