Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Kids MR ↓ 2071 episodes

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Author

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Category

Kids

Latest episode

Jul 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

# 1466: नसलेल्या जमिनीचा शोध लेखक. : शेखर गायकवाड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 06.05.2024

Send us Fan Mail कमी कष्टात श्रीमंत होण्यासाठी एका शहरी तरुणाने 'गाव कडच्या नसलेल्या जमिनीचा शोध ' घेण्यासाठी केलेल्या उठाठेवीची कहाणी !

#1466: झाडांची भिशी. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 05.05.2024

Send us Fan Mail लावलेल्या झाडांची महिन्यातून दोनदा तपासणी केली जाते. रोप व्यवस्थित रुजले आहे की नाही ते पाहिले जाते. बऱ्याचदा रोप रुजत नाही, तेव्हा दुसरे रोप लावले जाते. लागवडीला वर्ष पूर्ण झालेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला जातो. झाडाचं संगोपन करणाऱ्यांचे कौतुक केले जाते. हा उपक्रम सोलापूरकरांना आवडला आहे. आता कित्येक जण आपल्या वाढदिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवशी झाडं लावण्याचा संकल्प करतात व या उ...

# 1465: जगातील सर्वात श्रीमंत माणूस. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 04.05.2024

Send us Fan Mail मी त्याला विचारले," तु मला ओळखतोस का ? तो म्हणाला," हो तुम्ही बिल् गेट्स आहात...! मी म्हटलं, तुला आठवतंय का कि कधीकाळी तु मला न्यूजपेपर फ्री दिले होतेस...!* तो म्हणाला, "हो...दोनदा...!" मी म्हणालो, " मला त्याची किंमत अदा करायची आहे. तुला तुझ्या आयुष्यात जी गोष्ट हवी असेल ती मला सांग...! मी तुला हवी ती गोष्ट देऊ शकतो...!!! यावर तो नम्रपणे म्हणाला, " सर...

# 1464: पेनची नळी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 03.05.2024

Send us Fan Mail माझ्या प्रश्नाने बंड्या गांगरला ... मी परत विचारलं "इथं इतके लोक आहेत, मग माझ्याकडेच नळी का मागितली.?" बंड्या : "तुमच्याच खिशाला मला पेन दिसला म्हणून .!!!" मग मी सगळीकडे बघितलं ...बरेचसे लोक टी शर्ट वर होते. काहींना खिसे नव्हते ..तर काहींच्या खिशाला पेन नव्हते ... बंड्याचे निरीक्षण अचूक होते ... माझ्या खिशाला माझं आवडतं पेन होतं.

# 1463: डिफॅाल्ट मोड. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 02.05.2024

Send us Fan Mail आपल्या मेंदूच्या लँटरल प्री फ्रन्टल कॉरटेक्समध्ये लक्ष केंद्रित करणारे केंद्र असते, ते यामुळे सक्रिय होते. श्वासामुळे होणारी छातीची किंवा पोटाची हालचाल तुम्ही जाणत असता त्यावेळी मेंदूतील इन्सूला नावाचा भाग सक्रिय होतो आणि डिफॉल्ट मोड शांत होतो. मन काही क्षण वर्तमानात राहते त्यावेळी मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते...!!

# 1462: 20 हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीत पाठवणार! लेखक : भावेश ब्राह्मणकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 01.05.2024

Send us Fan Mail जगभरात सध्या एका धमकीची चर्चा आहे. ती म्हणजे, जर्मनीत वीस हजार हत्तींचा कळप सोडून देण्याची. बोत्सवाना मध्ये 1 लाख 30 हजारांहून अधिक हत्ती झाल्याने अनेक समस्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या  राष्ट्राध्यक्ष्यांनी शिकारी पर्यटक जर्मनीला ही धमकी दिली.

# 1461: मोर हवा तर आपणच मोर व्हायचं. लेखक : डॉ. श्रीरंजन आवटे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 01.05.2024

Send us Fan Mail स्वातंत्र्य हवं तर आपलं मन मुक्त हवं, हे सांगणार हे रूपक . एकदा हा आनंद गवसला की मोराच्या अस्तित्वाशिवाय नाचता येतं . स्वातंत्र्याचे  अस्तित्व असे  अटींच्या पलीकडे असू शकते .

