Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Kids MR ↓ 2071 episodes

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Author

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Category

Kids

Latest episode

Jul 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

# 1516: समुद्रातील अदृश्य लक्ष्मणरेखा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 07.07.2024

Send us Fan Mail रामायणात लक्ष्मणरेखेचे उल्लेख आहे. सुवणमृगाचा पाठलाग करत श्रीराम जंगलात दूरवर गेले आणि त्यांच्या शोधासाठी बंधु लक्ष्मणाला जावं लागलं. वनातील त्या कुटीत सीतामाईच्या रक्षणासाठी लक्ष्मणाने एक रेखा आखली, तीच "लक्ष्मणरेखा" म्हणून ओळखली जाते. ही रेखा सीतामाईंनी ओलांडल्या नंतरच सगळं रामायण घडलं. या पृथ्वीतलावर मात्र, एक अदृष्य लक्ष्मणरेखा बनलेली आहे. ही चमत्कारिक रेखा समुद्राच्...

# 1515: आयुष्य बदलवून टाकणारी साधी घटना. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 07.07.2024

Send us Fan Mail शेतकरी कुटुंबातला बावीस वर्षांचा सुशिक्षित तरूण मुलगा.  शेतातून येणार्‍या भात व वालावर वर्ष काढणारे कुटुंब. पीक न आल्याने आता  वर्षभर खायचं काय हा प्रश्न पडला. कावून जावून अचानक या मुलाने परवा आत्महत्या करायची असे निश्चित केले. आणि 'तो' भेटला. " आत्महत्या काय करतोस? धंदा करा" "पैसे नको धंदा करायला?.. बोलायला काय जातंय.. धंदा कर"!.. 

# 1514: कासवांचे गाव. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 05.07.2024

Send us Fan Mail कासवाची मादी किनाऱ्यावर येण्यापूर्वीच गावातील बरेचसे लोक किनाऱ्यावर जाऊन बसायचे. मादी येताना दिसली की, एक जागेवर शांत बसून राहायचे. तिने अंडी घालायला सुरुवात केली की, तिच्या जवळ जाऊन मागच्या बाजूने वाळू बाजूला काढून त्यात पिशवी लावायचे. वाळूत अंडी न पडता पिशवीत पडायची. मादी कासवाची अंडी घालून झाली की पिशवी काढून सगळी अंडी घरी घेऊन जायचे. आणि मग गुरांच्या गोठ्यामध्ये किंवा घराच्या...

# 1513: काडी काडी चे घरटे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 03.07.2024

Send us Fan Mail कोकणस्थी गोड-आमटी करायची  गोड जबाबदारी  नवी सून म्हणून माझ्यावर होती.  "शेजारी गॅस चालू आहे ना मग नवीन काडी कशाला पेटवली "?  "हे बघ प्रत्येकवेळी नवीन काडी लावायची नाही".  दुसऱ्या दिवशी फुरसतीत सासुमांनी मला उभे उभे तुकडे केलेली जुनी पिवळी-पोस्टकार्ड दाखवली.  त्या लांब लांब - तुकड्यांनी ह्या शेगडीवरून त्या शेगडीवरचा अग्नी प्रज्वलित करायला सोप्पा कसा पडतो त्याचं...

# 1512: मनाचे बंद दार. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 03.07.2024

Send us Fan Mail दोघींचा “रुसवा” कारण दाराचा “फुगवा”  लक्षात ठेवा “पावसाळ्यात दारं फुगतात”.  कुणी तुमच्या समोर असं धाडकन दार लावलं तर गैरसमज नसावा.  बिल्डिंगमध्ये दारांचा असा जोरात आवाज येऊ शकतो.   “नवरा बायकोचं भांडण झालं असेल” असे निष्कर्ष लगेच काढू नका".  आपण सगळ्यांनीच “मनाची दारं” मात्र* 'फुगण्यापासून वाचवूया'.

# 1511: ध्यास हवा श्रद्धा हवी , लेखिका- सुजाता लेले, कथन: ( मीनल भडसावळे. ) 01.07.2024

Send us Fan Mail आषाढी- कार्तिकी वारी वारकरी मोठ्या श्रद्धेन करतात.  ह्या वारीचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास सदर गोष्टीतून मांडला आहे.

