Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Kids MR ↓ 2071 episodes

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Author

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Category

Kids

Latest episode

Jul 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

# 1393: मी आहे पेशी कॅन्सरची. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 16.02.2024

Send us Fan Mail कॅन्सर हा आपल्याच काही पेशींना झालेला रोग आहे. गरज नसताना, पेशी विभाजन करून सतत वाढत जाणारी, सैरभैर झालेली, आपल्याच शरीरातील विकृत पेशी ही कॅन्सरची असते. जिवाणूजन्य रोगांचा इलाज करणे तुलनेने सोपे असते; कारण या रोगजंतूविरोधी औषध घेतले, की आपण या जंतुंचा नाश करू शकतो. कॅन्सरच्या पेशी मात्र आपल्याच पेशींची फितूर भावंडे असल्यामुळे, त्यांच्यात फरकांपेक्षा साम्यच अधिक असते. कॅन्सरच्या प...

# 1392: वाचाल तर वाचाल - भाग २. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 15.02.2024

Send us Fan Mail समाजातील सर्व थरातील लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी "पुस्तकांचं गाव" ही संकल्पना महाराष्ट्रात राबवली जातेय. हे "पुस्तकांचं गाव" भिलार मध्ये आकारास आलं आहे. पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावरील पाचगणीपासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर असलेल्या भिलार गावात आता ही अभिनव संकल्पना पुस्तकप्रेमींसाठी रुजू झाली आहे.

# 1391: वाचाल तर वाचाल - भाग १. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 14.02.2024

Send us Fan Mail शांघायला जाणाऱ्या फ्लाइटवर, झोपेच्या वेळी, केबिनचे दिवे बंद होते; तेंव्हा मला आढळलं की जागी असलेली लोकं iPads वापरताहेत, मुख्यतः आशियाई लोक. ते सर्व गेम खेळताहेत किंवा चित्रपट पाहताहेत. खरं तर, मी आधीपण हा प्रकार पाहिला होता. जेव्हा मी फ्रँकफर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की बहुतेक जर्मन प्रवासी शांतपणे वाचताहेत किंवा काहीतरी काम करताहेत. तर बहुतेक आशि...

# 1390: खारट कॉफी. लेखक : अज्ञात. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 13.02.2024

Send us Fan Mail "सर्वप्रथम आपण जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती! पण मी इतका नर्व्हस झालो होतो, की  साखरे ऐवजी चुकून मीठ मागितलं . आणि त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं . म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...  खरं तर खारट कॉफी मला आवडत नाही. ! पण मला तु खुप आवडतेस... आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो". 

# 1389: स्त्रीने असंच राहिले पाहिजे... भक्कम! लेखिका :संजना इंगळे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 13.02.2024

Send us Fan Mail "तुम्ही बाळाला आशीर्वाद दिलात हेच खूप..सोनं वगैरे काही नको बाळाला.  आणि हो, घरी गेलात की अंगावरच्या साड्या जशाच्या तश्या परत करा... जरा सुसंस्कृत लोकांना देता येतील" सुलोचना आईचं हे रूप बघतच राहिली. "हो बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जोपर्यंत समोरचा नम्र असेल तोवर त्याला मानपान द्यायचा..ज्यादिवशी तो स्वतःची पायरी सोडून वागेल त्यादिवशी मात्र त्याला बाहेरचा रस्ता दाख...

# 1388: शेतकऱ्याची व्यथा : तीन रुपये कर्जफेडीची हतबलता. लेखक : शेखर गायकवाड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 11.02.2024

Send us Fan Mail आजोबांनी 70 वर्षांपूर्वी सावकारा कडून कर्जाऊ घेतलेले तीन रुपये  दोघेही हयात नसताना किंवा  त्यांना  कोणी वारस नसताना कसे फेडायचे ह्या प्रश्नाने तो तरुण शेतकरी हतबल झाला.  त्या शिवाय बँक कर्ज देईना ! 

