Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Author
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Category
Podcast website
Latest episode
Jul 7, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
# 1541: जैसे कर्म तैसे फळ. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 07.08.2024 6:40
Send us Fan Mail राजाने दिव्यदृष्टी द्वारा पाहिले की साधारण पन्नास जन्मांपूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्यांनी एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच वृक्षावरील बरेचसे पक्षी पळून गेले, मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले तर पक्षांची शंभर एक लहान पिल्ले उडून न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. राजाचे हे त्या जन्मीचे क्रियामान कर्म, फळ देण्याची योग्य संधी पहात संच...
# 1540: सीता सेतू. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 07.08.2024 5:02
Send us Fan Mail केरळ राज्यातील वायनाड नावाच्या डोंगराळ भागातील काही गावे त्यांच्या पाठीशी असलेल्या डोंगरांनी आपल्या पोटात घेतली आणि नकाशातून ही सारी गावेच नाहीशी झाली...शेकडो लोक मातीच्या खाली गाडले गेले कायमचे. पावसाचे प्रचंड थैमान सुरु होते. सुरालमाला गावाजवळच्या मुन्दाकाई खेड्याच्या आसपासची चार गावे नाहीशी झालेली होती. आणि या गावांशी संपर्क करणयासाठी असलेला नदीवरील जुना पूल नष्ट झाला होता. बचा...
# 1539: मधमाशा नसलेलं जग. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 06.08.2024 6:06
Send us Fan Mail मधमाशी. आपल्या नखाएवढा किडा. पण त्याचं निसर्गाच्या जीवचक्रामध्ये खूप महत्त्वये. तुम्हाला माहितीये का एखाद्या फुलावर मधमाश्या का बसलेल्या असतात? कधी विचार केलाय का? मला तर लहानपणी वाटायचं की त्या फुलांमधून गोडवा शोषून घेतात आणि आपल्या पोळ्यात टाकतात मग आपल्याला गोड मध खायला मिळतो. पण खरं तर मधमाश्या परागीभवनाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. परागीभवन म्हणजे वनस्पती...
#1538. : कुळाच्या मालकीची जमीन दुसऱ्यास विकण्याच्या पेच. लेखक : शेखर गायकवाड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 05.08.2024 5:41
Send us Fan Mail कसेल त्याची जमीन ह्या कायद्याने जमिनी कुळांच्या मालकीच्या झाल्या. केवळ 100 रुपये किमतीवर जमिनी मूळ मालकां कडून कुळांना दिल्या गेल्या. कुळांनी ह्या जमिनी तिऱ्हाहीतांना जास्त किमतीनी रीतसर परवानगी घेऊन विकल्या. ही गोष्ट खटकणाऱ्या मूळ मालकाची व्यथा मांडणारी ही घटना.
# 1537 : बाप आहे म्हणून.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 03.08.2024 8:15
Send us Fan Mail साहेब आज बापाचा फोन येतोय उद्या भविष्यात बाप निघून गेल्यावर या नंबर वरून कॉल येणार नाही..हा काळजी असणारा आवाज कानावर पडणार नाही.. आणि साहेब मिटिंग,कार्यक्रम वैगेरे होतच राहतील…माझं बोलणं सुरू होतंच तेवढ्यात अण्णांचा परत फोन आला…मी पटकन उचलला आणि स्पिकरवर टाकला…अण्णा जोरात बोलत म्हणाले, “ आरं भजी घेताना जरा मिरची पण घेऊन ये..तोंडाला चव येईना लगा…मी शांतपणे होय म्हणल्यावर फोन ठेवला…
# 1536: मृत्युदूत व जीवन दाता शास्त्रज्ञ फ्रिट्झ हार्बर. लेखक : अनघा पाठक. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 01.08.2024 14:00
Send us Fan Mail फ्रिट्झ यांचा मानसपुत्र इतिहासकार फ्रिट्झ स्टर्न लिहितात, “हाबर यांनी आपलं आयुष्य विज्ञानाला वाहिलं होतं. पण आपलं देशप्रेम सतत सिद्ध करण्याच्या नादात त्यांनी युद्धात वापरल्या जाणाऱ्या विषारी वायूंचा शोध लावला. पहिल्या महायुद्धात या वायुंमुळे हाहा:कार उडाला. दुसऱ्या महायुद्धात सुद्धा ह्या वायूंचा उपयोग हिटलरने छळछावण्यांमध्ये केला. ” एकोणिसावं शतक संपत आलं तेव्हा जगाला एका प्रचं...
