Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Koniecznie odwiedź stronę podcastu i wesprzyj twórcę: lifeofstories.buzzsprout.com
Autor
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Kategoria
Strona podcastu
Ostatni odcinek
10 paź 2026
Gdzie słuchać?
Podcasty w aplikacji Replaio Radio Już wkrótcePodcasty trafią do aplikacji już wkrótce. Zainstaluj teraz i jako pierwszy zobacz nowe podejście do podcastów
Odcinki
# 2077 : सत्यवती. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 05.07.2026 8:06
Send us Fan Mail सत्यवती हे महाभारतातील एक महत्त्वाचे आणि प्रभावशाली पात्र आहे. ती हस्तिनापूरचा राजा शंतनू याची पत्नी, कौरव-पांडवांची पणजी आणि वेदव्यासांची आई होती. तिने हस्तिनापूरच्या राजकारणाला नवीन दिशा दिली. सत्यवतीचा जन्म एका अप्सरेच्या गर्भातून माशाच्या रूपात झाला होता. एकदा राजा सुधन्वाच्या दरबारात एका माशाचे पोट उघडल्यावर त्यातून एक मुलगा आणि मुलगी बाहेर आले. राजाने मुलाला स्वतःकडे ठेवले...
# 2076 : मिलिंद पाटील: एक माणूस एक मिशन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 04.07.2026 13:58
Send us Fan Mail पश्चिम घाट म्हणजे फक्त डोंगर नाही. पश्चिम घाट म्हणजे फक्त जंगल नाही. पश्चिम घाट म्हणजे आपला श्वास आहे. जगातल्या ३५ Biodiversity Hotspots पैकी एक म्हणजे आपला पश्चिम घाट. इथे असे हजारो प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती आहेत जे जगात फक्त इथेच आढळतात. पण आज हे जंगल धोक्यात आहे. रस्ते होतायत, बांधकामं होतायत, झाडं तुटतायत आणि सोबत नाहीशा होतायत त्या प्रजाती ज्यांची नावंही आपल्याला माहीत नाह...
# 2075 : कपटी शकुनी मामा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 03.07.2026 9:24
Send us Fan Mail महाभारत म्हटलं की डोळ्यासमोर अनेक पात्रं उभी राहतात; अगदी अर्जुनापासून ते भीष्मापर्यंत परंतु सर्वांचं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे शकुनीचं. महाभारतातील सर्वात कपटी आणि कारस्थानी व्यक्ती म्हणून सर्वाना शकुनी परिचित आहे. गांधार देशाचा राजपुत्र आणि गांधारीचा सख्खा भाऊ असलेला शकुनी, महाभारताचे युद्ध घडवून आणण्यासाठी जबाबदार असेलल्या काही व्यक्तींपैकी एक आहे. गांधार देश हल्लीच्या अफगाणिस्...
# 2074 : कुंती. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 01.07.2026 11:44
Send us Fan Mail मथुरेवर राज्य करणाऱ्या वृष्णी यदुवंशीय देवमीढ शूरसेनाची ज्येष्ठ कन्या, म्हणजेच विस्तीर्ण नयनांनीची आणि अत्यंत रूपवती असलेली पृथा, हिचे बालपण काहीसे वेगळेच होते. तिचा जन्म होण्यापूर्वीच तिच्या वडिलांनी तिला दुसऱ्याच्या स्वाधीन केले होते. त्यांनी तिला आपला जवळचा मित्र आणि अपत्यहीन चुलतभाऊ असलेल्या कुंती राज्याच्या भोज यदुवंशीय कुंतीभोजाला भेट म्हणून दिले होते. पृथाचा जन्म झाल्यानंतर...
