Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Author
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Category
Podcast website
Latest episode
Jul 7, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
# 1669: व्हॅलेंटाईन डे ची जन्मकथा. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 04.02.2025 6:52
Send us Fan Mail रोमचा सम्राट 'क्लॉडियस दुसरा' हा एक महत्त्वाकांक्षी, युद्धप्रिय आणि निर्दयी शासक होता. एक दिवस, त्याने एक कठोर फर्मान जारी केलं – "रोममधील कोणताही तरुण सैनिक लग्न करू शकणार नाही!" सेंट व्हॅलेंटाइन राज आज्ञेचं उल्लंघन करून तरुणांचे विवाह लावत असे. त्याला १४ फेब्रुवारी रोजी मृत्युदंड झाला. लोकांमार्फत ...."तुझा व्हॅलेंटाइन" – हा संदेश जगभर पोहोचला. ...
# 1668: "असाही व्हॅलेंटाईन डे". लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 03.02.2025 5:32
Send us Fan Mail "बाबा गेल्यानंतर आता हे रात्री स्तोत्र म्हणणं आईने का सुरू केलं आहे... हे कळत नाही..." मुलगा म्हणाला. ती आज थोडी हळवी झाली होती . पण मनाने त्यांच्याशी गप्पा झाल्याने तृप्त समाधानी होती. त्यानी बोललेले शब्द अंतःकरणापासून म्हटलेले निखळ.. सच्चे होते. त्यात सहज असं प्रेम होतं. त्यामुळेच हृदयाच्या खोल कप्प्यात तिने ते शब्द जपून ठेवले होते. नाहीतरी भाळणं काही दिवसांचं अ...
# 1667: शंखशक्ती नमोऽस्तुते. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 01.02.2025 10:41
Send us Fan Mail महाभारतकालीन प्रत्येक महापुरुषाकडे त्याचा वैशिष्ट्यपूर्ण शंख होता व कुरुक्षेत्रात तो वाजवलाही जात होता. श्रीकृष्णाचा पांचजन्य, पांडवांपैकी अर्जुनाचा देवदत्त, भीमाचा पौंड्र, धर्मराज युधिष्ठिराचा अनंतविजय, नकुलाचा सुघोष आणि सहदेवाचा मणिपुष्पक शंख होता. गीतेतच पितामह भीष्म यांच्याही शंखाचा उल्लेख आढळतो. त्यांनी जेव्हा कुरुक्षेत्रावर शंखनाद केला, तेव्हा सिंहगर्जनेसारखा मोठा आवाज झाला...
# 1666: सुटली शाळा . कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 31.01.2025 6:38
Send us Fan Mail खरंच किती सोप्पं होतं आयुष्य तेव्हा... जसं जसं वय वाढू लागलं तसं तसं गणिताची आकडेमोड हातापायांच्या बोटांत मावेनाशी झाली. इतिहासातली सनावळ ही भुतावळीसारखी मानेवर बसली होती... पण आज जेव्हा शाळेचा हात सुटला तेव्हा माझ्या सोबत माझे जिवाभावाचे मित्र होते. माझा आत्मविश्वास होता, डोळ्यात उद्याची स्वप्ने होती, कुठल्याही परिस्थितीत मला सावरणारी संस्काराची शिदोरी होती... आणि मनांत कधीह...
# 1665: लोखंडी कपाट. लेखन : नीता चं कुलकर्णी. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 30.01.2025 5:47
Send us Fan Mail पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वी एकंदरीत सर्वच समाज साधा मध्यमवर्गीय असा होता. घरं बैठी साधी लहान लहान दोन- तीन खोल्यांची असायची. घरातलं सगळ्यांत मुख्य एकमेव फर्निचर म्हणजे... "लोखंडी कॉट" असायची. ईतके जणं असुनही घरात एकचं लोखंडी कपाट असायचे. ज्याला सगळेच " गोदरेजचे कपाट "म्हणतं असत......