# 1535: बीथोवनचा केस . लेखक : बिपीन देशमाने. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 31.07.2024 11:45
Send us Fan Mail बरोबर दोनशे वर्षांपूर्वीची घटना आहे. ७ मे १८२४ रोजी व्हिएन्ना येथे बिथोवन यांनी रचलेल्या सिम्फनी क्रमांक ९ प्रीमियर होता. हॉल खचाखच भरला होता. या शोला अभूतपूर्व, प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोक उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करू लागले. स्टँडिंग ओव्हेशन! बिथोवन यांना मात्र याची काहीच कल्पना नव्हती! ते वादकांकडे तोंड आणि प्रेक्षकांकडे पाठ करून संचालन करत होते. शेवटी एका गायकाने स्वतः...
# 1534: परकेपण. लेखक : चन्द्रशेखर गोखले. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 30.07.2024 6:14
Send us Fan Mail " अरे, आधी वाडा होता, त्यात माझी स्वत:ची खोली होती. मला माझ्या खोलीचं कौतुक होतं. घरचेही त्या खोलीला ‘ताईची खोली’च म्हणायचे.”..वहिनी म्हणाली. “मग आता?”_ मी न राहवून विचारलं. “आता इतका आलिशान बंगला बांधला. एक मजला वाढवला… पण त्यात मला कुठंच जागा नाही रे !"
# 1533: ती बघती म्हनुन झोपता येतं देवाला. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 29.07.2024 5:51
Send us Fan Mail रात्री अंथरुणात पडल्या-पडल्या मी बापूंना विचारलंच.... “बापू, एकादशी म्हणजे काय असतं ?” बापू म्हणले... “ अरे खरंतर एकादशी म्हणजे आपल्या मराठी महिन्यातला अकरावा दिस... पर हा जो आखाड म्हंजी आषाढ असतोय का नाई .. त्यातल्या एकादशीला विष्णू देव झोपत्यात... चार महिन्यांसाठी.. मग ते चार महिने आपल्याला त्याचं दर्सन व्हनार नाही.. अनि आपल्या सावळ्याला एकदाचं डोळे भरून पाहून घेण्याची ही एकादशी...
# 1532: स्वप्नातून संदेश. लेखक : सुजाता लेले. कथन : ( मीनल भडसावळे. ) 28.07.2024 4:02
Send us Fan Mail ही गोष्ट एका छोट्या मुलाच्या स्वप्नाची आहे. दिवसेंदिवस कमी होणारी जंगले ,त्यामुळे होणारा पाणी-साठ्यावर परिणाम .तसेच प्राणी, पक्षी यांना बंदिस्त ठेऊ नये हा संदेश ह्या गोष्टीतून मिळतो.
# 1531: गुरू वचन त्रिकाल सत्य. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 28.07.2024 7:53
Send us Fan Mail गुरूजींनी धन न देता फक्त सल्ला दिला तोही धामधूमीत लग्न करण्याचा. इथं तर साधा मंडप घालायची पंचाईत. राहून राहून ते डाळींबाचं गाठोडं त्याला सतावत होतं अखेर त्याने विचार केला की हे गाठोडं सकाळीच गावाबाहेर लांब कुठेतरी नदीपात्रात फेकून द्यायचं. सकाळचा चहापाणी ऊरकून चंदन आपल्या सहकाऱ्यांची नजर चुकवून गाठोड्यासह घराबाहेर पडला. गावाबाहेर वेशीजवळ चौकात गर्दी पाहून तो जरा थांबला. तिथल्या ज...
# 1530: कारगिल हिरो: कॅप्टन विक्रम बत्रा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 26.07.2024 8:48
Send us Fan Mail “पाकिस्तानी हेवी मशीन गनच्या संततधार पावसासारख्या गोळ्या बरसल्या. आपल्या मुलाने तो गोळीबार चुकवत पाकिस्तानी बंकर गाठला आणि ग्रेनेडची पिन काढून तो थेट बंकरमध्ये टाकला व तेरा पाकिस्तानी सैनिकांना यमसदनाला पाठवले. हेवी मशीन गन मधून गोळ्यांचा वर्षाव बंद झाला आणि ते क्षेत्र आमच्या नियंत्रणाखाली आले.” “सर्वप्रथम तुमच्या मुलाचे शरीर उचलून बाहेर आणणारी मी पहिली व्यक्ती आहे. सर, त्याच्या श...