# 1510: शल्यशास्त्र कौशल्य करांचे. लेखक : सुरेश मथुरे. वाचन : ( सौ.मधुरा कुळकर्णी. ) 30.06.2024

Send us Fan Mail सुप्रसिद्ध भारतीय सर्जन म्हणजेच शल्यविशारद सुश्रुताचार्य! त्यांनी आयुर्वेदाच्या शल्यविशारद या शाखेचे वेगळेपण प्रस्थापित  केले आहे .आणि आज केवळ पाश्चात्य जगाचेच वर्चस्व आहे असे वाटणाऱ्या ज्ञानशाखेत चकीत करणारी भर घातली.  त्यांनी १२० अध्यायांची "सुश्रुत संहिता " लिहिली.

# 1508: पंढरपूर वारीचा इतिहास भाग-१. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 28.06.2024

Send us Fan Mail वारी ही १००० वर्षांहून जुनी परंपरा आहे ज्याचे पालन करणारे वारकरी "वारी नावाच्या प्रथेचे" पालन करतात. पायी चालत जाण्याची ही जुनी प्रथा असल्याचे कारण पूर्वीच्या काळी वाहतूक व्यवस्था नव्हती त्यामुळे लोक वारीला पायीच जात होते आणि तेंव्हा पासून आजपर्यंत विठ्ठल भक्त किंवा वारकरी वारीला पायी जाणं पसंत करतात. या संदर्भात, पु. ल. देशपांडे यांनी म्हटलं आहे की, मोटारीतून जाऊन पंढरप...

# 1509: पंढरपूर वारीचा इतिहास भाग-२. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 28.06.2024

Send us Fan Mail पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान-संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला. चोर सापडला या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले. परंतु चमत्कार झाला. कोरडीये काष्ठी अंकुर फुटले ! येणे येथे झाले विठोबाचे !! सुळाला पालवी फुटली. बातमी राजापर्यंत गेली. पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास तेथे क...

# 1507: उंदीरमामा उर्फ MOUSE. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 27.06.2024

Send us Fan Mail 'मोठे मोठे लोक भल्या थोरल्या गाड्या घेवून येत होते तुझ्या दर्शनाला! त्यांच्या  वाहकांना (Drivers) अगत्यानं मोदक, प्रसाद दिला जात होताऽ आणि.. मी एवढ्या सातत्याने, भक्तीभावाने, मनापासून गेली अनेक वर्षे तुला या पृथ्वीवर नेवून आणतोय तरी माझं नखाएवढंही महत्त्व नसावं? बाप्पा कुठे कमी पडतोय मी? काय केलं म्हणजे मला महत्त्वाचं स्थान  मिळेल?' बाप्पाला थोडी मजा वाटली आणि तो थोडा वि...

# 1506: हिशेबी माणूस. लेखक पु. ल. देशपांडे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 25.06.2024

Send us Fan Mail चिकू स्वभावाच्या माणसाची चेष्टा तरी करता येते . पण ज्यांना मी हिशेबी म्हणतो त्या लोकांचा खाक्याच निराळा . पुस्तक विकत घेतल्यावर त्याला कव्हर घालून तारीख लिहून, 'पुस्तके मागू नयेत ' या कपाटात ठेवणारी ही माणसे. झोपण्यापूर्वी तीस मिनिटे ही मंडळी वाचनही करतात , आणि साहित्याच्या आनंदात डुंबण्या  ऐवजी वहीत लिहितात, 'आजचे   वाचन पाने पन्नास!. पु .ल. देशपांडे.

# 1505: सेवा करणं हा माझा अधिकार आहे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 25.06.2024

Send us Fan Mail ते पुन्हा हसत म्हणाले, 'डॉक्टर पोरगं तुमचं असो, माझं असो किंवा आणखी कोणाचं असो, पोराच्या शिक्षणावर झालेला खर्च मी खर्च समजतच नाही, हा खर्च हा भविष्यामध्ये भरभक्कम परतावा देणारी गुंतवणूक असते‘ ‘गोरगरिबांची पोरं शिकतील तोच माझा परतावा... मंग खर्च झालाच कुठे ?  मी भारावून म्हणालो ‘या अनाथ मुलांसाठी तुम्ही किती करत आहात... ?‘

# 1504: कासविणीचे बाळंतपण. ( अंजली भडसावळे , अनघा आरेकर, सोनल शिंदे. ) 24.06.2024

Send us Fan Mail मेक्सिको मधल्या Cancun  बीच वर रात्री फिरताना अगदी अजब,  गोष्ट अनपेक्षितपणे पाहायला मिळाली. समुद्रातून बाहेर पडून बीचवर मोठं खड्डा करून  अंडी घालणाऱ्या  कासविणीशी आमची गाठ कशी पडली त्याची ही मजेदार चर्चा!

