Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Be sure to visit the podcast's website and support the creator: lifeofstories.buzzsprout.com
Author
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Category
Podcast website
Latest episode
Oct 10, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
# 1875: "तळतळाट घेऊच नये कुणाचा" लेखिका : वैशाली पंडित. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 20.10.2025 6:00
Send us Fan Mail गर्दीत वाट काढत एस टी च्या आत घुसणार तोच मला बघून कंडक्टर एकदम ओरडला. " ओ, या बाईला आधी चढू द्या. ते दिवसा या बाईन् दिलेला शाप लागला मला.दोन दिवस जेवनाचे वांदे झालेले." मी उभी थरारले.मी दिलेला शाप ? नाही रे बाबा , माझ्यासारखी सामान्य लेकुरवाळी गृहिणी कसला शाप देणार ? गाडीत चढल्यावर आतून जाणवलं की हा शाप बाईने कुठे दिला होता ? हा तळतळाट 'आईचा' होता. कोणीही आतून...
# 1874: ED. ची कमाल! सक्तवसुली संचालनालय. ( प्रा सौ अनुराधा भडसावळे. ) 19.10.2025 2:56
Send us Fan Mail एक शिक्षक छातीत दुखतं असल्यामुळे तपासणीसाठी मोठ्या हॉस्पिटलमध्य गेले. डॉक्टरांच्या टीमने आजच्या आज बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला . ऑपरेशन साठी फॉर्म भरताना व्यवसाय हा कॉलम आला तेव्हा ऑपरेशनच्या टेन्शनमुळे त्या कॉलमच्या पुढे त्यांनी E.D. अस लिहलं. आणि मग ... हॉस्पिटल मधलं सगळं वातावरणच बदललं ...डॉक्टरांची दुसरी टीम चेकअप करायला आली.आणि मग डॉक्टरांच्या टीमने निर्णय घेतला ......
# 1873: "ऐकताय ना, आमच्या खरेदीचा मूर्खपणा?" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 17.10.2025 8:30
Send us Fan Mail “काय हो, तुमच्याकडे व्हॅक्युम क्लिनर आहे?”* “ होय आहे !." “कधी घेतलात?”* “झाली की १५-२० वर्षे.” “व्वा, शेवटचा कधी बाहेर काढला वापरायला, आठवतो का?”* “झाली असतील ४-५ वर्षे. मुलीच्या लग्नाच्या वेळी काढला होता कि बहुतेक. !” “आता कुठे असतो.”* “माळ्यावर असेल बहुदा?. हिला माहीत आहे.” “मग नेहमी लागत नाही घर व्हॅक्युम करायला?”* “अहो, तो वापरणं फार कटकट आहे हो! मी तर हिला म्हणतो म...
# 1872: हुप... हुप...! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 10.10.2025 12:12
Send us Fan Mail त्या प्राणीप्रेमी मंडळींनी एका व्हेटर्नरी डॉक्टरला शोधून आणले... त्याने त्या माकडीणीला तपासले.. पाठीच्या कण्याला हात लागला की ती किंचालत होती.. "पाठीच्या कण्याला फऱ्याक्चर हाय.. काय करायच? 'तुमास्नी त्याची दया आसल तर आपरेशन करावं लागलं.. न्हाई तर द्या सोडून.. त्यातील काही लोक बोलू लागलं.. 'जाऊ दे की बोंबलत.. न्हाई तरी ही माकड लई नुकसान करत्यात.. काई बी ठेवत न्हाईत.....
# 1871: मज्जापेशीतील मजा मजा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 09.10.2025 16:15
Send us Fan Mail डेल आणि लोवी या शास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगातून असं सिद्ध केलं की, मेंदूतील संदेशवहन जसे इलेक्ट्रिकल आहे तसंच ते रासायनिक म्हणजे ‘केमिकल’ आहे. या प्रयोगाचं चित्तथरारक वर्णन डॉ. सिद्धार्थ मुखर्जी यांच्या ‘साँग ऑफ द सेल’ या पुस्तकात सापडतं. ते लिहितात, ‘‘विचारी मज्जापेशी एकमेकींशी दोन भाषांमध्ये बोलतात. इलेक्ट्रिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल!’’ पहिलं जीवरसायन-Neurotransmitter साप...
