Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Kids MR ↓ 2071 episodes

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Author

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Category

Kids

Latest episode

Jul 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

# 1618: "माझ्या गाडीला व्हॅनीला आईस्क्रीम आवडते." कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 06.11.2024

Send us Fan Mail पियाँटिक ह्या जनरल मोटर्सच्या शाखेला एके दिवशी एक तक्रार आली. माझ्या गाडीला व्हॅनिला आईसक्रीम आवडत नाही. इंजीनिअरने परत परत गाडी चेक केली, पण सगळे नीट होते. शेवटी त्याने कंपनीला कळवले की व्यक्तीने सांगितलेली तक्रार खरी आहे. आणि मग गाडीच्या इंजिनला गार करण्यासाठी लागणारे संशोधन सुरु झाले. .....

# 1617: आठवणींची पेटी : ‘बंब'. लेखिका : नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 04.11.2024

Send us Fan Mail  केवळ एक साधा बंब हा विषय पण त्यावर किती जणांकडून काय काय ऐकायला मिळाले...रेखाचा नवरा इतक्या गरीबीतून वर आला आहे  हे मला नव्यानेच कळले .तो इतका नम्र आणि साधा का याचेही कोडे उलगडले! तुमच्या घरी होता का बंब? तुम्हाला आली का कुठली आठवण?असेल तर मला जरूर  कळवा..

# 1614: इव्हेंट. लेखक:- स्वप्ना मुळे कथन:- (सौ. नीता दिनेश प्रभू.) 04.11.2024

Send us Fan Mail " फक्त आदर आदर ह्याच्या नावाखाली हे एकमेकांना प्रेमानं जवळ घेणं आपण विसरायला लागलो ते ह्या इव्हेंट मध्ये सापडलं ग मला ह्या लख्ख झालेल्या घंगाळा सारखं.क्षण जगून घ्यावा हा विचार आतमध्ये ह्या कमळाच्या पाकळ्यांसारखा उमलत गेला,..म्हणून मी आता ठरवलं आयुष्य इव्हेंट करून जगायचं अगदी सुंदर आणि आंनदी"

# 1616 : संगतीचा अलभ्य लाभ. लेखक डॉ. वर्षा तोडमल. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 03.11.2024

Send us Fan Mail साधूने बगळ्याच्या मनातील कपट जाणले आणि त्याच्या मुखातून सहज उद्गार बाहेर पडले  " घस घस घसी । और उपर डाले पानी ।।तुम्हारे मन मे जो कुछ है । वो हमने जानी ।।" राजाने विचार केला थोड्या वेळच्या संतसंगाने माझा प्राण वाचला जर निरंतर संतसंग केला तर काय होईल?

# 1615: मुक्ती. लेखक:- स्वाती नितीन ठोंबरे कथन :- (सौ नीता दिनेश प्रभू.) 02.11.2024

Send us Fan Mail "आता गुंत्यातून मोकळी हो… तू बावीस वर्षं सिंचलेलं संस्काराचं रोपटं छान फोफावलंय… आणि तुझ्या मुलींना आणि नवऱ्याला कवेत घेऊन भक्कमपणे उभं आहे, हे बघ आज… आणि निश्चिंतपणे मुक्त हो!”

# 1613: आगळी वेगळी दिवाळी, ले.सुजाता लेले, कथन: ( मीनल भडसावळे ) 31.10.2024

Send us Fan Mail ही गोष्ट आहे दुष्काळग्रस्त भागात  अन्नपाण्याअभावी झालेल्या परिस्थितीची .तिथे जाऊन मनू आणी तिच्या कुटुंबियांनी त्यांची दिवाळी साजरी केली, त्या लोकांना चार चांगले क्षण उपभोगायला दिले. तसेच त्या खडतर परिस्थितीत जगणाऱ्या कणखर लोकांच्या रूपाने मुलांना वास्तवाचे भान देणार्‍या कुटुंबाची आगळीवेगळी गोष्ट आहे.

#1612: कुठे थांबायचं हे नक्की झालं तो संतुष्ट. लेखक: अनामिक. कथन: (सौ. नीता दिनेश प्रभू.) 30.10.2024

Send us Fan Mail " आज जगात केवळ पैसा कमविण्यासाठी माणूस धडपडत आहे. कितीही पैसा कमवला तरी समाधान नाही. हाव कमी होत नाही.कमीच पडतो. या पैशा मागे लागून घर, झोप, नाती,प्रेम , मैत्री या साऱ्या गोष्टींना तो मुकत आहे. पैशाचा हव्यास संपत नाही.  या कलियुगात अशा समाधानी, अल्पसंतुष्ट माणसांचं दर्शन दुर्लभ झालेलं आहे."

