Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Kids MR ↓ 2151 episodios

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

No dejes de visitar la web del podcast y apoyar a su creador: lifeofstories.buzzsprout.com

Autor

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Categoría

Kids

Último episodio

10 de oct. de 2026

¿Dónde escuchar?

Podcasts en la app Replaio Radio Muy pronto

Los podcasts llegarán muy pronto a la app. Instálala ahora y sé el primero en descubrir una forma totalmente nueva de vivir los podcasts

Descárgala en Google Play Instálala gratis Android casi 10 M de descargas · valoración de 4,8 iOS muy pronto

Episodios

# 2100 : "न्यूट्रल थिंकिंग" लेखिका डॉ. स्वाती गानू. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 13.08.2026

Send us Fan Mail आपल्या माणसांच्या चुका, सवयी लगेच डोळ्यात भरतात… पण त्यांच्यातलं चांगलं किती वेळा दिसतं?  एकदा जरा न्यूट्रल होऊन बघा, माणूसच वेगळा दिसायला लागतो!  इतरांकडे पाहण्याची ही नजर हळूहळू स्वतःकडेही वळते.  मग कळतं—आपणही काही कमी नाही… आणि काही परफेक्टही नाही!  चला, या मजेदार Neutral Thinking Game चा अनुभव घेऊया. =========

# 2101 : "देवाला हवं होतं फक्त एक पेला पाणी!" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 13.08.2026

Send us Fan Mail एक तरुण देवाच्या भक्तीत इतका रमला की त्याने जगातल्या सगळ्या सुखांकडे पाठ फिरवली. देवाने त्याला एकच काम दिलं—“मला एक पेला पाणी आण.” पण पाणी आणायला गेलेला तो एका सुंदर मुलीच्या घरी अडकला… म्हातारपणी देवासमोर पोहोचल्यावर त्याने विचारलं, “मला परत का पाठवलंस?” देवाने त्याला जे सांगितलं, ते ही गोष्ट ऐकल्यावर कदाचित आपल्यालाही काही गोष्टी नव्याने कळतील.

# 2099 : ऑस्ट्रेलियन रानटी उंट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 12.08.2026

Send us Fan Mail ऑस्ट्रेलियाच्या विस्तीर्ण आणि निर्जन अशा 'आउटबॅक' प्रदेशात लाखो उंट मुक्तपणे फिरत असतात. पण मध्य-पूर्वेकडील प्रदेशाची ओळख असलेल्या या प्राण्यांचे इथे इतक्या मोठ्या संख्येने असणे कसे शक्य झाले? खरं सांगायचं तर, मला तिथे उंट दिसण्याची अजिबात अपेक्षा नव्हती. पण, यांची येथील सध्याची संख्या १० ते १२ लाखांच्या दरम्यान आहे आणि ही संख्या दर आठ-नऊ वर्षांनी दुप्पट होत असल्याचे सां...

# 2098 : खिडकी जवळची जागा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 10.08.2026

Send us Fan Mail मी माझ्या खिडकीजवळच्या जागेवर बसलो होतो, तेवढ्यात साधारण सात वर्षांचा एक छोटा मुलगा त्याच्या वडिलांचा हात धरून माझ्या शेजारी आला. तो हळूच म्हणाला, “काका… जर तुमची हरकत नसेल, तर मला खिडकीजवळ बसता येईल का?” मी उत्तर देण्याआधीच त्याचे वडील म्हणाले , “सर, मला माफ करा. कृपया तुम्हाला काही बंधन वाटून घेऊ नका. तो विमानतळावर आल्यापासून खिडकीजवळ बसण्याचा हट्ट करत आहे. तुम्हाला तुमची जागा ठ...