# 1529: कथा पहिल्या गुरूपौर्णिमेची. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 26.07.2024 7:47
Send us Fan Mail पण केवळ सात माणसे तेथे थांबून राहिली. या आदियोगीकडून ज्ञान ग्रहण करण्यासाठी ती सात माणसे आग्रही होती. पण आदियोगींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्या सात जणांनी प्रार्थना केली, ''जे गुह्य ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे, ते आम्हालाही प्राप्त करण्याची इच्छा आहे.'' त्यांची विनवणी धुडकावून लावत आदियोगी गरजले, ''मूढमतींनो, तुम्ही आज ज्या अवस्थेत आहात त्याव...
# 1528: कहाणी 'हायवे टच' घराची. लेखक : शेखर गायकवाड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 24.07.2024 5:51
Send us Fan Mail जगात सहसा कुठेही आपले राहते घर हायवे जवळ बांधले जात नाही. पण आपल्याकडे मात्र भर रस्त्यावर असलेले घर ही बाब अभिमानाने सांगितली जाते. सरकारी जमिनीत अतिक्रमण करुन हायवे लगत बांधलेल्या घराची ही कहाणी!
# 1527: "जा, कुणाला तरी मदत करून या!" कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 23.07.2024 3:41
Send us Fan Mail आता तुमच्या लक्षात आले असेल *मदत करण्यासाठी तुमची निवड व्हावी लागते.* कुणी ही मदत करू शकत नाही ,मदत तीच व्यक्ती करते ज्याची परमेश्वराने निवड केलेली असते.
# 1526: अवयवांची सभा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 23.07.2024 9:50
Send us Fan Mail पायानी त्यांची कशी पायमल्ली चालली आहे याचा पाढाच वाचला : माझा तर उपयोग नेमका चालण्यासाठी आहे का गाडींचे क्लच आणि ब्रेक दाबण्यासाठी आहे, हेच समजत नाही. दिवसाकाठी थोडेही चालत नाही हा माणूस. जरा कुठं मोकळं व्हावं म्हटले की हा मटकन बसतो जाग्यावर. घरात सोफ्यावर बसतो, बाहेर जाताना गाडीत बसतो, ऑफिसात खुर्चीवर बसतो आणि घरी आल्यावर बेडवर झोपतो. माझी तर चालायची सवयच मोडली आहे. किती वर्ष झाल...
# 1525: चिंटी चावल ले चली. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 17.07.2024 4:20
Send us Fan Mail मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'वा वा ... क्या बात है। देवा! तू भाताची सोय तर केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली. तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार...
1524: उचल्या भक्ताने विठ्ठलाला लुटले . (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 17.07.2024 11:24
Send us Fan Mail “अरे बाबा, आम्हालाही घेऊ दे की त्यांचे दर्शन! अरे, हे तीर्थयात्रेला गेल्यापासून नामयाचे कीर्तन नाही ऐकलं बरेच दिवसात. ज्ञानोबा माऊली दिसली नाही. आम्ही त्यांचं लांबून दर्शन घेऊ. बोलणार सुद्धा नाही त्यांच्याशी. आम्ही पिकली पान! वरती जाण्यापूर्वी संतांचे दर्शन घ्यावं म्हणतो! ” .. देव. देवाने हरीपाळाला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला आणि उद्गारले, “हरिपाळl, साधुसंतांचा आदर करायचा ह...
# 1523: शठे शाठ्यं समाचरेत्.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 14.07.2024 8:18
Send us Fan Mail मध्यरात्री कन्नौजच्या एक चतुर्थांश सैन्याने तक्षकाच्या नेतृत्वाखाली अरब छावणीवर हल्ला केला. सर्वजण झोपून विश्रांती घेत होते. महंमद बिन तुघलकाला अशी अपेक्षा नव्हती की एखादा हिंदू राजा प्रतिष्ठेचे उल्लंघन करून आणि शाश्वत नियम बाजूला ठेवून अशा प्रकारे आक्रमण करेल. सकाळपर्यंत दोन तृतीयांश अरब सैन्य मारले गेले होते. उरलेली फौज मागे धावायला लागली. ते मागे पळाले तेव्हा त्यांनी बघितलं की...
