Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
No dejes de visitar la web del podcast y apoyar a su creador: lifeofstories.buzzsprout.com
Autor
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Categoría
Web del podcast
Último episodio
10 de oct. de 2026
¿Dónde escuchar?
Podcasts en la app Replaio Radio Muy prontoLos podcasts llegarán muy pronto a la app. Instálala ahora y sé el primero en descubrir una forma totalmente nueva de vivir los podcasts
Episodios
# 1976 : सूर बहार. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 26.02.2026 6:46
Send us Fan Mail मि. बर्नार्ड स्वतः सतार प्रेमी होते. पंडीत रविशंकर यांचे निस्सीम चाहते होते.भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी सतारी मागवलेल्या होत्या. त्यांना माहीत होते,सतार वाजवणे ही एक कला असली तरी सतार बनवणे ही एक वेगळीच कला आहे. सतार बनवतांना कुशल कारागीर फक्त पंढरपूरचे आणि लखनौचे भोपळेच वापरतात. पंढरपूरच्या भोपळ्यांची साल जाड असते तर लखनौच्या भोपळ्यांची पातळ. सतार बनवणारे कारागीर त्याच...
# 1975 : प्रसाद. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 25.02.2026 6:55
Send us Fan Mail एकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवराआवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?’’ सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उ...
# 1974 : जगी सर्वसुखी असा कोण आहे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 24.02.2026 4:53
Send us Fan Mail एक दिवस जंगलातल्या तळ्याकाठी बसला असताना त्याला त्या तळ्यात पोहोत असलेला राजहंस दिसला. तो पांढराशुभ्र आणि डौलदार पक्षी पाहून तो थोडा हिरमुसला आणि विचार करू लागला," मी असा काळा कुळकुळीत एकदम आणि हा पक्षी एकदम शुभ्र, खरच हाच जगातला सर्वात सुखी पक्षी असावा, मी उगाचंच मला सुखी समजत होतो " असा विचार करत तो त्या राजहंसाकडे गेला आणि त्याला आपल्या या भावना बोलून दाखवल्या. तो राज...
# 1973 : गुप्तदान. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 23.02.2026 6:33
Send us Fan Mail शाळेला १० संगणक भेट देण्यासाठी मुंबईचे मोठे बिझनेसमन 'मिस्टर सुहास ओक' आले होते. सुहासरावांचा थाटच वेगळा होता. पांढरी शुभ्र मर्सिडीज, अंगावर महागडा सफारी सूट आणि डोळ्यावर रे-बॅनचा गॉगल. त्यांच्यासोबत चार बाउन्सर आणि दोन फोटोग्राफर होते. त्यांचा नियमच होता - "दहा रुपयांचं दान करायचं, तर शंभर रुपयांचा गाजावाजा झाला पाहिजे".
# 1972 : नेत्रदाता शिवभक्त कन्नप्पा नयनार. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 22.02.2026 4:21
Send us Fan Mail एके दिवशी शिव शंभूंनी भक्त कन्नप्पांची परीक्षा घेण्याचा विचार केला आणि मंदिरात कंपनं निर्माण करून मंदिराचे छत पाडले, हे दृश्य बघून सगळे लोकं मंदिरातून पळून गेले पण कन्नप्पा यांनी शिवलिंग वाचवण्यासाठी आपल्या शरीराने शिवलिंगाला झाकून घेतलं, नंतर त्यांना शिव शंभूच्या डोळ्यांतील सांडत असलेलं रक्त दिसलं, हे बघून कन्नप्पा यांनी पटकन बाणाच्या सहाय्याने स्वतःचा एक डोळा काढला आणि शिव शंभूल...