# 2097 : उलटे लटकण्याची शिक्षा.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 08.08.2026

Send us Fan Mail स्वर्गातून पृथ्वीकडे पाहताना एकादशी देवीच्या मनात एक वेगळाच संघर्ष सुरू होता. संपूर्ण जगात तिचे भक्त अन्नाचा एक कणही न खाता, स्वतःला कष्ट देऊन तिचे कडक व्रत पाळत होते. पण तिची नजर जेव्हा पुरीच्या श्रीक्षेत्र धामावर पडली, तेव्हा तिथे तिला वेगळेच दृश्य दिसले. तिथे उपवासाची कोणतीही सक्ती नव्हती, तर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. "माझे एवढे कडक व्रत सगळे जग पाळते, मग पुरीचे...

# 2096 : एक नव्हे दोन महाशंख" ओशो (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 08.08.2026

Send us Fan Mail एक भक्त होता. भगवान शंकरांनी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला इच्छापूर्ती करणारा शंख दिला. पण त्याच वेळी त्याच्या नजरेस पडला त्याहून मोठा महाशंख , आणि त्याचा लोभ जागा झाला. हा महाशंख प्रत्येक गोष्ट दुप्पट देण्याचं वचन द्यायचा... पण त्याचं एक गुपित होतं. त्या गुपिताच्या नादात भक्ताने स्वतःच्या हातचं सुखही गमावलं. शेवटी त्याला असा धडा मिळाला की तो ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. चला...

# 2095 : गोष्ट खचणाऱ्या राजधानीची. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 06.08.2026

Send us Fan Mail इंडोनेशियाची राजधानी जकार्ता हे तुमारे तीन कोटी लोकसंख्येचे महानगर आहे. दक्षिण-पूर्व  आशियातील महत्त्वाच्या आर्थिक आणि व्यापारी केंद्रांमध्ये त्याची गणना होते. पण अनेक दशकांपासून या महानगरावर एक अदृश्य संकट घोंघावत आहे. जकार्ताची जमीन हळूहळू खचत चालली आहे. काही भागातील जमीन गेल्या काही दशकांत चार मीटर पेक्षाही अधिक खाली गेली असून काही ठिकाणी आजही १० ते २० सेंटीमीटर प्रती वर्ष या व...

# 2094 : मुंग्यांची महावसाहत. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 06.08.2026

Send us Fan Mail मुंग्यांची महावसाहत वैज्ञानिक कुतूहलाचा विषय असली तरी ती पर्यावरणासाठी मोठे आव्हानही आहे. अर्जेंटाईन मुंग्या आक्रमक परकीय प्रजाती मानल्या जातात. त्या जिथे जातात तिथे स्थानिक मुंग्यांच्या प्रजातींचा विस्थापित करतात. अन्नस्रोतांवर ताबा मिळवतात आणि जैवविविधतेला धोका निर्माण करतात.

# 2093 : "पापी मन मोरा" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 30.07.2026

Send us Fan Mail आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी असे विचार येतात, की ते कुणाला सांगायचं ही धाडस होत नाही. मग वाटतं, "आपण इतके वाईट आहोत का? मनात असे विचार आले म्हणजे आपण पापी ठरलो का?"  हाच प्रश्न एका शिष्याच्या मनाला इतका पोखरत होता की तो थेट गुरुदेवांकडे गेला आणि म्हणाला, "मला शिक्षा द्या!"  पण गुरुदेवांनी शिक्षा केली नाही. ते त्याला एका विषारी रोपट्यापाशी घेऊन गेले आणि ए...

# 2092 : "पारख." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 29.07.2026

Send us Fan Mail एक साधा कामगार, त्याने  गाढवाच्या गळ्यात बांधलेला एक चमकणारा दगड. तो दगड नेमका काय आहे, याची कोणालाच कल्पना नसते,                                                            जोपर्यंत एका रत्नपारख्याची नजर त्याच्यावर पडत नाही. पण खरी कथा तेव्हा सुरू होते, जेव्हा त्या अमूल्य हिऱ्याची किंमत फक्त पन्नास रुपये ठरवली जाते. त्यानंतर घडणारी एक अनपेक्षित घटना या कथेला अशी  कलाटणी देते, की ...