# 1870: आपण चॅाकलेट का खातो? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 08.10.2025 7:34
Send us Fan Mail लाडू, जिलबी, गुलाबजाम हेदेखील गोडच पदार्थ! हे पदार्थ भरमसाट खाल्ले जातात ते फक्त लग्नाच्या पंगतीत पैज जिंकण्यासाठीच! एरवी नाही. मग चॉकलेट खायचा सपाटा का लागतो? शिवाय चॉकलेट गोड असतं ते आता! पण सुमारे पंचवीसशे वर्षांपूर्वी, अमेरिकेतल्या माया संस्कृतीतले लोक कडू कोकोबिया, तिखट मिरच्या आणि बेचव मक्याचं पीठ पाण्यात मिसळून, उकळून, घुसळून फेसाळ पेय बनवत. त्याचं नाव होतं, ‘xocolatl’ (झॉक...
# 1869: "छू SS टॉमी, छूss !" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 07.10.2025 3:16
Send us Fan Mail दुपारी मेकॅनिक हॉलमध्ये शिरला. सोफ्याजवळ खतरनाक डॉबरमॅन झोपला होता. तो बिचकला, पण कुत्र्याने त्याच्याकडे पाहिलं आणि परत डोळे मिटले. मेकॅनिक ए.सी. कडे गेला तर तो पोपटाचे सुरु झाले, "ए चोरा! काय करतोस रे?".......
# 1868: "जग काय म्हणेल?" लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 06.10.2025 8:19
Send us Fan Mail खूप मोठं जगावेगळं काही करायची आपल्यात हिम्मत नसते. पण अगदी लहान सहान गोष्टी करायला का लाजायचे ? अगदी साधी गोष्ट म्हणजे हॉटेलात हातानी डोसा खाताना सुद्धा..." आसपासचे लोक काय म्हणतील ?" यासाठी आपण घाबरतो. काटे चमच्यांनी कसरत करत डोसा खातो. त्यापेक्षा गरम कुरकुरीत डोसा हातानी मस्त खाऊन घ्यायचा.....
# 1867: चिन्ह-भाषेचा अर्थ-अनर्थ. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 05.10.2025 7:45
Send us Fan Mail परवा असंच झालं, सौम्याच्या शाळेच्या ग्रुपवर एका प्रोजेक्टच्या चर्चेत बराच वेळ गोंधळ चालला होता. अगदी भांडणंच म्हणा ना! कारण होतं की चर्चा करताना काहीजण न वाचता भराभर फक्त अंगठ्याचे इमोजी टाकत होते, तर काहीजण वेगवेगळे चेहरे! पण त्यावरून प्रोजेक्टमध्ये कोणते मुद्दे घ्यायचे, कोणते नाही, हे कळतंच नव्हतं. चर्चा होतच नव्हती. पुन्हा पुन्हा विचारलं तरी कुणीही आपलं मत शब्दांत सविस्तर लिहून...
# 1866: औषधांच्या गोळीला कसं कळतं? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 04.10.2025 8:31
Send us Fan Mail गोळी म्हणजे केवळ एक गाठोडं असतं, औषधाच्या इवल्याइवल्या कणांचं. तसली बहुतेक गाठोडी जठरात (stomach) सुटतात. काही औषधांना जठरातलं अॅसिड सोसत नाही. म्हणून त्यांची गाठोडी लहान आतड्यात (small intestine) पोचल्यावरच सुटावी अशा बेताने बांधलेली असतात. काही गाठोड्यांतले कप्पे टप्प्याटप्प्याने उघडतात आणि एकामागोमाग एक वेगवेगळी औषधं वेगवेगळ्या वेळी, काही जठरात, काही लहान आतड्यात तर काही मोठ्या...