1611: इमेज जपताना. लेखक:- सौ.विदुला जोगळेकर कथन:- (सौ. नीता दिनेश प्रभू.) 29.10.2024

Send us Fan Mail " प्रत्येक नात्यात तू उत्तमच आहेस...पण एक माणुस म्हणुन...तुझ्यातली स्त्री अत्यंत संवेदनशील, कर्तव्य तत्पर  आहे. तुझ्या देहबोलीतूनच तुझी इमेज  माझ्या मनात चढत्या आलेखात निर्माण झाली होती, त्याच्या कैकपटीने...तू प्रगल्भ आहेस. सन्मानित होणं आणि सन्मानित करणं..तुझ्याकडून शिकावं,सलामच तुला! ती प्रसन्न हसली.."

# 1610: निर्व्याज . लेखिका : धनश्री लेले कथन : (डॉ. गीतांजली राव ) 28.10.2024

Send us Fan Mail रस्त्याच्या बाजूला टोपलीत भाजी घेऊन विकायला बसलेल्या गरीब भाजीवालीशी एक दोन रुपयांची घासाघीस करणारे कारमधून ये जा करणारे श्रीमंत लोक, आपण अर्धपोटी राहून आपल्या समोरच्या कुत्र्याला आपल्यातली शिळी भाकरी देणारं भिकारणीचं शेंबडं पोर, काही निस्वार्थी लोक, आणि काहींच्या रुपात असलेली चालती बोलती देवस्थाने पाहू या कोण भेटतंय इथे...

# 1609: हरवणे, सापडणे. लेखिका : माधुरी ताम्हाणे देव. कथन : ( डॉ. गीतांजली राव ) 27.10.2024

Send us Fan Mail आतापर्यंत आपण आयुष्यात अनेकदा अनेक वस्तू, कागदपत्रे, माणसे अगदी नातीही हरवली असतील. त्यातल्या काही गोष्टी सापडल्याही असतील. हरवण्यासारखी एक साधी घटना आपल्याला किती विविध अनुभव देऊन जाते पहा! कधी कधी विचारांना एकदम वेगळी दिशाही मिळते. कशी ते पाहू या......

# 1608: डोंगर फोडून उभारला रस्ता! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 27.10.2024

Send us Fan Mail स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गुंडेगाव या गावातून इतर गावांना जोडणारा धड रस्ता नव्हता. सरकारी आश्वासने देखील हवेतच विरली. १९५७ ते १९९१ या काळात भापकर गुरुजी कोळेगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. तेव्हा त्यांना आपल्या गावामध्ये परत यायचे असलं तर तब्बल तीन गावे पायी पालथी घालण्याशिवाय गत्यंतर नव्हते. कारण गुंडेगावाच्या समोर संतोषा नावाचा भला थोरला डोंगर ठाण मांडून बसला होता. तो पार...

# 1607: हवेहवेसे पाहुणे...! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 25.10.2024

Send us Fan Mail अशीच एका जहाजातून निघालेल्या पारशी कुटुंबांची नौका गुजरातला नवसारी इथल्या किनाऱ्यावर येऊन पोहचली. तिथल्या राजा समोर त्यांना उभं करण्यात आलं. त्यांचा म्हातारा प्रमुख समोर आला. राजाला व त्याला एकमेकांची भाषा येत नव्हती. राजाने एक दुधाने काठोकाठ भरलेला पेला मागवला आणि त्या पर्शियन लोकांच्या प्रमुखाला सुचवलं की आमचा देश असा काठोकाठ भरलेला आहे आता आम्हाला आणखी माणसे नकोत. तेव्हा तो पार...

# 1606: हॅप्पी रिटायर्ड लाईफ...! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 25.10.2024

Send us Fan Mail "अगं म्हणजे कामवाल्या बाईचा interview  हे घेतात. विचार त्यांना".... अदिती  "अनिल तू घेतोस interview ?".... मी   "अरे it  is  a technique, how  to negotiate with  her "... अनिल सांगत होता.. “म्हणजे असं बघ. मी तिला विचारतो 'तू किती पैसे घेणार दर महिन्याचे'. मग ती म्हणते '७०० रुपये'. त्यात केर - लादी, सिंक मधील छोटी भांडी घासणे आणि आठ...

