Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Kids MR ↓ 2071 episodes

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Author

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Category

Kids

Latest episode

Jul 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

# 1694: "वाडीच्या आठवणी". लेखिका : आसावरी सुधीर हंजे. कथन : (आसावरी हंजे. ) 04.03.2025

Send us Fan Mail वाडी मध्ये कृष्णाकाठचा मस्त वारा अंगावर झेलत पायऱ्यांवर बसून राहायला खूप आवडायचे. थंडगार झुळझुळ वाहणारे ते पाणी पायाला सुखद लागायचे. कधीतरीच सणावाराला आणली जाणारी घट्ट बासुंदी गरम  पोळीबरोबर खूप अप्रतिम लागायची. सर्वांना बरोबर घेऊन केलेली मजा ,आनंद कायमचा आठवणींच्या कुपीत राहतो.

# 1693: "आ,मुझे मार" अर्थात, सौरभ बोथ्रा चा योग क्लास. लेखिका : अश्विनी मराठे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 03.03.2025

Send us Fan Mail तर हा सौरभ बोथ्रा , "Fear of Missing Out" होऊन प्री सेशनला आलेल्या सर्वांना काय काय करायला लावतो!! wall sit , squats   इथपासून ते पोटावर हात ठेवून शांतपणे श्वासोच्छवास करणं किंवा स्वतःलाच आपादमस्तक थपडा मारणं, उठाबशा काढणं इथपर्यंत काहीही..  तो सांगतो आणि आपण निमूटपणे ते करतो. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोप्पा वर्कआऊट' असं सांगून इतका पीळ देऊन ठेवतो की सेशन् संपतं...

# 1692: भयाचा तप्त ज्वालामुखी. लेखिका सोनाली नवांगुळ. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 03.03.2025

Send us Fan Mail एखाद्याचे अश्लील मेसेज तुमच्या मोबाईलवर यायला लागले, सतत त्याचे फोन यायला लागले तर अशावेळी काय करायचे?  शरीरभर सरसरत जाणारा भयाचा तप्त प्रवाह ज्वालामुखी बनवून तुमचं डोकं फुटायची वाट बघायची? खरं तर एका अशिष्ट  मेसेजने आपल्या तथाकथित निर्भयतेच्या अशा ठिकऱ्या उडताना बघणं दुर्दैवी असतं. ही हतबलता सगळ्या चांगुलपणा नी  सभ्यतेवरचा विश्वास नखलणारी असते.  अगदी पोलिसांनी प्रत्यक्ष येऊन मदत...

# 1691: एल पजारो वाई ला बॅलेना. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 01.03.2025

Send us Fan Mail अगं तुला उडता येत नाही आणि मला पोहता येत नाही. मग आपण दोघे एकत्र कुठे व कसे राहू?" पक्षी म्हणाला.  "आपण इथेच राहू - लाटांमध्ये!" व्हेल म्हणाली. पण पक्ष्याने खिन्नपणे नकारात्मक डोके हलवले.  "तुला खोल समुद्रात पोहायला आवडते," तो म्हणाला. "ते तुझे आवडते काम आहे. तू इथे कधीही आनंदी राहणार नाहीस." आणि तुला फक्त आकाशात उंच उडायला आवडते,"व्हेल म्हण...

# 1690: दान, त्याग आणि वैराग्य. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 28.02.2025

Send us Fan Mail एकदा भर्तृहरी मध्यान्हाला अन्नग्रहणासाठी सिद्ध झाला. तेवढ्यात आकाशमार्गे जाणाऱ्या शिव-पार्वतींचे लक्ष भर्तृहरीकडे गेले. माता पार्वती म्हणाल्या, ‘केवढे कडकडीत वैराग्य. मोठा दिव्य आत्मा आहे.’ शिवजी हसले. मग पार्वतीसह ब्राह्मण-ब्राह्मणी बनून भर्तृहरीसमोर उभे राहिले. राजाने स्वतःसाठी शिजवलेला भात त्यांना अर्पण केला. माता पार्वती विजयी मुद्रेने शिवजींकडे पाहायला लागल्या. तेवढ्यात शिवजी...

# 1689: समाधानाची व्याख्या लेखक - अनामिक कथन - ( मृदुला जोशी ) 27.02.2025

Send us Fan Mail त्याने मला खूप गोष्टी शिकवल्या स्वतःला हुशार शिक्षित समजणारा मी ,त्याच्यासमोर खाली मान घालून स्वतःचे परीक्षण करू लागलो .किती सहज त्याने त्याच्या समाधानाची व्याख्या सांगितली!

