Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Kids MR ↓ 2071 episodes

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Author

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Category

Kids

Latest episode

Jul 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

# 1593: "ताई, तुम्ही देव अनुभवता!" कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 07.10.2024

Send us Fan Mail नदीचे ते रौद्र  स्वरूप पाहून कीर्तनकार बुवा लटलट कापू लागले. बाई म्हणाल्या  "बुवा घाबरू नका.आपण पाण्यात उतरून चालायला लागू. पाणी फार वाढले की लगेच एक रामा नावाड्या येईल आणि आपल्याला पलिकडे चिमणगावाला नेईल." शास्त्री हमसाहमसी रडू लागले. म्हणाले, "ताई आम्ही एवढे पुण्यवान नाही. आम्ही फक्त देव सांगतो, तुम्ही अनुभवता."

# 1592: माझी रेणुका माऊली. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 06.10.2024

Send us Fan Mail ध्यान लावण्याचा प्रयत्न करून पोट दुखीमुळे त्यांचे ध्यान नीट लागत नसे. एके दिवशी कळवळ्याने त्यांनी ध्यान लावले. ध्यानावस्थेत त्यांना असे दिसले की श्रीरेणुका माता अतिशय प्रखर उन्हात माहूरगड धावत पळत चढत आहे व देवी घामाने थबथबलेली आहे. ध्यानावस्थेतच विष्णुदासांनी देवीच्या पदराचे एक टोक घेऊन देवीला वारा घालायला सुरुवात केली. देवी प्रसन्न झाली आणि त्याच क्षणी त्यांची ध्यानावस्था संपली...

# 1591: "जास्त ताणू नाही नाही बाई, जीव पस्तावतो" लेखक : समीर गायकवाड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 05.10.2024

Send us Fan Mail शांताबाई कडे जगण्याच्या विविध समस्यांवर तोडगे आहेत .आता देखील  या दोघांमधला वाद सहज सोडवला तिने.पण  त्या दिवशी घरी गेल्यावर शांताबाई पार उन्मळून  पडली. तिला गुराप्रमाणे मारझोड करणाऱ्या नवऱ्याने तिच्यावर कधी जीव लावला नव्हता की कधी साधे  प्रेम देखील केलं नव्हतं.  मरताना अखेरच्या क्षणी मात्र त्याने  तिची माफी मागितली होती. तिला त्याला माफ केल्याचं सांगायचं होतं. पण ती बोलण्याआधीच त्...

# 1590: रघुनायका मागणे हेचिं आता. लेखक - कोदंड पुनर्वसु. कथन : ( डॉ. गीतांजली राव ) 04.10.2024

Send us Fan Mail एरवी देवळात सारखं 'पुढे चला, पुढे चला ' म्हणणारे कार्यकर्ते आपल्याला स्वस्थतेने दर्शन घेऊ देत नाहीत. ते दर्शन म्हणजे खरोखरचे देवाशी अनुसंधान साधणे असते, का आपल्या मागण्यांची यादी संपेपर्यंत आपल्याला वेळ हवा असतो?खरंच जर दिवसभर संपूर्ण देऊळ  आपल्याला मिळालं तर आपण देवाशी किती वेळ गप्पा मारू शकणार आहोत? आपल्या मागण्यांची यादी सतत दिवसभर देवाला सादर करता येईल का?

# 1589: श्वास. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 03.10.2024

Send us Fan Mail मिनिटाला १२ ते १८ श्वास घेण्याचा दर हा सरासरी मानला जातो. तुमचा श्वासोच्छ्वासाचा हा वेग यापेक्षा जास्त असेल, तर लगेच काळजी करू नका. आजपासून नियमितपणे खोल आणि संथ श्वास घेण्याचा सराव करा. एक इण्टरेस्टिंग गोष्ट जी याच्याशी निगडित आहे ती म्हणजे, श्वास घेण्याचा वेग कमी होतो, तेव्हा आपलं आयुष्य वाढत जातं. प्राण्यांच्या जगातही श्वासाचा वेग आणि आयुष्य यात परस्परसंबंध आहे. उदाहरणच द्यायचं...

# 1588: तीन हजार बाहुल्यांशी खेळणारी मोठी मुलगी, लेखक श्री. संभाजी गायके , कथन ( मीनल भडसावळे ) 02.10.2024

Send us Fan Mail ही गोष्ट आहे पलक ह्या गाणार्‍या मुलीची. ती लहानपणापासुन गाऊन निधी जमा करून दान करते. विशेषत: हृदयरोग, किडनी संबंधीत आजार असणार्‍या लहान मुलांसाठी ती कार्यक्रम करून निधी जमा करते. पलक मुछाल हार्ट फाऊंडेशन द्वारा हे काम चालते. ही मुलगी फक्त बाहुली बक्षीस म्हणून मागते. तिची गोष्ट.

