Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Kids MR ↓ 2071 episodes

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Author

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Category

Kids

Latest episode

Jul 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

# 1744: हुशार उंदीर लेखिका:मीनाक्षी केतकर. कथन: (आसावरी हंजे.) 27.04.2025

Send us Fan Mail एकदा मांजर रानात दिवसा हिंडायला गेले.काही खायला मिळते का पाहू लागले.त्याला एक भाकरीचा तुकडा आणि लोण्याचा गोळा एके ठिकाणी दिसल्यावर त्याच्या तोंडाला पाणी सुटले. थोडा सुद्धा विचार न करता हावरटपणाने तिथे एकदम झेप घेतली आणि मांजर जाळ्यात अडकले. उंदीर जाळे कुरतडू लागला; पण अशा बेताने की पहाट होईपर्यंत मांजर सुटू नये,कारण त्याला माहीत होते - पहाटेच शिकारी येणार आपली शिकार न्यायला....

# 1743: "रंगछटा" लेखिका नीला गोडबोले महाबळ. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 26.04.2025

Send us Fan Mail " ताई, रंग  एकच आहे सगळीकडं.. पण प्रत्येक खोलीचा आकार वेगळा आहे. भिंतीच्या पोतात फरक आहे.. आणि मुख्य म्हणजे  प्रत्येक खोलीत येणारा प्रकाश वेगवेगळा आहे.. ताई, रंगाच्या छटा इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतात.., या सा-या गोष्टी सारख्या करा..मग रंगही समान दिसेल..!! अजून काही  महिन्यांनी बघा..रंग अजूनच वेगळा  दिसेल..!" रंगारी काका म्हणाले.

# 1742: "वाट बघणे, एक न संपणारी गोष्ट". कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 25.04.2025

Send us Fan Mail त्या लहानशा जीवाला वाटायचं, "माझे आई-बाबा माझ्यासाठी काहीही करू शकतात!" पण आता… ३० वर्षांनंतर…स्टेशनवर आई मला सोडायला आली आहे.  प्रवासाचं स्थान बदललंय, पण ‘वाट’ तीच आहे. पूर्वी मी वाट बघायचे, आज आई वाट बघते… आणि उद्या? कदाचित मीच माझ्या मुलीची वाट बघेन…

# 1741: सायकल आणि चौदा देश. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 25.04.2025

Send us Fan Mail स्पेनमधून जाताना ती उशिरापर्यंत सायकल चालवत होती. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. इतक्यात दोन तरुण समोरून बाईकवर आले. वेदांगील पाहून ते थांबले आणि अचानक चाकू काढून तिच्यावर रोखला. त्यांना पैसे हवे होते. म्हणून त्यांनी झटापट केली. वेदांगीला थोडी दुखापतही झाली. ती घाबरली. तोवर पैसे घेऊन ते तरुण पळून गेले होते. खरी अडचण त्यापुढे होती. वेदांगीला स्थानिक भाषा येत नव्हती. स्थानिक लोकांना...

# 1740: शत्रुध्न ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 24.04.2025

Send us Fan Mail एके रात्री, माता कौशल्या जी झोपेत असताना त्यांच्या राजवाड्याच्या गच्चीवर कोणीतरी चालत असल्याचा आवाज ऐकू आला. त्या उठल्या आणि त्यांनी विचारले, "कोण आहे तिकडे?" त्यांना कळले की ती शत्रुघ्नजींची पत्नी श्रुतकीर्ती आहे. माता कौशल्येनी तिला खाली बोलावून घेतलं. श्रुतकीर्तीजी आल्या, त्यांच्या पायाशी नतमस्तक झाल्या आणि तिथे उभ्या राहिल्या. माता कौशल्याजींनी विचारले: "श्रुती!...

# 1737: वंदे भारत. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 22.04.2025

Send us Fan Mail सहसा रिटायरमेंटच्या वेळी जेव्हा शेवटच्या पोस्टिंगची वेळ येते तेव्हा कर्मचार्‍याला त्याची निवड विचारायची पद्धत आहे. पसंतीच्या ठिकाणी अंतिम पोस्टिंग यासाठी कि कर्मचार्‍याने आपल्या शेवटच्या दोन वर्षांत आपल्या आवडीने घर वगैरे बनवावे, स्थिर व्हावे. आरामात रहावे. परंतु या अधिकार्‍याने ने आपली अंतिम पोस्टिंग मागितली ICF चेन्नई ला. ICF म्हणजे Integral Coach Factory, रेल्वेचे डबे बनविण्याच...