# 1688: आनंदाचे झाड. लेखक : अनामिक कथन : ( मृदुला जोशी ) 26.02.2025

Send us Fan Mail आई म्हणून तू  मला आवडायचीसच ,तुझ्या आई असण्याचा रादर एक उत्तम आई असण्याचा आदर आणि अभिमान होता. पण आपली आई ही प्रबळ इच्छाशक्ती असणारी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघणारी एक दमदार बाई आहे याचा अनुभव आला आणि तो आदर अभिमान कितीतरी पटीने दुणावला

# 1687: नैवेद्य. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 25.02.2025

Send us Fan Mail पहाटे पहाटे त्याला एक स्वप्न पडलं…  स्वप्नात पाच रुपयांची नाणी तो मोजत होता.  जागा झाला आणि स्वप्न जसंच्या तसं त्याला आठवू लागलं , खाऊ लागलं…  त्यानं देवाकडे पाहिलं.  तो चोरासारखा बेरकी हसत असलेला त्याला दिसला. तो पटकन उठला.  वही घेतली व हिशोब करू लागला…  एकूण वर्षे वीस, म्हणजे एकूण दिवस ७३००.  दररोज रुपये पाच प्रमाणं झाले रू. ३६,५००/-. त्याने ३६,५०० रुपयांची एक थैली तयार केली व श...

# 1686: परमार्थ आणि पुरूषार्थ. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 24.02.2025

Send us Fan Mail भगवान महावीर त्या साधकाला म्हणाले, ‘बराच वेळ झाला पुन्हा पाणी पिऊ. जा तिथून पाणी घेऊन ये.’ साधकानं आसपास पाहिलं तर मगाशी पाणी आणलेला माठ तर फुटलेला. तिथं केवळ चिखलाचा राडा. ‘भगवान, पाणी आणता येणार नाही. आता तिथं माठ नाही. फक्त माती आहे,’ तो साधक नम्रपणे म्हणाला. भगवान महावीर म्हणाले, ‘तुझ्या समस्येचं उत्तर तूच दिलं आहेस.’ साधकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. भगवान म्हणाले, ‘मित्र...

# 1685: एक पेला दुधाची बॅंक. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 23.02.2025

Send us Fan Mail त्यांच्या दवाखान्यात येणार्‍या बायकांना त्यांनी त्यांची मुलं वारंवार आजारी का पडतात ह्याचं कारण समजावलं ..!!  त्यांच्या आहारात रोज एक ग्लास दूध मुलांना द्यायला सांगितलं ..!! पुन्हा एकदा बायकांनी तक्रार केली .. "पैसे खायला पुरत नाहीत, दूध आणायचे कुठून ..??" ह्यावेळी डॉक्टरांचे उत्तर तयार होते .. "घरी गाय पाळा ..!!" हा उपाय तर बायकांनी हसण्यावारीच नेला ..!! &quot...

# 1684: "ती अपराजिता." लेखिका : डॉ. प्रतिभा जाधव. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 22.02.2025

Send us Fan Mail लग्नापूर्वी जे आदर्श चित्र सासरच्यांनी तिच्यासमोर रंगवले होते त्याचे रंग उडताना तिने काही दिवसातच पाहिले. सेवानिवृत्त सासऱ्याच्या पेन्शनवर घर चालायचं.  पण  त्या बदल्यात सासऱ्याची वाईट नजर तिच्यावर होती. आपल्या पायावर उभा राहणं अपरिहार्य आहे हे तिला समजल. तिने ब्युटी पार्लर काढले. १६-१७ तास उभे  राहून ती  काम करी...   आज आत्मसन्मानाने उजळलेली ती अपराजिता ठरली आहे! 

# 1683: "कहाणी पार्वती बाईंची." लेखिका : मुक्ता दाभोळकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 21.02.2025

Send us Fan Mail पार्वतीबाई आठवले या भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नी बाया कर्वे यांची बहीण होत्या. हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्था भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी उभी केली. या ह्या संस्थेच्या उभारणीमध्ये पार्वतीबाई यांचाही मोठा हातभार लागलेला आहे. “आपण फार तर स्वयंपाक करू शकू”असे सांगणाऱ्या  पार्वती बाईंनी पुढे देशभर व परदेशात फिरून हिंगणे येथील महिलाश्रमासाठी निधी संकलनाचे...

#1682: "खरंच स्त्री एक अजब रसायन असते." लेखिका : डॉ. प्रतिभा जाधव. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 20.02.2025

Send us Fan Mail प्राथमिक शाळेत असतानाच नात्यातल्या कुणीतरी हिच्यावर अतिप्रसंग केला. डी एड नंतर लगेच जि. प. शाळेतल्या शिक्षकाशी लग्न झालं. पण कमवत असलेल्या एका रुपयावर सुद्धा तिची सत्ता नव्हती. आजार संपल्यानंतर सुद्धा कित्येक वर्ष त्या गोळ्या घेणारा विक्षिप्त माणूस तिच्या नशिबी होता……. 

