Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Kids MR ↓ 2071 episodes

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Author

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Category

Kids

Latest episode

Jul 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

# 1643: डायरी माझी सखी. लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 29.12.2024

Send us Fan Mail काही वर्षांपूर्वी आकाराने जरा मोठी  अशी एक सुरेख डायरी मला मिळाली. मनात आलं या डायरीचा आपण काहीतरी वेगळा उपयोग करावा...  काय करावं ते मात्र सुचत नव्हतं. जानेवारी संपत आला तरी डायरी कोरी होती.  " सखे "...  ही फार सुरेख कविता  माझ्या पहिल्यांदाच  वाचनात आली.  " सखे.. तु दिलेल चांदण  माझ्या पडशीमध्ये तुडुंब आहे.."  आणि त्या दिवशी डायरीचा श्री गणेशा झाला.....! कुसु...

# 1642: "हर फिक्र को धुएँ मे उडता चला गया।" लेखक : पराग गोडबोले. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 29.12.2024

Send us Fan Mail खरं  सांगतो,   ' हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया ' या गाण्याचं जाम गारुड होतं माझ्यावर, शाळेत असताना.  मग मोठा झाल्यावर विल्स हाती धरली आणि पहिला झुरका घेतला. सगळ्यांना लागतो तसा ठसका वगैरे नाही लागला मला, उलट छान वाटलं. नवं काहीतरी थ्रिल !!! हळुहळू, आवडीचं रूपांतर  व्यसनात झालं. काही काळाने खोकला सुरू झाला.  प्रत्येक सिगरेट नंतर एक अपराधी भावना मनाला डंख करायची. .....

# 1641: "आयुष्य व्यापणारी मैत्री." लेखक अविनाश दिगंबर धर्माधिकारी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 27.12.2024

Send us Fan Mail " माझी  अमेरिकेतली गोरी मैत्रीण म्हणजे ‘ॲने’. अमेरिकन समाजात वागण्याच्या पद्धती मला तिच्यामुळे कळल्या. माझ्याशी झालेली मैत्री आणि ‘ॲने’ने माझ्या पुरतीच ठेवली नाही. माझ्या पत्नी बरोबरही तिचे तेवढेच जवळिकेचे  नाते होते. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता तिच्या बरोबर झालेली मैत्री ही आयुष्य व्यापणारी  आणि अविस्मरणीय  अनुभव देणारी ठरली." 

# 1640: गुरू नेहमी आपल्या आसपास असतात. कथन ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 26.12.2024

Send us Fan Mail चित्रकार म्हणाला, "स्वामीजी, तुमच्या पण संपूर्ण प्रवचना दरम्यान मला दिव्यप्रभा असलेला हा चेहरा तुमच्या मागे दिसत होता. म्हणूनच तो कागदावर उतरवला." चित्रकाराचे उत्तर ऐकताच स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यांत अश्रू दाटले.  "अतिशय भाग्यवान आहेस तू! तुझ्या ह्या डोळ्यांनी तू माझे गुरुदेव, साक्षात स्वामी श्री रामकृष्ण परमहंस यांचे दर्शन घेतलेस. माझ्या प्रत्येक प्रवचनात ते माझ...

#1639: त्रिकोणी मिथक : बर्म्युडा ट्रँगल. लेखक : एल के कुलकर्णी. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 25.12.2024

Send us Fan Mail या जगात गुढ, रहस्यमय असे काहीतरी कुठेतरी असावे असे अनेकांना वाटत असते. बर्म्युडा त्रिकोण ही त्यातूनच पुढे आलेली कल्पना!

# 1638: त्यांच्या मनात मी जिवंत असेन..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 25.12.2024

Send us Fan Mail खूप दिवसातून मी त्यांना भेटत होतो....  मला बघितल्यावर मग, हात वारे करून माझ्याशी त्या हक्काने कचकचून भांडायला लागल्या...!  "आमी काय मरायचं का ? तू काय सोताच्या मनाचा मालक हाय का ? तुला काय लाज हाय का ?" वगैरे वगैरे... शंभर गोष्टी त्यांनी मला सुनावल्या... !  "माझा डावा हात अजूनही नीट उचलत नाही.... तरीही मी मोटरसायकल चालवत गेलो होतो.... !  उजवा हात माझ्या डाव्या छातीव...

# 1637: नववर्षाच स्वागत, लेखिका सुजाता लेले. कथन ( मीनल भडसावळे ) 23.12.2024

Send us Fan Mail नववर्षाच्या सुरुवातीला आपण संकल्प करतो. कधी तडीस जातात पण. असाच सकाळी लौकर उठून फिरायला जाण्याचा संकल्प केलेल्या मुलीची, तिच्या आज्जीची गोष्ट आहे. त्यातून व्यायामाचे महत्व सहजरित्या सांगितले गेले आहे.

