Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Kids MR ↓ 2071 episodes

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Author

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Category

Kids

Latest episode

Jul 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

# 1418: अनुग्रह म्हणजे काय ? (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 10.03.2024

Send us Fan Mail समर्थांना पाय  धुवायला देवघरातील पूजेचे पाणी वेण्णा स्वामींच्या शिष्याने दिले.  त्या विचारले, " या मठातली सगळी मुले वेदांती झाली की काय? देवपूजेचे पाणी पाय धुवायला दिले?"

# 1417: " ती ". लेखिका राधा गर्दे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 10.03.2024

Send us Fan Mail डोक्यावर मानवी मैल्याची  घाण घेऊन चार पाच बायका चालल्या होत्या.    त्यांच्या बाजूला एक गाडी येऊन थांबली. त्यातून एक व्यक्ती बाहेर येऊन त्यांच्याशी बोलू लागली, “ मला तुमच्याशी काही बोलायचं आहे.काही सांगायचं  आहे, काही विचारायचं आहे‌.  ते घूंघट आधी वर करा.” सगळ्यांच्या मनात विचार आला, “ हा माणूस आता मार खाणार.” पण त्याने विचारले,, “ तुम्ही हे काम सोडून दुसरं काम करायला तयार आहात का?...

# 1216: कथनी करनी एकसी | : जमनालाल बजाज. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 09.03.2024

Send us Fan Mail  “ तुम्ही मुलगा द्या , तुमची गरिबी नाहीशी होईल एवढी संपत्ती मी देऊ शकतो.   ” मुलाचे  बाबा म्हणाले, “आम्ही काही आमचा  मुलगा  विकत देत नाही. ”  विचार करुन  कनीराम  शेवटी म्हणाले, “ आमच्या गावातल्या स्त्रियांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी खूप लांब जावे  लागते. गावासाठी विहीर आपण बांधून दिलीत तर फार उपकार होतील.” शेठ  बच्छराज बजाज यांनी गावासाठी विहीर  बांधून दिली, ज्याचा वापर अजूनही केल...

# 1214: झांशीची राणी लक्ष्मीबाई: भाग १ (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 08.03.2024

Send us Fan Mail भारतात जेव्हा जेव्हा महिला सक्षमीकरणाची चर्चा होते तेव्हा तेव्हा महान वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाची गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगितली जाते. झाशीची राणीच्या पराक्रमामुळे ती आता आपल्या भाषेत एक म्हण असल्यासारखी झाली आहे. एखाद्या लढाऊ स्वभावाच्या खमक्या मुलीचे किंवा स्त्रीचे वर्णन करताना आपण म्हणतो “ती तर अगदी झाशीची राणीच आहे”. अशी आपल्या रोजच्या बोलीभाषेत जाऊन बसलेली को...

# 1215: झांशीची राणी लक्ष्मीबाई: भाग २ (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 08.03.2024

Send us Fan Mail राणीने स्वाराचा वेष धारण केला. आपल्या लहानग्या मुलाला म्हणजे दामोदरला पाठीवर बांधले. तिचं वर्णन करतांना एका कवितेत म्हटले आहे,  " झांशिची राणी लक्ष्मीबाई एकच होती नार।  ढाल छातीशी, पुत्र पाठीशी, कमरेला तलवार!"  आपल्या लाडक्या बादल या घोड्यावर राणी बसली. बादलवर स्वार होऊन तिने किल्ल्याच्या उंच भिंतीवरून खाली मैदानात अतिशय मोठी उडी मारली. बादल या उडीमुळे जखमी होऊन मरण पावल...

# 1413: सुसंस्कृत आणि सुश्रद्ध मा. श्री. यशवंतराव चव्हाण. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 05.03.2024

Send us Fan Mail सुरक्षा रक्षकाला यशवंतराव म्हणाले, "जब तक माँ बिमार है, मोसंबी रोज लेकर जाना,  और चाहे तो चार दिन छुट्टी लेना, माँ की सेवा करना|  राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तीमत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण| 

# 1412: "वजन करा वो दादा"! लेखक डॉ. अभिजीत सोनवणे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 05.03.2024

Send us Fan Mail यांच्या पूर्वजांच्या  स्वप्नात म्हणे त्यांच्या कुलदेवीने सांगितलं होतं की, "तुम्ही काम नाही करायचं कुठं, मागुनच खायचं, नाहीतर तुमची वंशवेल खुंटेल.." तेव्हापासुन यांच्या सर्व पिढ्या भिकच मागतात. वजनकाटा  बळजबरीने दिल्यावर ती आज्जी म्हणाली, "आवो  वजन करुन पैक  दिलं लोकांनी. भिक मागण्यापरास ह्योच धंदा बरा हाय".

