Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Author
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Category
Podcast website
Latest episode
Jul 7, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
#1444: स्पाय गर्ल.. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 08.04.2024 9:51
Send us Fan Mail हिंसा हि काही एखाद्या प्रश्नाचे उत्तर नाही मुली, आम्ही सर्वजण अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांचा विरोध करीत आहोत. तुलादेखील हातात शस्त्र न घेता विरोध करता आला पाहिजे," गांधीजींनी तिला समाजावणीच्या सूरात अहिंसेचे महत्व सांगितले. "का? आम्ही डाकू, लुटारूंना मारीत नाही? हे इंग्रज आमच्या देशाला लुटत आहेत, त्यामुळे ते लुटारू आहेत! त्या लुटारूंना मारणे हि काही हिंसा नाही." अत...
#1443: Pulmonologist‘s patient diary. Dr Hershel Bhadsavle. Interview by: ( अनघा आरेकर. ) 07.04.2024 5:32
Send us Fan Mail Pulmonologist’s Patient Diary A Pulmonologist’s heartfelt narrative of his experiences from inside the ICU. A collection of anecdotes which are etched in his memory over the last 4 years.
#1442: काय... पित्त खवळतंय? (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 07.04.2024 8:54
Send us Fan Mail स्त्री बदलणारी संप्रेरके, साथ न देणारे आरोग्य, समजून न घेणारे कुटूंबीय या सर्व गोष्टींनी मानसिकदृष्ट्या खचते. लक्षात न राहणाऱ्या गोष्टी, एखादा बिघडलेला पदार्थ, जवळच्या नातेवाईकाचा आकस्मिक मृत्यू, कोणाशीही झालेला वाद किंवा भांडण एवढसं कारण मानसिक ताण वाढवतं आणि पित्ताचे आगमन होते.
#1441: उधळण आनंदाची बचत पाण्याची: लेखिका सौ सुजाता लेले (मीनल भडसावळे.) 05.04.2024 3:45
Send us Fan Mail ही गोष्ट पाणी, पाण्याचा अनावश्यक अतिरेकी वापर ह्याबद्दल असून येणारी भीषण पाणी टंचाई टाळण्यासाठी काही मुलांनी केलेल्या उपायांबद्दल आहे.
#1440: शेतकऱ्यांचं लाविश राहणीमान लेखन व कथन - (डॉ . माधवी ठाकूरदेसाई.) 04.04.2024 7:52
Send us Fan Mail कर्नाटकातल्या एका छोट्याशा खेड्या तल्या शेतकरी कुटुंबातून लग्न होऊन मुंबईसारख्या मोठ्या शहरात आलेल्या एका स्त्रीला जे बदल अनाकलनीय वाटले त्याची मजेदार गोष्ट
#1439: वीर बापू गायधनी. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 03.04.2024 8:43
Send us Fan Mail दुसऱ्या मजल्याला आता आगीने पूर्ण वेढलेले होते. जिना जळून कोसळला होता. काय करावे? त्या तरुणाने लगेच एकेका गादीत एकेका मुलाला गुंडाळले आणि खिडकीतून लोकांना हाक दिली. "मी या गादीत मुलांना गुंडाळले आहे. झेलून घ्या त्यांना." गर्दीला एकदम भान आले. त्या तरुणाच्या समयसूचकतेचे जनसमुदायाला अपार कौतुक वाटले. त्यांनी वरून फेकलेल्या गादीतील मुलांना अलगद झेलले. मुले वाचली !
#1438: रामधान्य. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 03.04.2024 4:26
Send us Fan Mail राम म्हणाले की "मी गेली १४ वर्षं घरापासून लांब आहे. मला घरी जायची ओढ लागली आहे. तेव्हा मी आधी अयोध्येला जातो. तिथे जाऊन मी ६ महिन्यांनी परत येईन आणि मग माझा निर्णय देईन. पण तोपर्यंत तांदूळ आणि नाचणी दोघांना ६ महिने तुरुंगात डांबून ठेवण्यात यावे."
#1437: अमेरीकेतील चिमण्यांची पुण्यातील मैत्रिण. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 01.04.2024 7:56
Send us Fan Mail एके दिवशी बाल्कनीत फिरत असताना अचानक माझी नजर एका जागेवर खिळुन राहीली. अमेरिकेतील तो क्षण तर माझा आयुष्यात अतिशय आनंद देणारा ठरला. चक्क मी समोर अंगणात चिमणी पाहत होते. मला तर या दृष्यावर विश्वासच बसत नव्हता. आता ती चिमणी रोजच दिसू लागली होती.
#1436: माकडांच्या राज्यात. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 31.03.2024 9:08
Send us Fan Mail मग मी त्यांच्याकडे या माकडमंडळींबद्दल विचारपूस केली. ‘‘वा!’’ बोवाजी म्हणाले, ‘‘या माकडांना एक राजा आणि राणी आहे बरं का! पंतप्रधान आणि सरसेनापतीही आहे. त्यांच्या सैन्याच्या एकूण चार तुकड्या आहेत बरं का, - छोटा सिमला तुकडी, लतार बाजार तुकडी, सदर बाजार तुकडी आणि चौथी, खास राखीव तुकडी.’’ हे सगळं ऐकून मला फार हसू आलं.