# 1664: British Empire medal विजेते उदय भोसले यांची मुलाखत : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 30.01.2025 9:44
Send us Fan Mail योगामुळे जागतिक सन्मान: उदय भोसले यांची कहाणी योगाचार्य डॉक्टर अय्यंगार गुरुजींचे शिष्य उदय भोसले यांनी कोविड काळात योगाच्या प्रसाराद्वारे जगभरातील हजारो लोकांना आरोग्य आणि मानसिक शांतता प्रदान केली. ऑनलाईन वर्ग आणि उपचार पद्धतींनी त्यांनी अनेकांचे जीवन सुखकर केले. या कार्याचा गौरव म्हणून Her Majesty Queen Elizabeth’s Honour List मधून त्यांना British Empire Medal (B.E.M.) प्रदान...
# 1663: जर्मनीतील वंशसंहार ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 25.01.2025 10:19
Send us Fan Mail युद्धकाळात जर्मनी व पोलंड या देशांत ‘श्रमछावणी’ या गोंडस नावाखाली छळछावण्या सुरू झाल्या. हिटलरचा निकटवर्ती हायरिश हिमलर याच्या आदेशानुसार ऑस्वीसिममध्ये सुरू झालेला अॅाशविट्ज हा सगळ्यांत कुख्यात ‘कॉन्सन्ट्रेशन कॅम्प’ म्हणजे छळछावणी. सन १९४०पासून येथे रोज हजारो अभागी लोक रेल्वेत कोंबून आणले जात असत. त्यांना निकृष्ट अन्नपाणी देऊन कामाला जुंपण्यात येई. ही तरुण मुलं अफाट कष्टांमुळे आणि...
# 1661: "या हनुमंतजी, स्थानापन्न व्हा..!" ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 23.01.2025 7:46
Send us Fan Mail त्याला वाटलं की हे महाराज रोज "या हनुमानजी स्थानापन्न व्हा" असं म्हणतात खरं पण काय खरंच हनुमानजी येत असतील ! हा असा विचार करता करता या वकिलाने त्या संताला शेवटी विचारलंच, "महाराज, तुम्ही रामायण खूप सुंदर सांगता. तुमच्या प्रवचनामुळे मनाला खूप आनंद मिळतो पण तुम्ही दररोज एक आसन हनुमानजींसाठी ठेवता आणि त्यावर त्यांना बसायला सांगता. मला एक सांगा, त्यावर खरंच हनुमानजी येऊ...
# 1660: संक्रांतीचा हलवा. लेखिका सुजाता लेले. कथन ( मीनल भडसावळे ) 22.01.2025 4:11
Send us Fan Mail छोटे छोटे समारंभ आपण करत असतो. त्याप्रमाणे एक तिळगूळ कार्यक्रम असतो. आई मुलीबरोबर बाकी घरातल्या महिलांबरोबर तयारी करते. छोट्या मुलीच्या मनात मैत्रिणीबद्दल द्वेष असतो. त्याचे परिवर्तन हलवा म्हणुन खडे -मीठ देण्यात होते. त्यानंतर सर्वांनी मिळून त्या मुलीला जी शिकवणूक दिली त्याची ही गोष्ट आहे. आजकालच्या स्पर्धेच्या युगात लहानपणापासून ही शिकवण आवश्यक आहे.
1659: "Outsourcing हा रोग आहे." लेखक डॉ. उदय निरगुडकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 21.01.2025 9:03
Send us Fan Mail धोका हा की ही outsourcing ही मानसिकता कुटुंबात पण आली आहे. पोळ्या बनवणे ,गाडी चालविणे आम्ही outsource करतो. ठिक आहे. पण मुलाला संस्कार करण्यासाठी आम्ही व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात पाठवतो म्हणजे आमची जबाबदारी संपली. एकदा मत दिले की पुढील पाच वर्षे राष्ट्र मोठे करायची जबाबदारी आम्ही राज्यकर्त्यांवर outsource करतो. देश सशक्त म्हणजे नागरीक सशक्त...
