Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Author
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Category
Podcast website
Latest episode
Jul 7, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
# 1719: "प्रवास माय लेकीचा." लेखिका : अनामिक. कथन : ( मृदुला जोशी ) 27.03.2025 7:12
Send us Fan Mail लहानपणी प्रत्येकाला वाटत असतं की आपली आई एक परी आहे आणि तिच्याकडे जादुची छडी आहे. मला पण असंच वाटे, खासकरुंन दिवाळीत कारण रात्री झोपताना सामसुम दिसणार्या स्वयंपाकघरात सकाळी उठले की स्वादिष्ट फराळाचा घमघमाट असे, तेव्हां कळायचंच नाही ही झोपते कधी, ऊठते कधी आणि सगळं करते कधी. फक्त खायचं तेवढं कळत असे. दिवाळीची आणखी एक आठवण म्हणजे तिची वसुबार्सेची रांगोळी. पाटावर अत्यंत सराईतपणे ती गा...
# 1718: "माझी आजी, जुनी गाणी आणि Alexa " लेखिका : ऋजुता दीक्षित. कथन : ( मृदुला जोशी ) 26.03.2025 5:30
Send us Fan Mail एवढं सगळं लक्षात ठेवणारी आजी मात्र दररोज तिचा चष्मा कुठं आहे हे साफ विसरून जायची मग शोधत बसायची. मला चष्म्याशिवाय सगळं धुरकट दिसतं, म्हातारी झाले न मी..म्हणायची असा काहीतरी यंत्र पाहिजे ज्याला काहीही विचारलं तर ते सांगेल.. मी अलेक्सा हे प्रॉडक्ट प्रथम पाहिलं तेव्हा मला आजी आठवली,आता असती तर म्हणली असती 'अग ह्या अलेक्साला विचारलं की माझा चष्मा कुठाय तर ती सांगेल?' कदाचित...
# 1717: "बहिष्कृततेचे आयुष्य संपले , पण..." लेखक : अॅड. रंजना पगार गवांदे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 25.03.2025 9:48
Send us Fan Mail भटक्या समाजात बालविवाहाचे प्रमाण जास्त व जात पंचायतीचे वर्चस्व फार. साठ वर्षाच्या पुढचा व नरबळीच्या प्रकरणात शिक्षा भोगून आलेल्या नवऱ्या बरोबर १७ वर्षांच्या सुनिताने एक रात्री साठी राहावे मग दुसऱ्या दिवशी तिचा काडीमोड करू अशा पंचायतीने निर्णय केला; अन्यथा समाजातून बहिष्कार...! सुनिताने विरोध केला तरीही या प्रकरणाचा तिच्यावर झालेला परिणाम भयंकरच होता.
# 1716: चहावाले सप्रे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 24.03.2025 8:24
Send us Fan Mail "माणूस गेल्यानंतर त्याचे जवळचे नातेवाईक जास्त दुःखी असतात. आणि त्यांना काही हवंय का, हे देखील कुणी विचारत नाही ..!! म्हणून मी थेट स्मशानभूमीत जाऊन, ही सेवा देतो. त्यांच्या दुःख्खी, कष्टी चेहऱ्यात मला माझ्या पत्नीचा चेहरा दिसतो ..!! हॉस्पिटल मध्ये गंभीर पेशंटचे नातेवाईक अतिशय तणावात असतात ..!! त्यांना मी जाऊन भेटतो .. पाणी देतो, चहा देतो, थोडी फार चौकशी करतो आणि दिलासा देण्याच...
# 1715: शब्दकळा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 23.03.2025 8:14
Send us Fan Mail अगदी शेलक्या शब्दात उल्लेख करायला मराठी भाषेत उदंड शब्दसमूह आहेत . आमच्या नात्यातल्या एका मुलीचं लग्न जमायला जरा अवघड जात होतं कारण काय ? तर म्हणे “ म्हशीनं पाय दिलाय ना नाकावर !” गोरीपान मुलगी असेल आणि तिचा नक्षा जर कुठलं वाक्य उतरवत असेल तर “ पांढरी पाल तर आहे , रंग काय चाटायचाय ! “ अत्यंत आळशी पुरुषाचा उल्लेख सहजपणे “ दिवसभर शेणाच्या पो सारखा पडलेला असतो “ असा होई . खरं तर वरच...
