BBC Marathi Audio

गोष्ट दुनियेची

जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

Koniecznie odwiedź stronę podcastu i wesprzyj twórcę: www.bbc.co.uk

Autor

BBC Marathi Audio

Kategoria

Science

Strona podcastu

www.bbc.co.uk

Ostatni odcinek

8 maj 2026

Gdzie słuchać?

Podcasty w aplikacji Replaio Radio Już wkrótce

Podcasty trafią do aplikacji już wkrótce. Zainstaluj teraz i jako pierwszy zobacz nowe podejście do podcastów

Pobierz z Google Play Zainstaluj za darmo Android prawie 10 mln pobrań · ocena 4,8 iOS niedługo

Odcinki

टाईम ट्रॅव्हल - भूतकाळात किंवा भविष्यात जाणं कितपत शक्य? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 17.12.2022

टाईम ट्रॅव्हल म्हणजेच भूतकाळात किंवा भविष्यात जाता येणं, ही संकल्पना अनेकांना आकर्षित करणारी आहे. टाईम मशीन किंवा एक असं यंत्र ज्याद्वारे आपला काळात हा प्रवास शक्य होईल, ते यंत्र अद्याप बनलेलं नाहीय. पण भविष्यात त्याची शक्यता किती आहे? की ही फक्त एक फँटसीच राहणार? संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर एडिटर – तिलक राज भाटिया

डिजिटल रुपया खरंच आपल्या खिशातल्या नोटा-नाण्यांची जागा घेईल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 10.12.2022

आज जगभरातली सरकारं क्रिप्टो विश्वाची दखल घेत आहेत, आणि त्याच धर्तीवर आपापल्या देशांमध्ये डिजिटल करन्सीची आणू पाहत आहेत. भारतातही 1 डिसेंबरपासून 13 शहरांमध्ये डिजिटल चलन ई-रुपीची सुरुवात रिझर्व्ह बँकेने केलीय. पण खरंच यामुळे आपल्या हातातल्या नोटा आणि नाणी कमी होत जातील का? यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की भविष्यात आपण रोख चलनाऐवजी डिजिटल करन्सीच वापरू लागू का? ऐका...

HIV AIDS ची जगात पुन्हा लाट येऊ शकते का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची 01.12.2022

सुमारे चार दशकांपूर्वी एड्स एक महाभयंकर रोग म्हणून जगापुढे आला. याचा संसर्ग ज्यामुळे होतो तो HIV वेगाने पसरत होता. 2000च्या दशकाच्या सुरुवातीला हा आजार वर्षाला सुमारे 20 लाख लोकांचा बळी घेत होता. पण कालांतराने मेडिकल सायन्सने प्रगती केली, आणि या रोगाची तीव्रता कमी करणारी औषधं आली. यामुळेच काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्राने एक लक्ष्य जगापुढे ठेवलं, जे काही वर्षांपूर्वी अकल्पनीय वाटत होतं – 2030 प...

घटस्फोटांचा लहान मुलांवर किती दुष्परिणाम होतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 26.11.2022

जगभरात घटस्फोटांचं प्रमाण आणि अनौरस अपत्यांची संख्या वाढली आहे. पण कुटुंबांची ताटातूट झाल्यावर मुलंच्या आयुष्यात काय बदल होतात? मुळात, दोन पालक असलेल्या कुटुंबामधली मुलं सिंगल पॅरेंटच्या कुटुंबातल्या मुलांपेक्षा जास्त प्रगती करतात का? ऐका ही गोष्ट दुनियेची. मूळ निर्मिती: द इन्कावयरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर एडिटिंग: तिलक राज भाटिया

झोप आणि थकवा यांचा काही संबंध आहे का? BBC News Marathi ऐका गोष्ट दुनियेची 19.11.2022

आपलं आयुष्य खरोखरंच धकाधकीचं झालंय. आपण प्रत्येक क्षणी काही ना काही करतच असतो... नोकरी, लोकांना भेटणं, कुटुंबीयांसोबत-मित्रांसोबत वेळ घालवणं, ई-मेल, फेसबुक, इन्स्टाग्राम पाहणं, OTT प्लॅटफॉर्म्सवर बिंजवॉचिंग करणं, वगैरे वगैरे. त्यामुळे अनेक गोष्टी करायच्या राहूनही जातात, आणि आपल्याकडे वेळ अपुरा आहे, असं राहून-राहून वाटत असतं. जास्तीत जास्त गोष्टी उरकायच्या भानगडीत एक गोष्ट मात्र कमी होताना दिसतेय -...

