Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Author
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Category
Podcast website
Latest episode
Jul 7, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
# 1768: "मैत्रिणीचं नातं." कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 27.05.2025 7:40
Send us Fan Mail एक काळ असा होता जेव्हा आमच्या वर्गाच्या मध्यभागी एक चीनची भिंत उभी होती. एका बाजूला मुलं दुसरीकडे मुली. इकडून तिकडे बोलणं हे भयंकर लाजिरवाण. पण म्हणून नजर वळायची थोडीच राहते?.. पुरुष म्हणून आपल्या वाढीमधला एक सुरेख टप्पा मैत्रिणीच्या नात्याचा असतो, पण तशा मैत्रिणी मिळायचं भाग्य मात्र लागत. या नात्याची मजा आस्वादायची असेल तर त्याला ‘मानलेली बहीण’ वगैरे बनवू नये! मैत्रिणीचा नातं म्...
# 1767: नाव नसलेलं भांडं. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 26.05.2025 5:41
Send us Fan Mail लग्नकार्यात वा अन्य प्रसंगी आलेली भांडी पहा, त्यात वर्गवारी होत असे. नांव घातलेली व नांव न घातलेली भांडी वेगळी केली जात असत. नांव असलेली भांडी वापरात घेतली जायची. व नांव नसलेली भांडी प्रसंगा प्रसंगाने देवाण,घेवाणीसाठी वापरली जात असत. तर अशी ही नांव नसलेली भांडी बेवारस असल्यासारखी या हातातुन त्या हातात, या घरातुन त्या घरात नुसती फ़िरत रहायची, उपयोग काहीच नाही.
# 1766: ह्रदयस्पर्शी खटला. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 24.05.2025 4:16
Send us Fan Mail सातारा न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला. वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही, त्या साठी लहान भावाने न्यायालयात मोठ्या भावा विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावे. मी ही त्यांचा मुलगा आहे. माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे. माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली २५ वर्...
# 1765: भारताची गुप्तहेर ‘सेहमत‘. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 23.05.2025 6:57
Send us Fan Mail पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताच्या ॲापरेशन सिंदूर अंतर्गत हवाई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला अभिमान वाटेल अशा एका भारतीय महिला गुप्तहेराची कहाणी ऐकुया. ही कहाणी ऐकून राष्ट्राप्रती धैर्य आणि समर्पणाची नवीन व्याख्या तुम्हाला कळेल. या भारतीय गुप्तहेराची कहाणी 1971 च्या युद्धाशी जोडलेली आहे. दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या जम्मू आणि क...
# 1765: मिले सूर मेरा तुम्हारा ऽऽऽ. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 23.05.2025 10:13
Send us Fan Mail "मिले सूर मेरा तुम्हारा ssssss" हे गाणे माहीत नाही असा एकही भारतीय नसेल. इतकं हे गाणं सगळ्यांच्या हृदयात वसलेलं आहे. हे गाणे जितके श्रवणीय तितकीच त्याच्या निर्मितीची कहाणी देखील अद्भुत आहे. झालं असं की, त्या वेळचे पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या मनात एक विचार आला की, तरुणांना विशेषतः लहान मुलांना प्रेरित करणारे आणि एकतेचा संदेश देणारे एखादं गाणे तयार करून ते दूरदर्शनव...
# 1764: नैराश्याला करा ‘टाटा!‘, ‘बाय् बाय्!!‘ ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 23.05.2025 6:04
Send us Fan Mail मनोचिकीत्सकाने त्यांना तपासले. त्यात त्यांना सर्व काही ठीक दिसले. आता त्यांनी बोलायला सुरुवात केली. काही खाजगी प्रश्नही विचारले आणि त्यांच्या पत्नीला, सुलभाला, बाहेर बसायला सांगितले. त्यांनी अंकुशला बोलते केले... "खूप त्रासात आहे हो मी... काळजीच्या ओझ्याने दबला गेलोय... नोकरीचा ताण... मुलांच्या शिक्षण आणि त्यांना नोकरी मिळेल की नाही याची काळजी.. घरासाठी घेतलेले कर्ज, गाडीसाठी...