# 1605: आपले विचारच आपल्याला घडवतात...! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 23.10.2024

Send us Fan Mail अमेरिकेत एका कैद्याला मृत्युदंडाची शिक्षा द्यायची असते. त्याच्यासमोर एका पिसाळलेल्या कुत्र्याला विषारी इंजेक्शन देण्यात आले. तो कुत्रा तडफडून मरण पावला.  मृत्युदंडाच्या शिक्षेची वाट पाहणाऱ्या या कैद्यासमोरच हे सर्व घडत असल्याने त्याच्या मनात त्या इंजेक्शनचे विचार सुरू झाले.  त्यानंतर त्या कैद्याला तिथेच ग्लुकोजचे साधे इंजेक्शन दिले गेले. मात्र, दोन तासातच तो मृत्युमुखी पडला व पोस्...

# 1604: ह्रदयी धरा हा बोध खरा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 22.10.2024

Send us Fan Mail प्रमाणापेक्षा जास्त वजनाच्या लोकांना शरीर मूकपणाने परंतु टाहो फोडून सांगतेय की कशाला मला शरीराचे अतिरिक्त वजन उगीचच अहोरात्र उचलायला सांगताय! हृदयाला त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट करायची नाही असं केलं तरच आपल्या हृदयाचं आणि आपल्या आरोग्याचे रक्षण होईल. हृदय आयुष्यभर नृत्य करीत असते आणि त्या नृत्यात फक्त दोनच स्टेप असतात. एक आकुंचन आणि दुसरी शिथिलन! केवळ नृत्याच्या या दोन स्टेपमध्ये...

# 1603: देवदूत. लेखक : अज्ञात. कथन: (सौ. नीता दिनेश प्रभू.) 21.10.2024

Send us Fan Mail "झाकण निघालेल्या मैनहोल मधे कुणी पडू नये म्हणून भर पावसात पहाटे पासून उभा असलेला माणूस, रस्त्यावरच्या उन्हात कालनिर्णय विकणाऱ्या म्हाताऱ्याचा फायदा व्हावा म्हणून सगळे कालनिर्णय घेणारा परप्रांतीय, भिकाऱ्या साठी एक कप चहा काढून ठेवणारा चहावाला, कुणाचे तरी प्राण वाचावेत म्हणून रक्तदानाच्या रांगेत उभे असणारे नोकरदार, तरुण मुलांचे जीव वाचवण्यासाठी आपल्या शेतात  गुहेतील पाणी सांडू...

# 1602: अन्नपूर्णा. लेखक :कल्याणी पाठक. कथन : (सौ. नीता दिनेश प्रभू.) 20.10.2024

Send us Fan Mail " आत्ताच्या काळातल्या स्त्रिया स्वतंत्र आहेत, सुखी आहेत , चांगलं चुंगल खायला मिळत मग आता सवाष्णी ला आणि घरच्या पुरुष मंडळी ना गरमा गरम जेवण वाढून , स्वतः भुकेल्या राहून मग उरलेलं सगळ थंड जेवण संपवायचं हा अट्टाहास का? आपण अन्नपूर्णा आहोत च तर आपण ही आपल्या घरात लक्ष्मी सारखं जेवू या"

# 1601: गावकऱ्यांचा डाव. लेखक शेखर गायकवाड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 19.10.2024

Send us Fan Mail त्या काळामध्ये शाळा कमी होत्या . मुलांना शाळेसाठी दहा ते पंधरा किलोमीटर पायी जावे लागत असे. गावकऱ्यांनी  सदानंद गळ घातली  आणि त्याने आपल्या सव्वाशे एकर जमिनीपैकी 40 एकर जमीन 1991 मध्ये गावाला शाळा काढण्यासाठी म्हणून दान दिली. तब्बल 40 ते 50 वर्षे  मैदान आणि शाळेची इमारत एवढे वगळता 22 एकर जमीन पडीक  पडली.  त्या जागेवर नंतर ग्रामदैवतेची मोठी यात्रा भरू  लागली. गावात इंग्रजी माध्यमाच...

