Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Kids MR ↓ 2071 episodes

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Author

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Category

Kids

Latest episode

Jul 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

# 1568: आईचे डोळे. लेखक:- प्रवीण दवणे कथन:- (सौ. नीता दिनेश प्रभू.) 10.09.2024

Send us Fan Mail " आपली परीक्षा बघणारे प्रसंग, प्रतिकूल परिस्थिती च आपल्या आयुष्यात प्रेरणा घेऊन येतात. दारिद्र्य माणसाला संपवू शकत नाही पण आळस, ध्येय शून्यता, उदासीनता माणसाला संपवू शकते. जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरीही आपल्या आई वडिलांचे कष्ट लक्षात ठेवले आणि त्यांनी पाहिलेली स्वप्ने आठवली तर ध्येय प्राप्ती साठी मार्ग मिळतो"

# 1567: तोडणे सोपे, जोडणे अवघड. लेखक:- मनीष मेस्त्री कथन:- (सौ. नीता दिनेश प्रभू.) 08.09.2024

Send us Fan Mail " आपल्या आजूबाजूचा परिसर , इतरांच्या वस्तू इत्यादींची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. झालेल्या चुका कबूल करून त्या दुरुस्त करण्याने आपण मोठे होतो आणि शिकतो. जी वस्तू आपण जोडू शकत नाही ती तोडण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही"

# 1564: "मोरा गोरा अंग लै ले। (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 05.09.2024

Send us Fan Mail "शैल! मै फिल्म बना रहा हूँ, मुझे एक गाना चाहिये और तुम एक मोटार मेकॅनिक को  गाना  लिखने के लिये ले आये?... पहिले हकाल दो इसको!!" झाले, संपुर्ण सिंग चा इगो दुखावला गेला... तडक आपल्या गावी जाऊन गॅरेज सांभाळू लागला. बऱ्याच मिनतवाऱ्या केल्यावर काही  दिवसानी "मुखडा" पत्राद्वारे आला. "ये ही तो चाहिये मुझे... किसने लिखा है... बुलाओ पठ्ठे को"l.....बिमल दा 

# 1563: क्रांतीसिंह नाना पाटील. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 04.09.2024

Send us Fan Mail त्या घरामधून  येणारे  गाणे जसेजसे  कानावर पडायला लागले तसे हे  सर्व  क्रांतीकारक  रडायला लागले मग त्यांनी दारावर  थाप मारली  त्या भगिनीने दार  उघडले  दारात असणार्या माणसाना पाहून तिने विचारले  "काहो? कोण तुम्ही आमच्या मालकाकडं आलाय ? उठवू का त्यास्नी ? "  "ताई  मला तुलाच भेटायचं हाय. तू आता ज्याला आयुष्य मागत हुतीस  त्योच तुझा भाऊ मी नाना पाटील. ताई  तुझ्यासारखी बहि...

#1562: निरुपद्रवी जीवंत प्राणी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 04.09.2024

Send us Fan Mail पार्सल पोस्ट सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर, जेसी आणि मॅथिल्डा बीगल नावाच्या एका ओहायो मधिल जोडप्याने त्यांचा 8 महिन्यांचा मुलगा जेम्स याला त्याच्या आजीला “मेल” केले, जी बटाव्हियामध्ये जवळच राहत होती. युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिस च्या इतिहासकार जेनी लिंच यांच्या म्हणण्यानुसार, बेबी जेम्स पार्सल पोस्टद्वारे पाठवलेल्या पॅकेजसाठी 11-पाऊंड वजनाच्या मर्यादेत होता आणि त्याच्या &q...

# 1561: संकटात साथ सोडू नका. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 02.09.2024

Send us Fan Mail इंद्र म्हणाला, "हे बघ भाऊ.., या झाडाला ना पानं, ना फुलं, ना फळं. आणि आता हे झाड पुन्हा हिरवं होईल, असं कोणी तरी म्हणू शकेल का? कारण ते आता मरणासन्न झालेलं आहे. झाडाने स्वत: सुध्दा जगण्याची आशा सोडून दिली आहे. आणि जंगलात काय हे एकच झाड आहे का? अरे, या जंगलात अशी अनेक झाडे आहेत, ज्यांच्या मोठमोठ्या ढोल्या रहायला अगदी योग्य आहेत आणि त्या पानांनी झाकलेल्या आहेत. ती झाडेही फळे आणि...