# 2072 : "पुंडलिका भेटी आले परब्रह्म " (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. ) 30.06.2026 6:54
Send us Fan Mail पंढरीचा विठूराया… शेकडो वर्षांपासून विटेवर विनातक्रार उभा आहे. फक्त भक्ताची वाट पाहात....! कोण होता तो भक्त, ज्याच्यासाठी देव थांबून राहिला ? काय घडलं होतं त्या छोट्याशा विटेजवळ? आणि कशी सुरू झाली पंढरपूरच्या विठ्ठलाची ही अद्भुत गोष्ट? भक्ती, प्रेम आणि एका विलक्षण भेटीची कथा… “पुंडलिक भेटी आला पांडुरंग!”
# 2071 : एक झपाटलेला शास्त्रज्ञ- जॅार्ज मरे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 29.06.2026 6:39
Send us Fan Mail डॉ. जॅार्ज मरेच्या गोष्टीतला सर्वात मोठा धडा म्हणजे ‘विज्ञानाची सुरुवात अनेकदा एका साध्या प्रश्नापासून होते..‘ त्याच्याकडं आधुनिक प्रयोगशाळा नव्हती. सीटी स्कॅन नव्हते. हार्मोन चाचण्या नव्हत्या. संगणक नव्हते; होतं ते फक्त निरीक्षण, तर्कशक्ती आणि प्रयोग करण्याचं धाडस..
# 2070 : तुलसीदासांचा सुत्रश्लोक. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 28.06.2026 4:35
Send us Fan Mail श्री. तुलसीदासांना एकदा एका भक्तांने विचारले की... "महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता, तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का ?" तुलसीदास म्हणाले, "हो" भक्त म्हणाला, "मला पण दर्शन घडवाल का ?" तुलसीदास म्हणाले, "हो नक्की" तुलसीदासांनी त्याला खुप समर्पक उत्तर दिलं, जे एखाद्या गणिती तज्ञाला ही लाजवेल !!! तुलसीदास म्हणाले , "अरे हे...
# 2069 : "पक्ष्यांची भाषा ‘निळवंती‘ समजू लागले तर?" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 27.06.2026 8:58
Send us Fan Mail आपण पक्ष्यांचा किलबिलाट रोज ऐकतो... पण ते नेमकं काय बोलत असतील, हा प्रश्न कधी मनात आला आहे का? कल्पना करा... एक दिवस अशी वेळ आली की पक्षी, प्राणी आणि माणूस एकमेकांचं म्हणणं समजू लागले! हे आज विज्ञानकथेसारखं वाटत असलं, तरी त्या दिशेने विज्ञानाने एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. एका छोट्याशा पक्ष्याच्या आवाजामागचं रहस्य उलगडण्यासाठी एका संशोधिकेने तब्बल पंधरा वर्षे घालवली... आणि कृत्रि...
# 2068 : "निवृत्तीनंतरचा 'उद्योग" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 26.06.2026 5:02
Send us Fan Mail निवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा, हा अनेकांसमोरचा प्रश्न… पण जोशीकाकांनी त्यावर शोधलेला उपाय मात्र अगदीच भन्नाट! ना सिनेमाची आवड, ना पुस्तकांचा नाद, ना कोणता खास छंद… तरीही त्यांचा प्रत्येक दिवस मजेत जातो. एक दिवस पु. ना. गाडगीळसमोरचा ट्रॅफिक पोलीस, एक गाडी आणि जोशीकाकांची ‘निरागस’ बोलणी… यातून सुरू झाला असा खेळ, की शेवटी कोण कुणाची फिरकी घेत होतं हेच कळेनासं झालं! जोशीकाकांचा हा हटक...
# 2067 : "ती गेली तेव्हा रिमझिम..." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 25.06.2026 10:12
Send us Fan Mail काही गाणी मनाच्या खोल कप्प्यात जपलेल्या आठवणी पुन्हा जाग्या करतात. कवी ग्रेस यांची “ती गेली तेव्हा रिमझिम...” ही अशीच एक कविता — विरह, एकटेपणा आणि नात्यांच्या न दिसणाऱ्या धाग्यांची कहाणी. बाहेर पडणारा पाऊस आणि मनात कोसळणारा पाऊस यातला फरक कधी मिटून जातो, हे या शब्दांतून जाणवतं. आई असो, पत्नी असो किंवा आयुष्यातली एखादी जिवाभावाची व्यक्ती… तिच्या नसण्याने निर्माण होणारी पोकळी कशी अस...