# 1387: गुहेतला प्रवास. लेखिका स्वाती पाटील. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 10.02.2024

Send us Fan Mail तेन्झिन पाल्मो ही जन्माने ब्रिटीश महिला आध्यात्मिक पगतीच्या शोधात भारतात आली. ह्या क्षेत्रातही स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीने त्या अस्वस्थ झाली. त्या स्वत:चा शोध स्वत:च घेण्याचे ठरवले. 1970 साली  27 वर्षांच्या ह्या युवतीने 13,200 फुटांवरील एका गुहेत 12 वर्षे 3*3 च्या लाकडी पेटीत बसून ध्यानधारणा केली. तिला स्त्री देहातच ज्ञान प्राप्ती झाली. 

# 1386: शिक्षक होणे सोपे नसते. संकलन : मिलिंद पंडित. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 10.02.2024

Send us Fan Mail मागच्या काही दिवसा पासून दररोज लंच ब्रेक नंतर लगेच दर अर्ध्या अर्ध्या तासांनी तो बाथरूमला बाहेर जाण्यासाठी मला विचारायचा. शाळेच्या मागच्या गेटच्या पायरीवर त्याची बालवाडीतली बहीण बसली होती. एक वाजता शाळा सुटुनही ती अजूनही इथेच होती. त्याचा मध्यंतरात मिळालेला खिचडीचा डबा उघडून तिला भरवत होता.

# 1385: भारतीयांच्या रोगप्रतिकार क्षमतेचे रहस्य. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 09.02.2024

Send us Fan Mail बाहेरच्या देशांमधून आपल्या देशात येणारे पाहुणे त्यांच्या तब्येतीची खूप काळजी घेत असतात. कारण त्यांच्या तब्येती नाजूक असतात. उलट भारतीयांच्या तब्येती मात्र त्या मानाने खणखणीत असतात. भारतीयांच्या विलक्षण रोगप्रतिकार क्षमतेचे रहस्य आपल्या समाज जीवन आणि खाद्य संस्कृतीत दडलेले आहे.

# 1384: दीर्घ श्वास: आयुष्याचा आधार (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 09.02.2024

Send us Fan Mail आज मनुष्याचा श्वास दर वाढल्याने त्याच प्रमाणात त्याचे आयुष्य देखील घटले आहे. सरासरी आयुष्य 60 ते 65 वर्ष राहिले.अनेक आधुनिक शास्त्रज्ञांचे मानणे आहे की जर मनुष्याच्या शारीरिक तापमानाला अर्धे केले जाऊ शकले, तर तो सहजपणे 1000 वर्षांपर्यंत जगू शकतो..

# 1383: द टॅाप फाइव्ह रिग्रेटस् ॲाफ द डायिंग (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 06.02.2024

Send us Fan Mail ब्रॅानी यांनी आयुष्याच्या शेवटी लोकांना प्राप्त झालेल्या दृष्टीच्या अभूतपूर्व स्पष्टतेबद्दल आणि त्यांच्या शहाणपणापासून आपण कसे शिकू शकतो याबद्दल लिहिलंय. "जेव्हा त्यांना कोणत्याही पश्चात्तापाबद्दल किंवा ते जे आयुष्य जगले ते परत जगायला मिळालं तर ते त्या आयुष्यात कोणत्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतील किंवा कोणत्या गोष्टी बदलायला त्यांना आवडेल याबद्दल विचारले असता, काही सामान्य...

# 1382: सावत्र आई. लेखिका : सौ. नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 04.02.2024

Send us Fan Mail " बाबा नवीन आई घेऊन येणार आहेत."..  बाप रे आम्ही हबकलोच... " म्हणजे तुला आता सावत्र आई  येणार ?" तिला आता तिची सावत्र आई छळणार ...त्रास देणार ...तिला मारणार... उपाशी ठेवणार..  वगैरे आमच्या मनात यायला लागलं. सावत्र म्हणजे दुष्ट,  त्रासदायक असंच एक मनात चित्र होतं. 