# 1658: "ओळखले, रामाचे चैतन्य रूप ओळखले." कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 20.01.2025 5:37
Send us Fan Mail दिवस जातात, आठवडे सरतात, तरीही राम त्याला प्रसन्न होत नाहीत. तो निराश होवून रामाची मूर्ती कोनाड्यातून काढून वरच्या फळीवर ठेवतो. बाजारातून कृष्णाची एक नवीन मूर्ती आणतो. पूजा, अर्चा, फुले, फळे, उदबत्ती, दिवा—सगळं सुरू ठेवतो. पण त्याला वाटू लागते, "रामाला फळीवर ठेवलं असलं तरी या उदबत्तीचाच्या वासाचा आनंद त्याने घेऊ नये. कारण तो मला प्रसन्न झाला नाही." .....
# 1657: "तो सर्व जाणतो" कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 17.01.2025 2:50
Send us Fan Mail त्याने सगळं नुकसान भरून दिलं आणि विनम्रणे माफीही मागितली. त्याला विचारले, ‘‘तुम्हाला माझ्य गाडीला धडक देताना कोणी पाहिलं नव्हतं. तुम्ही आपणहून कबुल कसं काय केलंत?’’ त्यावर तो शांतपणे म्हणाला, ‘‘कोणी पाहिलं नसलं तरी भगवंत सगळं पाहत असतो. रोज पहाटे मंदिरात दर्शनासाठी जातो, माझ्यात जर एवढाही प्रामाणिकपणा नसेल, तर माझ्यासारख्या नालायक माणसाला तिथं जाण्याचा काय अधिकार आहे?’’
# 1656: मुखवटा. लेखक:- ज्योती रानडे कथन:- (सौ. नीता दिनेश प्रभू.) 17.01.2025 8:52
Send us Fan Mail "घरातला प्रॉब्लेम कसा निर्माण झाला, कोण चुकल कोण बरोबर , वर्चस्व, चढाओढ, अबोला, धुसफूस अस करण्यापेक्षा आपण तो प्रॉब्लेम सोडवण्या साठी काय केलं त्या बद्दल बोलू म्हणजे एकमेकांना मदत होईल. घरातल्या स्त्रिया एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या की घराचं नंदनवन व्हायला वेळ लागत नाही"
#1655: एका आईच्या तिच्या स्वप्नांच्या पाठलागाची स्फूर्तिदायक कथा ! सौ.अश्विनी बराले यांची मुलाखत. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 15.01.2025 10:00
Send us Fan Mail 1990 च्या दशकामध्ये 35 वर्षाची, सौ अश्विनी बराले, आपल्या दोन मुलांना घेऊन अमेरिकेत गेली. गिफ्टेड मुलांच्या शाळेत शिकल्यामुळे मुलांवर वैचारिक वेगळे संस्कार झाले. मुले सक्षम झाल्यावर मुलासह त्या भारतामध्ये आपल्या यजमानांसह राहण्यासाठी शेतावर परतल्या. त्यांचा हा अमेरिकेतला प्रवास मोठा रोमांचक होता. त्याविषयी ऐकूया त्यांच्याच शब्दांमध्ये..
# 1654: मन रिचार्ज रिचार्ज. लेखक:- अनामिक कथन:- (सौ. नीता दिनेश प्रभू.) 14.01.2025 8:23
Send us Fan Mail "मोबाईलच्या युगात आपण सतत धडपडत असतो त्याला चार्ज करून ठेवण्यासाठी, मोबाईल चार्ज नसेल तर जीव वरखाली होतो. आजच्या धावपळीच्या काळात नकळत आपण स्वतःला विसरत जातोय, जवळच्या माणसांची भेट घेत नाही, संवाद दुर्मिळ होत चालला आहे..अशा वेळी जस आपल्या मोबाईल ला चार्ज करतो तसे अधून मधून ठरवून मोबाईल ला बाजूला ठेवून स्वतःला आणि सोबत आपल्या जवळच्या माणसासोबत वेळ घालवून एकमेकांना चार्ज करत रा...