# 1763: बॅाम्बे ब्लड ग्रुप. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 21.05.2025 4:15
Send us Fan Mail काही महिन्यांपूर्वी रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात अंजली हेळकर प्रसूतीसाठी दाखल झाली. चिरेखाणीवर काम करणाऱ्या अंजलीची हिमोग्लोबिन पातळी होती केवळ सहा. त्यामुळे प्रसूतीसाठी रक्त पुरवणे गरजेचे होतेच. लगेचच रक्तगटाची तपासणी केली गेली. आणि रिपोर्टमध्ये 'ओ' पॉझिटिव्ह रक्तगटाची नोंद झाली. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण खरी मेख पुढेच होती. 'ओ' गटाचे रक्त चढवण्य...
# 1762: वयाची अट नाही. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 21.05.2025 13:36
Send us Fan Mail माझी आजी कृष्तक्का कधी शाळेत गेली नाही, तिला लिहिता-वाचता येत नसे. दर बुधवारी ते साप्ताहिक आलं, की मी ही कथा तिला वाचून दाखवत असे. त्यावेळी तिला सगळ्या कामाचा विसर पडे. ती अक्षरश: जिवाचा कान करून त्यातला प्रत्येक शब्द ऐकत असे. ऐकून झाल्यावर तिला त्या कथेचा शब्दन्शब्द मुखोद्गत झालेला असे. माझी आजीसुद्धा कधीच काशीला गेलेली नव्हती, त्यामुळे कादंबरीतील त्या म्हाताऱ्या आजीबाईशी तिला खू...
# 1761: कर्नल साहेब विहीरीत! ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 19.05.2025 1:08
Send us Fan Mail सैनिकी शिस्तीचा अतिरेक, आणि ‘नियम हे नियम’ या वृत्तीची मिश्कील खिल्लीही ह्या कथेत आहे.
# 1760: संथारा किंवा सल्लेखना. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 19.05.2025 7:57
Send us Fan Mail जैन धर्मियांच्या संथारा व्रत अथवा सल्लेखना वर बंदी घालण्याच्या जयपूर उच्च न्यायालयाच्या २०१५च्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. याच संथारा किंवा सल्लेखना याची माहिती आणि महती सांगणारा हा लेख लिहिला आहे डॅा कल्याण गंगवाल यांनी. ते म्हणतात, वस्तुतः संथारा ही आत्महत्या नसून तो देहत्याग आहे. तो मृत्युमोहोत्सव आहे. हे व्रत म्हणजे परमसाधना आहे वैराग्य आहे व तृप्त जीवन...
# 1759: "प्रिय कोण? जीवलग मित्र की पती?...!" लेखक रमेश नागपुरे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 19.05.2025 19:24
Send us Fan Mail तो एक काल्पनिक खेळ होता. सर म्हणाले, "तुम्ही या बोर्डवर तीस पस्तीस व्यक्तींची नावे लिहा. ज्यांच्यावर तुम्ही खूप जास्त प्रेम करता त्याचं नाव आधी लिहा." "आता चार, दहा, पंधरा... जणांची नावे तुमच्या आयुष्यातून कायमची डिलीट करा कायमची !" हळू हळू फळ्यावर फक्त चार नवे उरली. तिचे आई वडील, तिचा जिवलग मित्र आणि तिचा पती. तिच्या आयुष्यात तिने कोणा एकाला प्राधान्य दिले? ते...
# 1758: "ते चिंचेचे.. प्रेमाचे झाड". लेखिका : नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 17.05.2025 6:16
Send us Fan Mail आमच्या सोसायटीच्या दारातच चिंचेचे झाड आहे. हळूहळू ते मोठ होत जाताना बघणं फार आनंदाच वाटत होत. एके दिवशी बघितलं तर गुलाबी पिवळसर रंगाची फुलं दिसली..एकदा मैत्रीण आली. म्हणाली, "आमचं घर म्हणजे फक्त दोन छोट्या खोल्या होत्या . दारात एक भलं मोठं चिंचेचे झाड होतं. त्याच्या सावलीतच आम्ही अभ्यास केला. गप्पा मारल्या. बाबा आणि आजोबा त्याच्या सावलीत झोपायचे. या झाडाला आज स्पर्श करून खू...
# 1757: निसर्गरम्य पहलगाम. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 16.05.2025 6:28
Send us Fan Mail पहलगाम हे भगवान शिवाशी देखील संबंधित आहे. हिंदू परंपरेनुसार त्याचे जुने नाव बैल गाव होते हिंदू मान्यतेनुसार, भगवान शिव यांनी अमरनाथ गुहेत प्रवेश करण्यापूर्वी येथे आपला बैल (नंदी) सोडला होता, ज्यामुळे हे गाव पूर्वी बैल गाव म्हणून ओळखले जात असे. या बद्दल ची एक गोष्ट प्रचलित आहे. एकदा आई पार्वतीला भगवान शिवाच्या अमरत्वाचे कारण जाणून घ्यायचे होते. यानंतर भगवान शिव यांनी माता पार्वतील...