# 1738: वावटळ लेखक:अनामिक कथन : (आसावरी हंजे.) 22.04.2025

Send us Fan Mail लग्नानंतर नवीन जोडपं जोतिबाला जात.तिथे जत्रा भरलेली असते.तिथे एका पाळण्यात बसून फोटो काढतात ती दोघं.छान मजेत एकत्र हसत खेळत बाजार करतात आणि शेवटी घरी येताना आईची तपकीर ची पुडी आणायचं मात्र विसरतात.   सून येऊन आत्या बाईच्या (म्हणजे सासूच्या ) पाया पडते. पण सासू तोंड फिरवून जाते ,आणि म्हणते," किती वेळ तो,दिवे लागण झाली,घरी देवासमोर दिवा लाव आधी".

# 1739: याचा आपण गांभीर्याने विचार करतो का? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 22.04.2025

Send us Fan Mail एकदा ते आणि हर्बर्ट एका उद्यानाजवळून चालत असताना, तिथं काही मुलं बेसबॉल खेळत असलेली त्यांनी पाहिली. हर्बर्टने वडिलांना विचारलं : "बाबा, तुम्हाला काय वाटतं? ते मला खेळायला देतील का?" वडिलांना माहीत होतं की, बहुतेक मुलांना हर्बर्टसारखं मूल आपल्या संघात नकोच असतं.  पण त्यांना हेही जाणवलं की, हर्बर्टला थोडा वेळ खेळायला दिलं तर त्याला सामावून घेतल्याची भावना आणि स्वीकृतीचा आत...

# 1736: एकशे दहा वर्षे चाललेली पावलं. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 13.04.2025

Send us Fan Mail “साब! म्हारो थैलो तो नीच्चे रहि गयो!” हेलिकॉप्टर मधे बिनधास्तपणे बसलेल्या त्या वृद्धाने म्हणल्याबरोबर त्यांच्या सोबतच्या लष्करी अधिका-यांनी हेलिकॉप्टर ताबडतोब माघारी फिरवलं आणि विमानतळावर उतरवलं! सुरकतलेलं पण अजूनही काटक शरीर,पीळदार आणि अगदी दाट मिशा आणि मुख्य म्हणजे दगडासारखे मजबूत पाय असलेल्या त्या आजोबांचे वय होतं १०७ वर्षे फक्त....होयं अवघे एकशे सात वर्षे! हे आजोबा हेलिकॉप्टरम...

# 1735: तुझी आवडी दे रे राम..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 12.04.2025

Send us Fan Mail रात्री साडेअकरा-बारा वाजता दरवाज्याची कडी वाजली. बाबांनी दार उघडले. आईही उठून बसली. बाहेर एक अनोळखी माणूस... भरघोस दाढी वाढलेला... साधी विजार-साधा शर्ट... हातामधे आईची पिशवी... "मी यशवंत पवार... परळीचा आहे. आज सकाळी या ताई आणि तुमचा हा मुलगा गडावर आले होते... तेव्हा तिथून दर्शन घेऊन परत येताना ही पिशवी पेठेतल्या मारुतीच्या देवळात विसरली होती. ती घेऊन आलोय. बघून घ्या..."...

# 1734: "पाखरावर प्रेम करणारा पर्वत" लेखिका गौरी देशपांडे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 11.04.2025

Send us Fan Mail एक होता पर्वत. उघडा बोडका. खडकाळ, उजाड वाळवंटात एकटाच उभा होता.  बिच्चारा!  त्याच्या खडकाळ उतारावर ना गवत, ना झाडं.  पानांची सळसळ सुद्धा कधी ऐकली नाही त्याने. एक दिवस मात्र त्याच्या नीरस निसर्गचित्रावर एक लालसर पाखरू विसावलं. त्या पाखराच्या मऊ मऊ पिसांच्या शरीराचा स्पर्श पर्वताला झाला मात्र, तो त्या अनोख्या अनुभवाने थरारून गेला. पाखरू जायला निघालं. त्यावेळेला पर्वत म्हणाला  "...

# 1733: "शितावरून भाताची परीक्षा." लेखिका : मुक्ता दाभोळकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 10.04.2025

Send us Fan Mail ताटात जेवण न मिळाल्याने नाराज झालेल्या नवरदेवाच्या कपाळावरच सावधान माझ्याशी लग्न केल्यास मुलीला हुंड्यासाठी मुलीचा हुंड्यासाठी छळ होऊ शकतो हे लिहिलेले नाही काय?  असा हट्ट धरणाऱ्या नवरदेवाला तेव्हाच टाटा बाय-बाय करायला नको काय? दुसऱ्याच्या पैशाने स्वतःचे कौतुक करून घेण्याचा सोस व होंडा यात फरक नाही हे त्या मुलीला आणि तिच्या मुलीच्या आई-वडिलांना तरी स्पष्ट दिसायला हवे.