# 1503: राहुन गेलेल्या गोष्टी. लेखक : पु. ल. देशपांडे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 23.06.2024

Send us Fan Mail "खेड्यातल्या वडाखाली पोरं सूरपारंब्या खेळताना दिसली की, माझ्या आयुष्यातल्या राहून गेलेल्या गोष्टींची मनाला फार चुटपुट वाटते . आता गळाही गेला आणि पायातली हिंडायची, पोरांबरोबर नाचायची शक्तीही."  पु. ल. देशपांडे.

# 1502: मध आणि मधाचे पोळे: भाग २. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 19.06.2024

Send us Fan Mail काही काळापूर्वी, काही शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटले की मधमाश्या हे षटकोनी पोळं नेमके कसे तयार करतात? तर, त्यांना आढळलं की काही मधमाश्या त्यांच्या शरीराचा एक साधन म्हणून वापर करून मेणामध्ये वर्तुळं तयार करायला सुरवात करतात. असं का घडतं हे शास्त्रज्ञांना खरोखर माहित नाही, परंतु मधमाश्या त्यांच्या शरीरातील उष्णता वापरून वर्तुळाच्या आकाराचं मेण वितळवतात आणि षटकोनी आकार बनवतात असं दिसलं...

# 1501: अमेरिकी स्त्रीमन. लेखिका मोहना प्रभू देसाई जोगळेकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 15.06.2024

Send us Fan Mail "You Indian women always have a shoulder to lean on." असे म्हणून माझ्या गाडीचे  टायर बदलून देणारी टीना ही माझ्या मनातल्या अमेरिकन स्त्री च्या चित्रांपेक्षा वेगळी होती. चेहेरा रंगवून , उंच टाचांच्या चपला घालून स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या  स्त्री पेक्षा हे वास्तव निराळे होते.

# 1500: रिक्त मरण नव्हे, जीवनाची इतिकर्तव्यता. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 13.06.2024

Send us Fan Mail लेखक म्हणतो प्रत्येकाने एक जाणून घेतले पाहिजे कि, जर मी आज रात्री झोपलो आणि उद्या उठलो नाही, तर माझ्यामध्ये जी काही सर्जनशीलता आहे ती मी रिकामी केली आहे का? कमीत कमी पश्चात्ताप तेव्हाच होईल जेव्हा किती लक्ष, वेळ आणि शक्ती खर्च केली आहे हे ध्यानात येईल आणि हे योगायोगाने घडत नाही; हे जाणीवपूर्वक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी घडते.

# 1499: मध आणि मधाचे पोळे: भाग १. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 12.06.2024

Send us Fan Mail तुम्हाला माहित आहे का की मध हा पदार्थ जगातील काही खाद्यपदार्थांपैकी एक आहे जो मानवी जीवन टिकवू शकतो? एक चमचा मध २४ तासांसाठी पुरेसा असतो. मधमाशांनी तयार केलेले प्रोपोलिस हे सर्वात शक्तिशाली नैसर्गिक प्रतिजैविकांपैकी एक आहे. मधाची कालबाह्यता तारीख नसते. पूर्वी महान सम्राटांचे मृतदेह सोन्याच्या शवपेटीमध्ये पुरले गेले आणि त्यांचा क्षय टाळण्यासाठी ते मधाने लेपित केले गेले.

# 1498: Love you all. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 11.06.2024

Send us Fan Mail लग्न पार पडले. जोड्याने पुन्हा पाया पडायला आला, तेव्हा नवपरिणीत पत्नीला म्हणाला,  “हया नसत्या, तर आज जसा मी आहे तसा कधीच घडलो नसतो !” त्यावर पाटिल बाई उत्तरल्या, 'शैलेश जर माझ्या वर्गात नसता, तर मला कधीही कळलं नसतं, की शिक्षकाने आधी प्रत्येक मुलाची आई असणं जास्त जरुरीचं आहे, मग शिक्षक' !