# 2066 : "ये ग ये ग विठाबाई". (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 24.06.2026 9:34
Send us Fan Mail “इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण?” या उत्सुकतेने संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. पण विठ्ठलाला आईच्या मायेने हाक मारणारी जनाई त्यांना भेटली ती गोवऱ्यांच्या ढिगाजवळ एका अनपेक्षित प्रसंगात! सारख्या दिसणाऱ्या गोवऱ्यांमधून जनाईच्या गोवऱ्या कबीरांनी कशा ओळखल्या? आणि तिच्या साध्या श्रमांतही चक्रपाणी कसा वसला होता? ऐका जनाईच्या निस्सीम भक्तीची सुंदर गोष्ट... =========
# 2065 : येरे घना येरे घना. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 23.06.2026 6:17
Send us Fan Mail आरती प्रभूंच्या कवितांत शब्द नाही , तर भावनांचे झरे वाहत असत. स्वानंदासाठी कविता करणाऱ्या त्या कवीच्या मनातून एके दिवशी काही ओळी सहज उमटल्या— "नको नको म्हणतांना, गंध गेला राना वना... ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना..." हृदयनाथ मंगेशकर वारंवार म्हणत, "ही कविता पूर्ण करा." पण आरती प्रभू प्रत्येक वेळी ते हसत हसत टाळत. अखेर एक दिवस शब्दांचा जणू बांधच फुट...
# 2064 : "सेकंड हॅन्डचं दुःख". लेखक कौस्तुभ केळकर. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 22.06.2026 7:19
Send us Fan Mail तिच्या नवऱ्याला एकच मोठा भाऊ. अभ्यासात हुशार, कायम पहिला नंबर आणि आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करणारा. धाकट्याच्या वाट्याला मात्र कायम मोठ्या भावाच्या वापरून झालेल्या गोष्टी आल्या—सेकंडहॅन्ड पुस्तकं, त्यातल्या रेघोट्यांसकट; सायकल, आणि नंतर नोकरीही मोठ्या भावाच्या ओळखीने. मोठ्या भावाने मोठा फ्लॅट घेतल्यावर त्याचा जुना फ्लॅट याने विकत घेतला. लग्नानंतर सासू-सासरे मात्र यांच्याच घरी र...
# 2063 : Pull the door - दरवाजा ओढा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 21.06.2026 5:51
Send us Fan Mail आमच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका ज्येष्ठ सफाई कर्मचारी भगिनीचा तर हा कायमस्वरूपी कार्यक्रम. त्या येतात, दरवाजा ढकलतात, तो उघडत नाही.पुन्हा ढकलतात मग मी आतून म्हणतो, ”खिंचोऽऽ, खिंचोऽऽ." लिखा है ना दरवाजे पर..?? यावर त्यांचं उत्तर ठरलेलं असतं, ”मै तो अनपढ हूँ, मुझे पढ़ना-लिखना नहीं आता."
# 2062 : "राजाच्या माकड चेष्टा" लेखक : मुकेश माचकर. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 20.06.2026 3:40
Send us Fan Mail राजाचा एक लाडकं माकड होतं! त्याला राजा दरबारात नेत असे. तिथे रोज कुणाची पगडी उडव, कुणाची दाढी ओढ, असे त्याचे चाळे असतं. राजा तेंव्हा पोट धरून हसे . एके दिवशी सेनापतीने माकडाच्या हातात खरा "वस्तरा" म्हणजे तलवारच दिली. पुढच्या क्षणी माकड थेट राजाचीच दाढी करायला धावलं... राजाला पळता भुई थोडी झाली! त्या दिवसानंतर माकड दरबारात कधीही दिसलं नाही!