# 1411: भगवान गणेशाच्या कथा. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 03.03.2024

Send us Fan Mail भगवान गणेशाच्या सर्वात मनोरंजक पैलूंपैकी एक म्हणजे त्याची चार मुख्य रूपे आहेत, प्रत्येकाची स्वतःची विशिष्ट प्रतीकात्मकता आणि महत्त्व आहे. श्रीगणेशाचे पहिले रूप म्हणजे सिद्धी विनायक रूप. या रूपात श्रीगणेशाचे चार हात, कमळ, शंख, चक्र आणि गदा धारण केलेले आहे. श्रीगणेशाचे हे रूप आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे आणि इच्छा पूर्ण करणारे मानले जाते. यश, संपत्ती आणि समृद्धी शोधणाऱ्यांकड...

# 1410: ‘शून्य रुपया‘. लेखक स्वामी विज्ञानानंद. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 02.03.2024

Send us Fan Mail साधू म्हणाला, "जोपर्यंत ह्याला शून्य रुपया मिळत नाही तोपर्यंत  या दोन मिळालेले मुलांना दीड दीड लाख रुपये, आता शून्यवत आहेत. तेव्हा प्रत्येकाने निम्मे निम्मे शून्य, म्हणजे पाऊण लाख रुपये या नावडत्या मुलाला द्यावे. *म्हणजे त्याला  पूर्ण शून्य मिळेल. आणि त्यांना त्यांचे पैसे मिळू शकतील."

# 1409: उस्ताद बिस्मिल्लाह खान आणि भगवान श्री. बालाजी भेट. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 01.03.2024

Send us Fan Mail एक दिवशी बिस्मिल्लाह खान हे पहाटे चारच्या सुमारास बालाजी मंदिराच्या आवारात शहनाईच्या सरावात मग्न होते. अचानक त्यांना आपल्या शेजारी कोणीतरी बसले असल्याची जाणीव झाली.  त्यांनी बघितले तर ते दुसरे कोणी नसून 'भगवान बालाजी' होते. 'कान्हारीरा' हा  भारतीय संगीतातील एक पवित्र 'राग' आहे. कारण  'श्री' कडून  म्हणजेच भगवान  कृष्णाच्या 'मुखातून त्यान...

# 1408: फेब्रुवारी २९: एक विशेष दिवस. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 01.03.2024

Send us Fan Mail २९ फेब्रुवारी ला जन्मदिवस असलेल्यांची संख्या एका अंदाजानुसार, जगाच्या लोकसंख्येच्या फक्त 0.07% असावी. आता ही संख्या इतकी कमी असली तरी या मंडळींना एक रुखरुख असते. या लीप ईयर डे व्यक्तींना आपला वाढदिवस साजरा करण्याची संधी चार वर्षांनी एकदाच मिळते. तैवानने मात्र हा प्रश्न सोडवला आहे. त्यांच्या कायद्यानुसार 29 फेब्रुवारीला जन्माला आलेल्या मंडळींची जन्मतारीख 28 फेब्रुवारी धरली जाते!

# 1407: नासिकची सांडव्यावरची देवी. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 29.02.2024

Send us Fan Mail सांडव्यावरची देवी ही साक्षात गडावरची सप्तशृंग निवासिनीच आहे. त्यामुळे येथील देवीची मूर्ती हुबेहूब सप्तशृंगगडावरील देवीसारखीच आहे. मूर्ती अतिशय भव्य आहे. मुख्य म्हणजे गडावरच्या देवीप्रमाणेच याही देवीला अठरा हात आहेत. देवीने डाव्या बाजूला एक हात कानावर टेकलेला असून, जणू काही देवी भक्तजनांची गाऱ्हाणी एकत आहे असे वाटते.