इम्रान खान पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधान होऊ शकतात का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 12.11.2022

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी बसण्यापूर्वीच्या दोन दशकांमध्ये इम्रान खान यांनी देशातल्या प्रस्थापित नेत्यांविरोधात आंदोलनं केली होती. त्यानंतर ते चार वर्षं पंतप्रधान राहिले, आणि याच वर्षी विरोधी पक्षाने अविश्वास ठराव आणत त्यांना पंतप्रधान पदावरून खाली खेचलं. आणि नुकताच त्यांच्यावर एका जाहीर सभेदरम्यान गुजरानवालामध्ये गोळीबार झाला, ज्यात ते जखमी झाले. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर आरोप केल...

आपल्या इलेक्ट्रिक कार्स, स्मार्टफोनसाठी आपल्याकडे पुरेसं लिथियम आहे का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 05.11.2022

भारतात दर महिन्याला एक नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच होतेय. टाटा, महिंद्रा, हिरो, बजाजसह BYDसारख्या दिग्गज चिनी कंपन्याही भारतात विजेवर चालणारी गाडी विकू लागल्यात. या गाड्यांमध्ये असतात लिथियम आयन बॅटऱ्या, ज्या आपल्या फोन आणि लॅपटॉपमध्येही असतात, आणि ज्या पुन्हा-पुन्हा चार्ज केल्या जाऊ शकतात. आज अनेक देश पेट्रोल आणि डिझेल सोडून ग्रीन एनर्जीकडे वाटचाल करू पाहत आहेत. त्यामुळे भविष्यात लिथियम बॅटरींचा...

महिलांना पुरुषांइतकाच पगार मिळेल, यासाठी काय करावं लागेल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 29.10.2022

भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड अर्थात BCCIने नुकतीच एक मोठी घोषणा केली – की आता पुरुष आणि महिला क्रिकेटर्सना दिली जाणारी मॅच फी एकसारखीच असेल. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे, ज्याचं सर्वत्र स्वागतच करण्यात आलं. पण यामुळे खरंच महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये समानता येईल का, हाही प्रश्न विचारला जातोय. 15 सप्टेंबर 2022 ला ऑक्सफॅम इंडिया या संस्थेने भारतीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध केला...

निवृत्तीचं प्लॅनिंग फिसकटणार? भविष्यात पेन्शन पूर्णपणे बंदच होणार? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 22.10.2022

जगातील जवळजवळ प्रत्येक देशात लोकांची इच्छा असते की 55, 60 किंवा 70च्या वयापर्यंतच काम करून मग आपण निवृत्ती घ्यावी. पण माणसांचं सरासरी वय वाढत चाललंय, आणि निवृत्ती वेतनधारकांची, पेन्शनर्सची संख्या की होत चाललीय, ज्यामुळे अनेकांचं निवृत्तीचं स्वप्न कदाचित पूर्ण होणार नाही, अशी दाट शक्यता आहे. अशात आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की तुमचं निवृत्तीचं स्वप्न भंग होऊ शकतं का?...

रोबो भविष्यात तुमची नोकरी घेतील तर काय होईल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 15.10.2022

दोन दिग्गज अर्थशास्त्रज्ञांच्या रिपोर्टनुसार, येत्या वीस वर्षांत अमेरिकेतील निम्म्याहून अधिक नोकऱ्या मशीन्सकडे सोपवल्या जातील. रोबोने याआधीही अनेक माणसांच्या नोकऱ्या घेतल्या आहेत. हा धोका पुढेही वाढतच जाणार आहे. तर यंदा आपण गोष्टी दुनियेची ऐकताना एका प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की रोबोंनी आपल्या नोकऱ्या घेऊन टाकल्यावर काय होईल? ऐका ही गोष्ट दुनियेची. संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मित...