# 2061 :उंदीर मारायला तलवार कशाला ? (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 19.06.2026 4:41
Send us Fan Mail जगातील अजेय समजला जाणारा एक तलवारबाज योद्धा... पण त्याची झोप उडवली एका छोट्याशा उंदराने! तलवार चालली, घरातील सामान तुटलं, पण उंदीर काही हाती लागेना. ही बातमी ऐकून मांजरीसुद्धा घाबरल्या. शेवटी मार्जार राणी स्वतः मैदानात उतरली आणि एका क्षणात सगळा खेळ संपवला. तेव्हा ती हसून म्हणाली, "उंदीर मारणं हे योद्ध्यांचं काम नसतं आणि तलवार हे उंदीर मारण्याचं हत्यार नाही!" ऐका, एका...
# 2060 : रामायणातील मंथरा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 14.06.2026 8:53
Send us Fan Mail कैकयच्या अश्वपती सम्राटाची मुलगी कैकेयी राजा दशरथांची तिसरी बायको होती. ती खूपच देखणी आणि साहसी देखील होती. कदाचित या कारणामुळेच राजा दशरथांचे तिच्यावर जास्त प्रेम होते. लग्नानंतर पाठराखीण म्हणून कैकेयीची ही दासी तिच्यासोबतच अयोध्येस आली होती. राणी कैकेयी आणि दासी मंथरा ह्या दोघी कैकय देशातील होत्या. मंथरा, राणी कैकेयीची लहानपणापासुन परिचयाची व अतिशय विश्वासू दासी होती. कैकेय देश...
# 2059 : पाताळलोक. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 12.06.2026 10:18
Send us Fan Mail वामन अवतार कथेत बळीराजाकडे श्रीविष्णू भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात. बळी त्यांना तीन पावले जमीन देण्याचे वचन देतो. मग वामन रूपातील विष्णू एका पावलात स्वर्ग व दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापल्यावर आता “तिसरे पाऊल कोठे ठेवू?” असे विचारतात. सत्यवचनी राजा बळीवर धर्मसंकट ओढवते. देण्यास काहीच जागा शिल्लक राहिली नाही, परंतु तरीही जर दिलेल्या वाचनाला जागलो नाही तर तो अधर्म ठरेल असा विचार...
# 2057 : "महाकालांच्या दारी...एक अनोखा नैवेद्य" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 08.06.2026 6:43
Send us Fan Mail महाकालाच्या मंदिराचे दरवाजे बंद असताना एखादा माणूस रोज देवाला नैवेद्य का अर्पण करत असेल? लोक त्याला मूर्ख म्हणत होते, पण तो म्हणायचा, "देव बंद नाही... फक्त दरवाजा बंद आहे." लॉकडाउनच्या दोन वर्षांतही त्याने आपली श्रद्धा जपली. मग एक दिवस एक अनोळखी साधू आला... आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले . ही एका माणसाच्या विश्वास, निष्ठा आणि बंद दारांपलीकडे दिसणाऱ्या आशेची कथा आहे.
# 2058 : काय असते पाण्याची एक्सपायरी डेट..? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 08.06.2026 7:23
Send us Fan Mail पृथ्वीवरील पाण्याचा साठा सुमारे ४.५ अब्ज वर्षे जुना आहे. हा पाण्याचा साठा अगदी आपल्या सूर्यमालेच्या निर्मितीच्या काळापासून अस्तित्वात आहे आणि तो थेट सूर्यापेक्षाही जुना असू शकतो. पृथ्वीवर पाणी कसे आणि केव्हा आले? संशोधकांच्या मते, पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी किंवा त्यानंतर लगेचच धूमकेतू आणि लघुग्रहांच्या माध्यमातून हे पाणी पृथ्वीवर आले. पृथ्वी ही एक 'बंदिस्त' (Closed)...