# 1865: जाहिरातीतील खाचाखोचा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 03.10.2025 6:53
Send us Fan Mail जाहिरातीत जर जीवाला घातक ठरू शकेल अशी एखादी कृती दाखवली असेल तर त्याच वेळी जाहिरातीच्या तळाशी ‘असे कृत्य करू नये. त्यामुळे अपघात होऊ शकतात’, असे दाखवणे जरुरीचे आहे. कोणीतरी सेलिब्रिटी उंचावरून उडी घेतोय, किंवा कशाचीही मदत न घेता उंचावर चढतोय वगैरे साहसी दृश्ये सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिरातीत हमखास आढळतात. त्या साहसी दृश्यात काम करणारे सेलिब्रिटी नसतात, तर ते त्यांचे डुप्लिकेट असतात. त्...
# 1864: "देव कधीही हिशोब मागू शकतो" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 02.10.2025 6:12
Send us Fan Mail एक महिला दुकानात आली आणि म्हणाली, "सेठ, तुमचे दहा रुपये घ्या... !" "तुम्ही "७ किलोमीटर अंतरावरून दुसऱ्यांदा आला आहात, मला हे दहा रुपये देण्यासाठी?" त्या महिलेने सहज उत्तर दिले, "हो, मी दुसऱ्यांदा आले आहे. मनःशांतीसाठी हे करावेच लागले. माझा नवरा आता या जगात नाही, पण त्याने मला एक गोष्ट शिकवली आहे, "दुसऱ्याच्या मा...
#1863: "जिथे फक्त ‘वाटणं‘ संपून ‘वाटून घेणं‘ सुरू झालय". लेखक :अज्ञात. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) ) 01.10.2025 5:07
Send us Fan Mail लग्नाला पस्तीस वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ... "तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?" तो बावचळला ...गोंधळला ... आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... ! बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं... हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ... लाईन लागेल नवऱ्यांची ... त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..!
#1862: "पुस की रात" लेखक प्रेमचंद. तळटिपा : आसाराम लोमटे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 30.09.2025 7:23
Send us Fan Mail "तुम्ही इथे आमराईत जाळ करून झोपून राहिलात आणि तिकडे सगळ्या पिकाचा सत्यनाश झालाय." असं म्हणत मुन्नी नवऱ्याला जागं करते. हलकू आणि त्याची बायको शेताची झालेली दशा पाहतात. बायको चिंतित झालेली असते पण हलकूच्या चेहऱ्यावर मात्र समाधान असतं. बायको म्हणते, "आता मजुरी करून मालगुजारी भरावी लागेल." हलकू अतिशय आनंदाने म्हणतो, "गेलं तर जाऊदे पीक. रात्री मरणाच्या...
# 1861: "शिक्षण विद्या देतय तशी लाजबी देतय" लेखक विशाल गरड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 29.09.2025 3:42
Send us Fan Mail टपरीपुढच्या बाकड्यावर डिगा नाना पेपर वाचत बसले होते. पप्याचं अगोचर बोलणं ऐकलं म्हणून न राहवून ते महाद्याला म्हणाले "आत्ता पस्तोर बापाला दहा लाख रुपायला झुपीवलंय ह्यनं. गावातल्या समद्या टपऱ्यावर अन् हाटेलात उधारी हाय ह्यजी. बापाची गाडी घेवून फिरण्याबिगिर ह्यला कायबी येत न्हाय. मोप शिकून इंजिनिअर झालाय म्हणत्यात, पण आजून रुपायाची मिळकत न्हाय. नुसतं बापाच्या जीवावर जगतंय. आ...