मानसिक आरोग्य कसं जपायचं? जगभरात या समस्येवरचा उपाय काय? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 08.10.2022

नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचा अहवाल - 2021 या वर्षांत देशभरात 1 लाख 64 हजार 33 आत्महत्या झाल्या. खरंतर असं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वीची त्या व्यक्तीची मानसिक अवस्था अनेकदा दुर्लक्षित असते, ज्याविषयी खरंतर आधी बोलल्याने हे मृत्यू टाळता आले असते. या भागात गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की मानसिक आरोग्य जपायला आपण काय करू शकतो? मूळ संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठ...

खरंच व्हॉट्सॲपमुळे लोकांचे झुंडबळी जातायत का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 01.10.2022

सप्टेंबरच्या मध्यात महाराष्ट्रातल्या सांगलीमध्ये एका गाडीत चाललेल्या ४ साधूंना मारहाण करण्यात आली. देवदर्शनासाठी हे साधू कर्नाटकहून पंढरपूरकडे जात होते, तेव्हा वाटेत एका गावात रस्ता विचारायला थांबले, पण गावकऱ्यांनी त्यांना मारहाण केली. महाराष्ट्रात अशी काही पहिलीच घटना नव्हती. 2020च्या एप्रिलमध्ये सुरतकडे निघालेल्या अशाच दोन साधूंचा पालघर जिल्ह्यात मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यापूर्वी 2018च्या जु...

व्हीडिओ गेम्स आपण का खेळतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 24.09.2022

सुमारे चार दशकांपूर्वी गाजलेला मारियो गेम तुम्ही एकदा तरी पाहिला आणि कदाचित खेळलाही असेल. तेव्हापासून आजवर व्हीडिओ गेम्सचं जग प्रचंड मोठं झालंय. रोडरॅश, अलादिन, नीड फॉर स्पीडसारखे कंप्युटर गेम्स असो वा अँग्री बर्ड्स, कँडी क्रश किंवा पब्जी-कॉल ऑफ ड्युटीसारखे मोबाईल गेम्स, आपापल्या काळात यापैकी प्रत्येकच गेमने आपल्याला वेड लावलंय. इतकं की काही मुलांनी या गेम्सच्या नादात टोकाचं पाऊलही उचललंय. आईने फो...

अणू ऊर्जा भविष्यातल्या प्रश्नांचं उत्तर असू शकतं का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 17.09.2022

गेल्या जवळजवळ 100 वर्षांपासून कृत्रिम फ्युजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या सुमारे 50 वर्षांपासून असे दावे केले जात आहेत की पुढील काही दशकांत हे उद्दिष्ट गाठलं जाईल. 2022च्या फेब्रुवारीमध्ये, इंग्लंडच्या शास्त्रज्ञांनी दावा केला होता की ते पाच सेकंदांसाठी असं करण्यात यशस्वी ठरले आहेत. आता प्रश्न असा आहे की, न्यूक्लियर फ्युजनमधून जगाच्या ऊर्जा प्रश्नावर कायमचा तोडगा निघू शकेल का? या प्रश्नाचं उ...

युक्रेन युद्धासारखाच संघर्ष तैवानमध्येही पेटेल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 27.08.2022

अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यानंतर चीन संतापलाय, आणि त्यामुळे तैवान भागात तणाव शिगेला पोहोचला आहे. त्यानंतर चीनने तैवानजवळ चार दिवस लष्करी कवायतीसुद्धा केल्या. अमेरिकेने म्हटलंय की ही “प्रक्षोभक कृती” आहे, तर दुसरीकडे चीनने अमेरिकेला 'आगीशी खेळू नका' असं म्हटलंय. या वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर एक प्रश्‍न विचारला जातोय की, आता तैवानवरून...