# 1636: कन्या जन्माचा हरित सोहळा! लेखक : शैलेश चव्हाण. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 23.12.2024

Send us Fan Mail राजस्थान म्हटलं की स्त्री भ्रूणहत्या आणि त्यामुळे या राज्यातील मुलींचं घटते  प्रमाण हेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभा राहते. मात्र याच राज्यातील पिपलांत्री या छोट्याशा गावानं मुलीच्या  जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी दरवेळी 111 रोप लावून त्यांची जोपासना करण्याचा वसा अंगीकारला. मुलींच्या  सन्मानासह पर्यावरण संरक्षणाचे मुलाचं कार्य हे गाव सन 2005 पासून सातत्याने करत आहे.

# 1635: बलवत्तर नशिबाचे रडतराव लेखक डॉ. कैलास दौंड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 21.12.2024

Send us Fan Mail काहींचे नशीब असे बलवत्तर असते की त्यांना सतत काही ना काही  कारणाने यश  मिळतच जाते. लोकांना अवघड वाटणारी कामे यांच्याकडून अनावधानाने सहजपणे होऊन जातात. त्यामुळे पाहणारे लोक देखील आश्चर्यचकित होतात. मात्र "हे का आश्चर्यचकित झाले आहेत?" हे संबंधितांना कळत सुद्धा नाही!   अशीच एक लहानपणी ऐकलेली मजेशीर गोष्ट! 

#1634: कंटाळलात? मग आनंद माना! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 15.12.2024

Send us Fan Mail ‘मला कंटाळा आला आहे’ किंवा ‘मला काहीही करायचे नाही’ हे वाक्य आपल्यापैकी बरेच जण रोज ऐकतात किंवा आपण ते स्वतःच वापरतो. मात्र, एखादी गोष्ट कंटाळवाणी कशामुळे होते, याचा कधी विचार केलाय? त्याची असंख्य कारणे आहेत. सध्या आपल्याला सतत काही तरी सांगायची किंवा एखाद्या गोष्टीवर व्यक्त होण्याची सवय आहे. एक मिनिट जरी काही केले नाही, तरी आपल्याला कंटाळा येतो आणि कंटाळा येऊ नये, म्हणून जे काही...

# 1633: रद्दीवाला. लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 15.12.2024

Send us Fan Mail  रघू तसा बुद्धीनं यथातथाच. पण धंद्यात डोकं भारी चालायचं. कुठली रद्दी आहे, कुठल्या रद्दीला सेकंडमधे सोन्याचा भाव आहे, हे त्याला बरोबर कळायचं. कसाबसा बारावीपर्यंत शिकला. आन् धंद्याला लागला. वर्षभरात गणूकाका गेले,  अन् रघूचा रघूशेट झाला. तसाच हसमुखराय चेहरा. गोडबोल्या स्वभाव. ईलेट्राॅनिक काट्यावर अचूक वजन करायचा. चोख भाव. हिशोबाला पक्का. दुकानाबाहेर वाचणेबल पुस्तकं , मासिकांचं प्रदर्...

# 1632 : "वाटा सहजीवनाच्या". लेखिका स्वाती पाटील. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 09.12.2024

Send us Fan Mail एकमेकांना समजून घेणे ही सहजीवनातली अपेक्षा असते. आई-बाबांचं एकमेकांशी निःशब्द समांतर सहजीवन असो किंवा विन्सेट वॉन गॉग व त्याचा भाऊ थिओ यांचे एकमेकांशी हळवे बंध असो, कोणत्याही दोन व्यक्तींमधील सहजीवनाच्या वाटा निरनिराळ्या असतात हेच खरे!

# 1631: श्रीक्षेत्र जेजुरी आणि कडेपठार. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 09.12.2024

Send us Fan Mail जेजुरगडाच्या मागे उंच डोंगरावर असलेलं कडेपठार  हे खंडोबाचं मूळ स्थान आहे, याची माहिती फारशी नसते. जेजुरीचं दर्शन घेऊन आल्याचं सांगणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर ‘कडेपठारचं मूळ स्थान पाहिलं का’, असं विचारल्यावर मात्र ‘हे काय नवीन,’ अशी भावना दिसते. त्यामुळं जेजुरीला जाणाऱ्या भक्तांनी खंडोबाचं हे मूळ ठिकाण पाहायलाचं हवं. जेजुरीपेक्षा इथं पोहोचणे थोडं खडतर असलं, वाट थोडी अवघड असली, तरी...