# 1260: सर्वोत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 01.09.2024

Send us Fan Mail  "मला तुला दाखवून द्यायचं होतं की, ज्या जुन्या कपड्याची किंमत १ डॉलर सुद्धा नाही त्याची किंमत आपण वाढवू शकतो, तर माणसांचं काय?" "आपण काळे सावळे असू किंवा गरीब असू, आपली किंमत पण आपण वाढवू  शकतो. " वडिलांच्या या वाक्याने जॉर्डन खूपच प्रभावित झाला. वापरलेल्या जुन्या कापडाला जर मी प्रतिष्ठा देऊ शकतो, तर स्वतःला का नाही?  काही वर्षांनी मायकेल जॉर्डन उत्कृष्ट बास्के...

# 1559: "मुलीला हरणी नको; तर वाघीण बनवा." लेखक हनुमंत वि. भोंडेकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 31.08.2024

Send us Fan Mail “लोकहो, आपल्या मुलीबाळींच्या रक्षणासाठी आता पूर्वीसारखे ‘सह्याद्रीत शिवराय’ नाहीत. आज शहरातील मुली जीव मुठीत धरून जगत आहेत. आम्ही तर दऱ्याडोंगरात राहतो. डोंगरवासीयांच्या मुली संकटात सापडता, कोणी मदतीला येण्याची शक्यता नसते; किंवा अत्याचार झाल्याची बातमी सुद्धा जगासमोर येत नाही.”  “मंडळी तुमची मुलगी शेळी किंवा हरणी सारखी दिसली  तर तिला त्रास दिला जाऊ शकतो; पण तुमची मुलगी वाघासारखी...

# 1558: उद्या आमचे बापू वारीला चाललेत. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 31.08.2024

Send us Fan Mail “बापू, मग माय ला मोक्ष नाही मिळणार?”... मी विचारलं... माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवून माय हसत म्हणाली... “पोरा.. ते मोक्ष बिक्ष असल्या गोष्टींचा विचार आयांनी करायचा नसतो बग... आई जर या नादाला लागली.. तर घरादाराकड कोण बघल?... समदी घडी इस्कटून जाईल की!!... आमचं पंढरपूर बी हितच आणि विठोबा बी हितच!!...  जगाची रीत असत्या रे...इथं विठ्ठलाच्या झोपन्याचाबी सोहळा हुतोय!... आणि तिकडं ती रुक्म...

# 1556: देवळा बाहेरचा विठ्ठल. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 29.08.2024

Send us Fan Mail विठ्ठलाच्या मंदिरापाशी सात वर्षाची एक चिमुरडी आपल्या दीड वर्षाच्या भावाला घेऊन लता दिदींचे 'ज्योती कलश छलके...' गात होती..       कपडे बेताचेच.. घरची गरिबी प्रचंड असावी.. पण सुरांची सरस्वती मात्र तिच्यावर प्रसन्न होती.. तिच्या तेजस्वी रुपात आणि प्रतिभासंपन्न गळ्यात लक्ष्मी साक्षात उतरली होती..पण तिच्या शेजारची ती पाटी मात्र माझ्या डोक्यातून काही निघत नव्हती. त्यावर लिहिले...

# 1556: ‘आठवणी गदिमांच्या‘. लेखक आनंद माडगूळकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 28.08.2024

Send us Fan Mail 'प्रपंच' ही पटकथा पूर्णत्वाच्या मार्गावर होती. विठ्ठलावरील भक्तीने ओथंबलेले गीत गदिमांकडून लिहून झालेले नव्हते. त्यामुळे बाबूजींचा पारा चढला होता. ते काहीतरी गदिमांच्या आळशीपणा बद्दल  त्यांना बोलले.   रागाने तणतणत गदिमा पंचवटीच्या फाटकाजवळ गेले. रस्त्याच्या पलीकडे बुरूडांच्या दोन चार झोपड्या होत्या. तिथे तीन चार लहान मुले  आऱ्यावर  ठेवलेले  चाक गरगर फिरवीत होती. तेवढ्यात...

# 1555: अमोघचे स्वप्न. लेखिका सुजाता लेले . कथन : ( मीनल भडसावळे. ) 27.08.2024

Send us Fan Mail आजकाल मैदानी खेळांपेक्षा कॉम्प्युटर खेळ मुलांना आवडू लागलेत. त्यामुळे मुलांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागलेत. सदर गोष्टीत  बाप्पा व कॉम्प्युटर यांच्या चर्चेच्या माध्यमातून ह्या संदर्भात प्रकाशझोत टाकला गेलाय .