# 1971 : "होलोकॉस्ट मधली चॉकलेटची गोष्ट." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 21.02.2026 8:01
Send us Fan Mail एक दिवस छळछावणीत अचानक गोंधळ उडाला. एक गर्भवती स्त्री जमिनीवर पडली होती. तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. पण त्या नरकात कोणाकडे तिला मदत करण्याची ताकद नव्हती… औषध नव्हतं… अन्न नव्हतं. ती स्त्री जवळजवळ बेशुद्ध पडली होती. आई मार्सेल यांनी आपल्या मुलीला विचारलं — “आपण चॉकलेटचा हा तुकडा तिला देऊया का?” " हो !" पन्नास वर्षांपूर्वी पोटात अन्नाचा कण नसलेल्या मुलीने ...
# 1970 : "इंटरनॅशनल स्कूल आणि राम राम" ( प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. ) 20.02.2026 6:44
Send us Fan Mail “आई, मी तुला हजार वेळा सांगितलं आहे… चिंटूच्या समोर तुझी ती गावाकडची भाषा बोलू नकोस!” सागरचा आवाज थोडा चिडलेला होता. “उद्या त्याचा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंटरव्ह्यू आहे. तिथे जाऊन त्याने ‘कसा हाईस माज्या राजा' ‘बरा हाय न्हवं’, किंवा ‘राम-राम ’ म्हटलं ना… तर माझं नाक कापलं जाईल! तिथे डोनेशन देऊनही अॅडमिशन मिळत नाही. ... स्टेटस बघतात… क्लास बघतात!”
# 1969: पोर्थोल मधून फेकलं म्हणून ती वाचली. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 17.02.2026 6:01
Send us Fan Mail अँटोनियोने मारियाकडे पाहिलं. एवढीशी.. लहान… इतकी घाबरलेली… आईला हाक मारणारी आणि मग… त्याने तेच केलं, जो आता त्याच्या पुढचा एकमेव मार्ग होता. त्याने आपल्या लेकीला पोर्थोलमधून बाहेर ढकललं. मारिया काळ्या पाण्यात पडताच किंचाळली. अँटोनियोने उरलेल्या ताकदीने ओरडून सांगितलं — “पोहत रहा मारिया! रोषणाईकडे पोहत जा! जहाजं येत आहेत — पोहत रहा!”
# 1968: क्रांतीकारक बटुकेश्वर दत्त. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 15.02.2026 5:32
Send us Fan Mail १९६४ मध्ये ते आजारी पडले तेव्हा त्यांना सरकारी दवाखान्यात भरती केले गेले, त्यांची अवस्था पाहून त्यांचे मित्र चमनलाल आजाद यांनी लिहिले होते "बटुकेश्वर दत्तासारख्या क्रांतिकारकांनी भारतात जन्म घ्यावा का? परमेश्वराने त्यांना या देशात जन्माला घालुन फार मोठी चुक केली आहे. ज्या व्यक्तीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावली तो दवाखान्यात तळमळत आहे, विचारणारासुध्दा कोणी न...
# 1966: ह्रदयपरीवर्तनी महाशिवरात्रीची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 14.02.2026 7:34
Send us Fan Mail मनुष्याप्रमाणे प्राण्यांना जगायला स्वत:साठी अन्न पिकवता येत नाही. त्यातूनच 'जीवो जीवस्य जीवनम्' हा सृष्टीनियम झाला. पण प्रत्येकाला कुटुंब प्रेम.. समाज.. देश प्रेम आहेच. अगदी प्राण्यामध्येही कुटुंब प्रेम आहेच. एकदा एका उपाशी पारध्याच्या हाती हरिणी सावज आले. "मला एकदा कर्तव्यपालनासाठी घरी जावू द्या, माझी लेकरं माझी घरी वट पहात असतील. त्यांना एकवार शेवटचे जवळ घेऊ द्या...