# 1460: कॅलेंडर. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 29.04.2024

Send us Fan Mail मघापासून इतके वेगवेगळे सुगंध छातीत भरुन घेणार्‍या त्याच्या, ते वाचून छातीतच चर्रर्र झालं. पुढल्या तीनच दिवसांत... म्हणजे १८ जुलै २०२० ला, त्याचे बाबा गेले होते. आणि कॅलेंडरवरच्या १८ तारखेला होतं, एक मोठ्ठं काळा टिंब... अर्थातच फुलस्टॅाप. "म्हणजे बाबा गेले त्या दिवसापासूनच, आपल्या आईचं आयुष्यही थांबलं?... तिला आता फरकच पडेनासा झालाय की, आज काय तारीख आहे?... इतकी रिकामी झालीये...

# 1459: शोधा आपला आवडता झेंडा. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 28.04.2024

Send us Fan Mail माझ्या चाळिसाव्या वाढदिवसाला शांत मनाने ठरवले. ‘आता या बिग मॅन एरिकने स्मॉल किड एरीकचे स्वप्न पूर्ण करायचे‘.. आणि  दुस-या दिवसापासून स्टेशनवर रुजू झालो ते माझे आवडते लाल हिरवे झेंडे हातात घेतले. मी त्या क्षणाच्या आजही प्रेमात आहे.." एरीक मस्त छोट्या एरीकसारखा, निरागस हसला.. आणि मग मोठ्या माणसासारखा बीअर रिचवू लागला.. पार्टी संपली..

# 1458: प्रेमाने जग जिंका (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 28.04.2024

Send us Fan Mail हे विलक्षण दृश्य पाहून सापाचे मन आपुलकीने भरून आले. चांगली वागणूक, नम्रता आणि गोडवा या जादूने त्याला मंत्रमुग्ध केलं होतं. तो राजाला मारण्यासाठी निघाला होता, पण आता त्याचं कार्य त्याच्यासाठीच अशक्य झाले होते. शत्रूला हानी पोहोचवायला आलेल्या शत्रूशी मैत्रीपूर्ण वागणूक असलेल्या त्या धर्मनिष्ठ राजाला मी कसं मारू? या प्रश्नामुळे तो कोंडीत सापडला.

# 1457: चिंता नावाची वैरीण . लेखक डॉ. कैलास दौंड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 24.04.2024

Send us Fan Mail राजा हत्तीवर बसून नगर प्रदक्षिणेला निघाला होता.त्यावेळेला वेशीतल्या तरुणाने हत्तीच्या शेपटीला धरून मागे ओढले. हत्ती जागेसच थांबला. "एक वर्षाने हेच काम करून दाखव व बक्षीस मिळाव" असे राजाने त्याला सांगितले. त्या धाकाने तरुण शरीराने आणि मनाने खचला.

#1456: ग्रीन हाऊस इफ़ेक्ट ची अनुभूती. लेखन व कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 24.04.2024

Send us Fan Mail “कारच्या सर्व काचा बंद करून तिला भर उन्हातउभी केली की गाडीच्या आतले  तापमान हळूहळू वाढू लागते  आणि शेवटी तापलेल्या गाडीत माणसाला बसणे अशक्य होते . उनात पार्क केकेल्या गाडीत तापलेल्या सिट वर  बसणे  किती अवघड असते हे आपण अनुभवतोच!” आपल्या पृथ्वीलाही ग्रीन हाऊस गॅसेस ने असाच गराडl   घातलl  असला पाहिजे. भाले मोठे पारदर्शक कवच ज्यातून सूर्या प्रकाश त्याच्या हानिकारक किरणे व उष्णतेसह आत...

#1454: मला अनुवंशिक कर्करोग आहे का? (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 19.04.2024

Send us Fan Mail साधारणपणे 5-10% कर्करोग अनुवांशिक असतात. या मध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींना कॅन्सर, किंवा लहान वयात कॅन्सर, किंवा एकापेक्षा जास्त अवयव किंवा दोन्ही बाजूंना कॅन्सर किंवा विशिष्ट प्रकारचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी जनुकीय चाचणी करून कोणत्याही जनुकामध्ये म्युटेशन आहे की नाही हे समजू शकते. अनुवांशिकतेच्या समुपदेशनामध्ये त्या जनुकानुसार स्पष्ट केले जाते की,...