# 1554: योगेश्वर आणि योगमाया. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 27.08.2024

Send us Fan Mail ती बालिका, योगमाया, देवकीच्या मांडीवर विसावली. देवकी बाळंत झाल्याची वार्ता कंसाला समजताच तो त्या नवजात बाळाची हत्या करण्यासाठी त्या ठिकाणी धावत आला. देवकीच्या मांडीवरचं बाळ त्यानं दोन्ही पायांना धरून उचललं आणि हवेत गरागरा फिरवलं. आता तो तिला फरशीवर आपटणार तोच, त्या योगमायेनं कंसाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेऊन स्वर्गाकडे उड्डाण केलं आणि कंसाला आकाशवाणी करून सांगितलं की &quot...

# 1553: घोडं दिसलं की पायी चालू वाटत नाही माणसाला! कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 25.08.2024

Send us Fan Mail आत्ता आठवतय कि ...आत्याचं घर किती लांबं होतं पण चालतच न्यायचे आजोबा .. त्यांचं काय नातीवर प्रेम का नव्हतं ? पण चालणं हेच फार स्वाभाविक होतं..... पुढे सायकल हातात आल्यावर चालत जायला कंटाळायला लागले मी तेंव्हा आज्जी म्हणत असे .. "घोडं दिसलं कि पायी चालू वाटत नाही माणसाला" !!!

# 1552: त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव....कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 24.08.2024

Send us Fan Mail त्या छोट्याश्या गावातला तो छोटासाच एस.टी.स्टँड आता जवळजवळ निर्मनुष्य झाला होता.   मोडक्या बाकड्यावर भावाच्या वाटेकडे डोळे लावून ती भेदरलेल्या अवस्थेत बसून राहिली. ड्राइवर कंडक्टर  दोघंही तसेच बसून होते एस.टी. त, दिवे बंद न करता....

# 1551: दिले दान घेतले दान । जगामध्ये न राही मान. लेखक शेखर गायकवाड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 23.08.2024

Send us Fan Mail सरपंच झाल्यावर त्यांनी आपली डू एकर जमीन शाळेला बक्षीस दिली. ते नंतर झाले जिल्हा परिषद सदस्य. तिथे लोक म्हणू लागले, " तुम्हाला राजकारणातले काही कळत नाही. दुसऱ्याची जमीन बळकावायची सोडून तुम्ही खुशाल स्वतः ची जमीन शाळेला दिलीत?" आता दिलेले जमीन परत कशी मिळवायची याचे विचारचक्र त्यांच्या डोक्यात सुरू झाले.

# 1550: "मित्रा, कधीच पूर्ण होऊ नकोस". लेखक तंबी दुराई. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 22.08.2024

Send us Fan Mail दीर्घ काळ रेंगाळणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाला उद्देशून ...!

# 1549: तुम्ही घाटी लोक काय स्टेडियम बांधणार? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 21.08.2024

Send us Fan Mail आमदारांचा प्रदर्शनीय क्रिकेट सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव घेऊन वानखेडेंसोबत काही वरिष्ठ नेते, तसेच काही आमदारदेखील विजय मर्चंट यांच्यकडे गेले. विजय मर्चंट यांनी सर्व ऐकून घेतले; पण त्यानंतर त्यांनी त्या प्रस्तावास मंजुरी देण्यास नकार दिला. त्यावेळी ते म्हणाले की, मी आमदारांच्या मॅचसाठी हे स्टेडियम तुम्हाला देणार नाही. कारण- हे इंटरनॅशनल दर्जाचे...

# 1548: एकाकीपणा विकत घेणे आहे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 20.08.2024

Send us Fan Mail एकदा मी असेच काम मिळेना म्हणून हताश होऊन बागेत बसलो होतो तेथे एक आजी येवून बसल्या. सुरुवातीला मला राग आला. त्यांनी माझी चौकशी केली. मी फक्त हो/ नाही करत राहिलो. त्याच त्यांचे काहीबाही सांगत होत्या. बराच वेळ झाला मग त्या म्हणाल्या "माझा नातू तुझ्या एवढाच आहे. तुला बघून तोच आठवला म्हणून बोलले एवढे. तो परदेशी असतो. पती वारले आहेत. घरी मी एकटीच दिवसभर कोणाशी बोलणार कामाच्या बायका...