# 2091 : तिरुपती बालाजी ची कथा. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 28.07.2026

Send us Fan Mail तिरुपती बालाजी हे जगातील सर्वाधिक दान मिळणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे. पण या दानामागे नेमकी कोणती श्रद्धा दडलेली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?  भगवान विष्णूंनी खरोखरच कुबेराकडून कर्ज घेतले होते का? महर्षी भृगूंनी विष्णूंच्या छातीवर लाथ का मारली आणि त्यानंतर महालक्ष्मी वैकुंठ सोडून का गेल्या?  श्रीनिवास आणि पद्मावती यांच्या दिव्य विवाहाचा या सगळ्याशी काय संबंध आहे?  आणि आजही भक्तांचे...

# 2090 : अनुभव. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 25.07.2026

Send us Fan Mail अण्णांनी त्याचे १०० रुपये परत केले आणि त्याला एक कप चहा फुकट देत म्हणाले, "हा आहे 'आयुष्याचा चहा'... एका घोटात पिऊ नकोस. प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेत हळूहळू पी." आज तोच मुलगा बंगळूरमधील एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे. तो दर महिन्याला अण्णांना फोन करतो. आणि जेव्हा कधी तो पुण्याला येतो, तेव्हा तो सर्वात आधी अण्णांच्या दुकानात जातो. तो नेहमी दोन कप चहा मागवतो—एक स्वत...

# 2089 : दुसरं महायुद्ध संपल्यानंतरही तब्बल 29 वर्षे लढणारा सैनिक." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 24.07.2026

Send us Fan Mail दुसरं महायुद्ध १९४५ मध्ये संपलं. पण एका जपानी सैनिकासाठी ते तब्बल २९ वर्षांनी संपलं.  फिलिपिन्सच्या दाट जंगलात तो एका आदेशाशी आणि एका विश्वासाशी आयुष्यभर निष्ठावान राहिला. जग बदललं, पण त्याचं जग तिथेच थांबून राहिलं.  ही आहे लेफ्टनंट हिरो ओनोडा यांची अविश्वसनीय आणि हृदयस्पर्शी सत्यकथा. शेवटी ती प्रत्येकाला एकच प्रश्न विचारते, " आपणही नकळत एखाद्या संपलेल्या युद्धाशी आजही लढत तर...

# 2088 : "दोन बहिणींची पंढरीची वारी." लेखिका :नीता चं. कुलकर्णी. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 23.07.2026

Send us Fan Mail संपूर्ण आयुष्य संसारासाठी जगलेल्या एका आईची एकच इच्छा होती. एकदातरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करायची. पण वय, जबाबदाऱ्या आणि परिस्थितीमुळे ते स्वप्न अपुरंच राहणार असं वाटत होतं.  आणि अचानक आलेल्या एका फोनने तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळालं.  या वारीत तिला नेमकं काय मिळालं? विठ्ठलाचं दर्शन... की स्वतःचाच नवा शोध?  एका साध्या आईच्या हृदयस्पर्शी वारीची ही भावस्पर्शी कथा नक्की ऐक...

# 2087 : अंगारकी चतुर्थी ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 22.07.2026

Send us Fan Mail भारद्वाज महर्षी यांच्या सल्ल्यानुसार सूर्यदेवाचा पुत्र सवन याची पृथ्वी देवीने सात वर्षे देखभाल केली. त्यानंतर पुत्र सवनला ती महर्षींकडे घेऊन गेली. महर्षींनी आनंदित होऊन सवनचा स्वीकार केला. त्याचा उपनयन सोहळा करून, त्याला वेद आणि शास्त्रात पारंगत केले. महर्षींनी सवनला गणपती मंत्राची दीक्षा दिली आणि गणपतीची उपासना करण्यास सांगितले. सवनने गंगेच्या काठावर जाऊन श्रीगणेशाचे ध्यान केले....