# 2056 : "मामा जेव्हा वाकू शकला नाही" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 06.06.2026 6:07
Send us Fan Mail एकदा खूप दिवसांनी झेन गुरु रयोकान बहिणीच्या भेटीला गेला. बहिणीला आपल्या तरुण मुलाची खूप चिंता होती. "तू त्याचा लाडका मामा आहेस. तुझं तो ऐकेल. त्याला काहीतरी समजावून सांग," ती म्हणाली. पण रयोकानने दिवसभररात भाच्याला काहीही उपदेश केला नाही. निरोप घेताना मात्र त्याने भाच्याला जवळ बोलावलं. "बेटा, जरा माझ्या जोड्याच्या नाड्या बांधून देशील का? आता माझं वय झालं आहे. आता...
# 2055 : "पुण्यातल्या आप्पा बळवंत चौकाची कथा" ( प्रा.सौ. अनुराधा भडसावळे.) 05.06.2026 9:24
Send us Fan Mail आज पुण्यातील आप्पा बळवंत चौकाला अनेकजण फक्त 'ABC चौक' म्हणून ओळखतात. पण त्या तीन अक्षरांमागे पानिपतच्या रणभूमीवर लिहिला गेलेला शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचा एक जाज्वल्य इतिहास दडलेला आहे. जिथे एका दिवसात महाराष्ट्राची तरुण पिढी रणांगणावर मावळली, तिथेच तलवारींसोबत निष्ठा, प्रेम आणि कर्तव्याचाही अद्भुत संग्राम घडला. एका वीरपत्नीचे ज्वलंत शब्द, सरदार बळवंतराव मेहेंदळ्यांचा...
# 2053 : "पक्षी प्राण्यांची भाषा" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 04.06.2026 9:35
Send us Fan Mail आपल्याला नेहमी वाटतं, "उद्याचं सगळं आजच कळलं, तर आयुष्य किती सोपं होईल! संकटं टाळता येतील, नुकसान वाचेल आणि मनाला शांती मिळेल!" पण सूफी संत एक वेगळाच प्रश्न विचारतात भविष्य कळलं तर खरंच शांती मिळेल, की चिंता वाढेल?कारण जीवनाचं सौंदर्य कदाचित त्याच्या अज्ञातपणातच दडलेलं असतं. ही कथा अशाच एका माणसाची आहे, ज्याला भविष्याचे पडदे उघडायचे होते... आणि त्या प्रयत्नात तो वर्तमान...
# 2053 : फिंगरप्रिंटस्. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 01.06.2026 8:16
Send us Fan Mail मानवाच्या बोटांच्या रेषा गर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यापासून तयार होऊ लागतात. त्या वेळी मूल बाह्य जगापासून खूप दूर असते, तरीसुद्धा त्याची ओळख देणारी ही रेषांची भाषा त्याच्या शरीरावर लिहिली जात असते. या रेषांची रचना आपल्या DNA च्या सूचनांनुसार होते; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रेषा ना आई-वडिलांसारख्या असतात, ना पूर्वजांशी जुळणाऱ्या असतात. जणू एखाद्या अदृश्य शक्तीच्या प्रभावाने या...
# 2052 :डोपामाइनच्या मागे असलेलं विज्ञान. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 01.06.2026 8:56
Send us Fan Mail डोपामाइन हे एक आकर्षक न्यूरोट्रांसमीटर आहे जे मेंदूच्या बक्षीस आणि आनंद केंद्रांमध्ये म्हणजे रिवॅार्ड आणि हॅपीनेस केंद्रंमधे महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे सहसा "फील-गुड" रसायन म्हणून संबोधले जाते. ते आपल्या एकूण मूड, प्रेरणा आणि अगदी व्यसनाधीन वर्तनावर सुध्दा प्रभाव टाकणाऱ्या विविध शारीरिक आणि मानसिक प्रक्रियांसाठी जबाबदार असते. ते अशाप्रकारे आपल्या मेंदू आणि वर्तनावर प...
Podobne podcasty
Replaio nie jest wydawcą podcastów; nazwy audycji, okładki i audio należą do ich autorów i są rozpowszechniane przez publiczne kanały RSS