# 1653: गरुड भरारी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 09.01.2025 9:47
Send us Fan Mail गरुडांचा जेंव्हा प्रजननाचा काळ जवळ येतो तेंव्हा अनेक नर गरूड मादीभोवती जमा होतात. त्यातून बरा दिसणारा नर, मादी निवडते आणि त्याला अंतिम निवड प्रक्रियेसाठी आवतण देते. परीक्षा सुरू होते. मादी स्वत:च्या चोचीत एक काडी धरते नि आकाशात उंच उंच उडत जाते. नराने तिच्यामागून उडत जायचे, पण तिच्यापेक्षा वर जायचे नाही. खालच्या पातळीवर राहून सगळे लक्ष मादीवर केंद्रित करायचे. मादी केंव्हाही तोंड...
# 1652 : "तो प्रवास सुंदर होता." लेखक : डॉ. नंदू मुलमुले. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 08.01.2025 7:57
Send us Fan Mail 67 वर्षांच्या सविताताईंनी महाविद्यालयात BA ला प्रवेश घेतला. " आजी हळू उठा, हाड मोडेल " पासून सुरू झालेला कॉलेज मधील प्रवास संपेपर्यंत त्या मुलांच्यातल्याच होऊन गेल्या. "आयुष्यात काय मिळवायचे?" ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या बरोबर शिकणाऱ्या तरुण मुलांना शोधण्यास प्रवृत्त करुन गेल्या!"
# 1651: "बोलणं शिकावं लागतं आयुष्यभर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 07.01.2025 6:14
Send us Fan Mail "शब्द जगलेल्या माणसाचा शब्दांचा उच्चार ज्या ताकदीने येतो त्यावरून त्याचा खरेपणा ओळखता येतो. बोलण्याचा आवाज हा आतून येतो! माणसाच्या चेतनेला स्पर्श करून!" "त्यामुळे शेवटी माणूस म्हणून आपण जितके घडत जातो, तितका आवाजही सुंदर होत जातो. .....बाकी हा जगण्याचा प्रवास अवघड आहे. शेजारी कोणी बोलणारं मिळालं, की प्रवास सोपा होतो!"
# 1650: "भोसला मिलिटरी स्कूल, नाशिक येथील कोदंडधारी श्रीराम" कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 06.01.2025 4:20
Send us Fan Mail भोसला मिलिटरी स्कूलमधील ही रामाची मूर्ती अत्यंत खास आहे. सामान्यतः रामाच्या मूर्तीमध्ये सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची साथ दाखवली जाते. पण या मूर्तीत एकटे कोदंडधारी श्रीराम शौर्यपूर्ण मुद्रेत उभे आहेत. श्रीरामाची ही अशी एकमेव एकटयाची कोदंडधारी मूर्ती आहे ..!! म्हणून भोसलाच्या विद्यार्थ्यांना 'रामदंडी' म्हणतात ..!! ही राममूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकार श्री सदाशिव साठे य...
# 1649: रामनामाचे अभेद्य कवच. ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 05.01.2025 9:01
Send us Fan Mail दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्र, गुरू विश्वामित्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, मंत्रीगण आणि अयोध्यावासी शरयू नदी किनारी जमले. वीर हनुमान शांतपणे बसून रामनाम जपत होते. प्रभू रामचंद्रांनी जड अंतःकरणाने धनुष्य उचलले. गुरू विश्वामित्र यांच्या परवानगीने परम भक्त हनुमानावर बाण सोडला. रामबाण तर सुटला, परंतु त्याच क्षणी काही अद्भुत घडले. . रामबाण हनुमानाजवळ पोहोचला परंतु रामनामाच्या अभेद्...