#1435: मृत्युपत्र. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 30.03.2024 5:53
Send us Fan Mail तू विचारलस ना... माझ्याकडे काय आहे वाटणी करायला ? खरंच.... काही नाही ग... मला वाटणी नाहीच करायची... तर तुमची जोडणी करायची आहे. तुमची माया एकमेकांवर अखंड अशीच राहू दे. आलं गेलं तरच ती टिकून राहील.. हीच माझ्या प्रेमाची वाटणी आणि हेच माझं मृत्युपत्र असं समजा.
#1434: मी नसतो तर काय झालं असतं.. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 29.03.2024 3:04
Send us Fan Mail अनेकवेळा अनेकांना असाच भ्रम होतो, मलाही वाटलं असतं की मी नसतो तर सीता मातेला कोणी वाचवलं असतं ? पण तुम्ही सीता मातेला वाचवलंच नाही तर वाचवण्याचं काम रावणाच्या पत्नीकडे सोपवलं. तेंव्हा मला समजलं की तुम्हाला ज्याच्याकडून जे कार्य करवून घ्यायचं आहे ते तुम्ही त्याच्याकडूनच करवून घेता.
#1432: थांबणे…! लेखक : डॉ. अनिल अवचट. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 28.03.2024 7:53
Send us Fan Mail झाडाचेa पिकले पिवळे पान फांदीवरून निसटते. हवेत तरंगत मौनाच्या प्रार्थनेसारखे जमिनीवर अलगद टेकते आणि विसर्जित होते. अगदी हळुवारपणे. छाती फुटेपर्यंत लोक धावत असतात. एक दिवस ऐश्वर्य येते पण ते भोगायची मनस्थिती नसते. मग जीवनभर एवढे पळून काय उपयोग झाला? त्यातून आपणच ठरवून विरक्त होणे केव्हाही चांगलेच...!!!
#1431: मी कोण ? (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 24.03.2024 6:19
Send us Fan Mail मनासारखी अप्सरा तर कुणालाच मिळालेली नसते. विचार करून पहा सर,.तुमच्या १००% अपेक्षेसारखी पत्नी आहे का ? पण तरी तुम्ही सुखी होताच ना? कारण सहवासाने समोरच्यामधील एखादे वैगुण्य नंतर ते वैगुण्य वाटत नाही सर.
#1430: द बेस्ट शेफ. लेखक : गौरी ब्रह्मे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 24.03.2024 4:33
Send us Fan Mail तव्यावरची तांदळाची भाकरी, वाफाळतं पिठलं, घट्ट दह्यातली कांद्याची कोशिंबीर, जवसाची ताजी चटणी, भाजलेला पापड असे सुग्रास ताट समोर येतं. पोट भरणारं जेवण सगळीकडे मिळतं, पण तृप्त करणारं जेवण फक्त आईकडे मिळतं!
#1429: स्थानिक पुढाऱ्याची हुशारी. लेखक : शेखर गायकवाड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 19.03.2024 3:58
Send us Fan Mail नव्या रस्त्याची रचना अशी करण्यात आली की तो पुढाऱ्याच्या जमिनीपर्यंत आपोआप जाईल. शेतकऱ्यांच्या जमिनीचा खर्च सरकारी तिजोरीतून होईल. परंतु यामध्ये त्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे अप्रत्यक्षरीत्या नुकसानच केले होते.
#1428: अक्कलदाढा. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 18.03.2024 3:26
Send us Fan Mail आजकालचा मानव मात्र दळून, तळून, पोळून, शिजवून बरेच हलके अन्न खातो. त्यामुळे चर्वण सहजसाध्य होते. त्यामुळे मागील लाखो वर्षांत आपले जबडे आणि दात आकाराने लहान झाले. उत्क्रांतीच्या रेट्यात चेहऱ्याची ठेवणही बदलली. दाताचे कार्य बदलले आणि एके काळी मांस तोडायला लागणाऱ्या अक्कलदाढा आता कामाच्या राहिल्या नाहीत.
# 1427: हॅपी हार्मोन्सना म्हणा ‘हो‘. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 17.03.2024 8:00
Send us Fan Mail आधुनिक मेडिकल सायन्समुळे आजच्या स्त्रीचे आयुष्य तिच्या आई किंवा आजी किंवा पणजीपेक्षा जास्त असेल, पण ते वाढीव आयुष्य निरोगी ठेवणं सर्वस्वी तिच्या स्वतःवर अवलंबून आहे. हेल्दी लाइफ स्टाइल ठेवण्याच्या दृष्टीनं रुटिनमध्ये काही बदल करणं आवश्यक आहे, मग तुमचं वय वीस असतो, चाळीस असो अथवा साठ.