#1963 : "आणि हे जग एक समीकरण आहे". ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 13.02.2026 7:02
Send us Fan Mail समीरची नजर त्या म्हाताऱ्यावर पडली. गाडी सिग्नलला थांबली होती. समीरने खिडकीतून बाहेर पाहिलं. त्या म्हाताऱ्याने भिंतीवर जे लिहिलं होतं, ते बघून समीरचे डोळे विस्फारले. ते काही गिचमिड नव्हतं. ती 'कॅल्क्युलसची अवघड समीकरणं' होती, आणि ती इतकी अचूक होती की, एखाद्या सामान्य प्रोफेसरलाही सोडवायला वेळ लागेल.
# 1964: "अति आधुनिक वैद्यकीय विज्ञान" डॉ. अनन्या सरकार (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 08.02.2026 7:31
Send us Fan Mail तुम्हाला दोन-तीन दिवस ताप आला होता. औषध घेतलं नसतं तरीसुद्धा शरीर स्वतःहून बर झालं असतं. पण तुम्ही डॉक्टरकडे गेलात. त्यांनी भरपूर चाचण्या लिहून दिल्या. थोडं वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर दिसलं. आहारावर मर्यादा काटेकोरपणे पाळल्या नाहीत, पण औषधं घेणं विसरलात नाहीत. काही महिन्यांनी, सर्व औषधांच्या साईड इफेक्टमुळे तुम्हाला हृदयाचा रुग्ण, डायबेटिक, झोप न येणं, अपचन, थायरॉईड, किडनी...
# 1963. "हिंजवडीतील आजीचा QR कोड तिचा नव्हताच" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 06.02.2026 5:47
Send us Fan Mail अक्षयच्या ऑफिसच्या खाली एक म्हातारी आजी, 'सकुबाई', भाजी विकायला बसायची . पेमेंट करायला फोन काढल्यावर , आजी गळ्यात लटकवलेला 'QR Code' पुढे करायच्या. स्कॅन केल्यावर त्यावर नाव यायचं - "जीवन हॉस्पिटल ट्रस्ट". ' नातवाच्या किडनीच्या उपचाराचा खर्च ट्रस्ट करेल, पण औषधांचा खर्च तुला करावा लागेल.' असे डॉक्टरने सांगितल्याने, ती दिवसाला एक वडापाव खाऊन...
# 1962: "कोकणची म्हातारी" लेखक डॉक्टर मिलिंद कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 05.02.2026 10:26
Send us Fan Mail कोकणातील अनेक वयोवृद्ध रुग्णांचा आहार डाळभात, भात-डाळ किंवा पेज इतकाच मर्यादित असल्याने पोषणतुटी जाणवते. कधीतरी मच्छीची आमटी किंवा साधी भाजी हा एकमेव बदल असतो. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे बी-कॉम्प्लेक्स देणं आवश्यक ठरतं. निराधार अवस्थेत औषधांसाठी येणाऱ्या आजींना सॅम्पलची औषधं आधार देतात. म्हातारी १० पैकी ३ गोळ्या घेते. पित्ताची आणि बी-कॉम्प्लेक्सची गोळी खाते आणि महत्त्वाचं अॅन...
# 1961: माणूस कधीच शून्य नसतो. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 04.02.2026 4:46
Send us Fan Mail "सर, एखादा विद्यार्थी काहीही लिहित नाही, तरी त्याला २ गुण देणे कसे योग्य आहे?” डॉ. मेद्रायेव हसले. शांत आणि विचारपूर्वक आवाजात ते म्हणाले, “शून्य म्हणजे अस्तित्वच नसणे. एखादी व्यक्ती प्रयत्न करत असताना ती शून्य कशी असू शकते? जरा विचार कर—फक्त वर्गात येण्यासाठीही विद्यार्थी किती प्रयत्न करतो. कदाचित पहाटे उठून, कडाक्याच्या थंडीत, लांबचा प्रवास करून, बस-ट्राम-ट्रेनमध्ये उभा राह...