# 1587: "दाद ........" कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 01.10.2024

Send us Fan Mail पुलं ना स्टेशन वरून घेऊन येणारा तो टांगेवाला होता. पुलं ना एवढा आनंद झाला वाळवंटात पाण्याचा झरा दिसावा अस त्यांना झालं . त्या माणसाला त्यांनी पुढे बसवलं सगळी रात्र त्या एकट्या माणसासाठी मैफल रंगवली.  परमेश्वराने गाणं ऐकण्याचे बीज टांगेवाल्याचात  टाकलं होतं.

# 1586: आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन. लेखक गणेश विसपुते. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 01.10.2024

Send us Fan Mail भाषांतरकार मंडळी  राष्ट्रांना एकत्र आणतात, संवाद सुलभ करतात, आणि शांततेत हातभार लावतात. साधं उदाहरण द्यायचं तर,  वैज्ञानिक किंवा तांत्रिक काम एका भाषेतून दुसऱ्या भाषेत नेणं ही फारच महत्वाची गोष्ट आहे. त्यातूनच माणसं एकमेकांना चांगलं समजून घेतात, बोलतात, आणि एकत्र येऊन काम करतात.  सेंट जेरोम हे बायबलचे भाषांतरकार आहेत त्यांच्या  पुण्यतिथीला  दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी 'आंतरराष्ट...

# 1585: "खा, माझ्या पुता" कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 28.09.2024

Send us Fan Mail म्हातारी म्हणाली, "माका सत्तर मैलार जांवचा आसा. सोडशील रे? यष्टी चुकली बग!" ड्रॉयव्हर खाली उतरला. म्हातारीची पाटी डिकीत टाकली आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर बसायला सांगितलं. आजी हरकली. चक्क पुढं बसून जायचं? आणि गाडीत कोणी पॅसेंजर्स नाहीत.  पण तिला हळहळपण वाटली. बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही. ती म्हणाली, "ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता.मियां तुका तीन आणे देतय...

# 1584: नात्यांच्या गाठी. लेखिका सपना जकातदार. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 27.09.2024

Send us Fan Mail ती नीट-नेटकी स्वच्छ रहायची. कुणाच्या अध्यात न मध्यात. लोकांच्या नजरेतली श्वापदं तिला घायाळ करायची. म्हणून तिनं एक डोरलं गळ्यात बांधलं होतं.  रुपानं देखणी नव्हती पण तिचे टपोरे डोळे खूप बोलके होते. तिच्या उशाशी एक भली मोठी सुरी असायची. घाबरायचे तिला इतरजण. तिचा चण्डिकेचा अवतार पहिला होता त्यांनी.   “जन्मली तेव्हा तिच्या हातावर आणि पाठीवर गाठ होती.. तुझ्या बापाला वाटलं, कॅन्सर असेल.ए...

# 1583: माउंटन मॅन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 26.09.2024

Send us Fan Mail दशरथ मांझी यांचा बालविवाह झाला होता. गावातील एका जमीनदार व्यक्तीकडे दशरथ कामाला होते त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा.  डोंगराच्या एकीकडे गाव आणि पलिकडे त्यांच्या कामाचं ठिकाण होते. त्यांची पत्नी फगुनिया दररोज त्यांच्यासाठी डोंगर चढून जेवण घेऊन जात असे. एकेदिवशी जेवण घेऊन जाताना फगुनियाचा तोल गेला आणि ती डोंगरावरून खाली कोसळली. यानंतर काही दिवसांनी तिचं निधन झालं.

# 1582: त्या परीक्षेची तयारी करा..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 25.09.2024

Send us Fan Mail शेखर कपूर आपला फोन घेऊन निघत असताना आपल्या विस्कटलेल्या केसांवर हात फिरवत तो पोरगा म्हणाला, “सरजी, ब्लॅकबेरी इस्तेमाल करना है तो हाथ साफसुथरे होने चाहिये. गंदे हाथसे इस्तेमाल करोगे तो ये प्रॉब्लेम आ सकता है.” ज्यानं कदाचित मागच्या पूर्ण आठवडाभर आंघोळ केली असावी की नसावी, असा संशय यावा, असा तो फाटका पोर कपूर साहेबांना सांगत होता. शेखर कपूर लिहितात, “ही एवढीशी फाटकी पोरं जगातील कोणत...