# 1426: भाव, अभाव आणि प्रभाव. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 16.03.2024 6:28
Send us Fan Mail एवढा वेळ हे काका काकू रडत होते, आता भगवंताचा गळा भरून आला, अश्रू अनावर झाले. हा गोकुलनंदन म्हणाला, "काका, केळी फार गोड आहेत. परंतु काकूंच्या हातानं जी सालं खाल्ली ना त्याची बरोबरी फक्त माझ्या बालपणीच्या यशोदा मातेनें भरवलेल्या लोण्याशीच होऊ शकते. आज मला माझं बालपण पुन्हा जगायला मिळतंय या अमृतसेवनानें!"
# 1425: गजानन महाराजांचा पुर्वेतिहास: भाग २. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 15.03.2024 7:02
Send us Fan Mail साश्रुनयनांनी माता पित्यांना निरोप देऊन गणोबा हे थड गांवातील उंचावरील मारुती मंदिरात आले. या मंदिरात 8 ते 10 नागवे चिमटा धारी साधू आले होते. येथूनच या साधू सोबत बाल गजानन वयाच्या 19 व्या वर्षी थड कायमचे सोडून गेले ते परत कधीच थड ला आले नाही.
# 1424: गजानन महाराजांचा पुर्वेतिहास: भाग १. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 14.03.2024 8:31
Send us Fan Mail एकदा बाल गजानन याच तपोवन गावच्या विहरीजवळ बसले होते. आयाबाया म्हणाल्या, "नुसता काय बसला, पाणी काढून दे की..." महाराज निमूटपणे उठले आणि पाणी काढू लागले. बायकांच्या घागरी भरल्या. त्या आपआपल्या घरी गेल्या तरी गणोबा विहरीचं पाणी काढून खाली ओतत होते. संध्याकाळी आयाबाया पुन्हा आल्या तरी गणोबाच पाणी काढण्याच काम सुरूच! तिथं निर्मळ पाण्याचा एक प्रवाहच निर्माण झाला. अखेरीस सर्वजण...
# 1423: करायला गेला एक. लेखक शेखर गायकवाड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 13.03.2024 4:38
Send us Fan Mail त्या शेतकऱ्याला खोल नांगरताना शेतात एक दगडी अर्धवट तुटलेली मूर्ती मिळाली. गावकऱ्यांच्या सल्ल्या नुसार त्याने छोटेखानी मंदिर बंडले. मग तिथे दर्शन, पुजारी, यात्रा, दुकाने, पाळणे सुरू झाले. त्याचे उभे पीक तुडवले जाऊ लागले...
# 1421: शेख साहेबांचे मतपरिवर्तन. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 12.03.2024 9:33
Send us Fan Mail आधी ठरल्याप्रमाणे पण थोड्या दडपणाखालीच पांडुरंग शास्त्री बहारिनला येऊन पोहचले होते. शेखसाहेब आपल्याला प्रवचन करण्यास परवानगी देतील का नाही याविषयी त्यांचे मन साशंक होते. काही दिवसांपूर्वीच स्वामी चिन्मयनंदांना मध्य आशियातील काही ठिकाणांहून अक्षरशः गेल्या पावली परतावे लागले होते. तिथे गेल्याबरोबर ते तेथील पोलीस कमिशनरला जाऊन भेटले. कमिशनर म्हणाले, " सॉरी, मी आपल्याला परवानग...
# 1422: भावाची विनंती. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 12.03.2024 5:10
Send us Fan Mail त्या मुलीनं एका कन्येला जन्म दिला, पण बाळ रडलं नाही. आई म्हणाली, "मुलगीच आहे ना? मरू दे तिला. माझ्यासारखे भोग नशिबी येतील." कुलकर्णी डाॅक्टरांनी बाळाला वाचवले. त्यांना १०० रु. फी देण्यात आली.. त्या बाळाच्या आईच्या हातावर शंभराची नोट ठेवत ते म्हणाले, "आक्का, आपल्या किंवा मुलीच्या जीवाचं बरं-वाईट करून घेऊ नको. संधी मिळेल तेव्हा पुण्याच्या नर्सिंग काॅलेजला जा. त...
# 1419: कथा स्टूल खरेदीची. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 11.03.2024 2:34
Send us Fan Mail तालुका कार्यालयाकडून पत्र गेलं, "स्टूल खरेदी परवानगी चा पत्रव्यवहारच इतका झाला आहे की, त्याचा गठ्ठा बांधून तोच आम्ही स्टूल म्हणून वापरत आहोत " 😄😄😄😄😄😄😄😄😄
# 1420: कर्ज फेडल्याची पावती द्या साहेब. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 11.03.2024 4:15
Send us Fan Mail इथे फारश्या ओळखी नसल्यानं घरी कोणाचं येणंजाणं पण अगदी नसल्यासारखंच. असं असतांना, एका अपरात्री कोणीतरी दरवाजा जोरजोराने वाजवत असल्याचा आवाज आला. मला वाटलं, मला भास होतोय. पण परत दरवाजा वाजला. मी उठलो. नवीन जागा, अनोळखी माणसं... क्षणभर अंगात भितीनं कंप आला. दाराशी कोण असेल त्याचा काहिच अंदाज येत नव्हता. कसंबसं दार किलकिलं करून पाहिलं तर बाहेर आदिवासी लोकांचा जमाव जमला होता.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.