# 1406: पाषाणाचा नंदी गवत खातो : संत एकनाथ महाराज (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 27.02.2024

Send us Fan Mail दंडवत स्वामींनी आपले गुरु, एकनाथ महाराजांची आज्ञा मानून त्यांच्या   चरणांवर मस्तक ठेवून  देह त्याग केला. "संत एकनाथांना  ह्या ब्रह्महत्येचे प्रायश्चित्त देवालया समोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून सिद्ध करावे लागेल." असा पंडितांनी निर्णय दिला.

# 1405: 'त्याने' आपला हात धरलेला आहे. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 26.02.2024

Send us Fan Mail एके दिवशी श्रीकृष्ण एका वेगळ्याच मन:स्थितीत बागेत धावत पळत आला आणि बांबूच्या झाडाजवळ गेला. बांबूच्या झाडाने विचारले,"श्रीकृष्णा, काय झाले, एवढा अस्वस्थ का दिसतो आहेस? श्रीकृष्ण म्हणाला "मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे, पण ती देणं तुझ्यासाठी खूप अवघड आहे" बांबू ने उत्तर दिले "तरी पण मला सांग,मला शक्य असल्यास मी ते निश्चित तुला देईन. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला &quo...

# 1404: जे विनामुल्य तेच मुल्यवान. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 25.02.2024

Send us Fan Mail तो म्हणाला "मी बिलाची रक्कम पाहून नाही रडलो. माझी आर्थिक स्थिती खूपच चांगली आहे. पण ह्या बिलामध्ये शेवटच्या रकान्यात एक दिवसाच्या ऑक्सिजनचा आकार जो ५००० युरो लावलेला आहे, ते पाहून माझ्या मनात विचार आला की मी परमेश्वराचे किती देणे लागतो; कारण हा एवढा महागडा प्राणवायू मी गेली साठ वर्षे परमेश्वराकडून विनामूल्य मिळवतोय."

# 1403शंभर रुपये खर्च करण्याची गहन समस्या. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 25.02.2024

Send us Fan Mail शाळेत असताना मला 100 रुपयांची नोट सापडली. ते पैसे घरी समजू न देता  खर्च कसे करायचे हे कळत नव्हते..  कारण त्या वेळी २५ पैशात मुठभर गोळ्या मिळायच्या.  पैशांनी अगदी भंडावून सोडले होते मला. मी खर्च करायला पहात होतो आणि ते परत परत येत होते.

# 1402: ईश्वर देतो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 24.02.2024

Send us Fan Mail "आम्हाला जे काही मिळते, ते ईश्वर देतो." भिकारी म्हणाला  आपण जेव्हा कोणाला मदत करतो तेव्हा ती मदत खरे तर आपल्या माध्यमातून ईश्वरच  देत असतो हे सत्य आता राजला पटले! 

# 1401: दोन आणि तीन ची गोष्ट. लेखक : डॉ. कैलास दौंड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 21.02.2024

Send us Fan Mail म्हातारीने चुल पेटवून होतील तेवढी भजी तळायला सुरुवात केली .पाच भजी झाली .म्हातारच्या तोंडाला पाणी सुटलं . "आण इकडे ताटली" . "मी एवढ्या थंडीत सगळं काम केलंय. तुम्हाला सगळी भजनी देणार नाही. आहेत  त्यातली निम्मी मला खायचेत " मग दोन भजी कोण खायचं आणि तीन कोण खाणार यावर बराच वादावादी झाली .....

# 1400: पिझ्झाचे आठ तुकडे - दुसरी बाजू . (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 20.02.2024

Send us Fan Mail एका पिझ्झ्याच्या किंमतीची तुलना तो बाईच्या उत्सवाच्या खर्चाशी करु लागला…  नातवाच्या ड्रेसचा पहिला तुकडा, पेढ्यांचा दुसरा तुकडा, मंदिरातील प्रसाद..तिसरा तुकडा,  भाड्याचा चौथा, पोरीच्या खर्चाचा पाचवा, बांगड्यांचा सहावा तुकडा,  जावयाच्या चप्पलचा सातवा तुकडा आणि नातवाच्या खाऊचा आठवा तुकडा !!