# 1756: एक रुपयात पोटभर आनंद." लेखक रवींद्र पिंगे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 15.05.2025 12:37
Send us Fan Mail ‘‘पिंगे, तू अगत्याने तुझा ' नाच रे मोरा' विषयी अनुभव कळवलास त्याचा आनंद झाला. स्वर चिरंतन असतात. म्हणून तर भास्करबुवांच्या चाली शंभर वर्षं टिकून आहेत. एका चित्रपटासाठी मी बांधलेली चाल लोकांनी आपली मानली. आपलीशी केली. ती चाल पु.ल.देशपांडेंची आहे हे लोक विसरलेसुद्धा! पण कोमल सूर जिवंत आहेत." हे वाचले आणि माझं भान हरपलं. कलावंताच्या आयुष्याचे सार्थक कशात असतं ते पु....
# 1755: ग्रंथपाल योद्धा, आलीया. ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 14.05.2025 7:08
Send us Fan Mail इराकमधील बसराच्या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या आलिया मोहम्मद बाकर या ग्रंथपाल होत्या. 2003, इराकमध्ये आलियांनी युद्धाचे संकट लक्षात घेऊन, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, ग्रंथालयातील 30,000 हून अधिक पुस्तके लोकांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवली. केवळ आपल्या देशाचा ज्ञान आणि सांस्कृतिक वारसा वाचवण्यासाठी !
# 1754: आजी निघाली अमेरिकेला. लेखिका: शोभा पिंगळे. कथन: ( आसावरी हंजे.) 13.05.2025 6:45
Send us Fan Mail एक दिवस आदित्यच्या वडिलांना एक कल्पना सुचली.नोकरीमुळे आपल्या दोघांना अमेरिकेला जाता येत नाहीय,पण आजीला पाठवलं तर आदित्यकडे? ती हुशार आहे,तिची तब्बेत ही ठणठणीत आहे.आणि महत्वाच म्हणजे तिचा आदित्यवर फार जीव आहे. आजीचा हा पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे आपण ऑक्सिजन वरच आहोत अस आजीला वाटत होतं.सुदैवाने एअर होस्टेस चांगली होती. तिनं आजीला जास्तीची फळं, बिस्किटे दिली.
# 1753: सावधान! तुमच्या घराखालून भूगर्भातील पाण्याचा प्रवाह नाही ना? मुलाखत डॉ अविनाश खरात. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 12.05.2025 17:11
Send us Fan Mail आपल्या घराच्या भूपृष्ठा खालून 300 ते 500 फूट वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे सिद्ध करणारे संशोधन पुणे येथील डॉ. अविनाश खरात यांनी केले आहे. पाण्याच्या प्रवाहाचे अजूनही खूप काही अपघाता सारखे दृश्य परिणाम आपल्यावर होत असतात. ह्या आगळ्या पण जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांची मुलाखत ऐकुया.
# 1751: वाळूतील शिवलिंगे...... (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 11.05.2025 6:20
Send us Fan Mail गरजे पुरते अन्न मिळाले की तो थांबायचा. जास्तीचे गरजूंना द्यायचा. मग तो पैसे साठवू लागला काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी. गंगेत स्नान करायला उतरला तेव्हा पैसे वाळून पुरून वर शिवलिंग रचले. वर येऊन पाहतो तर सर्वत्र शिव पिंडी दिसू लागल्या!....
#1752: "गाढवाची हजामत." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 11.05.2025 4:18
Send us Fan Mail न्हावी म्हणाला, 'हे काय, तुझ्या डोक्यावरची सर्व लाकडे तू दिलीच नाहीस व पैसे मागतो?' तुझ्या या कु-हाडीचा दांडासुध्दा लाकडाचाच आहे व तोसुध्दा द्यायला हवास.' लाकूडतोडयाने गयावया केली करत सर्व लाकडे दिली असे सांगून पुन्हा पैशाची मागणी केली. न्हाव्याने बळजबरीने कु-हाडीचा दांडा काढून घेतला व चार आणे देऊन त्याची बोळवण केली. बिरबलाकडे तक्रार गेल्यावर तो हसला........!