# 1960: हरकचंद सावला: कॅन्सर पेशंट्सचा सेवाव्रती. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 03.02.2026 4:49
Send us Fan Mail आपलं चांगलं चाललेलं हॉटेल त्याने भाड्याने दिलं आणि काही पैसे उभे राहिल्यावर त्याने चक्क टाटा हॉस्पिटलच्या समोर असलेल्या कोंडाजी चाळीच्या रस्त्यावर आपला यज्ञ सुरु केला. एक असा यज्ञ जो पुढे ३० पेक्षा जास्त वर्षे अविरत सुरु राहील याची त्याला स्वतःलाही कल्पना नव्हती. कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन द्यायचा त्याचा हा उपक्रम परिसरातील असंख्य लोकांना आवडला. सुर...
# 1959: शेवटची व्हॅाइस नोट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 02.02.2026 13:55
Send us Fan Mail मग एका दुपारी, माझ्या आईने फोन केला आणि म्हणाली, "तुझे वडील बरे नाहीत." तिचा आवाज शांत होता, पण त्यामागे लपलेली भीती मला जाणवत होती. मी विचारले काय झाले. ती म्हणाली, "ते बाजारातून परतण्याचा रस्ता विसरले." मी हलकेच हसलो, तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. "अरे, कधीकधी असे होते." माझी आई हसली नाही. ती हळूवारपणे म्हणाली, "ते काल तुझ्या चुलत भावाचे नाव...
# 1958: "देवी अनसूयेची सत्वपरीक्षा" (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. ) 01.02.2026 6:00
Send us Fan Mail अत्री ऋषी स्नानाला गेल्यावर त्रिदेवांनी अतिथींच्या वेषात अनसूयेची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी “आई, इच्छाभोजन दे, पण विवस्त्र होऊन” अशी विचित्र मागणी केली. अनसूयेने तपोबलाने त्यांना ओळखले आणि वात्सल्यदृष्टी टाकताच ते तिघे बालरूप झाले. तिने त्यांना प्रेमाने भोजन व दूध देऊन पाळण्यात जोजवले. त्रिदेवींना आपापले पती ओळखता न आल्याने त्यांनी शरणागती पत्करली. अनसूयेने देवांना पूर्ववत क...
# 1957: "ममा, मॉम, मम्मीच्या जमान्यातली वेगळीच 'आई'." ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 31.01.2026 6:31
Send us Fan Mail "टिचरने खूप कौतुक केलं त्याचं — फार सुंदर पेपर लिहितो म्हणाल्या. फक्त बोलता कमी येतं, म्हणून घरी इंग्रजीत बोलायला सांगितलं." मी ऐकत होते. तिने स्वतः इंग्रजीचा क्लास लावला होता, बदल्यात टीचरच्या पोळ्या करून देत होती. मी मनोमन तिच्या जिद्दीला सलाम केला. “छोट्या गावात वाढले ताई… बाबा लवकर गेले… अकरावीत लग्न झालं… शिकायचं राहिलंच. पण आता याची आई म्हणून कमी पडणार नाही. बारावी...
# 1956: "फॅड" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 30.01.2026 4:49
Send us Fan Mail ओशो मिनिमलिजम विषयी बोलत होते तेवढ्यात एक श्रीमंत शिष्य उठला.अंगावर महागडं वस्त्र,हातात सोन्याचं घड्याळ आणि चेहऱ्यावर थोडा ताण.. तो म्हणाला,”भगवान,मी सगळं ऐकलंय..कमी वस्तू,साधं जीवन..पण माझ्याकडं तर खूप काहीये..घरं,गाड्या,पैसा..हे सगळं सोडायचं का?” ओशो म्हणाले,”तुझं घड्याळ काढ.” “आता अंगठी.”“बाहेर काढलेले बूट कचरापेटीत टाक..” तसे केले आणि शिष्य त्याच्या कक्षात जाऊन पलंगावर पडला प...