# 1381: कॅन्सर माझा सांगाती. लेखक : डॉ. अरविंद बावडेकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 04.02.2024

Send us Fan Mail      मुंबईचे प्रख्यात अस्थिरोगतज्ज्ञ  डॉ. अरविंद बावडेकर हे  'कॅन्सर माझा सांगाती' ह्या पुस्तकात  पोटाच्या कर्करोगाचे निदान झाल्यापासून त्यांची जीवनकथा सांगतात.”       ही कथा असामान्य , अपवादात्मक निर्णयांची  आहे, त्यानुसार  महिन्यातून एक   दिवस ते नि:स्वार्थ  हेतूने गोंदवल्यास जाऊन, तेथे विनामूल्य वैद्यकीय सेवा देवू लागले.  'संपूर्ण दिवस अशी सेवा देऊनही रात्री आपण...

# 1380: भिरकावलेला दगड. लेखक अज्ञात. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 01.02.2024

Send us Fan Mail "काय रे, हे तू काय करतो आहेस? माझ्य कारवर तू दगड का मारलास?" "माझा मोठा भाऊ तिथे त्याच्या चाकाच्या खुर्चीतून खाली पडला आहे. त्याचे वजन जास्त आहे. मला त्याला उचलून चाकाच्या खुर्चीत बसवायला जमत नाहीये. कृपा करून मदत करा. त्याला उचलून त्याच्या चाकाच्या खुर्चीत बसवाल का? " तो लहान मुलगा म्हणाला.

# 1379: श्री रेणुकादेवी आणि परशुराम- भाग २ (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 30.01.2024

Send us Fan Mail भगवान परशुरामांनी आपल्या बाणाने आत्ताच्या गुजरात पासून केरळ पर्यंतचा समुद्र खूप अंतर आत ढकलून ही पश्चिम किनारपट्टी तयार केली होती.या भूमीला अपरांतभूमी आणि परशुराम भूमी असे म्हणतात. कोकणामध्ये चिपळूण जवळ परशुराम क्षेत्री भगवान परशुरामांचे छान मंदिर आहे.

# 1378: अवघ्या आशा श्रीरामार्पण. लेखक : सौमित्र श्री. माडगूळकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 29.01.2024

Send us Fan Mail “  इथे सही करा. मी तुमचे गीत रामायणाच्या रॉयल्टीचे पैसे वसूल करून देतो. '' क्षणात कागद परत करीत गदिमा म्हणाले,  “मग गीतरामायण लिहिलं याला काहीच अर्थ उरणार नाही वकीलसाहेब   "अहो, रामनामाने दगड तरले, मग काही गायकमित्र तरले म्हणून काय बिघडलं?"

# 1377: श्री रेणुकादेवी आणि परशुराम- भाग १ (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 27.01.2024

Send us Fan Mail एके दिवशी रेणुका नदिवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसी सोबत जलक्रीडा करीताना दिसला. ते अतिशय मादक दृष्य पाहून माता रेणूका हरवून गेली. आपल्या पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदाग्निनी आंतर्ज्ञानाने पाहिले. घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला. त्यामूळे त्यांचा राग अनावर झाला. ते संतापले. त्या अपराधाची शिक्षा म्हणून त्यांनी रेणुका आईस ठार मारण्याची आज...

# 1376: आयोध्या डायरी. लेखक : श्री विश्वास चितळे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 27.01.2024

Send us Fan Mail चितळे डेअरी भिलवडी व चितळे उद्योग समूहाचे  चे सर्वेसर्वा श्री विश्वासराव चितळेंना श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रण होते. त्यांचे हे अनुभव त्या शब्दात. "कार्यक्रम संघ परिवाराने खूप आखीव रेखीव घडविला.  मंत्र घोषात पूजा सुरु झाली.  आमच्या सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रुंची दाटी झाली… मोदीजी आणि योगीजी म्हणजे जणू  राम-लक्ष्मण यांची जोडी .  पंतप्रधान मोदीजी च्या भाषणाची सुर...