# 2110 : "438 दिवस समुद्रात...!" ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 22.07.2026

Send us Fan Mail जगातला सर्वात मोठा महासागर म्हणजे प्रशांत महासागर . याच महासागरात, मेक्सिकोच्या किनाऱ्यावर मासेमारी करणारा होता जोसे साल्वाडोर अल्वारेंगा . त्याच्याकडे होती फक्त सात मीटर लांबीची एक छोटीशी नाव . एका दिवशी मासेमारीला गेलेला अल्वारेंगा वादळात सापडला. नाव भरकटली… इंजिन बंद पडलं… संपर्क तुटला… आणि सुरू झाला असा प्रवास, ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती. ना जमीन, ना माणूस… ना अन्नाची...

# 2086 : ती जीवंत असेल का..? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 20.07.2026

Send us Fan Mail "ती म्हणते, आयुष्यभर मला तुम्हाला धन्यवाद म्हणायचे होते. पण त्यासाठी साठ वर्षे लागली, त्याबद्दल तिला खेद आहे." जेम्सने तिचे हात घट्ट धरले, आणि उत्तर दिले: "तिला सांग, साठ वर्षे काहीच नाहीत. मला, एका अमेरिकन सैनिकाला इटलीतील युद्धभूमीवर एक बेवारस बाळ सापडले. त्याने त्या बाळाला ४० मैल खांद्यावर घेऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. त्यानंतर पुढील ६० वर्षे तो फक्त एकाच प्रश्न...

# 2085 : काय करायचं या रील्सचं? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 19.07.2026

Send us Fan Mail काही वर्षांपूर्वी वेटिंगमध्ये बसलेले लोक वर्तमानपत्र वाचायचे-काही मासिकं चाळायचे-काही एकमेकांशी बोलायचे-कुणी दुसऱ्या पेशंटशी ओळख काढायचा-डॉक्टर कसे आहेत याची चौकशी करायचा-एखादं मूल भिंतीवरच्या शरीररचनेच्या चार्टकडं बघून प्रश्न विचारायचं. आणि आता?  दहा माणसं बसलेली असतात पण तिथं एकही माणूस नसतो; सगळे कुठेतरी दुसरीकडे गेलेले असतात.. कुणी दुबईतल्या फूड ब्लॉगरसोबत-कुणी अमेरिकेतल्या प्...

# 2084 : शंभर कौरवांच्या जन्माची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 19.07.2026

Send us Fan Mail एकदा ऋषी व्यास लांबच्या प्रवासातून परत आले तेव्हा गांधारीने त्यांची खूप सेवा केली होती. तेव्हा त्यांनी गांधारीला आशीर्वाद दिला होता की तुला माझ्याकडून जे हवे ते तू मागू शकतेस. गांधारीने त्याच्याकडे शंभर पुत्र होण्यासाठी आशीर्वादमागितला होता. गर्भपातानंतर गांधारीने त्यांना बोलावून विचारले की, तूम्ही मला शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला आहे, पण त्याऐवजी हा देहाचा तुकडा जन्माला आला आहे....

# 2083 : "असा कसा हा मनुष्य स्वभाव" लेखिका सुधा मूर्ती. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 15.07.2026

Send us Fan Mail आपल्याला प्रत्येकालाच आयुष्यात कधीतरी कौतुकाची थाप मिळावी, असं वाटतं. पण त्या कौतुकासाठी एखादा माणूस अशी एक खोटी गोष्ट सांगतो... आणि काही क्षणांतच ती खोटी गोष्ट त्याच्याच समोर उघडी पडते! प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या आयुष्यात घडलेला हा अगदी खरा प्रसंग आहे. एका छोट्याशा गावात त्यांना भेटतो एक हुशार, सुसंस्कृत आणि अत्यंत आत्मविश्वासाने वागणारा तरुण. पण त्याने स्वतःच्या सुवर्णप...