# 1732: नूतन : मेरे साजन है उस पार.....लेखक : अज्ञात. कथन: ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 09.04.2025

Send us Fan Mail "बंदिनी" मधली "मोरा गोरा रंग लैले" म्हणत प्रियकराला भेटायला अतुर झालेली नटखट नूतन शेवटी त्याच प्रियकराची असहाय्य अवस्था बघून समोरचा उज्वल भविष्यकाळ लाथाडून  "मेरे साजन हैं उसपार" या त्याच्या शब्दांबरोबर कासावीस होत धावत सुटते.  त्यावेळची तिची तगमग आपण विसरु शकतो? 

# 1731: वाड्यातील गमतीजमती लेखिका: आसावरी सुधीर हंजे कथन: ( आसावरी हंजे.) 08.04.2025

Send us Fan Mail पलीकडचा वाडा प्रसिद्ध होता,तो यासाठी की तिथे एक मारुतीचे देऊळ होते.रामाची भजने तिथे लावलेली असत. खूप सुंदर आणि मोठे हवेशीर देऊळ.त्या देवळात खेळायला वेगळीच मज्जा यायची. आम्ही मुले तिथे धुडगूस घालायला लागलो की,तिथले मामा आणि पार्वती काकू खूप ओरडायचे आम्हाला. आमच्या अंगणात मोगऱ्याची खूप झाडे.त्यामुळे उन्हाळ्यात रात्री मस्त सुगंध दरवळत रहायचा.दुसऱ्या दिवशी त्याचे सुंदर गजरे करून घालाय...

# 1730: शिकार ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 07.04.2025

Send us Fan Mail शिकार करुन विजयाच्या उन्मादात चाललेला चित्ता आणि त्यानं त्याच्या तोंडात पकडलेली ती निष्प्राण माकडीण. नाही म्हंटलं तरी ते चित्र पाहुन मन हेलावून गेलंच. कदाचीत त्या माकडीणी साठी नसेल, पण तीला तेव्हड्याच विश्वासांनं बिलगून बसलेल्या पिल्लासाठी.  त्या निरागस लेकराला कदाचीत माहीत आहे का नाही कुणास ठाऊक, की आपल्या आईची शिकार झाली आहे. त्याला एव्हडंच माहीत की आईच्या कुशितील सुरक्षितता जगा...

# 1729: ४४० फूट जमिनीखाली १८० दिवस ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 06.04.2025

Send us Fan Mail सिफ्रेने गुहेत पूर्णपणे एकटे राहण्याचा स्वेच्छेने निर्णय घेतला होता.  घड्याळे नाहीत सूर्यप्रकाश नाही वेळेचा मागोवा घेण्याचा कोणताही मार्ग नाही त्याला हे जाणून घ्यायचे होते: * मेंदू पूर्णपणे एकाकीपणाला कसा प्रतिसाद देतो * जेव्हा तुम्ही दिवस - रात्र या नैसर्गिक चक्रांपासून तुटता तेव्हा काय होते जगाला वाटलं की तो वेडा आहे. १९७२ मध्ये, सिफ्रे टेक्सासमधील एका गुहेत ४४० फूट जमिनीखाली उत...

# 1728: कृष्ण जगावा लागतो..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 05.04.2025

Send us Fan Mail एकदा द्वारकेत सत्यभामेने कृष्णाकडे हट्ट धरला की, 'मला तो पारिजात माझ्या अंगणात हवा. किती छान सुवास आहे त्याला!  तो पारिजातक माझ्या अंगणातचं लावा.' कृष्ण हसला, त्याने समजुतीच्या स्वरात सत्यभामेला सांगितलं, "सत्यभामे, पारीजातक हा अमूल्य आहे !त्याचा सुवास जितका मनमोहक, तितकं त्याचं बहरणं कठीण! पारिजातक एका जागेवरून दुसऱ्या मातीत हलवला तर रुजत नाही आणि रुजला तर, याची फु...

# 1727: "जर मला वनवास झाला नसता, तर..." कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 05.04.2025

Send us Fan Mail "आणि कैकयी मातेच्या  या एका क्षुल्लक चुकीला आपण अपराध तरी कां समजायचं भरता ?... जर मला वनवास झाला नसता, तर हे जग 'भरत' आणि 'लक्ष्मण' या भावंडांचं अतुल्य भ्रातृप्रेम कसं पाहू शकलं असतं ?  

# 1726: चेतक आणि शुभ्रक. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 03.04.2025

Send us Fan Mail एके दिवशी, तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल, कुंवर साहिब यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली... आणि त्यांची शिक्षा अंमलात आणण्यासाठी त्यांना 'जन्नत बाग' येथे आणण्यात आले. राजकुमाराचा शिरच्छेद करून त्या डोक्याचा वापर करून, त्यावर पोलोचा खेळ खेळण्याचा निर्णय घेण्यात आला. कुतुबुद्दीन स्वतः राजकुमाराच्या घोड्यावर, शुभ्रकवर, स्वार होऊन त्याच्या खेळाडूंच्या पथ...