# 1630 : "लाडकी बाहुली माझी माझी म्हणूनी" लेखिका : बागेश्री . कवयित्री : इंदिरा संत . कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 08.12.2024

Send us Fan Mail "आपलं लाडकं माणूस ,जे कदाचित आपल्यापेक्षा जरा दुबळं आहे, जे फार व्यक्त होऊ शकत नाही.. कुठे हरवलं तर घरी परतू शकत नाही; अशा त्या माणसाला शोधायला  आपणच निघायला हवं हे रुजलं. पण अशावेळी एखादवेळी आपल्यावरही  पावसाळी मर्यादा येऊन पडतात, तेव्हा संयम अंगी बाणवत उघड पडेपर्यंत तग धरायची असते... हे ही समजलं." 

#1629 : हिंदी महासागरात आहे "ग्रॅविटी होल". ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 03.12.2024

Send us Fan Mail अभ्यासात असे आढळून आले आहे की त्याच्या निर्मितीमागील टेथिस समुद्र हे आता नामशेष झाले आहे. टेथिस समुद्राच्या मृत्यूनंतर हिंद महासागराचे रहस्यमय गुरुत्वाकर्षण छिद्र तयार झाल्याचे शास्त्रशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. टेथिस समुद्र एकेकाळी पृथ्वीच्या कवचाचा भाग होता, परंतु 180 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवरील गोंडवाना या प्रदेशाच्या विघटनादरम्यान तो युरेशियन प्लेटच्या खाली गाडला गेला होता....

#1628 : कालभैरवाची कथा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 28.11.2024

Send us Fan Mail एकदा स्वर्गलोकांत ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांचे आपापसात श्रेष्ठ कोण यावरून कडाक्याचे भांडण जुंपले. तत्पूर्वी ब्रह्मदेवाला पाच शिरे होती. या दोघांच्या वादावर शंकरांनी तोडगा काढावा आणि निर्णय घ्यावा, तसेच दोन्ही देवांत ब्रह्मरूप कोणाचे हाही वाद उद्भवला. तेव्हा देवऋषी नारदांनी दोन्ही देवांना बदरीकाश्रमांत जाऊन तेथील महामुनींची भेट घेऊन या शंकेचे निरसन व्हावे यासाठी पाठविले. परंतु श...

#1626 : अमेरिकेतील आव्हानात्मक पहिला प्रवास. अंजली भडसावळे यांची मुलाखत. ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 25.11.2024

Send us Fan Mail लग्नानंतर आठ महिन्यांनी अंजलीचा भारतातून अमेरिकेमधे झालेला प्रवास खूप अडथळ्यांचा होता.  21 तासात पूर्ण होणाऱ्या प्रवासासाठी तिला तीन दिवस लागले. ह्या प्रवासात तिला माणुसकीचे अनोखे दर्शन घडले.  ऐकूया तिच्या शब्दात तिचा तो 41 वर्षापूर्वीचा परंतु अजूनही ताजा असलेला अनुभव.

#1627 : आभाळाचं ह्रदय असलेला उद्योजक. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 25.11.2024

Send us Fan Mail आम्ही सर्व उद्योजक आहोत. आम्ही अशी अनेक मशीन्स बघितली आहेत. तेथे गेलो होतो ,त्याला कारण म्हणजे त्या कारखान्याचे वेगळेपण पाहायचे होते. कारण तेथे एकंदर सव्वादोनशे कामगारांपैकी जवळजवळ पासष्ट कामगार गतिमंद होते. त्यांतील काही तर मतिमंद म्हणता येतील असे होते आणि तेच सुभाष चुत्तर यांच्या कारखान्याचे वैशिष्ट्य होते. व्यवस्थापकांनी आम्हाला असेम्ब्ली सेक्शन दाखवला. तेथे ‘फोर्स’ मोटरच्या गा...

#1625 : उजवा की डावा हात? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 19.11.2024

Send us Fan Mail तुम्ही तुमचा सकाळचा कॉफीचा मग कसा उचलता, डाव्या हाताने की उजव्या? आपण अगदी यांत्रिकपणे करतो ही क्रिया.. पण तरीही, कोणी न कोणी हे ठरवत असेलच ना..? मग कोण बरं ठरवतं हे? आजकाल कसं, सगळं अगदी जेनेटिक लेव्हल पर्यंत पाहिलं आणि तपासलं जातं. मग तुमचे जीन्स किती प्रमाणात हे सगळं म्हणजे, डावखुरेपण वगैरे ठरवतात याचा विचारही होऊच शकतो.