# 2082 : माहेरपण. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 14.07.2026

Send us Fan Mail रसिकाचे अविनाशशी लग्न झाल्यावर पहिल्यांदाच तिची सासू, सुहासिनी उर्फ मंदाकिनी, तिच्याकडे शहरात काही दिवस राहायला आली. सुहासिनी रोज रसिकाला काहीतरी नवीन खायला करायला लावायची. जर रसिकाला नाही जमलं तर ते स्वतः बनवून खायची. रात्री मनाला वाटेल तेव्हा पर्यंत टीव्ही पाहायची, कधी कधी टीव्ही सुरु ठेऊनच झोपी जायची. सकाळी कधी आठ वाजता तर कधी नऊ वाजता उठायची. रसिकाच्या साड्या नेसून पाहायची. रस...

# 2081 : अंबा, अंबिका आणि अंबालिका. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) 11.07.2026

Send us Fan Mail महाभारतात अनेक प्रमुख आणि दुय्यम व्यक्तिरेखा आहेत. मुख्यत्वे कौरव, पांडव आणि श्रीकृष्ण यांच्या भोवती हि कथा फिरते. अंबा, अंबिका आणि अंबालिका या महाभारतातील अत्यंतमहत्त्वाची पात्रे झाल्या. काशी नरेश म्हणजेच, राजा काशीराज, यांच्या तीन कन्या होत्या. जेव्हा या तिघींचे स्वयंवर होणार होते त्यावेळी भीष्माने एकट्यानेच तेथे आलेल्या सर्व राजांना पराभूतकरून तिन्ही कन्यांचे हरण करून त्यांना ह...

# 2080 : "Project universe." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 08.07.2026

Send us Fan Mail कल्पना करा... एक असं जग जिथे अन्न, पाणी, सुरक्षितता आणि प्रत्येक सुखसोय भरपूर आहे. मग तिथे राहणारे जीव सर्वांत आनंदी असतील... असंच वाटतं ना? पण एका वैज्ञानिक प्रयोगाने हा समजच उलटा करून टाकला. "Universe 25" या जगप्रसिद्ध प्रयोगात उंदरांसाठी स्वर्ग निर्माण करण्यात आला, पण पुढे जे घडलं ते विज्ञानविश्वालाही हादरवून गेलं. हा प्रयोग आजही एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतो— केवळ...

2079 : "जगण्याचा उत्सव" लेखिका : ज्योती रानडे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 07.07.2026

Send us Fan Mail ही कथा ऐकताना एक प्रश्न सतत मनात राहतो,माणूस खरंच शरीराने हरतो, की मनाने?  बाईआजींनी आयुष्यभर स्वतःच्या अटींवर जगण्याचा निर्धार केला होता, पण नियतीने त्यांच्यासमोर एक अनपेक्षित वळण उभं केलं.  त्या वळणावर त्यांनी स्वतःशी, मृत्यूशी आणि जगण्याशी केलेला संवाद मनाला खोलवर स्पर्शून जातो. एका छोट्याशा जाणिवेने त्यांचं आयुष्य पुन्हा कसं उजळलं, हीच या कथेची खरी ताकद आहे.  शेवटी बाईआजी असा...

# 2078 : लोक म्हणताहेत पाऊस कोपलाय" लेखक समीर गायकवाड. प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) 07.07.2026

Send us Fan Mail पाऊस बदललाय की आपण? लोक म्हणतात, पाऊस कोपलाय... पण खरंच पाऊस बदललाय का? पूर्वी माणसांशी, झाडाझुडपांशी संवाद साधणारा पाऊस आज वर्षाची सरासरी काही दिवसांत का गाठतोय? की घाईच्या जगात तोही आपल्यासारखाच धावायला लागलाय? पाऊस चुकलेला नाही... तो फक्त आपल्याच बदललेल्या जगण्याचं प्रतिबिंब दाखवतोय. निसर्ग, माणूस आणि हरवलेल्या निवांत क्षणांची ही हळवी गोष्ट...

Escucha el podcast Life of Stories en Replaio

Radio y podcasts en una sola app - gratis y sin registro. Instálala hoy y no te pierdas el estreno

Descárgala en Google Play

Replaio no es editor de podcasts; los nombres de los programas, las portadas y el audio pertenecen a sus autores y se distribuyen a través de canales RSS públicos