# 1547: एक झुंज कॅन्सरशी. लेखक डॉक्टर शंतनु अभ्यंकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 19.08.2024

Send us Fan Mail Living with terminal Lung Cancer: Astory of hope ya पुस्तकाचा लेखक सांगतो, Lung  कॅन्सर होण्यासाठी सिगरेट फुकायची गरज नाही निव्वळ Lungs  असल्या की पुरतं. आपल्या आजाराच्या उपचाराबद्दल शोध घेत असताना लेखकाला जाणवते एक वास्तव. " डॉक्टरच्या सेवा तुम्ही भाड्याने घेतल्या  आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवायचं काम तुम्हालाच करायला हवं.  जसं तुम्ही आर्किटेक्ट ,शिंपी यांना त्यांच्या   चुका द...

# 1546: खेळ विषामृताचा: भाग 2 ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 13.08.2024

Send us Fan Mail ह्या लसीच्या पूर्ण परिणामकारकतेसाठी प्रत्येक विषबाधित रुग्णाला सरासरी २५ मात्रा द्याव्या लागतात. सर्पदंशानंतर रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी, लसीची किमान पहिली मात्रा रुग्णाला सर्पदंश झाल्यापासून एक तासाच्या आत द्यावी लागते. सर्पदंशानंतर एक तासात रुग्णाला लस देणे, हे एक मोठे आव्हान आहे. बहुतेक रुग्ण हे निम्न आर्थिक स्तरातील, अशिक्षीत, ग्रामीण दुर्गम भागातील असल्याने त्यांना सर्पदंशावर...

# 1545: खेळ विषामृताचा: भाग १. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 12.08.2024

Send us Fan Mail सर्पदंशाचे दोन प्रकार आहेत, कोरडा दंश आणि विषबाधा. ज्यावेळी सापाने दंश केल्यावर त्याच्या विषग्रंथीमध्ये निर्माण झालेले विष त्याच्या दातांच्या पोकळीतून माणसाच्या (किंवा अन्य प्राण्याच्या) रक्तात मिसळते, त्यावेळी त्याला विषबाधा होते. अन्यथा तो कोरडा दंश मानला जातो. सर्वसाधारणपणे ७० टक्के सर्पदंश हे कोरडे असतात. सर्पदंश अधिकतर ग्रामीण, वनक्षेत्रात होतात. सर्पदंशावर तत्काळ उपाययोजना न...

# 1544: स्वामी गोवू इंदा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 11.08.2024

Send us Fan Mail ऋषी अगस्त्य आश्रमात परतले आणि जेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांकडून त्यांच्या अनुपस्थितीत श्रीनिवासच्या आगमनाबद्दल ऐकले तेव्हा त्यांना अत्यंत नैराश्य आले. "श्रीमन नारायण स्वतः लक्ष्मीसह माझ्या आश्रमात आले होते तेव्हा दुर्दैवाने मी आश्रमात नव्हतो ,खुप मोठा योग माझ्याकडून हुकला, तरीही काही हरकत नाही पण श्रींना हवी असलेली गाय मला दिलीच पाहिजे " व ऋषि ताबडतोब गोशाळेत दाखल झाले आ...

# 1543: केदारनाथ ज्योतिर्लिंगाची कथा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 09.08.2024

Send us Fan Mail या प्रमाणे, पांडव आणि द्रौपदी एक दिवस महादेवाच्या शोधात हिमालयापर्यंत आले. इकडे, जेव्हा महादेवांनी या लोकांना पाहिलं तेव्हा ते बैलाच्या रुपात लपून राहिले, परंतु युधिष्ठीराने भगवान शिवाला असं लपताना पाहिले. तेव्हा युधिष्ठीराने त्यांना सांगितले की तुम्ही कितीही लपून राहिलात तरी, हे प्रभु, आम्ही तुम्हाला भेटल्या शिवाय येथून जाणार नाही आणि मला हे देखील माहित आहे की आम्ही पाप केलेले आह...

# 1542: मला देव भेटला. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 08.08.2024

Send us Fan Mail "मी तुमच्या मित्राचा मुलगा आनंद नाही.  माझे नाव अरविंद आहे. काल तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला होतात. आनंद कामानिमित्त शहराबाहेर गेला आहे. मुलाचा अपघाती मृत्यू हे तुमचे नुकसान हे कधीही न भरून येणारे आहे. तुम्हाला मदत केल्याने मला फार समाधान लाभले."  वरुन माझे  बाबा पाहात असतील तर त्यांना फार बरे वाटले असेल हे नक्की!"

Listen to the Life of Stories podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.