#1624 : कालबाह्यतेचा सापळा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 17.11.2024

Send us Fan Mail आपल्या लहानपणी पेनमधील शाई संपली की नवी रिफील घ्यायची प्रथा होती. आता तो पेन कचऱ्यात फेकून नवा पेन घ्यायची प्रथा रुजली आहे. आज ही मी जेव्हा पेन च्या रिफिलचा शोध घेत फिरतो तर बहूतांश पेनच्या रिफीलच मिळत नाहीत. कारण तेच. मग दुप्पट किंमतीला विकले जाणारे नवे पेन कोण विकत घेईल ? या "नियोजित अप्रचलन" नावाच्या विकृत व्यापार फंड्यामूळेच..  ‘वापरा आणि फेका’ ... नावाचा 'भस्मा...

#1623: गिरनार परिक्रमा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 16.11.2024

Send us Fan Mail भवनाथ म्हणजे तलेटी, येथील दुधेश्वर शिवमंदिरापासून प्रदक्षिणेला सुरूवात करतात. गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे गिरनारच्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही; फक्त या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस सर्वांसाठी प्...

# 1622: म्हणून पृथ्वीच्या फिरण्याचा वेग झाला कमी? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 12.11.2024

Send us Fan Mail जेव्हा थ्री गॉर्जेस धरण बांधले गेले तेव्हा यांग्त्झी नदीचे  42 बिलियन टन पाणी त्या धरणाच्या मागे समुद्रसपाटीपासून 175 मीटरपर्यंत अडवले गेले. यामुळे पृथ्वीचा जडत्वाचा क्षण थोडासा बदलला, ज्यामुळे पृथ्वीचं रोटेशन अधिक हळू होतंय. पृथ्वीचे परिभ्रमण कमी झाल्यामुळे, एका दिवसाची वेळ 0.06 मायक्रोसेकंदने वाढली आहे. म्हणजेच दिवस आता काही क्षणांनी मोठा झाला आहे. थ्री गॅार्ज डॅमच्या बांधकामामु...

# 1621: जनुकांचे नियंत्रण करणारी बटणं. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 08.11.2024

Send us Fan Mail प्रश्न असा येतो की मेंदू काय, हृदय काय, यकृत काय... सगळ्यांकडे जनुकांचा तोच वारसा असतो. मग ते नियमित नाही तरी अडअडचणींत तरी एकमेकांची काम का करू शकत नाहीत? आणि तसंच पाहिलं तर नियमितपणेही ते आपलं वेगळेपण कसं काय टिकवून ठेवतात? हे कोडं वैज्ञानिकांना कित्येक वर्षं सतावत आहे. त्याचं एक उत्तर शोधून काढणाऱ्या व्हिक्टर अँम्ब्रोज आणि गॅरी रुव्हकून या दुकलीला यंदाच्या वैद्यकीय नोबेल पुरस्क...

# 1620: ‘रंग बदलू‘ मंडळी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 08.11.2024

Send us Fan Mail जगात प्रत्येक जीवाकडे आपली अशी एक खास कला असते. या कलेच्या माध्यमातून ते त्यांचं जीवन सुरक्षितपणे जगत असतात. असंच हे एक खास गिफ्ट सरड्यांना निसर्गाकडून मिळालं आहे. असं मानलं जातं की, सुरक्षेनुसार सरडे त्यांचा रंग बदलतात. शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी सरडे जिथे बसलेले असतात, आपोआप ते त्या रंगात स्वत:ला सामावून घेतात. सरडे त्यांचा रंग बदलून स्वत:चा बचाव करतात. सरडे आपलं पोट भरण्यासाठी...

1619: ‘आपली राष्ट्रीय दांभिकता.' कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 06.11.2024

Send us Fan Mail देशाच्या प्रगतीचे मापन करायचे झाले तर नागरिक काय लायकीचे  काय लायकीचे आहेत या निकषावर करायला हवे. पाहता आपल्या नागरिकांचे सार्वजनिक उद्योग? रात्री दोन वाजता ढिनच्यॅक ढिनच्यॅक संगीत गाडीत वाजवत गल्ल्यांतून फिरणारे,  गाडीचा दरवाजा उघडून ओकल्यासारखे तंबाखू थुंकणारे,  ऐतिहासिक इमारतींवर स्वत:चे आणि स्वत:च्या टिनपाट मैत्रिणीचे नाव कोरणारे,  कोणी बघत नाही म्हणून सार्वजनिक शौचालयाचा वापर...

Listen to the Life of Stories podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.