# 1522: कोण गोंदवलेकर...? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 13.07.2024 7:29
Send us Fan Mail मला सांगा. आपल्याला गोंदवलेकर महाराज कोण, श्री स्वामी समर्थ कोण, साईबाबा कोण, गजानन महाराज कोण हे माहीत आहे. त्यांचे चमत्कार, त्यांचा बोध सारं माहीत आहे. तरी आपल्यात पालट होत नाही ..... आणि त्यांचं नाव-गाव काही माहीत नसताना केवळ त्यांच्यावरच्या निस्सीम प्रेमामुळेही अंतरंगातून बोध होत जातो आणि त्यानं जीवनाला कलाटणी मिळते, ते पूर्ण पालटू शकतं! याचं या इतकं दुसरं उदाहरण माझ्या तरी पा...
# 1521: बाई या पावसाने...लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 12.07.2024 10:42
Send us Fan Mail शाळेतला मराठीचा तास. त्यादिवशी पाऊस खूप जोरात होता. बाई वर्गात आल्या आल्या म्हणाल्या, " आज आपण फक्त कविता म्हणू" तासभर कवितांनी वर्ग चिंब भिजला. कॉलेज मधे वर्षासहल म्हणजे वर्गातल्या मुलांबरोबर बाहेर पडायची आयुष्यातली पहिली वेळ.. गप्पा ,गाणी ,खोड्या आणि वरून पाऊस ..! अशावेळी हळूच कोणीतरी दोघे मागे रेंगाळायचे. हातात हात घालून झाडाखाली उभे राहायचे खुळ्यासारखा कोणाचा तरी कुण...
# 1520: मानवतेचा मानस...! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 11.07.2024 8:46
Send us Fan Mail अनादी काळापासून शेतीतून निघणाऱ्या धान्यातून आमच्या पिढ्या धष्टपुष्ट तयार झाल्या. कित्येक माणसे १३० वर्षांपर्यंत जगायची, पण आता सारेकाही सत्त्वहीन, रासायनिक खताचं खाऊन पन्नाशीत माणसांना जगणं नकोसे झाले आहे. कुलकर्णी यांचे शेतीबाबत सारे प्रयोग जबरदस्त होते. तिथला सोनचाफा तर आयुष्यभर आठवणीत राहील असाच होता.
# 1519: फुलपाखरांचे हरवलेले ठिपके. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 10.07.2024 5:55
Send us Fan Mail अमाथुसिड या फुलपाखरांच्या पंखांवर घुबडाच्या डोळ्याप्रमाणे दिसणारे व साधारण त्याच आकाराचे दोन ठिपके असतात. या फुलपाखराचा हा भाग अगदी घुबडाच्या डोक्यासारखा दिसतो म्हणूनच पक्षी त्याच्या वाटेला जात नाहीत व या नाजूक फुलपाखराचे रक्षण होते. अॅब्रोटा, सिंब्रेटिया, पँटोपोरिया इ. फुलपाखरांच्या पंखांवर रंगीबेरंगी विविध आकारांचे पट्टे व आकृत्या असतात. त्यामुळे झाडाझुडपांतून त्यांना ओळखता येत...
# 1518: एकतरी वारी अनुभवावी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 10.07.2024 9:26
Send us Fan Mail दोन दिवसांनी त्यांचा फोन आला. माझ्या तब्येतीची चौकशी करून म्हणाले, “तुम्हाला आनंदाची बातमी द्यायला फोन केला. मुलाच्या नव्या शेतात विहीर खोदताना पांडुरंगाची मूर्ती मिळाली. आषाढीलाच. तुम्हाला टोचणी राहील मला दर्शन घेता आलं नाही याची, म्हणून सांगायला फोन केला.” "मी स्तब्ध झालो. त्या एका वारीनी माझं आयुष्य, माझी मतं संपूर्ण बदलून टाकली." डॉक्टरांची गोष्ट ऐकून मीही भारावलो....
# 1517: सेकंड होम चा सुवर्ण मृग. लेखक शेखर गायकवाड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 08.07.2024 6:07
Send us Fan Mail थोड्या पैशांची बचत झाल्यावर किंवा गुंतवणूक म्हणून सेकंड होम किंवा फार्म हाऊस हौसने घेतले जाते. पण घर झाल्यावर इथे कामासाठी कुणी कुटुंब ठेवायचे जमले की खार फटका बसू लागतो. घरापासून लांब ह्या मोहमयी घरात 10 ते 12 वेळेपेक्षा जास्त वेळ सहकुटुंब राहिले जात नाही असा अंदाज आहे!
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.