#1455: गोस्वामी तुलसीदासांची रामभक्ती. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 19.04.2024

Send us Fan Mail दुसर्‍या दिवशी मौनी अमावस्या होती. तुलसीदास राम घाटावर आसनस्थ होऊन श्रीराम यांची वाट बघू लागले. तेवढ्यात तिथे एक छोटा मुलगा आला आणि म्हणाला, बाबा, मला चंदन हवं आहे. तुम्ही द्याल का मला चंदन ? त्या लहान मुलाच्या मोहक मुखाकडे तुलसीदास बघतच राहिले. तुलसीदासांचं भान हरपलं आहे, हे हनुमानाने जाणलं आणि म्हणून हनुमानाने एका पोपटाचं रुप धारण केलं आणि म्हणाले,  "चित्रकूट के घाट पर, भई...

#1453: समाधान. लेखिका एवं कथन: ( डॅा. श्रीमती शशि परोदा. ) 18.04.2024

Send us Fan Mail यह शाश्वत सत्य है कि यदि आप दूसरों की समस्याओं को अपनी समस्या समझेंगे तो आपकी समस्या का स्वतः ही समाधान हो जाएगा ।

#1450: उडी शेवटची. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 18.04.2024

Send us Fan Mail व्हेल माशात एक अजब क्षमता असते. ती म्हणजे, मरण जवळ आल्याची पूर्व कल्पना मिळणं! जेव्हा ही वर्दी येते तेंव्हा तो चूपचाप आपला समूह सोडतो. आणि कुठलं तरी शांत, एकांत असलेलं स्थळ निवडतो. तो आता त्याच्या आयुष्यातील काही गंमतीशीर खास कवायती करणार असतो. त्याचं हे शेवटचं आणि उत्तम सादरीकरण होणार असतं. आहे नाही त्या शक्तीनिशी तो समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन त्याच्या नेत्रदीपक कवायती करतो. आय...

#1451: भैरूची नवी गोष्ट. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 18.04.2024

Send us Fan Mail पहाट झाली. भैरू उठला.  बैल सोडले. औत जोडले.  शेतात गेला. शेत नांगरले.  दुपार झाली. औत सोडले.  बैलांना वैरण घातली. जवळ ओढा होता. बैलांना पाणी पाजले. आपली भाकरी सोडली.  चटणी, भाकरी, कैरीचे लोणचे.  झाडाखाली बसला. आवडीने जेवला.

#1452: पाचशे रुपयांच्या विड्रॅावलची गोष्ट. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 18.04.2024

Send us Fan Mail एका वृद्ध महिलेने तिचा चेक बँकेच्या टेलरकडे दिला आणि म्हणाली, "मला 500 रुपये काढायचे आहेत.." काउंटर वरील टेलरने तिला सांगितले, “₹५,००० पेक्षा कमी पैसे काढण्यासाठी कृपया एटीएम वापरा”. म्हातारीने मग विचारले, "का?" सांगणारा चिडून तिला म्हणाला, “हे नियम आहेत. दुसरं काही काम नसेल तर कृपया हे काउंटर सोडा. तुमच्या मागे रांग आहे. लोकं खोळंबली आहेत.

#1448: नांदतो देव हा आपुल्या अंतरी. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 16.04.2024

Send us Fan Mail दहा दिवसांपूर्वी घडलेला प्रकार मी सांगितला तेव्हा म्हातारबा प्रसन्न हसले. “माफ करा. चुकून झालं... मी हात जोडले. "अवो, कामाच्या गडबडीत व्हतं अस. माऊली, हे पैशे मिळणार याची खात्री व्हती." "कशावरून??" "माणूस चांगला की लबाड हे.माणसाच्या बोलण्या-वागण्यावरून ह्ये अनुभवी नजरंला बरुबर समजतं"