# 1497: चिखल पळवणारी टोळी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 10.06.2024

Send us Fan Mail त्यांची टोळी ही साधी सुधी नसते. चांगले दोन अडिचशे टोळीचे सदस्य एकाचवेळी कल्ला करत घिरट्या घालत नदीकाठच्या चिखलावर तुटुन पडलेले दिसतात. चिमणीच्या आकाराच्या देखण्या भिंगरी पक्षांची सध्या घरटी बांधण्यासाठी धांदल उडाली आहे. हा पक्षी चिखलापासून आपलं घरटं बनवतो. यासाठी चिखल जमण्यासाठी समूहाने आरडून एकच कल्ला करत पाणवठ्यावर जमतो. त्याचे चिखल चोचीत जमवतानाचे दृष्य एखाद्या मोठ्या टोळीने एक...

# 1496: भेट पांडुरंगाची. लेखिका नीता चं कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 09.06.2024

Send us Fan Mail मला आज त्या मुलामध्ये पांडुरंग दिसला . सोन्याचे दागिने ,झगमग कपडे, हार फुलं काहीही न ल्यायलेले  हेच साधे भोळे लोक साक्षात देव असतात नीट बघितले  की दिसतात... 

# 1495: लोभाने आंधळा झालेल्याची गोष्ट. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 08.06.2024

Send us Fan Mail दुसऱ्या दिवशी त्याने चौथा दिवा लावला आणि घाईघाईने उत्तरेकडे निघाला. दिवा   विझला.   आणि त्याला कळले की हा महाल फक्त त्याच्यासाठी आहे.  "नाही, गिरणी बंद करू नकोस."  म्हातारा म्हणाला, "हा राजवाडा आता तुझा आहे. पण जोपर्यंत तू  गिरणी चालवत आहेस  तोपर्यंतच हा राजवाडा उभा राहील. गिरणी बंद पडली तर तो  कोसळेल आणि तू सुद्धा  त्याखाली मरशील" . म्हातारा पुन्हा म्हणाला,  &...

# 1494: डोंगरगावची पाणीबाणी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 07.06.2024

Send us Fan Mail न्यूज चॅनलवाल्यांनी याचं पुन्हा एकदा फीचर केलं. त्याचा छोटासा इंटरव्ह्यू घेतला. ढसाढसा रडला म्हातारा. म्हणाला,  "'मारवाडातलं गाव होतं माझं....पण एकदम कोरडं ठाक!! पाण्यासाठी चार चार किलोमीटर वणवण फिरायची आई माझी. आणि आईबरोबर मीही. एक एक थेंब प्राण कंठाशी आणायचा. पाण्यात देव दिसायचा. इथली उधळमाधळ बघितली की जीव तुटतो माझा. मला पता आहे, लोक माघारी माझी टिंगल करतात. पन धापैकी...

# 1493: काश्यप ऋषींचे काश्मीर. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 06.06.2024

Send us Fan Mail दुसऱ्या दिवशी, शंकराचार्यांना उपवास घडला हे ऐकल्यावर त्या दाम्पत्यास अतिशय वाइट वाटले. शिष्यांनी रात्री पाकसिद्धीसाठी वन्हीच उपलब्ध नसल्याचे सांगितले. तेव्हा त्या गृहिणीने थोडे पाणी हातात घेऊन मंत्रित करून लाकडांवर शिंपडून अग्नी प्रज्वलित केला हे बघुन शंकराचार्यांना मोठेच आश्चर्य वाटले. काश्मीरच्या सामान्य जनांकडूनही खुप काही शिकण्यासारखे आहे हे शंकराचार्यांना कळून चुकले होते.

# 1492: "ते तर मला येतय्". लेखक : डॉ. कैलास दौंड. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 05.06.2024

Send us Fan Mail येत नाही हे कबूल करण्या ऐवजी  "ते तर मला येतय्" असा धोषा लावला की अशी फजिती होते ....!

Listen to the Life of Stories podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.