# 1714: स्नेक ॲंड लॅडर आणि ज्ञानेश्वर. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 22.03.2025 7:38
Send us Fan Mail नेहमीच्या साप-शिडी पेक्षा ज्ञानदेवांच्या साप-शिडीचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ही साप-शिडी चित्रांकित आहेच परंतु शब्दांकितही आहे. म्हणजे साप शिडीच्या पटाला संलग्न असणाऱ्या दुसर्या पटावर कोणती कवडी कोणत्या घरात पडली तर नेमकं कसं वागावं यासंबंधीचं भावपूर्ण मार्गदर्शन अगदी सहज सुंदर ओव्या मधून केलेलं आढळतं. उदा. तुम्ही क्रोधाच्या घरात गेलात तर तिथे तुम्हाला संयमाचं महत्व सांगणार...
# 1713: चौकट आक्रसत चाललीय. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 21.03.2025 5:20
Send us Fan Mail असाच एकदा मी कपडे इस्त्रीला टाकण्यासाठी तिथे गेलो होतो. आजींच्या बाजूला त्यांचा नातू उभा होता. आज तो खूपच छान नटून आलेला. कपाळावर टिळा, छान नवे कपडे. तीन चार वर्षाचा त्यांचा नातू, छान गोरा, गुटगुटीत अन् गोड. तो त्याच्या आजीला सांगत होता, "आजी तू उद्यापासून त्या सुमंत आजीबरोबर बोलायचं नाही बघ." आजीने विचारलं," का रे, काय केलं त्या आजीनं तुला? तो: "काही नाही असं...
# 1712: संत निवृत्तीनाथ. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 20.03.2025 4:47
Send us Fan Mail आज जगप्रसिद्ध असलेला मानवतेची शिकवण देणारा 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ निवृत्तीनाथांच्या आदेशानेच माऊलींनी लिहलाय. संस्कृत भाषा जनसामान्यांना समजत नव्हती तेव्हा मराठीत हा ग्रंथ लिहण्यासाठी निवृत्तीनाथांनी माऊलींना आज्ञा केली. "ज्ञान गुढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले माझ्याहातीं" अशी माऊली गुरुविषयी कृतज्ञता माऊली व्यक्त करतात.
# 1710: अंतराळयानं पृथ्वीवर कशी परततात? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 19.03.2025 10:49
Send us Fan Mail आपल्याला माहित आहे की सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांनी 5 जून 2024 रोजी परीक्षणयान असलेल्या स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती. तिथे आठ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते; मात्र, त्यांच्या यानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोघेही तिथेच अडकून पडले. आता ते परत यायला निघालेत. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून निघून पृथ्वीवर परत येण्यासाठी असलेल्या यान...
# 1711: "कळ" कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 19.03.2025 2:53
Send us Fan Mail डॉक्टर म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून शाळेतल्या माझ्या वर्गातली अनिता होती…* *स्कूल क्रश... मी तिला म्हणालो…“ओळखलस का मला?”* ती म्हणाली… “नाही खरंच नाही हो!… तुम्ही कुठला विषय शिकवत होतात त्यावेळेला सर?” आणि हृदयात कळ येणं म्हणजे काय हे त्यावेळी मला चांगलच कळलं…!
# 1708: "पाट्या टाकणे" लेखक शेखर गायकवाड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 18.03.2025 2:42
Send us Fan Mail पाट्या टाकणे म्हणजे एका ठिकाणची माती काढून पाटी भरून दुसऱ्या ठिकाणी टाकणे. हे काम आपण नक्की कशासाठी करत आहोत याची थोडीशी सुद्धा माहिती न घेता वर्षानुवर्षे तेच तेच काम नेमाने कारणे म्हणजे शासनामध्ये " पाट्या टाकणे " होय!
# 1709: "मी, आठही वाऱ्यांच्या पलीकडे" लेखक ओशो. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 18.03.2025 6:58
Send us Fan Mail "आपण इतकं सुंदर आध्यात्मिक कवन लिहिलं आणि फोयिनकडे पाठवलं. तर त्याने ही कविता म्हणजे "निव्वळ पोटातला वारा सरणं आहे" असं म्हणून तिचा अवमान तरी करायला नको होता". डोंगपो क्रोधायमान होऊन फोयिनकडे याचा जाब विचारायला निघाला. "डोंगपो, जर माझा ‘पाद’ हा शब्दही तुला अजूनही क्रोधीत करू शकतो, तर तुझे कमळ अजूनही वाऱ्यांनी डळमळतेच आहे!" फोयिनने लिहिले होते!