#1449: सफाई कामगार ते उद्योगपती. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 16.04.2024

Send us Fan Mail डनहिलने पण बरीच वर्षे, म्हणजे उतारवय होईपर्यंत तेथे काम केले. वृद्धत्वामुळे चर्चचा जुना प्रमुख निवृत्त झाला व त्याजागी एक तरूण माणूस चर्चचा प्रमुख म्हणून आला. तो चर्चच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणारा होता. जेव्हा त्याला कळले की डनहिलचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नाही, तेव्हा त्याने डनहिलला नोटीस पाठवली व सहा महिन्यांच्या आत शालेय शिक्षण पूर्ण करून तसा दाखला आणण्यास सांगितले.

#1447: सुखाचा शोध. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 15.04.2024

Send us Fan Mail प्राजक्ता-माझी मोठी मुलगी- हिला काही कारणाने मी हलकेच चापट मारली. तशा त्या संतप्त झाल्या. इतक्या तापल्या की धुण्याची मोठी काठी त्यांनी माझ्या समोर धरली, " ही घे, नि मार माझ्या टाळक्यात! मुलींवर हात उचलते!" त्या कडाडल्या.  मी सौम्यपणे म्हटलं, "माझ्या मुलींना मी शिस्त लावायचा प्रयत्न करतेय, त्यात कृपा करून तुम्ही मधे पडू नका." यात काय चुकलं हो माझं? पण त्या ठाशीव...

#1446: शब्देविण संवादु. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 11.04.2024

Send us Fan Mail शास्त्रज्ञांनी शोध लावलाय- अगदी आईच्या पोटातच बाळ ऐकत असतं निरनिराळे आवाज, ओठही उघडत मिटत असतात. जन्म होताच सुरू होतो पहिला संवाद-रडण्यातून. आपल्या जिवंतपणाची जाणीव करून देणारा. तेव्हापासून बाळाचा शब्देविण संवादु सुरू होतो. रडण्याच्या तरी केवढय़ा परी. भूक लागली, झोप आली, एकटं वाटतंय. थंडी वाजतेय, उचलून घ्या.. एक ना दोन. बाळाशी संवाद साधणाऱ्या आईबाबांनाच कळते ही रडण्याची भाषा.

#1445: बाबांच्या हाताचे ठसे. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 11.04.2024

Send us Fan Mail जवळच्या भिंतीवर मला बाबांचे हात दिसले. माझ्या डोळ्यापुढं बाबांचं चित्र उभं राहिलं. त्या दिवशी मी  ओरडून बोललो नसतो तर बाबा अजून जगले असते असे वाटू लागले. आपोआप डोळ्यात पाणी साचले. तेवढ्यात आठ वर्षाची नात धावत आली. "आजोबा, आजोबा!  तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला," असे म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली.

#1444: संवाद. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 10.04.2024

Send us Fan Mail ज्यांच्या मेंदूतून व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामसारखी सामाजिक संवादी माध्यमं म्हणजे सोशल मीडिया, जन्माला आली तिच माणसं वैयक्तिक आयुष्यात किती नि:शब्द, निरस आणि एकलकोंडी असतात, हा त्या लेखाचा निष्कर्ष! या 'लिसनर’शॉर्ट फिल्मची प्रेरणा घेऊन कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅलीसह युरोपात अशी हॉटेल्स सुरू झाली आहेत, जिथं तुम्हाला, तुमचं मन मोकळं करता येतं!

#1443: मधुबाला .... लेखिका : स्मिता. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 08.04.2024

Send us Fan Mail मधुबालाला इंग्रजीचे ज्ञान नव्हते.. तिने देव आनंदजींना तसं सांगितले . त्यावर त्यांनी तिला इंग्रजी शिकवायला एक शिक्षक नेमले.  त्यांनी इंग्रजी भाषेची जवळून ओळख करून दिली.  सरतेशेवटी ती उत्तमोत्तम इंग्रजी  पुस्तके वाचु लागली.. आणि तिच्या शेवटच्या जीवघेण्या आजारात  एकटेपणात, पुस्तकांनी तिला शेवटपर्यंत साथ दिली...

Listen to the Life of Stories podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.