भ्रष्टाचार देशातून पूर्णपणे संपवणं शक्य आहे का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 20.08.2022

21व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात जॉर्जिया जगातल्या सर्वाधिक भ्रष्ट देशांपैकी एक होता. एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी भ्रष्टाचार किती हानिकारक असू शकतो, याबद्दल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनेही आपल्या एका अहवालात सांगितलं आहे. भ्रष्टाचार हा प्रश्न फक्ता जॉर्जियापुरता मर्यादित नाहीय. जगातल्या अनेक देशांमध्ये ही एक मोठी समस्या आहे. स्वतः पंतप्रधान मोदींनी त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात हे अधोरेखि...

स्मार्टफोनचं व्यसन का जडलंय? तो सोडायचं कसं? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 13.08.2022

स्मार्टफोन वापरताना तुमची नजर सतत त्याच्या स्क्रीनवर असते. याची क्रेझ जवळपास दीड दशकापासून आली, जेव्हा ॲपलने आयफोन विक्रीला सुरुवात केली. तेव्हापासून स्मार्ट फोन कनेक्ट करायला, म्हणजे जगाशी तुम्हाला जोडून ठेवायला, क्रिएट करायला, म्हणजे कंटेंट तयार करायला आणि शिकण्यासाठीसुद्धा एक उत्तम साधन बनलंय. अनेकांच्या हातात किंवा खिशात स्मार्टफोन नेहमीच असतो, पण त्यापैकी अनेकांना असं वाटत असतं की ते त्याचा अ...

आर्टिफिशल इंटेलिजेन्सच्या स्वतःच्या संवेदना विकसित झाल्या आहेत का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 06.08.2022

2021 मधली ही गोष्ट. ब्लेक लेमॉइन गुगलच्या responsible artificial intelligence division मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होते. ते एका चॅटबॉट सिस्टमचं टेस्टिंग करत होते. त्या सिस्टमचं नाव 'लॅमडा' (Lamda). काही महिन्यांच्या काळात त्यांनी लॅमडासोबत अनेक विषयांवर शेकडोवेळा संवाद साधला होता. यातलाच एक संवाद त्यांनी एका सॉफ्टवेअरच्या मदतीने ऐकला. या संवादाची सुरुवात ब्लेक यांच्या एका प्रश्नापासून...

भारतात पूर आल्यावर त्यामुळे होणारे मृत्यू आपण टाळू शकतो का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची 30.07.2022

भारतातल्या अनेक राज्यांमध्ये मान्सूनच्या जोरदार पावसानंतर पुन्हा पूर आलाय. 2017 मध्येही भारत, बांगलादेश आणि नेपाळमध्ये पुरामुळे 1,200 पेक्षा जास्त जणांना जीव गमवावा लागला होता. या वर्षीही हा पूर अशाच विनाशाचं कारण बनलाय. एकट्या आसाममध्ये 27 हून अधिक जिल्ह्यांमधल्या दोन हजारांहून अधिक गावांना पुराचा फटका बसलाय. सरकारी आकडेवारी सांगते की शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. एकट्या महाराष्ट्रात जून महि...

गांजा (Cannabis / Marijuana) आता सहज मिळू शकेल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 23.07.2022

जून 2022 मध्ये थायलंड दक्षिण पूर्व आशियातला पहिला देश बनला ज्याने गांजाच्या वापरावरची बंदी हटवली. गांजा, ज्याला Marijuana, Cannabis, Weed, Pot, Green, Hemp, अशा अनेक नावांनी ओळखलं जातं, त्याच्या घरगुती शेती आणि वापराला थायलंड सरकारने आता गुन्ह्यांच्या यादीतून बाहेर काढलंय. पण याचा वैयक्तिक वापर करू नका, असंही सरकारने म्हटलंय. थायलंड प्रशासनाला आशा आहे की यामुळे स्थानिक गांजा उद्योगाला चालना मिळेल...