# 1600: आणि शब्दच मुके झाले. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 15.10.2024

Send us Fan Mail माजोरडी वाटून रागानेच म्हटले... " तो वडापाव मी  विकत घेऊन दिला होता, आणि तू कुत्र्याला घातला?" विश्वातील साऱ्या भावना कोळून प्यायल्याच्या शांततेत ती म्हणाली,_ "माझं एकच हाये, तिची चार चार पोरं भुकेली हायेती..."

# 1599: गरजवंताला अक्कल नसते. लेखक -अनामिक कथन : (डॉ. गीतांजली राव ) 13.10.2024

Send us Fan Mail लहानपणापासून आपण अनेक गोष्टी ऐकत आलो आहोत. प्रत्येक गोष्टीतून आपलं मनोरंजन झालं आहेच. शिवाय त्यातून काहीतरी नवीन कळलंय. आपल्या ज्ञानात भर पडली आहे. पण कर भरणे, आणि फटके खाण्यात वेळ घालवणे हे काय......!

# 1598: वेंकटरमणा... गोविंदा..!! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 12.10.2024

Send us Fan Mail ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रसाद आणि ट्रस्टी मनातल्या मनात विचार करत होते, “आम्ही काय गुन्हा केला आहे?” , “परमेश्वराने आमचा आक्रोश का नाकारला?” आता आपण जगाला आणि स्वतःला कोणता चेहरा दाखवू? इतक्यात श्री प्रसादांच्या कपाळावर पाण्याचे दोन-तीन थेंब पडले... घामाचे थेंब असावेत असा विचार करून ते मोठ्या निराशेने मंदिराकडे वाटचाल करत राहिले, पण तेवढ्यात आणखी पाच-सहा थेंब पडले. त्यांनी डोकं वर...

# 1597: "संपलं ग नवरात्र!" लेखिका : नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 11.10.2024

Send us Fan Mail "वाट बघणारी आई आहे तोपर्यंत भेटत जा ग तीला .." "खूप वेळा असं होतं की आपण आपल्याच विश्वात दंग राहतो.. आईला  गृहीतच धरतो..." आपल्याच पसाऱ्यात हरवुन जातो.  अगदी...घरी असूनही आईशी  निवांत बोलणं होतच  असं नाही....!

# 1596: दुरून डोंगर साजरे. लेखक डॉ. श्रीराम गीत. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 11.10.2024

Send us Fan Mail मुलांनी काही आगळावेगळा करायचं ठरवलं की अनेक कंगोरे टोकदारपणे समोर येतात. पायलट बनण्या मागचे वास्तव दाखवण्यासाठी हा खटाटोप.  “सारं खरंच छान चालले असले तरी पायलट बनवण्याच्या हट्टा पायी घर आणि देश तुटला हेच  खरे.  शिवाय बेकार असणाऱ्या कमर्शियल पायलट ची आकडेवारी लक्षात घेतल्यावर जाणवले ते म्हणजे हे क्षेत्र दुरून डोंगर साजरे असेच आहे.”  एका कमर्शियल  पायलटने आपला अनुभव सांगितला आहे. 

# 1595: आई आणि आईपण. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 09.10.2024

Send us Fan Mail बाळ जन्माला येतं आई सुटकेचा नि:श्वास सोडते. त्या जीवाच्या जन्मवेणा मात्र अजून संपलेल्या नसतात. नऊ महिने आईच्या गर्भातल्या पाण्यात, काळ्यामिट अंधारात तरंगणारा, आईच्या रक्तामासावर पोसलेला तो जीव त्या पाण्याबाहेर पडतो. पाण्यातून थेट हवेत.  काळ्यामिट अंधारातून भगभगीत उजेडात. आईच्या हृदयाची धडधड आणि गर्भाशयाची भिंत पार करून त्याच्या पर्यंत पोहोचणारा तिचा हलकासा आवाज इतकीच काय ती त्याची...

# 1594: एक सुंदर अनुभव - मनातल्या घरात लेखक - अज्ञात कथन ( डॉ. गीतांजली राव ) 08.10.2024

Send us Fan Mail मनाचा थांग आतापर्यंत कोणाला लागला आहे का? त्याचा वेग तर वाऱ्यापेक्षाही जास्त असतो. बहिणाबाईने मनाविषयी कितीतरी गोष्टी सांगून ठेवल्या आहेत आपल्या अभंग आणि ओव्यातून! अशा या मनाच्या घरात आपल्याला शिरायला मिळालं तर....!

Listen to the Life of Stories podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.