# 1648: "राजा रविवर्मा यांना कशी लाभली मॉडेल "सुगंधाबाई?". लेखक : रणजीत देसाई. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 04.01.2025 13:23
Send us Fan Mail राजा रविवर्मा सुगंधा बाईंना म्हणाले, "बाईसाहेब, मी एका श्रीमंत घराण्यात, वेदपठण, कथाकीर्तन ऐकत मी वाढलो. त्यामुळं नलदमयंती, हंस-दमयंती, सैरंध्री, द्रौपदी, ही सारी रूपं माझ्या मनात रेंगाळत होती." "पण ती द्रौपदी, ती सीता, ती लक्ष्मी, ती सरस्वती मी आणू कुठून?" "ह्या देवता होण्याचे सामर्थ्य देवानं तुमच्या रूपाला दिलेलं आहे. तुम्ही मला साहाय्य केलं तर, दे...
# 1647: एक पाऊल मातीसाठी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 02.01.2025 8:08
Send us Fan Mail जेव्हा युरोपियन-अमेरिकन स्थायिकांनी आयोवामध्ये पहिल्यांदा नांगरणी सुरू केली तेव्हा त्यांना आढळलं की हवामान आणि स्थानिक जमिनीच्या प्रकाराने इथे या सेंद्रिय पालापाचोळ्याची, वाळू आणि गाळ एकत्र होऊन चिकणमाती नावाची पौष्टिक, समृद्ध अशी माती तयार झाली आहे. यामुळे आयोवाला पृथ्वीवरील सर्वात सुपीक मातींपैकी एक असलेली माती मिळाली, आणि तिने गेल्या 160 वर्षांमध्ये युनायटेड स्टेट्समधील आयोवाला...
# 1646: डॉ विनय कोपरकरांची गोष्ट. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 01.01.2025 7:37
Send us Fan Mail डॉक्टरांच्या हातात रिपोर्ट होते. निदान झालं .... नॉन ALCOHOLIC लिव्हर सिरॉसिस .. व्यसनापासून हजारो हात लांब असलेला मी .. लिव्हर खराब झालं होतं.. माझ्याकडे खूप पैसा आहे. पण पैसा असूनही जगात कुठेच अस शॉप नाही जिथून मी हृदय, किडनी, फुफ्फुस, हात, पाय विकत घेईन! माझ्यासमोर बसलेले तुम्ही सगळे खूप श्रीमंत आणि नशीबवान आहात. निसर्गाने दिलेले सगळे अवयव तुमच्याकडे आहेत. त्याची काळजी घ्य...
# 1645: हरवलेली माणसे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 31.12.2024 8:50
Send us Fan Mail पूर्वी आमच्या आळीत एक म्हातारा मीठवाला यायचा. “अरे, अर्धी बरणी मीठ सांगितल होत,” असं म्हटलं तर म्हणायचा, “ तसे केले तर आपल्याला आयुष्यात अर्धंच सुख मिळतं. तुम्ही पैसे अर्ध्या बरणीचेच द्या.” रघू बाजारभावापेक्षा स्वस्त आंबे विकायचा.गिऱ्हाईकांना कसं पटवायचं, माणूस कसा ओळखायचा, मेहनत कशी करायची हे शिकत मग धंद्यात यायचं. असे त्याला वडिलांनी सांगितले होते. फुलवाला, केळीवाला, बिस्कीटवा...
# 1644: चोराचा आर्थिक विकास! कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 31.12.2024 3:52
Send us Fan Mail एका सेवानिवृत्त गृहस्थाने पत्नीसह महिनाभर त्यांच्या मूळ गावी जायचे ठरवले. चोर आल्यास त्याला एक पत्र लिहून ठेवले. परतल्यावर चोराचे पत्र त्यांची वाट पाहत होते.... "माझ्या निवृत्त मित्रा, टिप्सबद्दल धन्यवाद.. मिशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आणि भरपुर कमाईही झाली. म्हणून तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी एक लाख रुपये रोख ठेवले आहेत."
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.