# 1581: उपरती. लेखक : अज्ञात. कथन: (सौ.मधुरा कुळकर्णी.) 24.09.2024

Send us Fan Mail "अती घाई संकटात नेई " माणूस वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतो. प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक असते. कारण एक चुकीचा निर्णय माणसाचे आयुष्य त्याच्या स्वप्नांची दिशा बदलण्यास कारणीभूत होवू शकतो.  काही वेळेस एखादी व्यक्ती किंवा एखादा सुविचार आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने नेण्यास कारणीभूत ठरतात.  अशीच एका राज्याच्या धुंदीत असलेल्या राज...

# 1580: राष्ट्र मजबूतीचा संकल्प. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 24.09.2024

Send us Fan Mail मी त्याच्या उजव्या हाताला बी पी कफ बांधू लागलो. फोर आर्मवर एका जखमेचा वेडावाकडा व्रण मला दिसला.  "इधर क्या हुआ था?" "गोली लगी थी साहब." मी उडालोच, "यह गोली का जखम है?"  "एक नही साहब, छह लगी थी. यहाँ से यहाँ तक ब्रश फायर लगा था." त्याने आपला डाव्या हाताच्या तर्जनीने उजवा हात, उजवा खांदा, उजवी छाती आणि शेवटी डाव्या खांद्यापर्यंत निर्देश केला. ...

# 1579: आठवणी दाटतात : माढ्यच्या काकू. लेखिका:निता चंद्रकांत कुलकर्णी. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 23.09.2024

Send us Fan Mail काकूंचा  तो कट्टा म्हणजे गंमतच होती. रोज तिथं काहीतरी नवीन घडायचं . पलीकडची  नुकतच लग्न झालेली नवीन सून घाबरतच आली. "काकु  वांग्याच्या भाजीत जास्तीच मीठ झालय.काय करू?"  " चार बटाटे उकडून तिखट,कुट घाल." " उद्या राहिलेल्या भाजीत ज्वारीचे पीठ, तिखट,मीठ  ,कोथिंबीर घाल आणि  त्याची थालपीठ कर " "चांगली होतील! आणि लक्षात ठेव   अशा गोष्टी  पुरुषांना सांगा...

# 1578: आमच्या आजोबांचे पोहे. लेखिका गौरी ब्रम्हे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 21.09.2024

Send us Fan Mail आमच्या आजोबांनी केलेले हे पोहे कमालीचे अपारंपारिक असतात . चक्क तूप जिऱ्याची फोडणी असते. कधी त्यात बदामाचे बारीक काप असतात, कधी मनुका असतात तर कधी फक्त ओलं खोबरं, वरून मीठ, साखर, किंचित तिखट, आणि एक दमदमीत वाफ. बस, काम तमाम! आणि तरीदेखील हे पोहे अतिशय चवदार लागतात!

# 1577: Munich Olympic - एका सुडाची कहाणी. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 20.09.2024

Send us Fan Mail युद्धामुळे किती जीवित व वित्तहानी होईल याची कल्पना करणेच कठीण आहे. पण म्हणून काय फक्त निषेध करायचा?  सूड घेण्याचे आणखीही काही मार्ग असतात. ५ सप्टेंबर १९७२ या दिवशी आठ खतरनाक दहशतवादी पॅलेस्टाईनी  आगंतुकांनी  ट्रॅक सूट घालुन म्युनिक, जर्मनीतील ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये प्रवेश केला. त्यांनी इस्रायलच्या ११ ओलीस खेळाडूंना गोळ्या घालून ठार केले व ते सुद्धा शार्प शूटर्सच्या  गोळ्यांना बळी प...

# 1576: जो दुसऱ्यावरी विसंबला. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 17.09.2024

Send us Fan Mail जो दुसऱ्यावरी विसंबला| त्याचा कार्यभाग बुडाला | जो आपणचि कष्टत गेला| तोचि भला || असे समर्थ रामदास स्वामी का सांगतात? ही छोटीशी गोष्ट ते खूप छान समजावते. चिमणी रोजच्याप्रमाणे आपल्या इवल्याशा चोचीतून पिलांसाठी दाणे घेऊन घरट्यात आली. पिल्लं उदास होती. चिमणीने विचारले, काय झाले, तुम्ही उदास का? पिल्लं म्हणाली, 'आई, शेतकरी आला होता, तो सांगत होता, ‘उद्या त्याची मुलं येऊन झाडाची का...

# 1576: Online shopping चे तारतम्य. लेखिका नीलिमा जोशी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 16.09.2024

Send us Fan Mail "online सामान घरी येते खरे, पण  पण तुमच्या सोयीच्या वेळेनुसार येतं का? कधी भाजी फोडणीला टाकत असतो, कधी wash room मधे असतो, कधी पूजा करीत असतो, कधी वाचत  असतो, आणि सामान येतं. दार उघडा!," "OTP दिल्या शिवाय मिळत नाही  मग फोन शोधा. लिस्ट प्रमाणे चेक करा. यात वेळ तर जातोच ना?" तो सुद्धा तुमच्या मनाविरुद्द,आणि गैरसोयीचा. मग आपल्या सोयीने, वेळ काढून का नाही बाजारातून...