#1750: "मध्यमवर्गीय मिनीमॅलीझम". लेखिका संध्या घोलप. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 10.05.2025 6:35
Send us Fan Mail एका ज्येष्ठ नागरिकाची एक खोली फक्त रद्दी पेपर ने भरलेली होती. एकटेच राहत होते. इतका कुबट वास पसरला होता घरभर की विचारूच नका. म्हणायचे, जेव्हा पैश्याची गरज असेल तेव्हा एकदाच विकून टाकीन म्हणजे भरपूर पैसे मिळतील! बाईंची मूले परदेशात होती. त्यांचे घर साड्या, कपडे, खरे खोटे दागिन्यांच्या यांच्या गाठोड्यानी गच्च भरलेलं होतं. डायनिंग टेबलवरही एवढी गर्दी की ही एकटी असूनही जेवायला ते वा...
# 1749: खरा श्रीमंत लेखक: मोहन रावळ. कथन: ( आसावरी हंजे.) 02.05.2025 5:48
Send us Fan Mail एकदा उन्हाळ्यात शेतकऱ्याने दहा हजाराचे कर्ज सावकाराकडून घेतले होते. परंतु शेतीचे काम सुरू असतानाच त्याच्या मुलीचे लग्न ठरले.त्यासाठी पाच हजार रुपयांची गरज होती. सावकार दहा हजाराच्या बदल्यात शेतकऱ्यांकडून अकरा हजार रुपये दिवाळीला घेत असे. शेतकऱ्याने खिशातून एक रुपयाचे नाणे काढले व सावकाराच्या हाती देत म्हणाला," लक्ष्मीचे दर्शन घडवण्याची ही किंमत. हा रुपया देऊन मी आज सावकार झाल...
# 1748 : चातक पक्षाची गोष्ट लेखिका- मीनाक्षी केतकर. कथन- (आसावरी हंजे.) 01.05.2025 5:35
Send us Fan Mail तहानेने प्राणी व्याकुळ होऊन इकडेतिकडे हिंडू लागले.काही जणांच्या लक्षात आले,आपल्या जंगलात नदीच नाही.त्यामुळे आपल्या पाणी मिळत नाही. सगळेजण मग डोंगरापलीकडच्या जंगलात गेले.तिथे एक नदी वाहत होती. " नदीबाई ,आमच्या जंगलात येतेस का? पाण्यावाचून आमचे खूप हाल होतात" प्राणी म्हणाले. " कशी येऊ?" नदीने विचारले. नदीचे काम चालू असताना एक पक्षी मात्र झाडावर निवांत बसून राहिला...
# 1747: "घोटभर पाण्यासाठी" लेखक : आसाराम लोमटे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 30.04.2025 8:15
Send us Fan Mail कोरड्या विहिरीतील एक भांडं पाणी भरण्यासाठी त्या दोघींची अर्ध्या तासाची धडपड उघड्या डोळ्यांनी पाहिली तेव्हा पाण्याच्या थेंबाची किंमत या माणसांना कशी आणि किती चुकवावी लागते या कल्पनेने अंगावर काटा आला . जे पाणी निघालं ते अत्यंत गढूळ होतं , पण तेच त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी होतं .
# 1746: ओव्यांमधील रुक्मिणी लेखिका: अरुणा ढेरे. कथन:(आसावरी हंजे.) 29.04.2025 6:27
Send us Fan Mail या बायकांना विठ्ठलावर रुसून दूर राहिलेल्या रुक्मिणीच मन चांगलं ठाऊक आहे. असं एकट रहाणं लग्नाचं नातं न तोडताही नवऱ्यापासून दूर राहणं, काय सोपं असतं काय? पण तरी रुक्मिणी विठूचा गाजत्या मंदिरात त्याच्या शेजारी नाही उभी राहिली. लग्नाआधीच राधेवरच त्याचं प्रेम तिला माहित असेलही,पण लग्नानंतर इतक्या वर्षांनी तिनं पुन्हा त्या दोघांना तस पाहिलं आणि ती वंचनेच्या जाणिवेनं तडफडली.
# 1745: खाद्य संस्कृतीचा मेळ लेखिका: तनुलता पालखे. कथन: ( आसावरी हंजे.) 28.04.2025 2:54
Send us Fan Mail मी मुंबईत जन्माला आले,साहजिकच इथले फास्ट फूड, वडा पाव आणि पावभाजी माझ्या डीएनए मध्ये आले. वांगी म्हणजे माझा शत्रू क्रमांक १.तर या जळगाव करांचे वांग्यावर निस्सिम प्रेम.इतके की सासरे निगुतीने वांग्याची भाजी करत.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.