# 1955: "भानगडीतल्या व्यवहाराच्या गोष्टी" लेखिका नीता चं. कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 29.01.2026 9:52
Send us Fan Mail “अहो, माझा जावई एका पोरीच्या नादी लागलाय. गाडी भाड्यानी द्यायचा त्याचा धंदा आहे.” “अग ती एवढी शिकलेली, विमानानी फिरणारी, ड्रायव्हरच्या कशी प्रेमात पडेल?” “कसंय वहिनी, माझा जावई तरणा बांड, देखणा गडी आहे, इंग्रजी बोलतो.भाळली असेल. ह्या आत्ताच्या पोरींचं काय सांगता येतंय?” नीलाने लेक-नातींना माहेरी आणलं, सगळ्यांना भिडून लेकीमागे ठाम उभी राहिली. सरते शेवटी प्रकरण मिटलं. नीलाने शांतपणे...
# 1954: "दोन गुरु - अपमान आणि भूक" लेखक नाना पाटेकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 28.01.2026 10:43
Send us Fan Mail वयाच्या तेराव्या वर्षी तिशीची समज आली. भूक माझी सगळ्यात गोड मैत्रीण झाली आणि अपमान तिचा सावलीसारखा सोबती. भूक कायम जागी असायची, माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. अपमान आला की डोळ्यांना पाझर फुटायचा, पण त्यानंच चिंतन शिकवलं. हळूहळू कळलं, प्रत्येकाच्या आतड्यात भूकेची वसवट असते आणि अपमानाला जात नसते. हे उमगलं की उभं राहण्याआधी प्रत्येक जण रांगतो, उत्कर्षाच्या अलीकडच्या पायऱ्या भूक आणि...
# 1953: भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 27.01.2026 12:56
Send us Fan Mail पुण्याच्या वास्तव्यात एमव्ही सर्वांना खुशीने भेटत आणि त्यांच्या गप्पात सामील होत. मित्रमंडळींना आवर्जून सांगत की मी स्वत:ला भाग्यवान समजतो की माझ्या पुण्याच्या मुक्कामात मला लोकमान्य टिळक, गोखले, आगरकर, चिपळूणकर, न्यायमूर्ती रानडे, साहित्यसम्राट केळकर वगैरे अनेक विद्वान, देशप्रेमी, थोर मंडळींचा सहवास लाभला. एमव्हींची आठवण म्हणून पुण्यात नाव घ्यावे असे स्मारक नाही, याची मात्र उणीव...
# 1952: खोली क्रमांक ४३२. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 26.01.2026 17:25
Send us Fan Mail ती म्हणाली, "मला माहित आहे की मी मरणार आहे. प्रत्येकाला वाटतं की मला काही कळत नाही, पण मला कळतं. मी त्यांना म्हणताना ऐकलं की आता कॅन्सर सगळीकडे पसरला आहे. ते म्हणाले, कदाचित सहा महिने. कदाचित त्याहूनही कमी." मी पुस्तक खाली ठेवलं. "अमारा, मला खूप वाईट वाटतंय." तिने त्या मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. "मिस्टर माईक, मी तुम्हाला काही विचारू का?" "...
# 1951: वनस्पतींमधील संवाद. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 25.01.2026 7:41
Send us Fan Mail सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वनस्पतींना 'स्मृती' (Memory) आहे. एका प्रयोगशाळेत, वनस्पतींनी त्यांना पाणी देणाऱ्या व्यक्तीला (नर्चरर) आणि त्यांची पाने कात्रीने कापणाऱ्या व्यक्तीला (असॉल्टर) ओळखले. असॉल्टर खोलीत येताच, वनस्पतींच्या अंतर्गत विद्युत सिग्नलमध्ये वाढ होत असे आणि झाडे धोक्याचा सामूहिक अल्ट्रासोनिक इशारा प्रसारित करत असत. याउलट नर्चरर खोलीत आल्यावर झाडे शांत रहा...
Podcasts similares
Replaio no es editor de podcasts; los nombres de los programas, las portadas y el audio pertenecen a sus autores y se distribuyen a través de canales RSS públicos