# 1399: भारतीय रेल का एक सुखद अनुभव | लेखिका : मंजिरी काळे . कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 20.02.2024

Send us Fan Mail मेरी बैग राजधानी एक्सप्रेस मे भुलसे रह गयी थी| वो थैला सुरक्षित  रूपसे वापस मिले ईस लीये कोटा और रतलाम स्थानक के मुख्य प्रबंधक,   RPF  पुलीस मुनेशजी, अनीताजी;  टी.सी. कल्याणकरजी, अटेंडेंट  सभीने मेरी बहुत ही सहाय्यता की । 

# 1398: खजिन्याचा शोध. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 18.02.2024

Send us Fan Mail जयच्या आईबाबांनी मात्र त्याच्या गैरहजेरीत जयसाठी एक वेगळाच सरप्राइज बेत करायचा ठरवलं. त्यानुसार वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी त्यांनी पूर्ण तयारी करून ठेवली होती. आईनं त्याच्या कानाशी ‘हॅप्पी बर्थडे जय’ म्हटल्यावर मात्र जयची झोप उडाली. आळोखेपिळोखे देत डोळे उघडून आईबाबांकडे पाहून गोड हसला. ‘‘आज एका मुलाचा वाढदिवस आहे ना? त्याच्यासाठी आम्ही काही तरी गंमत आणलीय. बघायची नाही का?’’

# 1396 : जनमेजयाचे सर्पसत्र. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 17.02.2024

Send us Fan Mail राजा जनमेजयाने आपल्या पित्याच्या मृत्यूबद्दल आपल्या अमात्यांकडे चौकशी केली आणि त्याला सर्व घटनाक्रम कळला. तक्षकाच्या दंशाने आपल्या पित्याचा मृत्यू झाला हे कळताच संतापाने त्यानं सर्व सर्प जातीलाच नष्ट करायचं ठरवलं व त्यासाठी सर्पसत्र आयोजित केलं. सर्पसत्र म्हणजे असा यज्ञ ज्यात सर्पांची आहुती दिली जाते. यात त्याने बऱ्याच नाग कुळांचा निर्वंश करण्याचा सपाटा लावला. यात वासुकी, ऐरावत, क...

# 1397: केवळ सत्कर्माची पुंजी. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 17.02.2024

Send us Fan Mail "आता इतक्या वर्षांनी वडिलांच्या आठवणींनी रडण्याइतक्या आपण लहान नसूनही आपल्या डोळ्यांत त्यांच्या आठवणींमुळे पाणी कां येते?" या, मुलाखतकाराच्या प्रश्नावर त्या उत्तरल्या, "माझ्या वडिलांच्या मृत्यूसमयी मी त्यांना ते आयुष्यभर सचोटीच्या मार्गाने चालले या गोष्टीसाठी अपमानास्पद बोलले होते. आज मी त्यासाठी त्यांची क्षमा मागतेय."

# 1394 : ठिकऱ्या वाजवणारी मुलगी. लेखक : सुधीर खांडेकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 16.02.2024

Send us Fan Mail परदेशी पाहुण्याने   ते फरशीचे चपटे तुकडे  म्हणजे ठिकऱ्या बोटांच्या चिमटीत पकडून ताल पकडला आणि आम्ही आश्चर्यचकित होऊन ते वाजवणं ऐकू लागलो.ट्रेन मधल्या त्या गाणे म्हणणाऱ्या मुलीला खूप आनंद झाला आणि आश्चर्यही वाटलं.  "तुम्ही माझ्यापेक्षा छान वाजवलं "असं म्हणत , तिने  त्या दिलेले 100 + 5 रुपये त्यांना बक्षीस दिले. 

# 1395 : मराठी रसिक आहेत त्या सुईणीचे ऋणी. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 16.02.2024

Send us Fan Mail आई काही आपल्या बाळाला सोडायला तयार नव्हती. पण तिच्या वडिलांनी ते बाळ आपल्या हातात घेतलं आणि सर्वजण घरामागे त्या बालकाच्या अंत्यविधीसाठी निघाले. इतक्यात त्या म्हाताऱ्या सुईणीने त्यांना क्षणभर थांबण्याची विनंती केली. तिनं काहितरी विचार केला. अन् ती उठली. बाळंतिणीच्या बाजेखालील कोळश्याच्या शेगडीतला एक रसरसता निखारा तिने हातात घेतला आणि नुकत्याच जन्मलेल्या त्या बाळाच्या बेंबीजवळ चटका...

Listen to the Life of Stories podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.