# 1681: "वेंधळेपणा". ले. गिरीश मिठारी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 19.02.2025

Send us Fan Mail धावपळीत त्याने वेंधळेपणा केला आणि आपले पाकीट विसरून आला. आता त्याच्या शर्टच्या खिशात फक्त शंभर रुपयेच होते. ती ठरलेल्या वेळेत आली. तिने सहजपणे सँडविच ऑर्डर केले. याने मनात हिशोब मांडला—शंभर रुपये इथेच संपले! ती मंदस्मित करत म्हणाली, "तुमचा चेहरा फार बोलका आहे. तुम्हाला काहीही लपवता येत नाही."

# 1680: "शिव - समर्थ भेटी". ले. सुनील चिंचोळकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 19.02.2025

Send us Fan Mail गिरीधर स्वामींनी शिवाजी महाराज व   समर्थ भेटीच्या अनेक कथा ‘समर्थ प्रताप’ या ग्रंथात नमूद केल्या आहेत. छत्रपतींनी समर्थांच्या झोळीत संपूर्ण स्वराज्य घातले व व स्वामींनी “आमच्या वतीने हे राज्य तुम्ही सांभाळा” हे सांगितले ती कथा समर्थांनी परीक्षा घेण्यासाठी दिलेला तांबूल, महाराजांनी प्रसाद म्हणून भक्षण केला ती कथा, एका मांत्रिकाने समर्थांवर अकरा दिवस  मंत्राच्या प्रभावाखाली ठेवले ती...

# 1679: जीवाणूंच्या भात्यातील बाण. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 17.02.2025

Send us Fan Mail बऱ्याच अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की मानवांमध्ये पेप्टिक अल्सर आणि गॅस्ट्रायटिसची बहुतेक प्रकरणे हेलिकोबॅक्टर पायलोरी या जीवाणूंच्या संसर्गामुळे होतात आणि पोटाच्या कर्करोगाच्या विकासाशी या संसर्गाचा संबंध असल्याचे पण दिसून आले आहे. पोटातील आम्लाचा pH 1 ते 2 असतो. याचा अर्थ पोटात अत्यंत तीव्र स्वरूपाचे आम्ल असते. हेलिकोबॅक्टर पायलोरी पोटाच्या या प्रतिकूल अम्लीय वातावरणात आनंदान...

# 1678: "तुझे नाम घेता घेता । तुझे रुप ल्यालो". कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 15.02.2025

Send us Fan Mail "माझं नांव सुदाम्या. मी लहानसा  शेतकरी हाये.   हा देवळांत बसलेला मुरलीधर हाये ना , त्याची आणि माजी दोस्ती झाली हल्लीच.  मी शेतावर राबत असतांना, त्याला मला भेटायचं असलं, की तो मुरली वाजवून मला बोलवून घ्येतो".  "अरे आजवर मी वर्षानुवर्षे देवाची सेवा केली. अखंड नामजप, पूजा, अभिषेक, आरती सर्व कांही करतो आहे. मला नाही कधी ती बांसरी ऐकू आली ? मला नाही कधी श्रीकृष्णाने संदे...

# 1677: "श्री महाराजांचे दर्शन घडले पण अनुभवता आले नाही". ले. डॉक्टर मनोहर वर्टीकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 14.02.2025

Send us Fan Mail " यांनी कित्येक वर्षांपूर्वी समाधी घेतली असे आपण म्हणता, पण हेच साधू काल रात्री माझ्यासाठी जेवणाचे ताट घेऊन आले होते व उपाशी झोपू नकोस, म्हणून सांगून गेले." ड्रायव्हर म्हणाला. श्रीभक्तांच्याही डोळ्यात अश्रू जमा झाले. "आम्ही इतकी वर्षे इथे गोंदवल्यास येतो, पण अजून तरी श्रीदर्शन आमच्या नशिबात नाही, पण हा एक मुसलमान माणूस, इथे पहिल्यांदाच आलाय, तरीही श्रीमहाराजांच्या ह...

# 1676: साखर आणि मीठाचे खाणार त्याला.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 12.02.2025

Send us Fan Mail आहारातील मिठाचे प्रमाण कमी करण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटना करत असली, तरी आहारातून मीठ पूर्णपणे वजा करून टाकणेही सुरक्षित नाही. आपल्या शरीराचे काम योग्य पद्धतीने होण्यासाठी थोड्या प्रमाणात मीठ आवश्यकच असते. मीठ पूर्णपणे बंद केल्यास इलेक्ट्रॉलाइट असमतोलासारख्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. मीठाइतकेच अतिरिक्त साखरसेवनाचेही धोके आहेत. अतिरिक्त साखरेमुळे टाइप टू मधुमेह होण्याचा ध...