# 1860: "पाऊस आपल्यासारखंच वागतोय" लेखक समीर गायकवाड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 28.09.2025 8:38
Send us Fan Mail पावसाचंही तसंच झालंय. आताशा वेळ नसतो त्याच्याकडे. वर्षाची सरासरी एका दिवसात गाठतो. कधी कधी महिनाभर येत नाही कुठे तरी बिझी असतो. अचानक येतो मग. सुट्टीवर एक दिवसासाठी घरी परत आलेल्या मुलासारखा, पहाटेच येतो, त्याच दिवशी परतण्याचे वेध डोळ्यात घेऊन. विचारलं तर म्हणतो "आता मन रमत नाही गं आई". पावसाचंही तसंच झालंय. त्याचं आता मन रमत नाही. आता तो बसरतो फक्त 'बॅकलॉग'...
# 1859: देवाचा ओव्हरटाईम. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 27.09.2025 5:25
Send us Fan Mail परवा देव भेटला होता. माणसं बनवतांना काय त्रास होतो ते सांगत होता. म्हणाला, फार कष्टाचे काम, जरा उसंत नाही, नाही आराम. म्हणजे आकार साधारण सारखे असले तरी चालतात; पण डिझाईन्स वेगवेगळी बनवावी लागतात. म्हणून साचा बनवून भागत नाही, कारण सरळ नाकावर प्रत्येक वेळी टपोरे डोळे शोभतीलच असं नाही. आणि गोल चेहऱ्याला एक सारखी जिवणी लावून चालत नाही, म्हणूनच त्रास होतो.
# 1858: बिघाड. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 26.09.2025 6:07
Send us Fan Mail फ्रिज बिघडला. टीवी बंद. वाय-फाय डाऊन. शनिवारी सकाळपासून घरात अघोषित आणीबाणी जाहीर झाल्यासारखं वातावरण होतं. "आता ह्यालाही काहीतरी झालं वाटतं!" – तो कपाळावर हात मारत फ्रिजकडे पाहत होता. सहा वेळा प्लग काढून लावला. टीव्हीचा रिमोटही चालेनासा झाला. नेट कनेक्शन गायब. सगळीकडे जणू "No Signal". तो चिडून म्हणाला, "हे घर आहे की सर्वसंकट केंद्र? दर आठवड्याला आपलं काही...
# 1857: तपस्वी महर्षी धोंडो केशव कर्वे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 25.09.2025 7:15
Send us Fan Mail डॅा. राजेंद्रप्रसाद भाषणासाठी उठले. पण ते जेव्हा माईककडे न जाता, व्यासपीठाच्या पाय-या उतरू लागले तेव्हा मात्र सारेच बुचकळ्यात पडले. राष्ट्रपती खाली उतरले. चालत चालत पहिल्या रांगेतल्या त्या विशिष्ट खुर्चीपर्यंत गेले आणि तिथे बसलेल्या त्या वयोवृद्ध व्यक्तीला वाकून नमस्कार केला त्यांनी! 'ती व्यक्ती कोण आहे,' हे तिथे हजर असलेल्या प्रत्येकाला माहित असल्यानं, तमाम पुणेकर जनते...
# 1856: "तिथं माझी आई राहते" लेखिका : डॉ. अश्विनी कर्वे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 25.09.2025 8:18
Send us Fan Mail खेडेगावात डॉक्टरी करणाऱ्या अश्विनीताई गावातील स्त्रियांमध्ये फार प्रिय आहेत. भिवंडीहून आवर्जून त्यांच्याकडे येणारी विठाबाई गावातील मुलीला सांगते, "तुला काही आजार झाला नं, तर नेरळला जा. तिथं माझी आई राहते". पोटाची खळगी भरण्यासाठी देहाची विटंबना करून घ्यावी लागलेल्या लांबून येणाऱ्या विठाबाईची कहाणी मनाला चटका लावणारी आहे.