# 1706: "कर्करोगाला रामराम ठोकताना" लेखिका : वंदना अत्रे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 17.03.2025 10:54
Send us Fan Mail कर्करोग झाल्याचं कळल्यावर, आपल्याच शरीराने फसवणूक केल्याच्या भावनेनं दुखावली गेलेली लेखिका, पुढे आयुष्यच बदलून टाकणाऱ्या अनुभवांना सामोरी गेली. कधी शरीर-मनाच्या अद्वैताचा प्रगल्भ विचार मांडणाऱ्या भारतीय तत्त्वज्ञानाने आयुष्याला अद्भुत वळण लागलं तर कधी मन स्वत:च्या मर्यादांना आव्हान देत राहिलं आणि त्याचमुळे पुढच्या दहा वर्षांत तीन वेगवेगळे कर्करोग, केमोथेरपीच्या अनेक सायकल्स, तीन श...
# 1707: "शोध पत्रकारितेतील दीपशिखा" लेखक : डॉ.नंदू मुलमुले. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 17.03.2025 11:27
Send us Fan Mail “नेल्ली ब्लॉय 1864 ते 1922 ही तिच्या काळातील स्त्री शोध पत्रकारांपैकी एक होती कुख्यात मानल्या गेलेल्या मनोरुग्णालयातील स्त्रियांची स्थिती जाणून घेण्यासाठी तिने मनोरुग्णाचे सोंग घेतले. तिथे डांबलेल्या प्रक्षुद्ध रुग्णांचे ओझरते दर्शन नेल्लीला घडले आणि ती हादरून गेली. तिच्या रिपोर्तlजने समोर आलेल्या वास्तवाने समाजात खळखळ माजली”.
# 1704: "भाषा". लेखक : अविनाश बिनीवाले. कथन: (आसावरी हंजे. ) 16.03.2025 3:03
Send us Fan Mail भाकरीसाठी एखादी परदेशी भाषा किंवा स्वदेशी भाषा कोणी शिकावी? ह्या प्रश्नाच उत्तर खरं तर सोपं आहे! ज्याला भाकरी हवी असेल ,त्यानं शिकावी! त्याच बरोबर गृहिणींना आपल्या विद्याविभूषित, उच्च पदस्थ पतीबरोबर परदेशी गेल्यावर अधिक फायदा होत असेल तर भाषेचा. कारण बाजारहाट करणं,मोलकरणींकडून कामं करून घेणं वगैरे गोष्टींसाठी परदेशी / स्थानिक भाषेची गरज पडतेच.
# 1705: "खुर्ची योग". लेखक : शेखर गायकवाड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 16.03.2025 4:03
Send us Fan Mail सरकारी कार्यालयात काम करताना जुन्या व मोडक्या खुर्च्याच जास्त काळ वाट्याल येतात. नव्याने आलेल्या कोणी त्यावर चांगलं कव्हर घालून घेतलं तर ते खराब कसं होईल याची विशेष दक्षता घेतली जाते. आणि ,इथे सर्वजण समान आहेत हे त्याला दाखवून देऊन त्याचं विधिवत 100% सरकारीकरण केले जाते!
# 1703: "मृत्युपत्र". लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 15.03.2025 5:28
Send us Fan Mail " तु विचारलस ना...माझ्याकडे काय आहे वाटणी करायला ? खरंच ....काही नाही ग... मला वाटणी नाहीच करायची ...तर तुमची जोडणी करायची आहे." "तुमची माया एकमेकांवर अखंड अशीच राहू दे. एकमेकांकडे आलं गेलं तरच ती टिकून राहील ..हीच माझ्या प्रेमाची वाटणी आणि हेच माझं मृत्युपत्र असं समजा."
# 1702: "कैरी डाळ ". लेखिका : आसावरी सुधीर हंजे. कथन: (आसावरी हंजे. ) 14.03.2025 3:01
Send us Fan Mail अत्तराचा मंद सुगंध ( वाळा,चंदन, मोगरा) उन्हाळ्यातील तीव्र झळा कमी करायचा.ठेवणीतले शालू किंवा जरीच्या झुळझुळीत साड्या बाहेर काढल्या जायच्या. चैत्रागौरी च्या हळदी कुंकू मधील सर्वात आवडती म्हणजे कैरी डाळ, म्हणजे डाळीची कैरी घालून केलेली आंबट गोड कोशिंबीर.
# 1701: "बालपण". लेखिका: आसावरी सुधीर हंजे. कथन: (आसावरी हंजे. ) 13.03.2025 3:01
Send us Fan Mail बालपणातल्या आठवणी या कोणत्याही माणसाच्या आठवणीच्या कुपीत बंद असतात. उघडल्या की अत्तराच्या सुंगाधाप्रमाणे मनभर दरवळतात. ती कुपी बंद करू नये अस वाटत राहतं. आपण जिथे खेळलो,वाड्याच्या अंगाखांद्यावर बागडलो, स्वयंपाक घरात अन्न ग्रहण केले,उबदार पांघरुण घेऊन खोलीत झोपलो,माजघरात गप्पा गोष्टी केल्या,ती ठिकाणे मनाच्या तळाशी कोपऱ्यात जाऊन बसलेली असतात.