# 1675: अंतरासी लागेल ढका l ऐसी वर्तणूक करू नका ll लेखिका : नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 11.02.2025

Send us Fan Mail "उद्या आपल्या वर्गात मीनल नावाची नवीन मुलगी येणार आहे. तिच्या वडिलांची इथे बदली झाली आहे. तिला आई बद्दल काहीही विचारू नका.... कारण काही दिवसांपूर्वी तिची आई देवाघरी गेली आहे." बाईंनी शिकवलेलं अजून लक्षात आहे. ...एखाद्याचे दुःख समजून घ्यावं.. त्याला होईल ती मदत करावी, चार चौघात त्याला त्याविषयी विचारून कानकोंड करू नये. मुख्य म्हणजे त्याला आपल्यात सामील करून घेऊन देता येईल...

# 1674: कुंभमेळा का होतो? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 09.02.2025

Send us Fan Mail रवी, चंद्र व गुरु ह्या गोचरांमध्ये विशिष्ट पद्धतीने योग जुळून येतो त्या त्या योगावर त्या ठिकाणी कुंभ मेळा भरतो. कधी सहा वर्ष तर कधी बारा वर्ष  तर कधी १४४ वर्षांनी हे योग येत असतात आता जर असा योग सहा वर्षांनी आला तर त्यास अर्धकुंभ मेळा भरतो जर असा योग बारा वर्षांनी आला तर तो पुर्ण कुंभ भरतो आणि असा योग जर १४४ वर्षांनी आला तर तो महाकुंभ मेळा भरतो. आता भरलेला प्रयाग येथील जो कुंभमेळा...

# 1673: भगवान श्रीकृष्ण आणि गुरू सांदीपनी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 07.02.2025

Send us Fan Mail गुरुकुलातील त्यांच्या अभ्यासानंतर, निघण्यापूर्वी, त्यांनी त्यांच्या गुरूंना विचारले की ते गुरू दक्षिणा म्हणून त्यांना काय देऊ शकतात? परमेश्वराच्या असीम वैभवाची परिपूर्ण जाणीव असलेल्या आणि भारावून गेलेल्या सांदीपनिंनी कृष्णाला प्रभास क्षेत्रात सागरामध्ये हरवलेल्या आपल्याच मुलाला परत मिळवून देण्यास सांगितले. कृष्णाने त्यांच्या मुलाला परत आणण्याचे वचन दिले आणि ते आपल्या भावासह प्रभास...

#1672: धर्मो रक्षति रक्षित:. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 06.02.2025

Send us Fan Mail "आजोबा, राम आणि कृष्णाच्या परिस्थितीत खूप फरक आहे....! रामाच्या काळात 'रावणा' सारखा खलनायकही शिवभक्त होता....!! मग रावणसारख्या नकारात्मक शक्तीच्या कुटुंबातही बिभीषण, मंदोदरी, माल्यवानसारखे संत असायचे.....! मग बालीसारख्या खलनायकाच्या कुटुंबातही तारासारख्या विद्वान स्त्रिया आणि अंगदासारखे कोमल पुत्र असायचे....! त्या काळात खलनायकालाही धर्माचे ज्ञान होते....!! म्हणूनच र...

# 1671: "सोमनाथ ज्योतिर्लिंगाची कथा आणि इतिहास". (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 05.02.2025

Send us Fan Mail सौराष्ट्र येथील सोमेश्वर  ह्या  ज्योतिर्लिंगा पासून दर्शनाची सुरवात केली जाते. चंद्राने मंदिर बांधले म्हणून त्याचे नाव सोमेश्वर.  चंद्राने लाडकी पत्नी रोहिणी व आपल्या इतर पत्नींमध्ये भेदभाव केल्यामुळे त्याला क्षय होण्याचा शाप त्याचा सासरा दक्ष प्रजापतीने दिला.  चंद्राच्या सोमनाथ येथील कठोर तपश्चर्यानंतर, महादेवांनी त्याला “ तू पंधरा दिवस कलाकलांनी वाढशील  व पंधरा दिवस कलाकलांनी क्...

# 1670: AI: Our ugly friend. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 04.02.2025

Send us Fan Mail आपण याला ‘तिसरा स्फोट’ म्हणू शकतो. सन १८९६ च्या आसपास ‘डायनामाइट’चा शोध लावणाऱ्या आल्फ्रेड नोबेलचा शोध, हा स्फोट पहिला. सन १९४५ मध्ये ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’ मधील अणुबॉम्बचा शोध लावणारा ओप्पेनहाइमरचा स्फोट दुसरा.  आल्फ्रेड नोबेलच्या भावाचे निधन झाल्यानंतर, आल्फ्रेडचेच निधन झाले आहे असे समजून एका वृत्तपत्राने ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याचे निधन’ अशी बातमी छापली. आपण मेल्यावर जग आपल्याला कसे...

Listen to the Life of Stories podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.