# 1575: हत्तींशी बोलणारा माणूस. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 16.09.2024

Send us Fan Mail प्रसंगानुरूप हत्तींचं वर्तन कसं असतं, हे मीच काढलेल्या छायाचित्रांचे पुन्हा पुन्हा निरीक्षण करताना माझ्या लक्षात येऊ लागलं. त्यांची एकमेकांशी संवादाची भाषा, त्यांच्या भाव-भावना, हत्तीच्या पिलांची भाषा, हे मी प्रत्यक्ष हत्तींच्या निरीक्षणातून शिकलो. माणसामध्ये जसे वेगवेगळे स्वभावधर्म आहेत, तसे हत्तींमध्येही राग, लोभ, मोह, माया, मत्सर, आनंद आणि भीती असे भाव असतात, हे लक्षात आले. मग...

# 1573: जे. एन. टाटांना विवेकानंदांचा मौलिक सल्ला. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 14.09.2024

Send us Fan Mail त्यावर विचार करत स्वामी विवेकानंद म्हणाले, "ठीक आहे, सर, या पोत्यांमध्ये जरी लोहयुक्त माती असली तरी, जर्मन लोक तुम्हाला सत्य सांगतील यावर तुमचा विश्वास आहे का?? तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही युरोपीय राष्ट्राला मजबूत/ पोलाद उत्पादनात श्रीमंत/ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र भारत पाहण्याची इच्छा नाही. ही माती बहुधा लोह-खनिजाने समृद्ध असेलही. परंतु दुर्दैवाने हे पण सत्य आहे...

# 1572: 'गौरीमाय' ला निरोप लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 13.09.2024

Send us Fan Mail "गौरी माय तू यायच्या आधीच आम्हाला शहाणं केलं होतंस..  त्यामुळे आम्ही  अन्न वाया  नाही घालवलं..  घरचे पण आनंदित झाले. हळूहळू   जमेल तसा थोडा थोडा बदल करत आहेत. रूढी ,परंपरा ,रीती ,रिवाज यांचे दडपण  आहे.  काय होतं आई खरं सांगू का ... बदल केला आणि काहीतरी विपरीत घडलं की वाटतं  आपण बदल केला म्हणूनच  हे असं झाल. लगेच मनात संशय येतो देवी  किंवा देव आपल्यावर  कोपला तर नसेल?"...

# 1571: "माझी गौरीमाय." लेखिका निता चंद्रकांत कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 13.09.2024

Send us Fan Mail गौरी माय म्हणाली, "पण खूप काम करून दमून नको जाऊस.....सण साजरा करताना त्यातला आनंद घ्यायला शिक.  आता लेकी बाळी नोकरी करणाऱ्या आहेत.  त्याचं घराची खरी लक्ष्मी आहेत हे विसरू नकोस... त्या आनंदात असतील तर घर सुखात असतं... हे केलंच पाहिजे.. ते केलंच पाहिजे... असं म्हणत बसू नकोस . काही बदल करताना मनात भीती नको ग  ठेवूस... माझ्यावर प्रेम करतेस ना मग  मला भ्यायचं कशाला ?"  

# 1570: देव नदीत बुडण्या पासून स्वतःला वाचवू शकतात का? (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 12.09.2024

Send us Fan Mail घरात काही चांगलं झालं की आईचं ठरलेलं वाक्य ‘देवाची कृपा’..! रागाच्या भरात त्यांनी देवघरातून सगळे देव उचलले आणि पिशवीत भरले.. भरकन गाडी काढली आणि एकटेच निघाले नदीच्या दिशेने...विसर्जन करायला. " बघू हिचे देव स्वतःचं तरी रक्षण करू शकतात का?नदीत बुडण्यापासून स्वतःला वाचवू शकतात का?" ते म्हणाले.

# 1569: असेही गौरी-पूजन '. लेखिका सौ सुजाता लेले. कथन( मीनल भडसावळे. ) 10.09.2024

Send us Fan Mail गौरी -पूजन आपल्या जिव्हाळ्याच. गणेशासोबत गौरीमाता घरी येते.नेहमीच्या आरासीबरोबर सरस्वतीमातेच्या बक्षिसांची आरास मांडण्याची एक नवीन कल्पना ह्या गोष्टीत मांडली आहे.

Listen to the Life of Stories podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.