# 1725: कामवाली बाई लेखिका: आसावरी सुधीर हंजे कथन: (आसावरी हंजे. ) 02.04.2025

Send us Fan Mail कारखाना कसा सुरू असतो ना,तसेच स्वयंपाक घराचे असते. एकदा सुरू झाला की थांबायचे नावच घेत नाही.लवकर उठा,मग फ्रीज मधील दूध काढा,ते तापवा,आणि सर्वासाठी आलं गवती चहा चा मस्त चहा बनवा! नंतर थोडाफार योगा उरकून ,अंघोळ करून कणिक मळून भाजीची तयारी. ते झालं की कामवाली मावशी हजर.तिच्यासमोर अक्षरश: कामे टाकावी लागतात.कारण तिचा वेग फारच असतो आपल्यापेक्षा!

# 1724: "मेंदीच्या पानावर." कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 01.04.2025

Send us Fan Mail एकदा एक काव्य पं. हृदयनाथ यांच्या वाचनात आले. ते त्यांना एवढे भावले की लगेचच ते स्वरबद्ध केले. हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले. पण या गडबडीत पं. हृदयनाथ हे गीतकाराची परवानगी घ्यायला मात्र विसरले. पं. हृदयनाथांच्या परिचितांनी  "हे कवी खूप तापट आहेत. ते  कोर्ट कचेरी करतील" म्हणत घाबरवले.  त्या कवींनी नोटीस न देता या गाण्याच्या स्वरसाजाची स्तुती करुन आणखी काही गाणी पाठवली होती...

# 1723: "हिम्मत जिथे, विजय तिथे." ओशो. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 01.04.2025

Send us Fan Mail बैलाचे पाऊल घसरले आणि तो त्या आडबाजूच्या खोल विहिरीत पडला.  शेतकऱ्याने हे पहिले आणि मनात विचारांचे काहूर उठले. "बैल वाचवावा की नाही? तो बैल म्हातारा झाला होता...." बैलाने पाहिले की हे लोक त्याला जिवंत गाडत आहेत!   हळूहळू बैलाचा हंबरडा मंदावत गेला आणि एका क्षणी तो गप्प झाला......!

# 1722: "गुरुजी, तुमचे गुरु कोण आहेत?" लेखक ओशो. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 30.03.2025

Send us Fan Mail माझा पहिला गुरु एक  चोर होता. माझा दुसरा गुरू होता एक कुत्रा. माझा तिसरा गुरू म्हणजे एक लहान मुलगी होती.   "मला हे सांग की या दिव्यात हा जो प्रकाश तेवतोय, तो कुठून आणलास?"  त्या मुलीने क्षणभर विचार केला आणि मला काही कळण्याच्या आत त्या दिव्यावर फुंकर घालून तो तिने विझवला आणि म्हणाली,  "आता इथे जी ज्योत होती, ती कुठे गेली?  ती जिथे गेली, तिथूनच हा प्रकाश आला." 

# 1721: "आम्हाला तुम्ही जन्माला तरी का घातले?" लेखक अभय भंडारी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 29.03.2025

Send us Fan Mail अमिताभ महाशय घुश्शात होते. ते तडक घरी गेले आणि वडिलांसमोर उभे राहून त्यांना विचारले - तुम्ही आम्हाला जन्माला का घातलं ? आमच्यापोटी जन्माला यायचं आहे का ? असं विचारायचं तरी !" हरिवंशरायजी म्हणाले, "माझ्या असं लक्षात आलं, कि माझ्या वडिलांनीही मला काहीही  न विचारता जन्माला घातलं. आमच्या आधीही  बरीच वर्षे हे असंच चालू होतं." "तू हुशार आणि शहाणा आहेस. तू मुलांना जन्...

# 1720: "जिवंत वाळवणे". लेखक : सई लळीत. कथन : ( मृदुला जोशी ) 28.03.2025

Send us Fan Mail कोकणातील अंगणं मे महीन्यात नटलेली दिसतात. आंबे भरपूर असले की गोड आंबट मिरमि-या डिकाळया तिखटा बिटक्या काळया, शेंदरी, उग्रट सगळया प्रकारच्या आंब्यांचा रस काढतात. स्टिलच्या ताटाला तुपाचा हात लावून हा रस ताटात ओततात. एकदम जाड थर देत नाहीत. मध्यम देतात. रस चांगला वाळायला हवा. मग दुस-या दिवशी परत दुसरा थर देतात. असे पाच सहा थर देतात. रोज नवे आंबे नवा रस. त्यांचा रंग रोज बदलतो. पिवळा ते...

Listen to the Life of Stories podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.