# 1700: "आनंदवन ज्ञानेश्वरचेही". लेखक : श्रीपाद अपराजित. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 12.03.2025 5:47
Send us Fan Mail तो जन्मांध आहे. त्याला डोळ्यांच्या खाचाही नाहीत. तरीही पन्नास वर्षांपासून " All is well " चा मंत्र तो जपतो आहे. तो बाबांच्या वेळचा आनंदवनाचा "Brand Ambassador" आहे.
# 1699: माझी शाळा..ले. मीनल भडसावळे .कथन ( मीनल भडसावळे ) 11.03.2025 5:33
Send us Fan Mail पुण्यातील नावाजलेली शाळा ,येथील मुलींना शिक्षण देण्याची कार्यपद्धती ह्याचे वर्णन आहे. हा काळ 1960 नंतरच्या दशकांचा आहे. पुण्याला शिक्षणाच माहेरघर का म्हणतात ह्यावर हा छोटा प्रकाशझोत
# 1698: "माहेरपण". लेखिका : आसावरी सुधीर हंजे. कथन: ( आसावरी हंजे.) 10.03.2025 3:47
Send us Fan Mail आपण वयाने कितीही मोठे झालो तरी आपल्या आई बाबांसमोर एकदम लहान होऊन जातो. आई वाढताना सढळ हाताने गरम भातावर तूप घालणार,दुधाची साय घालणार.आपण इकडे वाढलेल्या वजनामुळे नको नको म्हणत राहतो, आणि आईबाबा इकडे आग्रह करून वाढतच राहतात.वरून " किती वाळली आहेस ग !खा बरं! ,"असे म्हणत राहतात.खूप भारी वाटतं हे! हेच हवं असतं ना कोणत्याही माणसाला की,कुणीतरी आपली काळजी घेतय,काळजी करतय!
# 1697: अन्न हे पूर्णब्रह्म लेखिका: आसावरी सुधीर हंजे. कथन: (आसावरी हंजे.) 09.03.2025 4:19
Send us Fan Mail पोळीची कणीक मळून ,इकडे डाळ भाताचा कुकर चढवावा लागतो.भाज्या चिरून किंवा निवडून त्या फोडणीत टाकायला सज्ज कराव्या लागतात.. मधेच चहाचे आधण ठेवावे लागते.दूध तापत वर येत असते.नेमके आपण त्याच वेळी ओट्यापासून दूर गेलेलो असतो. स्वयंपाक घरातील दररोज घडणाऱ्या या घटनांचे मजेदार वर्णन लेखिकेने यामध्ये केले आहे.
# 1696: "आयुष्य काय कमाल आहे!" लेखिका : ऋजुता दीक्षित कथन : ( मृदुला जोशी ) 08.03.2025 5:20
Send us Fan Mail पण एक गोष्ट तर नक्की, आपलं कौतुक करणारे, कारणाशिवाय आपल्यावर प्रेम करणारे फक्त आपले आईवडील. नंतर वडीलधारी मंडळी, नातेवाईक, आप्त, मित्रमैत्रिणी अनेक असतील, पण आपणही सुंदर आहोत, हुशार आहोत आणि जे ठरवू ते प्रत्यक्षात आणू हा विश्वास देणारे भगवंता नंतर आई बाबाच! जर समोर दोन्ही हात पसरून बोलावणारे बाबा नसतील तर अडखळत रांगणाऱ्या बाळाला पाऊल उचलून पुढे टाकायचा आत्मविश्वास का येईल? रडू आल्...
# 1695: "स्त्री पुरुष समानता?" लेखक : चंद्रकांत पागे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 08.03.2025 2:37
Send us Fan Mail “ बायांनो, सायकलीला स्टॅन्ड कोणच्या चाकाला असतो?” “मागच्या!” “आणि सामान ठेवायला कॅरियर कोणच्या चाकावर असतं?” “मागच्या!” “सांगा बरं कुलूप कोणच्या चाकाला लावतात?” “मागच्या!” “मग हा ठोंब्या पुढच्या चाकावर बसून काय फक्त हँडल फिरवायला असतो का “ स्त्री आणि पुरुष समानतेच्या चर्चा करायला असतो?” म्हातारीने विचारले.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.