# 1375: हरवलेल्या रेल्वे गाडीची सुरस परंतु रचलेली कथा. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 25.01.2024

Send us Fan Mail आसाममधल्या 'तिनसुखीया' या छोट्या रेल्वे  स्थानकावर एकावेळी फक्त दोन गाड्या राहू शकत असत . तिथे एक मालगाडी आली. गाडीतील सर्व माल उतरवल्यावर ती गाडी सायडिंगला टाकण्यात आलीं.  त्याच दिवशी अर्ध्या तासातच धुवाधार पाऊस झाला. संपूर्ण रेल्वेस्टेशन 5 ते 6 फूट पाण्यात बुडाले. येणाऱ्या  सर्व रेल्वेगाड्या  जागच्या जागी  ठप्प झाल्या.    सर्व यंत्रणा व्यवस्थित करण्याच्या गडबडीत बरेच म...

# 1374: संकल्प करावा नेटका. लेखक :- स्नेहल बाकरे कथन :- (सौ. नीता दिनेश प्रभू.) 24.01.2024

Send us Fan Mail " शारीरिक व्यायाम करण्यासोबत च मेंदूलाही व्यायाम हवा नाहीतर तो कमकुवत होऊन जाईल. साध्या गोष्टीसाठी मोबाईल ऍप वर अवलंबून राहण्यापेक्षा मेंदूला चालना द्यायचा संकल्प करू या"

# 1373: हाटूमुटुचा चंद्र. लेखक :- फारुक एस. काझी कथन : (सौ. नीता दिनेश प्रभू.) 23.01.2024

Send us Fan Mail " काहीवेळा परिस्थिती आपल्या हातात नसते आणि छोट्या मोठ्या आनंदाला मुकावं लागत, सत्य कळत असते पण ते रुचत नसते. अशावेळी ' हे ही दिवस जातील ' हा विश्वास मनात ठेवून मनातला चंद्र हरवू देऊ नये"

# 1372: आनंद द्यावा नि घ्यावा. लेखक : राजश्री राजवाडे काळे. कथन : (सौ. नीता दिनेश प्रभू.) 23.01.2024

Send us Fan Mail " काहीतरी एक विशिष्ट गोष्ट केली म्हणजेच आपण यशस्वी ठरतो किंवा आपला जन्म कारणी लागला असे ठरत नाही तर छोट्या गोष्टी करून देखील आपण इतरांना आनंद देऊ शकतो आणि आनंद घेऊ शकतो"

# 1372: मांसाची किंमत. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 20.01.2024

Send us Fan Mail आर्य चाणक्य म्हणाले, "महाराज, ह्या दोन कोटी सुवर्ण  मुद्रा आपण सोडून  दुसऱ्या कोणाचे तरी  हृदय  विकत घेण्यासाठी  आपल्या मंत्रिगणां  कडून जमा झाले आहेत. आणि एवढे  पैसे  देऊनही  दोन तोळे  मांस काही मिळाले नाहीच . राजन! आता तुम्हीच विचार करा मांस खरेच स्वस्त आहे का ?"

# 1371: श्रीमंत होण्याची युक्ती. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 20.01.2024

Send us Fan Mail "म्हणजे तुम्ही तीस वर्षे चोरी करूनही त्याला कधीही, काहीही कमी पडलं नाही.  आणि तुम्हाला मात्र अजून चोरी करावी लागते.  याचाच अर्थ सज्जनपणाने जगूनच श्रीमंती लाभते..  मग हा धंदा करण्यापेक्षा मी त्या साधूकडेच जाऊन राहतो कसा!" मुलगा वडिलांना म्हणाला.

# 1369: वाबळेवाडीतील अनोखी शाळा (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 19.01.2024

Send us Fan Mail एका मुलाला वारे सरांनी काही शाळेला भेट द्यायला आलेल्या पाहुण्यांसमोर तिनाच्या पटीतले अंक, पंधराचे निम्मे किती, साताचे निम्मे किती, साडेतीन च्या अर्धे किती, अमूक अमूक रुपये कुणाला द्यायचे असल्यास कितीच्या किती नोटा द्याव्यात असे प्रश्न विचारले आणि त्याची त्या मुलाने एकेक सेकंदात उत्तरं दिली. तेंव्हा सर म्हणाले की हा मुलगा पहिलीत आहे आणि त्याला गणितासारखं गणित शिकवलेलं नाही..

Listen to the Life of Stories podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.