भारतात हवामान बदलामुळे जगणं कठीण होत चाललंय का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 16.07.2022

या वर्षी भारतातला उन्हाळा असह्य झाला होता. पाऱ्याने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले. मे महिन्यात अनेक ठिकाणी तापमान 47-48 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचलं होतं. एका अंदाजानुसार या 'हीट वेव्ह'मध्ये भारत आणि पाकिस्तानात कमीत कमी 90 लोकांचा बळी गेला होता. दुसरीकडे जुलैच्या पहिल्याच आठवड्यात किमान पाच राज्यांमध्ये पुराने थैमान घातलं आहे. एकट्या महाराष्ट्रात या वर्षी पावसाने सत्तरहून जास्त बळी घेतले आहेत. आज...

आपण तथ्यांवर विश्वास का ठेवत नाही? सत्य गोष्टींवर शंका का घेतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट 09.07.2022

सत्य घटनेवर आधारित सिनेमे अनेकदा वास्तवाशी, तथ्यांशी छेडछाड करताना दिसतात, आणि त्यामुळे वादही निर्माण होतात. पण काही लोक या सिनेमांचा सोशल मीडियावर बचाव करताना दिसतात. आणि त्यामुळे खरंच प्रश्न पडतो, की लोकांना, प्रेक्षकांना खरंच तथ्यांशी, वास्तवाशी काही घेणंदेणं आहे की नाही? आज आपण गोष्ट दुनियेची ऐकताना याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की खरंच आपण आजच्या जगात तथ्यांचा विचार करतो का? मूळ संशोधन - द...

धूम्रपान आपण खरंच का करतो? सिगरेट ओढण्याचं व्यसन सोडणं किती अवघड? BBC News Marathi 02.07.2022

दरवर्षी जवळजवळ 80 लाखांपेक्षा जास्त लोक स्मोकिंगचे बळी ठरतात. यातले साधारण 70 लाख लोक प्रत्यक्ष तंबाखूच्या सेवनामुळे मरण पावतात, तर सुमारे 12 लाख लोक आजूबाजूला धूम्रपानाच्या धुरामुळे जीव गमावतात, असं UNची आकडेवारी सांगते. पण तरीही आज जगभरात कित्येक लोक स्मोक करतात. आपल्याकडे सिनेमात कुणीही पडद्यावर धूर काढताना दिसलं की लगेच कोपऱ्यात इशारा येतो... smoking is injurious to health. पण तरीसुद्धा जगभरात...

भाग 34: 100 वर्षांपर्यंत जगायला काय करावं? दीर्घायुष्याची गुरुकिल्ली | गोष्ट दुनियेची BBC News Marathi 25.06.2022

तुमच्याही ओळखीच्यां पैकी कुणा ना कुणी असेलच, कुणाचे बाबा किंवा आजोबा किंवा पणजोबा, ज्यांनी आयुष्याची सेंच्युरी गाठली असेलच. त्यांच्या या दीर्घायुष्याची गुरुकिल्ली नेमकी काय? आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की खरंच शंभर वर्षांपर्यंत जगण्याचा मंत्र काय आहे? ऐका हा संपूर्ण एपिसोड. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर सहनिर्मिती - वात्सल...

भाग 33: आंतरराष्ट्रीय योग दिन - योगा जगभरात एवढा लोकप्रिय कसा झाला? BBC News Marathi 18.06.2022

दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. वाराणसी ते वॉशिंग्टन, आज सगळीकडे योग केला जातो. कदाचित तुम्हीसुद्धा करत असालच. अगदी प्राचीन काळापासून केली जाणारी ही क्रिया मुख्यत्वे मानसिक आणि अध्यात्मिक शांततेची, संतुलनाची आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून ओळखली जाते. पण योग ही कला जगभरात इतका लोकप्रिय कशी झाली? आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की य...

Słuchaj podcastu गोष्ट दुनियेची w Replaio

Radio i podcasty w jednej aplikacji - za darmo, bez zakładania konta. Zainstaluj już dziś i nie przegap premiery

Pobierz z Google Play

Replaio nie jest wydawcą podcastów; nazwy audycji, okładki i audio należą do ich autorów i są rozpowszechniane przez publiczne kanały RSS