# 1855: "भोंडला" लेखिका : नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 23.09.2025 8:52
Send us Fan Mail देवीचे नवरात्र बसलं की आमचा आवडता भोंडला सुरू व्हायचा . आमच्या वडिलांना आणि भावाला सुद्धा ही गाणी पाठ असायची. किती सुखाचे दिवस होते ते . सहज मिळणारा हा निर्मळ आनंद होता. आज वाड्यातल्या काकू ,ताई आठवल्या... न ओळखता येणाऱ्या वेगवेगळ्या खिरापती कौतुकानी करणारी आई आठवली... पोरी भोंडला खेळणार म्हणून अंगण झाडून घेणारी आजी आठवली... आमच्या पायाला टोचू नये म्हणून खडे सुद्धा ती उचलून टाक...
# 1854: मशिन, मटेरियल आणि मॅन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 22.09.2025 8:57
Send us Fan Mail आम्ही पुढे विविध ठिकाणी ५० मशीन्स लावल्या असतील. या दरम्यान मशीनची काच फोडणे. ड्रिंक्सच्या बटनांवर काळे फासणे, मशीनवर आपली नवे लिहिणे/कोरणे , "भलत्याच" जाहिरातींची पोस्टर्स चिकटवणे, मशीनच्या चावीच्या होलमध्ये एम - सील भरणे असे अनेक भयानक प्रकार लोकांनी मशीन्सबरोबर केले. शेवटी आम्ही प्रत्येक मशीनसाठी एक ऑपरेटर ठेवायचा निर्णय घेतला. तो ग्राहकांकडून पैसे घेऊन मग त्यांना ह...
# 1853: जरा विसावू या वळणावर. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 21.09.2025 13:34
Send us Fan Mail परवा मला एका बर्थडे पार्टीत जाण्याचा योग आला. बच्चेकंपनी एकदम आनंदात दिसत होती. एन्टरटेनर कम इव्हेंट अॅार्गनायझर मुलांचे खेळ वगैरे घेत त्यांना बिझी आणि आनंदात ठेवत होता. त्याच्या एका खेळात त्याने मुलांना त्यांचा आवडता पदार्थ विचारला. त्यावर सर्व मुलांनी सांगितलेले पदार्थ होते: पिझ्झा, बर्गर, नुडल्स, सॅंडविच, चीझी पास्ता, मन्चुरियन... आणि असेच आपल्याकडचे नसलेले इतर पदार्थ. एकाही मु...
# 1852: फ्रेम आणि फ्रेमिंग. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 20.09.2025 8:06
Send us Fan Mail जेव्हा करप्रणाली मध्ये केलेल्या बदलाला सरकार तर्फे "टॅक्स रिलीफ" किंवा "टॅक्स गिफ्ट" असे म्हटले जाते तेव्हा ते एक फ्रेमिंगच असते. किंवा जेव्हा एखाद्या गुन्ह्याला धर्माच्या रंगाने ओळखले जाते तेही एक फ्रेमिंग असते. जेव्हा एखादा नेता आपल्या कामाऐवजी आपल्या घराण्याची, धर्माची, हलाखीच्या दिवसांची कहाणी सांगत असतो तेव्हा तो फ्रेमिंगच करत असतो. जेव्हा एखादी कंपनी आ...
# 1851: फुलका कठीण नसतोच मुळी.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 15.09.2025 3:19
Send us Fan Mail त्या दिवशी रात्री मी स्वयंपाक करताना माझा छोटा मुलगा जवळ उभा राहून पहात होता. मी छोटासा फुलका लाटून तव्यावर टाकला आणि एकदा उलटून भाजून घेतला. तोवर दुसरा लाटून तयार होताच.. एका हातात पकड घेऊन तवा उचलला आणि फुलका चिमट्याने गॅसवर धरला, लगेच तो फुगून आला. मुलगा आश्चर्याने म्हणाला "झाला पण फुलका?" "इतका सोप्पा??" मी म्हणाले, "हो, कठीण नसतोच मुळी फुलका&q...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.